Wednesday, 12 February 2025

शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा pl share

 शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे;

राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत 

महामेट्रोने समन्वयाने काम करावे

-         उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबईदि. 12 :- शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असूनती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार होण्याबरोबरच वेळेत व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वाच्या प्रकल्पांसाठी चांगले विकसक मिळण्यासाठी 99 वर्षाचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शिवाजीनगर येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत आज उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळशिवाजीनगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, ‘महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे)महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरपरिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकरनगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा घेतलेला निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे. हा प्रकल्प निर्धारीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी येत्या महाराष्ट्र दिनी (दि. 1 मे 2025) या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्यादृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत. शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो सार्वजनिक खासगी भागीदारी’ या तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. त्यासाठी महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वारगेट येथे अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक त्या कार्यवाही पूर्ण कराव्यात. शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानकाच्या विकासाचा प्रकल्पसुद्धा पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असूनतो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

          आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.

          वाहनतळासाठी दोन तळघर.

          किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.

          बसस्थानक तळमजल्यावरबसआगार पहिल्या मजल्यावर आणि बसवाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.

          शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

 मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने

मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार

-  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. 12 : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सकाळ ग्रुपचे बॉबी निंबाळकर आदी उपस्थित होते.

            छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगित तत्वावर राबवण्यात यावा. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने मूल्यमापन करावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये किती आणि कशी वाढ झाली आहे, मच्छिमारांना कशा प्रकारे फायदा झाला याचा या मूल्यमापनामध्ये समावेश असावा. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागाने त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मंत्री श्री. राणे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर हे 2026 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा आणि तो तातडीने राबवण्याचे नियोजन करण्यात यावे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्यतः किनारपट्टीच्या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. जेणेकरून किनारपट्टीच्या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येईल. वाढवण बंदरासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती राज्यातूनच पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. तरी याविषयीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

            मच्छिमारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शाश्वत मासेमारी व्यवसाय, पर्यावरण स्नेही मच्छिमारी, मच्छिमारांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांची सुरक्षा,  अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असणार आहे.

0000

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती

 एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे 

राज्यात दुसरी निल क्रांती

-  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. 12 : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते.  

यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि प्रगत कायद्यासाठी दक्षता अंमलबजावणीचे संचालक बी.व्ही. सत्यसाईकृष्णा आदी उपस्थित होते.

            सागरी सुरक्षा तसेच मच्छिमारांची सुरक्षा हा महत्वाचा विषय असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे करता येईल याचा आराखडा तयार करावा. तसेच मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, मच्छिमारांची सुरक्षा निश्चित करणे, मच्छिमार नोंदणी, मच्छिमारी नौका नोंदणी, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, मासळी विक्रीची व्यवस्था, त्याची वाहतुक, आपत्तीच्या काळात राबवावयाची सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा यासाठी एआयचा वापर करावा. अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर ससून डॉक येथे उभारण्यात यावे. त्याचे मुल्यमापन करून सर्व राज्यभरात ही प्रणाली कशा प्रकारे लागू करता येईल यासाठी चाचपणी करावी. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे त्याचबरोबर राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ करुन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलणे शक्य असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

            ससून डॉक येथे उभारण्यात येणाऱ्या या एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीमध्ये मासळीचे मूल्यमापन, आपत्तीच्या काळात मच्छिमारांची सुरक्षा, मासळी आजारांचां शोध  घेणारी प्रणाली, एआय आधारित मासळी बाजार प्रणाली, सागरी सुरक्षा, सागरी गस्त, बेकायदेशीर मासेमारीवर लक्ष ठेवणे व त्याला आळा घालणारी प्रणाली, मच्छिमार कल्याणाच्या योजनांची देखरेख करणारी प्रणाली यांचा समावेश असणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मासळीचे उत्पादन वाढीसाठीही मदत होणार असून पारदर्शकता येणार आहे.

गंगा नदीच्या सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र pl share

 *🙏गंगा नदीच्या  सुरुवातीपासून सागराला मिळेपर्यंतच्या प्रवासाचे सुरेख चित्र.. त्यात तीला येऊन मिळणार्या नद्या आणि ज्या ज्या राज्यातून ती जाते त्यातील तिचा किती प्रवास होतो हे ही आहे.  आपण सर्व या नदीला का पवित्र मानतो हे यातून कळतं* 👌


नाशिक शहरातील मराठा समाजाने आज एक चांगला निर्णय, सर्वांनीच अनुपालन करावा असा

 नाशिक शहरातील मराठा समाजाने आज एक चांगला निर्णय घेतला मराठा समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त  आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग याचे अनुकरण करत ईतर काही समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरवले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका  छपायची नाही तर फक्त whatsapp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे*

*खास निर्णय म्हणजे  प्रि- वेडींग व संगीत संध्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे*

       *वरील  समाज आर्थिक दृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले, त्या बद्दल त्या सर्व समाजाचे अभिनंदन*


      *आपण कधी बदलणार, आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत, वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो, आता आपण बदलेले पाहिजे हे नक्की.*

*नोट :- आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे मनापासून स्वागत करा . आणि सर्व जाती धर्म पंथ यांनी या निर्णयाचे सर्वांनी पालन करा* .


*समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे.*


 *काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने  लक्षात आली होती,परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु उधळू लागले.*

 *आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत .आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.*


*१)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे.*

*२) शेती मालाला भाव नाही.*

*३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत.*

*४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही.*

*५) मुलीच्या लग्नाला १००००००/- रु खर्च येत असेल तर मुलालाही ८००००००/- रु खर्च येतो.*

*६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरतो आमच्या काही पिढ्या गेल्या.आता तरी डोळे उघडले पाहिजेत.*

*७) विवाह हा सोहळा नाही तर तो ' संस्कार ' आहे .१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे.*

*८)  कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही*

*९) आपण शेती विकून गुंठ्यावर आलो, तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करत आहे. व्यापारीवर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे.*

*१० ) इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे.*

*११) भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको.*

*१२ ) वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे.*

*१३) वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपली मुलगीच आहे. ही भावना रुजली पाहिजे.*

*१४) जेवणावळी, मानपान ही पद्धत बंद करून खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा.*

*१५) संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच.*

*१६) मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा.*

*१७) क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २० - २० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ?*

*१८) मोजक्याच लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो.*

*१९) लग्न पत्रिकेचा खर्च वाचून लग्नपत्रिका व्हाट्सअप वरून पाठवावी व संबंधित व्यक्ती पत्रिका पाठवल्यानंतर फोन करून आग्रहाचे निमंत्रण द्यावे पुन्हा आठवणीसाठी फोन परत लग्नाच्या अगोदर दोन दिवस करावा*

*२०) कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केला पाहिजे*


*फक्त वाचू नका....!*

*विचारही करा....!*

*(समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत हा मेसेज पोहचवा.)*

        *🙏🏻ही नम्र विनंती.*

       *💯हि काळाची गरज आहे.

- *श्री सूभाष बाळासाहेब पाटील सर*

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७' हेल्पलाइन · मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन १४५६७हेल्पलाइन

·         मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध

 

मुंबईदि. ११ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी 'एल्डरलाईन - १४५६७ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.

राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी)सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र शासनसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.

    या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी१५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकतावृद्धाश्रमडे केअर सेंटरपोषणसांस्कृतिककलाज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादनेआणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.

   वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयकमालमत्ताशेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरणआर्थिकनिवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरणनातेसंबंध व्यवस्थापनमृत्यूशी संबंधित भीती निवारणवेळताणराग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापनमृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते.

 यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्षअप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.

0000

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे कडून उत्पादित केलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीमीटर ग्राहकांनी खरेदी न करण्याचे वैधमापनशास्त्र, मुंबई यांचे आवाहन

 उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे कडून उत्पादित  केलेल्या ऑटोरिक्षाटॅक्सीमीटर ग्राहकांनी खरेदी न करण्याचे वैधमापनशास्त्र, मुंबई यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. ११ : मे.ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर त्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने काही फेरबदल केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल होती. या याचिकेवर दि.३१/०१/२०२५ रोजी सुनावणी होऊन मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी उत्पादीत केलेल्या ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर (Model Approval No.-IND/०९/०६/१६३) ची विक्री व वितरण पुढील आदेशापर्यंत तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

            उच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून सर्व ऑटोरिक्षा/टॅक्सी चालक/मालक यांना मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची पुढील आदेशापर्यंत खरेदी करु नये तसेच आपल्या वाहनावर मीटर न बसविण्याची दक्षता घेण्याबाबत आवाहन नियंत्रक वैधमापनशास्त्र मुंबई यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे कंपनीकडून उत्पादित केलेल्या ऑटोरिक्षा, टॅक्सीमीटर ग्राहकांनी उच्च न्यायालयाकडून पुढील आदेश होईपर्यंत खरेदी न करण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र मुंबई यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi