Monday, 10 February 2025

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश Pl share

 ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर

विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

 

मुंबई, दि. 10 : मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटर ची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीपुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ अन्वये उत्पादित केलेल्या मीटरची खरेदी करु नये तसेच वाहनावर हे मीटर न बसविण्याचे आवाहन नियंत्रणवैद्यमापनशास्त्र यांनी केले आहे

मंत्रालय प्रवेशासाठी ‘फेस डिटेक्शन’ न झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालय सुरक्षा व पारदर्शकेत वाढ

 मंत्रालय प्रवेशासाठी फेस डिटेक्शन’ न झालेल्या

अधिकारी व कर्मचाऱ्यांची फेरनोंदणी

एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालय सुरक्षा व पारदर्शकेत वाढ

 

मुंबईदि. 10 : मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस’ तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदत होणार आहे. शासकीय अधिकारीकर्मचारीलोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावीजेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस डिटेक्शन न झाल्यामुळे मंत्रालय प्रवेशास विलंब किंवा अडथळा होत असल्यास अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अद्ययावत छायाचित्रासह फेर नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मंत्रालयात कामानिमीत्त येणाऱ्या  अभ्यांगताना व क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी  यांना डिजी प्रवेश’ या अॅप आधारीत ऑनलाईन प्रणालीमार्फत मंत्रालय प्रवेश सुनिश्चीत करण्यात येणार असून त्याबाबत पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

            या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. तसेच अनधिकृत प्रवेश व अनधिकृत प्रवृत्तींना चाप बसणार आहे. या प्रणालीमुळे अनुचित प्रवेश रोखले जाणार असून मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता येईल. तसेच लोकांची कामे जलद गतीने होण्यास मदत मिळणार आहे.

            मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची आस्थापना असल्याने या आस्थापनेची सुरक्षा महत्त्वाची बाब आहे. त्याअनुषंगाने मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला आहे. मंत्रालय अंतर्गत सुरक्षा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे.  मंत्रालय परिसर एकात्मिक सुरक्षा आणि देखरेख अंतर्गत टप्पा 2 प्रकल्प हा टप्पा 1 प्रकल्पाचा नैसर्गिक विस्तार म्हणून राबविण्यात येत आहे.

            या प्रकल्पांतर्गत मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेसीअल रिकॉग्नीशन’ व आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्याबाबत तरतूद आहे. याकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील 10 हजार 500 अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांचा तपशिल या प्रणालीमध्ये भरण्यात आलेला आहे. तसेच सर्व मंत्री कार्यालयेसंसदेचे व विधानमंडळाचे सर्व विद्यमान व माजी सदस्य यांचा तपशिल मागविण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेसीअल रिकॉग्नीशन’ यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.   जानेवारी 2025 पासुन मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांना फेसीअल रिकॉग्नीशन’ व आरएफआयडी’ कार्ड आधारित प्रवेश देण्यात येत आहे.           

मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना दि.26 सप्टेंबर 2023 रोजीच्या  शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यामधील सुचनेनुसार बाहेरील खाद्यपदार्थ मंत्रालयात आणण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा भाग म्हणून अभ्यागतांजवळील पाण्याच्या बॉटल्सऔषधे व इतर पदार्थ प्रवेशद्वार येथेच काढून ठेवण्यात येत आहेतअसे गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

ग्रामीण कला, संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्षमी सरस' ला आवर्जून भेट द्यावी प्रदर्शन दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

 ग्रामीण कला, संस्कृती अनुभवण्यासाठी 'महालक्षमी सरसला आवर्जून भेट द्यावी 

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०२५ ला दि. ११ फेब्रुवारी पासून सुरुवात

मुंबई दि. १० - ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री होऊन ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाला व उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वैविध्य पूर्ण उत्पादनेग्रामीण कलासंस्कृतीचा अवश्य लाभ घ्यावाअसे आवाहन ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. 

राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये ५०० पेक्षा अधिक स्टॉल

ग्रामविकास व पंचायत राज विभागमहाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५  उद्घाटन सोहळा दि. ११ फेब्रुवारी२०२५ रोजी बांद्रा कुर्ला संकुलमुंबई येथे होत आहे.

या   राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये ५०० पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४०० आणि इतर राज्यातून साधारण १०० स्टॉल असणार आहेत. याशिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुगरणीचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ८० स्टॉलचे भव्य असे फूड कोर्ट असणार आहे.

मुंबईकरांच्या विशेष पसंतीच्या असलेल्या या भव्य प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना होणार आहे. हे प्रदर्शन प्रशस्त मोकळ्या पटांगणात असून वातानुकूलित असल्याने मुंबईठाणेनवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांना प्रदर्शनाचा आरामदायी अनुभव घेता येणार आहे. तो घेण्यासाठी मुंबईठाणे आणि जवळच्या सर्व महानगरातील नागरिकांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.  

प्रदर्शन   दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान

सरस महालक्ष्मी या प्रदर्शनाला दि. ११ ते २३ फेब्रुवारी,  या कालावधीत भेट देता येणार आहे.

या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूहातमागावर तयार केलेले कपडेवुडन क्राफ्टबंजारा आर्टवारली आर्ट च्या वस्तू याशिवाय अनेक प्रकारच्या ज्वेलरीलहान मुलांसाठी लाकडी खेळणी व इतर राज्यातील दुर्मिळ वस्तूंची रेलचेल असणार आहे. या ठिकाणी  प्रमाणित असे सेंद्रिय पदार्थ प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे  यांच्या नेतृत्वात  ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिवएकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे  भव्य आयोजन करण्यात येत  आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

उमेद  हे राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिकसामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अभियानामार्फत या महिलांना अनेक प्रकारची कौशल्ये व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे दिली जातात. आज अभियानाच्या माध्यमातून लाखो महिला सक्षम उद्योजिका म्हणून अनेक उत्पादनांची निर्मिती करत आहेत.  त्यांनी तयार केलेली ही विविध उत्पादने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून दरवषी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन आयोजित केले जाते. आतापर्यंत मुंबईनवी मुंबईनागपूर या ठिकाणी महालक्ष्मी सरस चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

****

या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव

 या वर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 10 : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगप्रसिद्ध आहे. त्याचे महत्त्व आणि व्याप्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी यावर्षीपासून लोणार पर्यटन महोत्सव सुरू करण्याची घोषणा पर्यटनखनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

 मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीस माजी आमदार संजय रायमुलकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन विभागाचे संचालक  डॉ.बी. एन. पाटील‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीबुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जगात उल्कापातामुळे तयार झालेली तीन सरोवरे आहेत त्यापैकी एक बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये आहे. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठी राज्याच्या पर्यटन विभागातर्फे यावर्षी पासून लोणार पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधी व संबंधितांची लवकरच बैठक घेऊन महोत्सवाची तारीख व वेळ घोषित करण्याचे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

 आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे

- सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

 

मुंबई, दि. 10 : आयुष्यमान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावेअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बोंदरेवित्तीय सल्लागार प्रमोद पेटकरमहाव्यवस्थापक (प्रशासन) सुनील सोवितकरमहा व्यवस्थापक (ऑपरेशन) रामेश्वर कुंभार उपस्थित होते.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या कीमोफत आरोग्य सुविधेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आयुष्मान भारत योजना कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे. यासाठी प्रभावी जनजागृतीआशा कार्यकर्त्याअंगणवाडी सेविकाआणि ग्रामसेवक यांच्या मदतीने घरगुती सर्वेक्षण व लाभार्थी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात यावीअशा सूचना राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिल्या.

प्रधाननमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ  जास्तीत जास्त रुग्णांना होण्यासाठी व तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावीअसेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी आरोग्य सुविधामनुष्यबळ आदीबाबींचा आढावा घेतला.

0000

लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

 लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती द्या

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई दि. 10 : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या परिसरास भेट देण्यासाठी जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. यादृष्टीने परिसरातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश पर्यटनखनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयातील दालनात लोणार सरोवराच्या जतनसंवर्धनआणि विकास आराखडा संदर्भात बैठक झाली. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटीलएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीतसेच व्हीसीद्वारे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटीलसहाय्यक वनसंरक्षक चेतन राठोडपुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक उपस्थित होते.

 

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघण्यासाठी सामान्य पर्यटकांसह संशोधन करणारे पर्यटकही जगभरातून मोठ्या प्रमाणावर येतात. संशोधनासाठी नासाचे शास्त्रज्ञही अनेकवेळा येथे येत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी योग्य सुविधा देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यात यावी. पर्यटन विभागाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यटक लोणार सरोवराकडे आकर्षित व्हावे यासाठी त्या ठिकाणी तारांगणसंग्रहालयचिल्ड्रन पार्कगार्डन एमटीडीसीचे रेस्ट हाऊसचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले. या ठिकाणी पर्यटकांना सोयीचे व्हावे म्हणून रोपवेची सुविधा करता येईल का, यासंदर्भात पाहणी करावी.

जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला....

 हे माहीती आहे का ?


👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने  स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला....

तो राजा म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील पहिलीच "जमीन

सातबारा पद्धत" सुरु करणारे आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे

निर्माते -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना

"पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे

जगवा"

म्हणजेच सामाजिक वनीकरण ही

संकल्पना सत्यात उतरवणारे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि

मृत्यु किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे

आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे

झाले तरी आजही १२०+ देशात अभ्यास

चालु आहे असे एकच जिजाऊंचे पुत्र -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगाच्या इतिहासातील पहिलेच स्वराज्य ज्या काळात

एकही भिकारी कधी पहायला

मिळत नव्हता त्या सुवर्णकाळाचे साक्षात् परमेश्वर -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

👉 जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड"

जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी

राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते

म्हणजे -

छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🙏

 👉छत्रपती शिवाजी यांचा फोटो भारतातील काही लोकाना  १००० च्या नोटेवर हवेत


पण एक  कवी कवितेतून  काय म्हणतो ते पहा ••••

👇


"नकोय शिवराय नोटेवर"


नकोय शिवराय

आम्हा नोटेवर |

विकला जाईल 

तो वाटेवर ||


आहेत समाजात 

काही दरिंदे |

नाहीत ते

कुठलेच परिंदे ||


घेऊन जातील शिवराय

दारुच्या अड्यावर |

लावतील त्यालाही

सट्यावर ||


म्हणतील,

शिवराय

 घ्या |

अन् 

दारू द्या ||


होतील ते 

पिऊन  तराट   |

माजवतील कल्लोळ 

घरात ||


नाचणारींवर जाईल

पैसा उधळला |

नाचता-नाचता तोही

जाईल तुडवला ||


फोफावला आहे

भ्रष्टाचार |

नाही उरलेला

शिष्टाचार   ||  


भाटाच्या ताटी

जाईल थोपवला |

गणीकांच्या हाती

जाईल शिवराय सोपवला ||


खाटीकाच्या दुकानात

जातील घेऊन त्याला |

मंदिरात  येतील

देवासमोर ठेवुन त्याला ||


नाही विकणाऱ्यांमधला तो |

नाही मांडायचा

आम्हाला त्याचा शो ||


फाटुन जाईल

हृदय आमचं |

नाही ऐकणार

आम्ही तुमचं ||


राहुद्या तुमचा

गांधीच नोटेवर ||


शिवराय आमचे 

शोभतात सिहासनावर  || 


💐💐 जय शिवराय  💐💐

मित्रांनो आपले मत काय आहे , कृपया पाठवा जर योग्य असेल तर पुढे पाठवा.🚩🚩🚩🚩🚩🚩

मला आलेली पोस्ट मला पटली म्हणून पुढे पाठवित आहे.


.

धन्यवाद.

जय शिवाजी जय भवानी,

जय महाराष्ट्र,जय अखंड भारत.

Featured post

Lakshvedhi