Tuesday, 11 February 2025

सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक

 सिंगापूरसोबत व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र उत्सुक

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 10 : भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारेपर्वतरांगाअभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण फळेफुलेभाजीपाला अशी मुबलक कृषी संपदा असून सिंगापूरने व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढे यावेमहाराष्ट्र आपले स्वागत करेलअसे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

सिंगापूरचे महावाणिज्य दूत चिओंग मिंग फुंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबाबत चर्चा झाली.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.फुंग यांना माहिती दिली. जगप्रसिद्ध हापूस आंबास्ट्रॉबेरीसह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळफळेभाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. सिंगापूरला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावामहाराष्ट्राच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी सिंगापूर करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

0000

उपराष्ट्रपती तसेच उपसभापती यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

 उपराष्ट्रपती तसेच उपसभापती यांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सदिच्छा भेट

उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती  जगदीश धनकड यांची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ आणि राज्यसभेतील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.

उपसभापती हरिवंश सिंह यांच्यासोबतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चर्चा केली. असंघटित  कामगारसामाजिक न्याय यावेळी यासंदर्भात चर्चा झाली.

0000

संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

 संसदीय प्रक्रियेतील सक्रीय सहभाग गरजेचा : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वाधिक दिवसांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळ सदस्यांनी शून्य तासप्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक्रिया प्रभावीपणे वापराव्यात आणि सभागृहात सक्रिय सहभाग घ्यावाअसा आग्रह त्यांनी व्यक्त केला.

सभागृहातील उपस्थिती शंभर टक्के असावीसंसद व विधीमंडळाच्या जुन्या चर्चांचा अभ्यास करावातसेच विषयाचा सखोल अभ्यास करून प्रभावी लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे जितेंद्र भोळे (सचिव-१) आणि विलास आठवले (सचिव-२) हेदेखील उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी 'विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण' कार्यक्रमाचा समारोप

 उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते

11 फेब्रुवारी रोजी 'विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणकार्यक्रमाचा समारोप

 

नवी दिल्ली दि.10 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन संसदीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (प्राइड) च्यावतीने करण्यात आले. प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते होणार आहे

कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते.

राज्यातील नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्यासाठी प्रशिक्षण संस्थान प्राइड (PRIDE) च्या द्वारे आयोजित या कार्यक्रमात विधीमंडळीय मसुदा लेखन (लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग) कौशल्य आणि संसदीय समित्यांच्या कार्यकुशलतेचे महत्त्व प्रशिक्षण कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही पणन विभागाचे स्पष्टीकरण

 सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून 

नव्याने मुदतवाढ नाही

पणन विभागाचे स्पष्टीकरण

 

मुंबईदि. १० - महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दि. १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.

       

काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसृत झाले. तथापि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दि. ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 

महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार

 

नवी दिल्ली दि. 10 :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  सरहदपुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहेअशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली.

11 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल.

५ लक्ष रुपयेमानपत्रसन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

               कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

0000


जिन्दगी का साथ निभाते चला......

 तीन मनोरंजक लघु कथा. या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. या कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल. तुम्हीही वाचा आणि आवडल्यास पुढे पाठवा.


१. "गहन"


मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"


तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."


मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"


तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसत नाही!"


किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?


२. "थकलेला"


आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.


ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.


बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!


मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.


३. "थांबा"


एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."


त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"


त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या शिटापाशी उभी राहिली.


ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"


तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं. 


या तीन गंमतदार छोट्या गोष्टी इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही त्यांना शेअर केल्याशिवाय राहूच शकणार नाही. मग उशीर कशाला? तुम्हीही द्या पाठवून पुढे, इतरांनाही थोडं हसू द्या. 😊

Featured post

Lakshvedhi