Sunday, 9 February 2025

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

 माजी सैनिकमाजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

 

मुंबई दि.8:-. मुंबई शहर जिल्ह्यातील माजी सैनिकमाजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in व www.ksb.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ओळखपत्रपाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारले जाणार नाहीमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

1. ओळखपत्र,2. डिस्चार्ज बुक3. आधार कार्ड4. पी.पी.ओ.  (PPO)5. पॅन कार्ड6. पासपोर्ट साईज फोटो7. पेन्शन बँक पासबुक8. ई.सी. एच. एस. कार्ड9. ई-मेल आयडी

10. दूरध्वनी क्रमांक

अधिक माहितीसाठी क्रमांक 022- 22700404 / 8591983861 या कार्यालयीन दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा

 🦋🪴🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. *🫓नैवेद्य🫓*



तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा.


त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत पांच रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं.


त्याच्या साध्या कपड्यांवरून व सायकलच्या वापरावरून तो एक निम्नवर्गीय गरीब भक्त आहे, हे सहज लक्षात येत होतं. 

कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला सोबत घेऊन यायचा, तेव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा. 

एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे.


त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यानं आणि विश्वस्तांनी पाहिलं नव्हतं.

 त्यामुळं तो आदराचा विषय झालेला होता.


अशी वीस वर्षं उलटून गेली… 

महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्यानं आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही. 

आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व स्कुटर, मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात…

 मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही.


अलीकडे त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्तीचं असावं, असं जाणवत होतं; तरीही दानपेटीतला पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबानं चुकविला नाही… 

त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. 

कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही.


त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिलं देखील; मात्र हा आपणहून कुणाशी बोलत नसे किंवा आपलं दुखणं सांगत नसे. 

सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता.


एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिय्या केला व आपुलकीनं त्याला विचारलं,


“सध्या तुम्ही चिंताग्रस्त दिसता… 

तुमचं काम सुटलंय का? 

कसली चिंता भेडसावतेय?”


तो कसंनुसं हसला. 

म्हणाला, “काही नाही हो… 

मुलीचं लग्न ठरलंय आणि पैशाची जोडणी काही झालेली नाही. 

स्थळ चांगलं आहे. हातचं जाऊ नये असं वाटतंय. 

पण आता हात तरी कुणाकडे पसरायचे? 

मी हा असा पैशानं दुबळा. 

कामाचा मालकही फारसं कांही उचलून द्यायला तयार नाही… 

म्हणून काळजीत आहे, इतकंच. बघू, देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते?”


_“अरे, पण खर्च तरी किती येणार आहे?”_

 विश्वस्त.


_“पंचवीस-तीस हजार तरी नक्की लागणार हो!”_ तो म्हणाला.


त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना. 

रात्री झोपतानाही त्याचाच विचार. 

रात्री वरचेवर जाग आल्यामुळं झोपदेखील नाही झाली.


पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडलं… 

स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता. 

जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं , खाऊ लागलं… 

त्यानं देवाकडे पाहिलं. 

तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला.


तो पटकन उठला. 

वही घेतली व हिशोब करू लागला… 

एकूण वर्षे वीस, म्हणजे एकूण दिवस ७३००. 

दररोज रुपये पाच प्रमाणं झाले रू. ३६,५००/-. त्याने ३६,५०० रुपयांची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला.


झोपेत पुन्हा तेच स्वप्न!

 तो जागा झाला व आठवू लागला… 

पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवत होतं. 

दानपेटीतले जमा पैसे आपण ‘एफडी’त ठेवतो हेही त्याला आठवलं.


त्यांनं हिशोब केला. 

सरासरी जमा रुपये १८,२५०/- वर्षाचे अंदाजे व्याज २०००/-. वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी!


तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्यानं देवाच्या तिजोरीतून ७६,५०० रुपयांची थैली तयार करून ठेवली. 

आता त्यास शांत झोप लागली.


नेहमीप्रमाणं दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. 

त्यानं देवाला नमस्कार केला. 

तिथल्या दानपेटीत पाच रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला.


तो विश्वस्त देवळातल्या आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथं आला व त्यानं ती थैली त्या गरिबाला दिली व म्हणाला,


“बाबा रे, तू दररोज पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत देवाला ३६,५०० रुपये वाहिलेस. 

वीस वर्षांत त्याचे ७६,५०० रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत. 

आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत… 

म्हणून तुझे पैसे तू मोजून घे!”


गरीब चकीत झाला.

 त्याला दिवसाउजेडी जणू कांही मोठं स्वप्न पडलं होतं!

 तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला…

 सर्वजण खूप भावूक झाले.

 देव प्रसन्न हसत होता. 


गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. 

तो मात्र थैली घेऊन तिथंच बसून राहिला. 

त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली. 

त्यानं घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितलं.

 त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले.


आता पत्नी व मुलगी त्याला घरी चलण्यासाठी विनवू लागली…

 पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. 

‘माझं दान देवानं परत तर नाही ना केलं?’_ असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं.


काय करावं, त्याला सुचेना. 

त्यानं विश्वस्ताला बोलावलं व विचारलं, 

_“मी जे देवाला रोज पाच रुपये वाहिले, त्याचे वीस वर्षात किती होतात?”_


_“३६,५०० रुपये होतात.”_ विश्वस्त म्हणाले.


गरीबानं थैलीतले ३६,५०० रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले. 

आता त्याच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला.


सर्व उपस्थित चकित झाले. 

त्यांनी त्याला विचारलं, 

_“हे तू काय केलंस?”_


तो म्हणाला, _“मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. 

तो मी माझ्यासाठी देवाला दिलेला नैवेद्य होता. 

उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनानं देवाला वाहीन. 

अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. 

आता मला शांत झोप लागेल. 

देवानं दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल. 

आता मी घरी जातो…”_


आणि प्रसन्न चेहऱ्यानं ते कुटुंब घरची वाट चालू लागले.

 देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता!



थेंबाथेंबानं देवाकडे आपण साठविलेली कोणतीही गोष्ट; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतरानं अशी महाकाय होत असते व आयुष्यातल्या कठीण वेळा सहज दूर करते!


*आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य*

*कधीच वाया जात नाही…*

*केव्हा ना केव्हा आयुष्याच्या*

*कुठल्यातरी टप्प्यावर ते तुम्हाला*

*त्याचं फळ देऊन जातं…!*    नमस्कार good morning all 🤗

लंगडे की चौकी हनुमान मंदिर,*

 *लंगडे की चौकी हनुमान मंदिर,* 


आग्रा, उत्तर प्रदेश


संकलन - सुधीर लिमये पेण 


मथुरा आग्रा फिरोजाबाद रोडजवळ सिव्हिल लाईनमध्ये लंगडे की चौकी नावाचे हनुमानजींचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे लंगडे की चौकी मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन आहे.


मंदिर राजा भोजच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. अकबरही या मंदिराच्या वैभवापुढे नतमस्तक झाला होता. त्यावेळी सिव्हिल लाईन जवळ सुरक्षा चौकी होती. त्यावर एक शिपाई पहारा देत असे. जवळच हनुमानाचे मंदिर होते. त्याकाळी या मंदिरात रामकथा असायची, या मंदिरात चौकी वरचा पहारेकरी कथा ऐकण्यासाठी रोज येत असे. पहारेकरी चौकी सोडून मंदिरात जात असल्याची तक्रार मुघल सैनिकांनी पोलिस ठाण्यात केली.


रागाच्या भरात कोतवालने मंदिरात जाऊ नये म्हणून चौकीदाराचा पाय कापला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पहारेकरी मंदिरात गेल्याची बातमी त्याला समजते. त्यामुळे संतप्त झालेल्या कोतवालांनी रामकथा गाठली. जिथे लंगडा चौकीदार बसला होता. हे दृश्य पाहून तो पुन्हा चौकीवर गेला आणि तो लंगडा चौकीदारही चौकीवर बसलेला दिसला. हा चमत्कार पाहून कोतवालला धक्काच बसला. त्याने ही घटना अकबराला सांगितल्यावर अकबरलाही आश्चर्य वाटले.


या घटनेनंतर हे मंदिर लंगडे की चौकी म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण त्या लंगड्या चौकीदाराच्या जागेवर हनुमानजी महाराज स्वतः पहारा देत होते. त्यानंतर चौकीदाराला महावीर हनुमानजींचे दर्शन होऊ लागले. त्यानंतर त्यांनी दान करून येथे हनुमान मंदिर बांधले. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.


जवळपासच्या राज्यातून आणि भागातील लोक येथे विशेषत: दर मंगळवारी प्रार्थना करण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. 


विशेषत: हनुमानजी महाराजांना चोळा अर्पण करण्यासाठी अनेक लोक दर मंगळवारी येथे येतात. लंगडे की चौकी मंदिरात दर मंगळवारी फुलांचा बंगला भव्य पद्धतीने सजवला जातो. बंगला सजवण्यासाठी आजूबाजूच्या परिसराव्यतिरिक्त लोक परदेशातूनही फुले आणतात. प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी फुलांचा बंगला सजवण्यासाठी बुकिंग असते. 




मुकुंदराय धारैया‌ 

भारत के प्रसिद्ध मंदिर

Saturday, 8 February 2025

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 जयपूर डायलॉग हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जयपूर डायलॉग डेक्कन समिट

 

पुणेदि. 8 : जयपूर डायलॉगने राष्ट्रीय विचारांना एक व्यापक मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच इतिहास आणि संस्कृती नव्या पिढीसमोर आणण्याचे कार्यही या माध्यमातून केले जात आहे. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हॉटेल हयात येथे  आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या 'जयपूर डायलॉग'च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधलात्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेप्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणे आवश्यक आहे. जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याचीखात्री करून घेण्याचीशोध घेण्याचीनवनवीन विषय हाताळण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे. महाराष्ट्रातील नव मतदारांच्या संख्ये संदर्भात ते म्हणालेभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये व्यापक मतदार जनजागृती अभियान घेऊन मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली. याआधी फक्त १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवाराला मतदार यादीत नाव नोंदणी करता येत होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार १ जानेवारी१ एप्रिल१ जून  व १ सप्टेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवा मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली असेही त्यांनी सांगितले.

 

एक होतं गाव.* *"महाराष्ट्र" त्याचं नाव.*

 (a forward)  *नम्र विनंती ह्या पोस्ट ला लॉईक कॉमेट नाही केलात तरी चालेल पण वाचुन फॉरवर्ड कराच*


*एक होतं गाव.* 

*"महाराष्ट्र" त्याचं नाव.* 

*गाव खूप छान होतं,*

*लोक खूप चांगले होते.* 

*"मराठी" भाषा बोलत होते,*

*गुण्यागोविंदानं  नांदत होते.* 

*त्यांचं मन  खूप मोठ्ठं होतं.*

*वृत्ती खूप दयाळू होती.*

*दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या*

*हाकेसरशी धावून जायचे.* 

*आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे.*

*एकमेकांना साथ देऊन* 

*जगण्याचं गाणं शिकवायचे,*


*महाराष्ट्रात होता एक भाग.* 

*"मुंबई" त्याचं नाव.*

*मुंबईसुद्धा छान होती;*

*महाराष्ट्राची शान होती.*

*सर्वांच्या आकर्षणाची बाब होती.*

*आजूबाजूचे* *सगळेच मुंबईसाठी* 

*धडपडत होते.*

*इथं आले की* 

*इथलेच होऊन राहत होते.*

*"अतिथी देवो भव...!"* 

*या उक्तीनुसार महाराष्ट्रातील*

*लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं.*

*पाहुण्यांचा मान म्हणून* 

*मागतील ते देऊ लागले.*


*हळूहळू परिस्थिती बदलू लागली.*

*"अतिथी" जास्त आणि* 

*"यजमान" कमी झाले.*

*मुंबई  कमी पडू लागली,* 

*आजूबाजूला पसरू लागली.* 

*सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती.*


*मराठी आपली वाटत नव्हती.*


*प्रश्न मोठा गहन होता,*

*पण माणसं मात्र हुशार होती,* 

*दूरदृष्टीची होती.*

*त्यांना एक युक्ती सुचली.*

*दूरदेशीची* *परदेशातील भाषा*

 *त्यांना जवळची वाटली.*


*त्यांना वाटलं आपली मुलं* *शिकतील,  परदेशात जातील,* 

*उच्चशिक्षित होतील.* 

*सर्वांचाच, अगदी "महाराष्ट्राचा" ही विकास होईल,* 

*म्हणून त्यांनी याच भाषेतील* 

*शिक्षणाची सोय केली.*

*आजूबाजूला या भाषेत बोलणारे* 

*पाहून मराठी माणसंही खंतावली.*

*आपल्यालाही हे आलंच पाहिजे* 

*म्हणून याच भाषेत शिकू लागली,* 

*शिकवू लागली.* 

*मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना,* 

*मराठी कोणीच बोलेना,*

*बोलीभाषा ही बदलली.*

*सगळ्याचा नुसता काला झाला.* 

*शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.*


*अशा या* *महाराष्ट्रातील एक* 

*छोटा मुलगा* *आपल्या आईबरोबर*

*माफ करा हं........*

*आपल्या 'मम्मी' बरोबर एकदा*

*वाचनालयात गेला.*

*चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला* 

*त्यानं ते उघडलं. पुस्तक शहारलं,*

*पानं फडफडली, आनंदित झाली.*

*त्यांना वाटलं* 

*निदान आज तरी आपल्याला* 

*कोणी वाचेल.* 


*इतक्यात त्या मुलानं विचारलं,*

*Which language is this?*


*'मम्मी' खूप सजग होती,*

*मुलाचं हित जाणत होती,* 

*सगळं ज्ञान पुरवत होती.*

*पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,* 

*"अरे, खूप पूर्वी म्हणजे* 

*तुझ्या आजोबांच्या वेळेस*

*"मराठी भाषा" प्रचलित होती;*

*आता कोणी नाही ती बोलत.*


*पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली,*

*पानांपानांतून अश्रू ठिबकले;*

*पण*

*हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं.*

*कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं*

*काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!*


*महाराष्ट्राची शान "मराठी"भाषा!*

*मला एकाने विचारले* 

*तू मराठीत का 'पोस्ट' टाकतोस?*

*आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं,* 

*आमच्या घरात "तुळस"आहे,*

 *'Money plant'नाही.*

*आमच्या स्त्रिया "मंदिरात" जातात,*

*'PUB' मध्ये नाही.*

*आम्ही मोठ्यांच्या  पायाच पडतो,* 

*त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.*

*आम्ही "मराठी" आहोत,*

*आणि मराठीच राहणार!*

*तुम्ही English मध्ये मेसेज केलात*

*तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,*

*याचा अर्थ असा नाही की,* 

*मला English येत नाही.*

*अरे गर्व बाळगा तुम्ही* 

*मराठी असल्याचा.*

*"काकी" ची जागा* 

*आता 'Aunti' घेते*

*'वडील' जिवंतपणीच "डेड" झालेत.* 

*"भाऊ" 'Bro' झाला...!!*

*आणि "बहीण " 'Sis'...!!!*

*दुध पाजणारी "आई"* 

*जिवंतपणीच 'Mummy' झाली.*

*घरची "भाकर" आता* 

*कशी आवडणार हो*

*५ रु. ची 'Maggi' आता* 

*किती "Yummy" झाली.*

*मराठी माणूसच "मराठी" ला* 

*विसरू लागलाय....*

*आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी* 

*ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा.*

**आजपासूनच* *शक्‍यतोवर मराठी*

*लिहिण्याचा प्रयत्न करूया.*


 *२७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जाऊंदे.*

महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम व एएफडी बँक यांच्यासमवेत

 महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकोरियन एक्झिम व एएफडी बँक यांच्यासमवेत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

 

नागपूर,दि.07 : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्पमराठवाडा वॉटरग्रीड योजनासमृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पदमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँककोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्पमराठवाडा वॉटरग्रीड योजनासमृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पदमणगंगा-एकदारे-गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करुअसे सांगितले.

 या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशीमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदालगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवारतापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकरकोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

तापी रिचार्ज योजनाबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथे अभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

 राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC)येथे

अभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

 

मुंबईदि.8:- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले असूनयु. पी. एस. सी. परीक्षेतील महाराष्ट्रातील उमेदवारांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा हा यामागील उद्देश असल्याचे,  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थाच्यासंचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

या अभिरूप मुलाखतीसाठी पॅनल सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर,              अतिरिक्त पोलिस महानिदेशक विश्वास नांगरे पाटीललोहमार्ग पोलीस आयुक्तमुंबई डॉ. रवीद्र शिसवेमुख्य आयकर आयुक्तजयंत जव्हेरीझोनल विकास आयुक्तसेझ महाराष्ट्र गोवा दीव दमणदादरा नगर हवेली ज्ञानेश्वर पाटीलसंचालकअणुविभाग नितीन जावळेअक्षय पाटील (आयकर विभाग)माजी आय.आर.एस. व आय.पी.एस. अधिकारी विकास अहलावतभारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा तसेच ए.आर.ओ.सी मध्ये कार्यरत रुजूता बनकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ प्रा. भूषण देशमुख आदि उपस्थित होते.

या मुलाखतीचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून या यूपीएससी अभिरूप मुलाखतीचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असल्याचे संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले.


Featured post

Lakshvedhi