Friday, 31 January 2025

कामगार संहितेनुसार नियमावली तयार;

 कामगार संहितेनुसार नियमावली तयार;

विधीमंडळ अधिवेशनात नियमावली मांडणार

- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

नवी दिल्ली दि. 29: महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली.

 

येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज  केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री फुंडकर बोलत होते.  या बैठकीस केंद्रीय कामगार मंत्री यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री शोभा कंरदलाजे, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव तसेच विविध राज्यांचे कामगार मंत्री आणि सचिव उपस्थित होते.  कामगार मंत्री  आकाश फुंडकर उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव  आय ए कुंदन , रोजगार राज्य विमा योजनाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे उपस्थित होते. 

 

राज्याचे कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या विषयावरील महत्त्वपूर्ण सत्राची सहअध्यक्षता केली.  अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री श्री मांडविया होते. यावेळी त्यांनी सांगितले, कामगार संहितांनुसार नियमावली तयार केली असून फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही नियमावली मांडली जाईल, असून  मार्चमध्ये होणाऱ्या  विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली सादर केली  जाईल, अशी माहिती श्री. फुंडकर यांनी दिली. 

 

ईएसआयसीसंदर्भात,  श्री. फुंडकर यांनी ईएसआयसी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले.  ईएसआयसी अंतर्गत अधिक लोकांना लाभ देण्यासाठी त्याचे कार्यक्षेत्र वाढविणे, आरोग्यसेवेचे फायदे सुधारणे आणि धोरणात्मक सुधारणांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर श्री. फुंडकर यांनी भर दिला यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा ही व्यक्त केली.

            कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्राचे आभार मानले. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय आणि संवादाची संस्कृती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात महाराष्ट्रात  असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छाही श्री फुंडकर यांनी व्यक्त केली.

 

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी औद्योगिक न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मागितले. उद्योगातील कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची आवश्यकता असल्याचे माहिती दिली.

 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी राज्यात ईएसआयसीच्यावतीने  सुरू असलेल्या योजनांची आणि आरोग्य सेवांची माहितीचे संगणकीकृत सादरीकरण केले. राज्य शासनाने कामगार विमा सोसायटी तयार असल्याची माहिती दिली.

स्त्रियांचे कुंकू '

 ' स्त्रियांचे कुंकू '

 एक गोष्ट अशी,

एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडिंगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर. ऑफिसरने विचार केला, एवीतेवी बायको मरणार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी  आणण्यास सांगितले. त्यांनी केळी  आणली. एक केळं सोलून फाकवून त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले आणि ते केळं  त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडिंग थांबले आणि दोन दिवसात त्याची बायको घरात काम करू लागली. 

गोष्ट  ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशरचा पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अॅबसॉर्ब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते. 

मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-४ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले. 

आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.

कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे. कुंकू शुध्द असणे हे फार महत्वाचे आहे.

शुद्ध कुंकू कसे ओळखावे - 

१] कुंकवाला हळदीचा वास येतो. 

२] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते आणि त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.


👉🏻 बांगडी, पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचे वाण नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


👉🏻 " सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते. "


बांगडी घालण्याचे फायदे :-


१) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताचा रक्तसंचार वाढतो.

२) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.

३) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.

४) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.

५) तुटलेली बांगडी घालू नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.


जोडवी घालण्याचे फायदे :-


१) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तू नाही.

२) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील 

"Hormonal System" योग्यरित्या कार्य करते.

३) जोडवी घालण्याने "Thyroid" चा धोका कमी होतो.

४) जोडवी "Acupressure" उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात.

५) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.


पैंजण घालण्याचे फायदे :-


१) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.

२) पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील "Fat's" कमी करण्यात मदत होते.

३) वास्तुशास्त्रानुसार पैंजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.

४) चांदीच्या पैंजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.

५) पायातील पैंजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.

६) पायात सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते..


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*


*(कॉपी पेस्ट)*

अधिक माहितीसाठी खाली लिंक जॉईन करा आणि भरपूर लोकांना शेअर करा*


मला बाळासाहेब आवडतात कारण,-promod महाजन,pl share



झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावीमुख

 झिरो प्रीस्क्रिप्शन’ निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करावी

-   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मुंबई शहरच्या ६९० कोटीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

मुंबई, दि. ३० :- जनतेला दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची शासनाची भूमिका असून  या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची अमंलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष .राहूल नार्वेकरकौशल्य विकासरोजगार उद्योजकता आणि  नाविन्यता  मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबई शहरचे खासदारआमदारजिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्यलोकप्रतिनिधीअपर मुख्य सचिव आय एस चहलमुंबई शहर जिल्हाधिकारी रवि कटकधोंडपोलिस आयुक्तसर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रथम प्राधान्य देण्याचे सूचित करुन केईएम.जे.जे यासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरुन औषध विकत घेण्याची वेळ येऊ नयेयादृष्टीने रुग्णालयामार्फत औषध उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून झिरो प्रिस्किप्शनची अंमलबजावणी तातडीने करण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये पूरेशा प्रमाणात एमआरआयव्हेंटीलेटरसिटी स्कॅन मशीन्सची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे सूचित केले. केईएम मधील रुग्णांची संख्या लक्षात घेता त्याठिकाणी तातडीने नवीन अतिरिक्त एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावे,त्यासाठीची खरेदी प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावीजोपर्यंत नवीन मशीन्स येत नाही तोपर्यंत रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी वाडीया,खालसा या रुग्णालयांतून तपासणी सुविधा उपल्ब्ध करुन द्यावी. केईएमच्या खाटांची क्षमता वाढवण्यासाठी त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शताब्दी टॉवर संदर्भात लवकर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध व्हेंटीलेटर व इतर सुविधांच्या बाबत आढावा घेऊन त्याची पूर्तता करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच आरोग्य मंत्री यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुंबई मधील रस्ते सुव्यवस्थित चांगले ठेवण्यात यावे. रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता फुटपाथवरुन सुरक्षित चालण्याची नागरिकांची जागा मोकळी करावी. पावसळ्यापूर्वी करावयाची कामे युद्धपातळीवर सुरु करण्यात यावी. रस्त्यांची डागडूजीनालेसफाई या सर्व कामांना आत्ताच सुरवात करावी जेणेकरुन पावसळ्यापूर्वी ती योग्यपद्धतीने पूर्ण होतील. त्याचप्रमाणे लालबागमाटुंगापरळ याठिकाणच्या पूलांचे रिसफरिंग करावे. मुंबईतील पर्यावरणाचे संतुलन आणि हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यास कटाक्षाने लक्ष देण्यात यावे,यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबई शहरातील सर्व बागांच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने चांगली संस्था नेमून त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मुंबईच्या स्वच्छेतच्या दृष्टीने पुन्हा डीप क्लिन्सिंग ड्राईव्ह सुरु करण्यात यावे. महापालिकेने ससून डॉक व इतर भागातील कचरा स्वच्छ करावा. सर्व पुलांच्या खालील जागेचे सुशोभिकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे पावसळ्यापूर्वीच्या धोकादायक इमारतीच्या दुरुस्ती तसेच पुर्नविकास प्रकल्पांच्या विविध कामांसाठी ट्रान्झींट कॅम्प आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईतील आपल्या घराचे स्वप्न् पूर्ण करण्यासाठी शासन विविध शासकीय गृहनिर्माण संस्थ्याच्या सहकार्याने सर्वांना परवडणारी घरे या संकल्पनेची अंमलबजावणी मोठ्या स्वरुपात करणार असून यामध्ये महिला,विद्यार्थीनी,डबेवाले,गिरणी कामगार,ज्येष्ठ नागरिक,पोलिसया सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणार आहेत यासाठी म्हाडाची गृहनिर्माण धोरण नव्याने आणणार आहे. सर्व योजनांच्या अमंलबजावणीतून लोकांना लाभ देण्याचा उद्देश असून सर्व यंत्रणांनी कालबद्धपणे काम करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

मुंबई शहरच्या सन २०२५ -२६  वर्षासाठीच्या  एकूण  ६९०  कोटी रुपयांच्या  प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी  पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीच्या  व्यवस्थापनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद  उपलब्ध करून द्यावी. तसेच हवेच्या गुणवत्ता लक्षात घेता  मुंबई शहरातील स्मशान भूमीत शवदहनासाठी एलपीजीसीएनजीची व्यवस्था करावी,असे सूचित केले.

कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी   बांग्लादेशी आणि रोहिंग्ये यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सूचित केले. तसेच  याबाबतच्या समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करण्याचे सूचना दिल्या. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन मंडळाच्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध घुसखोरी संदर्भात  उचित कार्यवाही करण्याचे सूचित केले.

                  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ प्रारुप आराखडा

मुंबई शहरामध्ये एकूण ११ मोठी शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयांमध्ये मुंबई शहरातील रुग्णांची संख्या व मुंबई शहरा बाहेरील रुग्णांची संख्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आहेयामध्ये सर्वसाधारण आजार व गंभीर आजार अशा दोन्ही प्रकारचे सामान्य कुटुंबातील रुग्ण उपचार घेत आहेतयासाठी रुग्णालयामध्ये औषधोपचार व यंत्रसामग्री तसेच रुग्णालयातील वॉर्डचे आधुनिकीकरण अद्यावतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रुपये १३२.४७ कोटीच्या निधीस मान्यता दिली.

मुंबई शहरातील काही भागांमध्ये डोंगर उतारा खाली झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून यामध्ये अति सामान्य व गरीब कुटुंबे राहत आहेत यांच्या सुरक्षितेसाठी व संरक्षण अर्थ डोंगर उतारा खाली संरक्षण भिंतीची कामे घेण्यात येत आहे यासाठी  रूपये २६.९० कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली.

शासकीय महाविद्यालयाचा विकास या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील ९ मोठी शासकीय महाविद्यालय मध्ये आवश्यकता सोयी सुविधा व साधन सुविधा तसेच एज्युकेशन अपग्रेशन याकरिता रुपये २५.०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली.

            महिला व बालविकास या विभागाअंतर्गत मुंबई शहरातील डेविड ससून डोंगरी उमरखडी येथील बालसुधार गृह इमारतींचे सक्षमीकरण तसेच येथील मैदानांचे सुशोभीकरण व बालक युवकांसाठी इतर क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेतयासाठी रुपये १५.२० कोटीच्या निधीस मान्यता दिली. एकात्मिक बाल विकास योजना या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील सर्व अंगणवाडी येथे स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याचे प्रयोजन आहे तसेच अंगणवाड्यांमध्ये आवश्यकता मूलभूत सुविधा साधन साहित्य साधनसामग्री उपलब्ध करून द्यायचे आहे यासाठी लागणारा आवश्यक निधी रुपये ५.२० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील सर्व कोळीवाड्यांमधील पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे रंगरंगोटी व सौंदर्यकरण यांची कामे तसेच समुद्रकिनाऱ्यावरील जीटीची बांधकामे व मजबुतीकरण करण्यात येत आहेयासाठी रुपये ३३.२६ कोटीची रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरामध्ये एकूण ५ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून यामध्ये एक युवतींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एक अल्पसंख्यांक साठी स्वतंत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे येथील यंत्र सामग्री साठी तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी रुपये ८.२५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओपन जिम व शैक्षणिक संस्थांतर्गत असलेले खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण करून मैदानी तयार करावयाचे आहेत यासाठी रुपये ५.१२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील युवकांना व युवतींना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम कौशल्य विकास विभाग करीत आहेयासाठी रुपये ३.५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तू एशियाटिक लायब्ररी या ठिकाणी जुन्या पुस्तकांचे जतन करण्यासाठी व त्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत रुपये ०.०२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.

पोलीस व तुरुंग या विभागांना पायाभुत सुविधा पुरविणे यामध्ये  पोलीसांना वाहन उपलब्ध करणेपोलीस वसाहती व पोलीस स्थानके अद्ययावत करणे,  पोलीस व तुरूंग या विभागांना साधनसामग्री पुरविणेजिल्हा रस्ता सुरक्षा उपाय करणेपोलीस व तुरुंग या विभागांच्या कामांसाठी रूपये ६४.१० कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्हयातील गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत शासकीय कार्यालये व शासकीय निवासी इमारतींची दुरूस्ती करणे तसेच सार्वजनिक जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागांभांवती संरक्षक भिंत बांधणे या कामांसाठी रूपये ४०.३६ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करणे करीता रूपये ४६.६८ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील गड-किल्लेमंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके संवर्धन करणे करीता रूपये २०.७० कोटीची निधी मागणी आहे (३% राखीव निधी) मुंबई शहर जिल्हयामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविणे करीता रूपये ३१.०५ कोटीची निधी मागणी आहे. (राखीव ४.५% शाश्वत विकास ध्येय १% सह) मुंबई शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) अंतर्गत अपारंपारिक उर्जा विकास करणे करिता रूपये २.८५ कोटीची निधी मागणी आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा धारावीसायनवडाळामाहिमवरळीशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवी व कुलाबा क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेयेथील मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधीची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने रुपये २२५.१९ कोटीची निधी मागणी करण्यात आलेली आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

Thursday, 30 January 2025

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा

 कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार 

त्यांना योजनांचा लाभ द्यावा

- राज्यमंत्री आशिष जयस्वाल

साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या

समितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई दि. 30 : कृषी विभागाने त्यांच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे. तसेच पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावाअशा सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

            साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सूचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची मंत्रालयात राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये आज कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराप्रधान सचिव (व्यय) सैरभ विजयकृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            लाभार्थ्यांची निवड यादी गुणवत्तेवर करण्याच्या सूचना देऊन राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीसर्व लाभार्थ्यांना सॅच्युरेशन मोडपर्यंत लाभ द्यावामानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांना प्राधान्य द्यावेप्रतिक्षा यादी गुणवत्तेवर तयार करावीमदतीपेक्षा शेतकऱ्यांच्या  शेती विकास व उत्पन्न वाढ करणाऱ्या भांडवली गुंतवणूकीवर भर द्यावा. कालबाह्य झालेल्या योजना नव्याने प्रस्तावित कराव्यात. विकेल ते पिकेल याबाबत पिक पद्धती अवलंबण्यात यावीवन क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व उचित पिके घेता यावी यासाठी बांबू फेंसिग व योग्य पिके घेण्याचे नियोजन करुन त्यानुसार योजना तयार कराव्यात. पिक विमाएनडीआरफएसडीआरएफ व नुकसानभरपाईबाबत सुधारित प्रस्ताव तयार करावा व भांडवली गुंतवणूकीवर जास्त भर द्यावा. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवून राज्याच्या उत्पन्नात कशी भर घातला येईल याबाबत नियोजन करावेउपग्रहाच्या माध्यमातून पडिक जमीन किंवा कमी उत्पन्न देणारी जमिनीबाबत उचित नियोजन करावे. उपलब्ध निधी आणि लाभार्थी यांची योग्य सांगड घालावी. राज्यात गरज असणारी पण कमी  उत्पादन असणाऱ्या पिकांचे उत्पादन वाढवावे. जी पिके शेतकऱ्यांसाठी व शासनासाठी नुकसानीची आहेत याबाबत नव्याने पर्यायी पिकांचे धोरण तयार करावेअशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.

            राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले कीलाभार्थ्यांनी योजनांसाठी विभागाकडे येण्याऐवजी विभागाने योजना देण्यासाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेराज्यातल्या विविध क्षेत्रांनुसार योजनांची गरज ठरवण्यात यावी. सर्व योजनांमध्ये सुसूत्रीकरण असावे. लाभार्थ्यांचा शोध घेणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणे महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या गरजेनुसार योजना देऊन खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कसा होईल, असे नियोजन करण्यात यावे. कृषी विभागाच्या योजना राबवताना त्या योजनांचा राज्याच्या विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. एकाच प्रकारच्या सर्व योजना एकत्र करण्यासाठीही प्रस्ताव तयार करावा अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी यावेळी दिल्या.

             या उच्चस्तरिय समितीची पहिली बैठक आज झाली. तसेच इतर सर्व विभागांचा सविस्तर आढावाही या समितीमार्फत घेण्यात येणार आहे. यानंतर विविध विभागांच्या राज्य योजना व जिल्हा योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना पोहचावेत व त्यांचे मूल्यमापन करून सुसूत्रिकरण करण्यासाठी शिफारस या समितीमार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये मित्र संस्थेने केलेल्या शिफारशींचाही समावेश असणार आहे. तसेच कालबाह्य झालेल्या योजनाद्वरुक्ती होणाऱ्या योजनाजलद आर्थिक वाढ करण्यासाठी योजनांचे सुसूत्रीकरण करणे आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या दृष्टीने ही समिती शासनास शिफारशी करणार आहे.

0000

वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध

 वाळू निर्गती धोरण 2025 चे प्रारुप

हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध

 

मुंबईदि. 30 : शासनामार्फत वाळू/ रेतीचे उत्खननसाठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरणदिनांक १६.०२.२०२४ व शेतामधील वाळू निर्गतीबाबतचे धोरणदिनांक १५.०३.२०२४ अधिक्रमित करण्यात येऊन त्यामध्ये काही सुधारणा करुन प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ चे प्रारुप हरकती/ सूचनेसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तावित वाळू/ रेती निर्गती धोरण-२०२५ च्या प्रारुपाच्या अनुषंगाने काही हरकतीसूचना किंवा अभिप्राय सूचवावयाचे असल्यास https://mahakhanij.maharashtra.gov.in या संकेस्थळावर व deskkhal-sandpolicy@mah.gov.in या ई-मेलवर शुक्रवारदिनांक ०७ फेब्रुवारी२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या हरकती/ सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीतयाची नोंद घ्यावीअसे महसूल विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

स्थानिक वापर व घरकुलासाठी सहज व सुलभतेने वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामपंचायत हद्दीमधील जे वाळू गट निविदेसाठी प्रस्तावित करण्यात येणार नाहीत तसेचज्या वाळू गटास पर्यावरण अनुमती प्राप्त होणार नाही अशा वाळू गटामधून वाळूचे उत्खनन करणेतसेच पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्तीना हातपाटी-डुबी पद्धतीने विना लिलाव परवाना पद्धतीचा वापर करुन वाळू गट उपलब्ध करुन देणे. खाजगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे अथवा इतर कारणामुळे जमा झालेली वाळू निष्कासन करुन शेतजमीन लागवडीयोग्य करण्यासाठी वाळूचे निष्कासन करणे तसेचनैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्वनैसर्गिक वाळूचा तुडवडा या बाबी विचारात घेऊन कोणत्याही काँक्रीटच्या बांधकामामध्ये कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कृत्रिम वाळूचा वापर करणे तसेचपर्यावरण अनुमती प्राप्त वाळू गटामधून खाडी व नदीपात्रातील वाळू गटांसाठी लिलाव प्रक्रियेचा अवलंब करुन वाळू उत्खनन करणे व मोठ्या खाणीमधील ओव्हर बर्डन मधून निघणाऱ्या वाळूचा वापर करणे यासाठी सध्याच्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे.

सन २०२३-२०२४ या काळावधीत वाळू निर्गतीसाठी डेपो पद्धतीचा उपयोग करुन वाळू डेपो मार्फत नागरिकांना वाळू उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेपो मार्फत वाळू उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अडचणी डेपो पद्धती व लिलाव पद्धती यामधील गुण-दोष यांचा विचार करुन वाळू निर्गतीसाठी सर्वंकष सुधारित धोरण विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने हे धोरण हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 


 


जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

 जे जे रुग्णालयातील नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस उपकरणाचे लोकार्पण

 

मुंबईदि. 30 : इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अँड वाइव्हस् असोसिएशन (IASOWA) यांनी ग्लॉकोमा आजाराचा धोका लक्षात घेता कावसजी जहांगीर नेत्र विभागग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूह यांना ५ लाख रुपयांचे नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओलेंस यंत्र उपलब्ध करुन दिले आहे. याचे लोकार्पण मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते २९ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. ग्लॉकोमा आजाराचा सामना करण्यासाठी ओ. पी. डी. कावसजी जहांगीर नेत्र विभागजे. जे. रुग्णालययांना नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर व गोनिओ लेन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुगणालय समूह यांनी IASOWA चे आभार व्यक्त केले.

ग्लॉकोमा हे संपूर्ण जगात अपरिवर्तनीय पण टाळता येणारे अंधत्वाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे आणि ते जवळपास ८ टक्के जागतिक अंधत्वासाठी जबाबदार आहे. सन २०१० मध्ये संपूर्ण जगभरात ग्लॉकोमाचे प्रमाण ६०.५ दशलक्ष होते आणि २०२० पर्यंत ते ८० दशलक्ष झाले असल्याचा अंदाज आहे. संपूर्ण जगभरातील ३९.३६ दशलक्ष अंध लोकांपैकी तीन दशलक्षांहून अधिक लोक ग्लॉकोमामुळे अंध आहेत.

भारत हे जागतिक अंधत्वाच्या सर्वाधिक प्रादेशिक भारासाठी (२३.५%) जबाबदार आहे. ग्लॉकोमा हा मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) आणि अपवर्तक दोष (रेफ्रॅक्टिव्ह एरर) नंतर अंधत्वाचे तिसरे प्रमुख कारण आहे. ग्लॉकोमाचे प्रमाण ११.९ दशलक्ष असून त्यात अंधत्वाचे प्रमाण ८.९ दशलक्ष आहे. ग्लॉकोमा १२.८% अंधत्वासाठी जबाबदार आहे.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दरमहा सुमारे १५०-२०० ग्लॉकोमा रुग्ण पाहिले जातात. डोळ्यांमधील वाढलेला दाब (Intraocular Pressure - IOP) हे ग्लॉकोमाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

ग्लॉकोमा निदानासाठी वापरले जाणारे उपकरणे :

              नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर (Non-Contact Tonometer - NCT) : हे एक उपकरण आहे जे डोळ्यांचा दाब (IOP) लवकर आणि डोळ्याला थेट स्पर्श न करता सहजपणे तपासते. यामुळे रुग्णाला अधिक आराम मिळतोतांत्रिक सहायकावरील अवलंबित्व कमी होते आणि संसर्गाचा धोका टाळता येतो.

             गोनिओस्कोपी (Gonioscopy) : हा एक नियमित तपासणीचा प्रकार आहेज्याद्वारे आईरिस आणि कॉर्निया यामधील कोन (Iridocorneal Angle) मोजला जातो. गोनिओलेंस (Gonioscope) व स्लिट लॅम्प किंवा ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या मदतीने हे परीक्षण केले जाते. ग्लॉकोमाचे निदान व उपचार करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

            नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि गोनिओलेंस हे ग्लॉकोमाचे त्वरित निदान आणि उपचार करण्यासाठी अतिशय उपयुक्त उपकरणे आहेत.

ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूहमुंबई हे १८० वर्षांच्या गौरवशाली इतिहास असलेले एक प्रतिष्ठित आणि अग्रगण्य वैद्यकीय संस्थान आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी ही सर्वात जुनी वैद्यकीय संस्था असूनयेथे वैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तसेचया रुग्णालयात सर्वसामान्य आरोग्य सेवेपासून सुपर-स्पेशॅलिटी आणि तृतीयक आरोग्य सेवेपर्यंत रूग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवली जातात.

0000

Featured post

Lakshvedhi