Thursday, 30 January 2025

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना गती द्यावी

 वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या

बांधकाम प्रकल्पांना गती द्यावी

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. 30 : राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेले नियोजित बांधकाम प्रकल्पांना गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून कामांची गुणवत्ता राखून काम वेळेत पूर्ण करावेअसे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या नियोजित बांधकामाचा व विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारआयुक्त राजीव निवतकरसंचालक अजय चंदनवाले उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी अमरावती व लातूर येथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयपुणे येथे होणाऱ्या मानसिक आरोग्य केंद्राचे व वाशिम येथे होणाऱ्या सर ज.जी. रुग्णालय येथील मुलांचे वसतीगृह व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअंबरनाथपालघर व हिंगणघाट येथील बांधकामासंदर्भात सद्य:स्थिती जाणून घेतली. हिंगोलीनाशिकगडचिरोलीसांगली, मुंबई येथे होणाऱ्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन-2025 मध्ये सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी बैठकीत ''वाय फाय कॅम्पस" प्रकल्पहिमोग्लोबिन टेस्ट मिटीर अँड स्ट्रिप्ससादरीकरण, NAT Testing बाबत उपस्थित असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.


70 वर्षांपूर्वी, 1954 मध्ये कुंभमेळा. त्यावेळची अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक व्हिडिओग्राफी

 *70 वर्षांपूर्वी, 1954 मध्ये कुंभमेळा. त्यावेळची अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक व्हिडिओग्राफी जिथे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री.  गोविंद वल्लभ पंत कार्यक्रमाला उपस्थित होते...*!!  *हा अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ अवश्य पहा

*70 वर्षांपूर्वी, 1954 मध्ये कुंभमेळा. त्यावेळची अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक व्हिडिओग्राफी जिथे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री.  गोविंद वल्लभ पंत कार्यक्रमाला उपस्थित होते...*!!  *हा अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ अवश्य पहा हा सिनेमा रूपी रिळ आजही कुरणखेड सावजी येळणे कुटुंबात होता तेव्हा टुरिंग टॉकीज मध्ये दाखवत होते*👏


हा सिनेमा रूपी रिळ आजही कुरणखेड सावजी येळणे कुटुंबात होता तेव्हा टुरिंग टॉकीज मध्ये दाखवत होते*👏

Govt employee करीता

 


पुण्यामध्ये GBS (Gullian barre syndrome) च्या रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे सावधगिरी बाळगावी

 *अतिशय महत्वाचे*


मित्रहो सध्या पुण्यामध्ये GBS (Gullian barre syndrome) च्या रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत आहे. वृत्तपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्णांची संख्या असून कित्तेक रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. कालच पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे बातम्यामध्ये सांगितले आहे. वास्तवमध्ये इतर खाजगी रुग्णालयात अजून किती रुग्ण आहेत याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.


GBS चा प्रादुर्भाव हा कोरोना सारखा माणसांमध्ये GBS चा रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यामुळे होत नाहीये किंवा पसरत नाही तर तो बाहेर खाल्ल्या जाण्याऱ्या अन्नामधून त्याची बाधा होत आहे.


GBS चा संसर्ग झाल्यावर आपल्या शरीरामध्ये त्याच्या अँटीबोडीज तयार होऊन त्या आपल्या मज्जातंतुंवर हल्ला करतात ज्यामुळे पक्षाघात (Paralysis) होतो. यामध्ये प्रथम कमरेखालचा भाग निष्क्रिय होतो नंतर कमरेवरचा भाग आणि शेवटी मेंदू ज्यामुळे अशी बाधित व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते.


या रोगापासून आपल्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी मी आपणा सर्वाना कळकळीची विनंती करतो कि पुढील एक महिना तरी कुणीही बाहेरचे खाऊ नये ज्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरी, चिकन, पनीर अश्या पदार्थ्यांचे सेवन करू नये.


आपण हि माहिती आपल्या संपर्कामधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती 🙏

खनिज क्षेत्रातील कामांवर देखरेख करणारी अद्ययावत यंत्रणा कार्यरत करा

 खनिज क्षेत्रातील कामांवर देखरेख करणारी अद्ययावत यंत्रणा कार्यरत करा

खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई दि. २९ : खनिकर्म विभागाने केंद्र व राज्यातील नियमावलींचा अभ्यास करून सर्व खनिजक्षेत्राचे प्रभावी नियंत्रण करावे. खनिज क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांवर अत्याधुनिक यंत्रणेमार्फत देखरेख करण्याचे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

             खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खनिकर्म विभागाची आढावा बैठक  मंत्रालयात झाली. या बैठकीस खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहलव्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. रावखनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

             खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खनिकर्म विभाग, राज्य खनिकर्म महामंडळ तसेच खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय केंद्र व राज्याचे विषय याबाबतीत समन्वय असावा. केंद्र शासनांच्या नियमांसोबत राज्य शासनही याबाबतीत धोरण ठरवेल. राज्यातील खनिजनिहाय खाणपट्टया,यामध्ये एकूण खनिपट्टेसुरू असलेले खाणपट्टेबंद असलेले खाणपट्टे,स्वामित्वधन संकलनाचा तपशील याबाबत योग्य कार्यवाही विभागाने करावी. जास्तीत जास्त खाणपट्टी लिलावास काढण्यासाठी राज्यांमध्ये अन्वेषण वाढविणेएकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली २.० लागू करणेमहाजेनको- एमएसएमसी- कोल वॉशरी यांच्या कामामध्ये सुसूत्रता आणणेमहसूल वाढीच्या दृष्टीने २०१५ च्या अधिसूचनेनुसार घोषित गौण खनिजांचे पुनर्वर्गीकरण करून त्यांचे संनियंत्रण खनिकर्म विभागाकडे घेणे याबाबतीतही कार्यवाही करण्यात यावी. एखाद्या खाणीच्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास पर्यटन क्षेत्र विकसित करता येईल का याबाबत सर्वेक्षण करावे व त्याचा अहवाल सादर करावा, अशाही सूचना श्री. देसाई यांनी केल्या.

*****

खते आणि औषधांबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करु नये

 खते आणि औषधांबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करु नये

- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

बि-बियाणेखते आणि कीटकनाशकांबाबत नियमांत सुसूत्रता आणणार

 

    मुंबई, दि.29: बी -बियाणे,खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बि-बियाणेखते आणि कीटकनाशक यांची गुणवत्ता तपासणी, केंद्र व राज्यांच्या विविध नियम व धोरणात एकसूत्रता आणण्यात येत असून खत उत्पादक आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्या व विक्रेते यांनी खते आणि औषधे याबाबतीत कोणत्याही प्रकारचे लिंकीग करू नये. रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटीची सुविधा असलेला शेतीमाल  शेतक-यांना उपलब्ध करून द्यावा अशा सूचना कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी यावेळी केल्या.

             सह्याद्री अतिथिगृह येथे बियाणेखते व कीटकनाशके उत्पादक कंपन्या व विक्रेते यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी संचालक सुनील बोरकरमुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख यासह बियाणे, खते व कीटकनाशके उत्पादक कंपन्या व विक्रेते यांचे राज्यातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

               कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीबि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांची गुणवत्ता तपासणी  करताना  गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणली जाईल. राज्यात बि-बियाणे,खते आणि कीटकनाशक यांच्याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये पुनरावृत्ती  टाळणे,समान नमुना पद्धतीने तपासणीचे धोरणसंगणीकृत बियाणे साठा पुस्तक ठेवणेबियाणे नमुनाचे आकारमानात बदलएक देश एक परवाना या सर्व सूचनांचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येईल. कंपन्यांनी फक्त नफा हा दृष्टीकोन समोर ठेवून न काम करता शासनाने दिलेल्या नियंमाचे पालन करणेही गरजेचे आहे. बि-बियाणे, खते आणि कीटकनाशक यांच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिथे नियमांत त्रुटी असेल  जिथे कायद्याचे उल्लंघन केले जाईल तिथे  कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही कृषीमंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले. 

            कृषीमंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीजागतिक बाजारात आता रेसिड्यू फ्री म्हणजेच कीडनाशकाच्या उर्वरित अंशाची कमाल पातळी सांभाळून पिकवला जाणारा शेतीमाल विकला जातो. हा शेतीमाल ट्रेसेबल असतो. ट्रेसेबल म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातील खरी माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देणारी प्रणाली होय. सध्या रेसिड्यू फ्री आणि ट्रेसेबिलिटीची सुविधा असलेला शेतीमाल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. कीटकनाशक कंपनीने बाजारात विकले जाणारे औषधे अजून कमी किमतीत उपलब्ध होतील का याबाबतीत विचार करावा. कृषी विभागाचे संकेतस्थळ नव्याने अद्ययावत करण्यात येत असून याबाबतीत सर्वांनी आपल्या सूचना आणि मते जरूर कळवावीत. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ नुसार कृषी क्षेत्रातील उद्योगांना शासन सहकार्य करून यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात येणार आहे. आज आलेल्या सर्व सूचनांचा विचार करून कृषी विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणली जाईल सर्वांच्या सहकार्याने कृषी विभागातील योजनांना गती मिळेल. तसेच विविध खते तसेच कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या नफ्यातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक  तंत्रज्ञान तसेच कृषीला आवश्यक असलेले साहित्य पुरवावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.


विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा

 विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी

भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

·     स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाचा 27 वा दीक्षांत समारंभ थाटात

              नांदेड दि. 29 जानेवारी : देशातील अनेक नव-तरुणांनी स्टार्टअपद्वारे 1 लक्ष, 10 हजार कोटीहून अधिक किमतीचे उद्योग उभारले आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता तर वाढत आहेच. त्याशिवाय रोजगारही निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार निर्माण करून भारताच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे ध्येय्य साध्य करण्यासाठी उद्योजक बनायला पाहिजेअसे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

              स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकरप्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धनकुलसचिव डॉ. डी.डी. पवारपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळेवित्त व लेखाधिकारी मोहमद शकीलडॉ. संतुक हंबर्डेव्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत पेशकारनरेंद्र दादा चव्हाणडॉ. सुर्यकांत जोगदंडडॉ. डी. एम. मोरेइंजि.नारायण चौधरीडॉ. संतराम मुंढेहनमंत कंधारकरडॉ. सुरेखा भोसलेसहसंचालक किरणकुमार बोंदरअधिष्ठाता डॉ. एम.के. पाटीलडॉ. डी. एम. खंदारेडॉ. पराग खडकेडॉ. चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.

              या कार्यक्रमाला आमदार आनंद पाटील बोंढारकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवालजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणारी विद्यार्थींनी परभणी येथील बी. रघुनाथ आर्टसकॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची कु. श्रद्धा हरहरे हिला नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने राज्यपालांनी सन्मानित केले.

              अध्यक्षीय भाषणात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, संशोधन आणि नाविन्य हे आपल्या केंद्रस्थानी असले पाहिजे. नेतृत्व गुण जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहण्यासाठी विद्यापीठाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डिजिटल व्यसन ही वृद्ध आणि तरुण दोघांमध्येही वाढणारी समस्या आहे. मोबाईल फोन व इंटरनेट वापरात शिस्त पाळावी. तुमच्या आयुष्यातील स्क्रीन टाईम कमी करावा. विद्यार्थी जीवनात आव्हानेअडथळेअपयश येत असतात. याकडे संधी म्हणून पहावे. यश मिळायला उशीर होईल पण यश मिळणार नाही असे होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा गरज असेल तेव्हा आधार घ्या आणि स्वतःचे ध्येय्य पूर्ण करा. एकट्यासाठी जगू नका दुसऱ्यांसाठी जगासमाजाला परत दिल्याशिवाय शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. देशासाठी संपत्ती निर्माण करास्टार्टअप व उद्योजकांचा देश म्हणून देशाला नवी ओळख द्या आणि जीवनात यशस्वी व्हाअसा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

              या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष  प्रा. भूषण पटवर्धन म्हणालेविद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस तुमच्या जीवन प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. तुम्ही मिळवलेले ज्ञान हे विशेषाधिकार आणि जबाबदारी दोन्ही आहेत. तुमच्या पुढील जीवन प्रवासाने विद्यापीठाची अखंडताउत्सुकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचे प्रतिबिंब दिसायला हवे. जगात पाऊल ठेवत असताना चांगल्या गोष्टी आत्मसात करा, स्वतःला वाईट व्यसनापासून दूर ठेवा. हे जग तुमच्या तेजस्वीपणाची उत्सुकतेची आणि करुणेची वाट पाहत आहे. पुढे जाऊन सौर्हादाचा वारसा निर्माण करालअशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

              विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर  यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाचा अहवाल सादर केला. प्रमुख अतिथींचे दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.

या दीक्षान्त समारंभामध्ये 51 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये फसीहा शेख अनुद शेखप्रीती राजहंसअक्षता शेळकेनंदिनी बिरादारप्रतीक्षा टोम्पेकोमल कापसेतृप्ती कुलकर्णीप्रियंका रेवतेसुजाता खटकेकाजल मोरेशिवानी कुलकर्णीपवन चौधरीश्रावणी गांधीवैशाली कीर्तनेशैलेश भुतडाकामाजी पुयडव्हूवनेश्वर बुजारेशिरीन फतिमा परकोटेआकांक्षा करणेशुभम मोतीपवळेसोनाली हिवरेसुमय्या खाटूनपवन चौधरीसचिन बनाटेसाक्षी सूर्यवंशीसरोजा लोळेकाजल मोरेराजश्री जाधवप्रियंका देशपांडेकांचन आवलकोंडेपृथ पाठकपूजा गायकवाडसुधीर सावंतश्रेया शहाणेश्रुती राजवाडशझिया पठाणअतुल समिंदराआकांक्षा करणेहर्षिता भुतडाज्ञानेश्वरी जायभायेशिवानी कुलकर्णीशिवकांता पाटील या विद्यार्थ्यांचा समवेश आहे.

              दुपारच्या सत्रामध्ये 180 विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी अधिसभा सदस्यविद्यापरिषद सदस्य यांच्यासह संचालकप्राध्यापकअधिकारीकर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

0000

 


Featured post

Lakshvedhi