Wednesday, 29 January 2025

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्धत करावे

 ग्रामीण भागातील नागरिकांना

पिण्याचे पाणी उपलब्धत करावे

- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी

 

मुंबईदि. 29 :  ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन योजनेतील कामे गतीने व्हावीत. केंद्र शासनामार्फत या योजनेतील कामांचा नियमित आढावा घेतला जात असल्याने योजनेची कामे कालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीतअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालय येथे नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील विविध कामांसंदर्भात बैठक झाली.

यावेळी आमदार हिरामण खोसकरप्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णासंचालक ई रवींद्रन, सहसचिव बी.जी पवारमुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरेदूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले,  जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना क्षेत्रीयस्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये येणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन योजनेच्या कामांना गती द्यावी.

इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करुन आदिवासी पाड्यातपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. जल जीवन मिशन योजनेची कामे कालमर्यादेत पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी यंत्रणांनी त्यांच्याकडील विषयअपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

बैठकीत जल जीवन योजनेतील कामांच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या चिंचवड व सहा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, वाघेरा व 14 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाचिखलपाडा व आठ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि घोटी बुद्रुक पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. याबरोबरच हर घर जल योजनेचाही आढावा घेण्यात आला.


पाल' देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा

 'पालदेवस्थानला पर्यटन स्थळासाठी

प्रस्ताव सादर करावा

-         पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. 29 कराड तालुक्यातील पाल देवस्थान 'वर्गाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘पाल’ देवस्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाल देवस्थानाला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर करावाअसे निर्देश पर्यटनखनिकर्ममाजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पाल (ता.कराड) येथील 'वर्ग देवस्थान येथे भाविक व पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी एकात्मिक धार्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व ‘पर्यटन पोलीस’ या विषयासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडेपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशीपर्यटन विभागाचे उपसचिव श्री.पवारपर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटीलमहाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे राहुल श्रीरामेमेस्कोच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लढ्ढा उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, 'पालला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करुन परिपूर्ण प्रस्ताव एक महिन्‍याच्या आत सादर करावा. तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पर्यटकांच्या सेवेसाठी 'पर्यटन पोलीस'

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. तसेच राज्यातील संस्कृतीइतिहासपर्यटनस्थळेकायदानियमपर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलीसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहेअसे पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले कीसेवानिवृत्त पोलीसमहाराष्ट्र सुरक्षा बल व इतर संस्थेमार्फत पर्यटन पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे होणाऱ्या 'महाराष्ट्र पर्यटन महोत्सवातप्रायोगिक तत्वावर 50 पर्यटन पोलीस यांना विशेष प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती लवकरात लवकर सादर करावी.

पर्यटन पोलीस या संकल्पनेमुळे पर्यटन स्थळावरील शाश्वत पर्यटन पद्धती टिकवून ठेवण्यासाठी व शाश्वत पर्यटनच्या सवंर्धनासाठी प्रयत्न करतीलअसेही मंत्री श्री.देसाई यांनी सांगितले. 

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांच्या परवानगीबाबत समिती स्थापन

 मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सीएनजी व इलेक्ट्रीक

वाहनांच्या परवानगीबाबत समिती स्थापन

 

मुंबईदि. 29 मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांची संख्या व प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी  दिल्लीप्रमाणे पेट्रोल व डिझेल वाहनांवर निर्बंध घालण्यात यावे. महानगर क्षेत्रामध्ये केवळ सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्यात यावीया बाबींचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली 7 सदस्यीय समिती 22 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आली आहे.

            या समितीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी सुधीरकुमार श्रीवास्तव अध्यक्ष असून राज्याचे परिवहन आयुक्तसह पोलीस आयुक्त (वाहतूक)महानगर गॅस निगम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकमहावितरणचे प्रकल्प संचालकएसआयएएम (SIAM) चे अध्यक्ष सदस्य आहेत. तर सह परिवहन आयुक्त (अंमल - 1) सदस्य सचिव असणार आहेत.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी व वाढते प्रदूषण याबाबत उच्च न्यायालयमुंबई यांनी जनहित याचिका प्रकरणी 9 जानेवारी 2025 रोजी ‍दिलेल्या आदेशान्वये समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी व वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून केवळ सीएनजी व इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्याविषयी अभ्यास करून तीन महिन्यात शिफारशींसह शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहेअसे अर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी कळविले आहे.      

--

जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने

 जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

              मुंबईदि. 29 : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावेयामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

              मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदमग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुखयांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीप्रकल्प संचालकसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने करावे

              ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले कीदेशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आग्रही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने होण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने अमंलबजावणी करावी. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाले आहे.  सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेने सुरू करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाहीबांधायला जागा नाही असे लाभार्थी प्रथम प्राधान्याने घ्यावे. तसेच जागा असलेल्या मात्र घर नसलेल्या लाभार्थीची स्वतंत्र यादी करावीअसे सूचित करुन श्री.गोरे यांनी सांगितले कीघरकुल मंजूरीची प्रक्रिया  पूर्ण झाल्यावर गावागावांत ग्राम सभांमध्ये याबाबत माहिती द्यावी.

घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी

              मंत्री श्री. गोरे म्हणाले, घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी. जेणेकरून गावातील  सर्वांना घरकूल लाभार्थ्यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहचवावेत. सर्वेक्षण करताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम करावे. कोकण पट्ट्यात गावातील गावठाण जमिनी घरकूल योजनेसाठी वापराव्यात. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गतही घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.

योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी

              ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे. त्यात  ग्राम संघप्रभाग संघशेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी सर्व गटांची सक्रियता वाढविण्यावर यंत्रणानी अधिक लक्ष द्यावे. हे सर्व गट सक्रिय होण्यासाठी समन्वयपूर्वक कार्यपद्धती स्वीकारुन कामांची गती वाढवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी  प्रभाग संघाना भेटी द्याव्यात. विभागांतर्गत विविध  योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.गोरे यांनी यावेळी दिल्या.

यंत्रणांनी स्थळ पाहणी वेळेत करावी

              ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावेअसे सूचित करुन सांगितले कीकामांची वेळेत आणि दर्जेदार पूर्तता होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा. स्थळ पाहणी वेळेत करावी. हप्ता वितरित केल्यावर घरकुलाच्या सुरु केलेल्या कामाची नोंदणी व्यवस्थित ठेवावी. कामाच्या टप्पानिहाय विहित केल्यानुसार लाभार्थ्यांना हप्ते द्यावे. विभागांर्तगत बचतगटांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिक संख्यने ते कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणाप्रमुखांनी त्यांच्या नियमित बैठका घ्याव्यात. ग्रामविकास विभागाच्या लखपती दिदी योजनेसह इतर सर्व योजनांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे निर्देश श्री.कदम यांनी दिले.

              ग्रामीण जीवनोन्नती अभियानब वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमप्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान यासह ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या

 सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास

आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या

                                               - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबईदि. 29 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधायंत्रसामुग्रीमनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेमाजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकरआमदार निलेश राणेवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीवर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष  द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावीनर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी,  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावीनव्याने उभारण्यात येणाऱ्या  इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीतअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावेऔषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावामंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावाअशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीनवर्ग चार आणि तांत्रिकअतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त श्री. निवतकर यांनी दिली.

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात

 दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात


- मंत्री अतुल सावे


          मुंबई, दि.29 : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले.


            मंत्रालयात मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.सावे बोलत होते.


            मंत्री श्री.सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.


 या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.


             या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


0000

मौनी अमावस्येची* रोगं शोकं तापं पापं हर मे* *भगवति कुमतिकलापम् ।*

 ⚜🚩⚜️🚩🕉🚩⚜🚩⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


              *मौनी अमावस्येची*

              

⚜🚩⚜🚩🛕🚩⚜🚩⚜


    *रोगं शोकं तापं पापं हर मे*

    *भगवति कुमतिकलापम् ।*

    *त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि*

    *गतिर्मम खलु संसारे ॥*

        *.... श्री गंगास्तोत्रम्*


        *हे भगवती गंगे, माझ्या रोगाचे, दुःखाचे, संकटाचे, दोषाचे, दुष्ट बुद्धीचे हरण कर. वसुंधरेच्या हाराप्रमाणे शोभणाऱ्या गंगे, तूच आमच्या संसारातील गती आहेस.*

        *आज मौनी अमावस्या. जीवनातील अनेक समस्यांचे मूळ दडले असते ते पितृदोषात. हे पितृदोष.. शनी दोष दूर व्हावेत म्हणून आज गंगास्नान करुन सूर्याला अर्घ्य देत केलेले दान पुण्यकारक ठरते.*

        *आज कुंभमेळ्यात गंगास्नानाचे महत्व आहे. पण गावोगाव असणारी नदी.. तलाव हे गंगेचेच रुप. यामुळेच गावोगाव नदीकाठी ग्रामपंचायतीनी.. दानशूरांनी घाट बांधून जनतेची गंगास्नानाची बारमाही सोय केलेली असते. ज्यांना तिथेही  जाणे शक्य नाही ते स्नानाच्या जलात घरातील गंगाजल टाकून मंत्र म्हणत स्नान करतात.*

        *गंगा सर्वांना पापमुक्त करत मोक्षाचा मार्ग दाखवते. गंगा सर्वांना सामावून घेते. तिच्याजवळ कोणताही भेदभाव नाही. संत तुकोबा म्हणतात.. "गंगा न देखे विटाळ". भेदभावरहीत पवित्र.. निर्मळ मन लाभणे हेच जीवनात गंगास्नानाचे पुण्य.*

        *मौनी अमावस्या या शब्दात मौन शब्दाचे मोठे महत्व आहे. मौनाने मन स्थिर होते. मन संयमी होत सत्याचा मार्ग गवसतो. ब्रह्मांडाशी संवाद होतो. मौनाने  वादविवाद.. पाप.. खोटेपणातून सुटका होते.*

        *जगताला प्रगतीसाठी पवित्र मनाचा मार्ग दाखवणारी आजची मौनी अमावस्या.. आणि गंगास्नान.*

        *ॐ नमो गंगायै विश्वरुपिणी*

        *नारायणी नमो नम:*


🌹🔆🚩🔱🌺🔱🚩🔆🌹


  *वाचे म्हणता गंगा गंगा* 

  *सकळ पापे जाती भंगा*


  *दृष्टी पडता ब्रह्मगिरी*

  *त्यासी नाही यमपुरी*


  *कुशावरता करिता स्नान*

  *त्याचे वैकुंठी रहाण*


  *नामा म्हणे प्रदक्षिणा*

  *त्याच्या पुण्या नाही गणना*


🚩⚜🚩🥀🏵🥀🚩⚜🚩


  *रचना : संत नामदेव महाराज*  ✍

  *संगीत : रंभाजी बुवा पाटील*

  *स्वर : मनोहर ठाकरे*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


            🚩 *हर हर गंगे* 🚩

         ‼️ *हर हर महादेव* ‼️

 

    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-२९.०१.२०२५-*


🌻🌸🥀🛕🌺🛕🥀🌸🌻.

Featured post

Lakshvedhi