Monday, 27 January 2025

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे

 गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

 

मुंबईदि. २७ : राज्यात गोड्यापाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडाअंतर्गत मासेमारीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

   सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीखंडांतर्गत मत्स्य व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी मत्स्यबीज उपलब्धता अत्यंत महत्वाचे आहे. मत्स्यबीज उपलब्धता वाढविण्यासाठी ध्येयात्मक काम करावे. ज्या ठिकाणी राज्यात मत्स्य बीज प्रक्रियेविषयी चांगले काम होत आहे. त्यांना प्रोत्साहन आणि निधी देण्यात यावा. त्यासोबतच सागरी मासेमारी विषयी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केंद्र शासनाने मत्स्य व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. केंद्राच्या नियमानुसार राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. धरण क्षेत्रातील मासेमारी व्यवसायासाठीही सर्वसमावेशक धोरण तयार करावे. मासेमारी संस्थांचा कारभार पारदर्शक राहील असे पहावेअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

   मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एनयांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाची माहिती सादर केली. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यासह सागरी क्षेत्रात होणारे ड्रोन सर्वेक्षणमासेमारी बोटी व मत्स्य व्यवसायिकांना देण्यात येणारे अनुदान व सोयी सुविधा, मत्स्य व्यवसाय वाढीसाठी उभारण्यात येत असलेल्या मत्स्य बंदरमत्स्य बाजारमरोळ येथील आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार यासारख्या सुविधांचीही माहिती देण्यात आली.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेक्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसुरू करणारे 

महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईदि. २७ : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता२०२३ कायद्यानुसार  ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहेअसे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून  क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहे. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये  फॉरेन्सिक सहाय्य पुरविण्यासाठीपुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही  व्हॅन उपयुक्त ठरणार आहे.

या व्हॅनमध्ये रक्तडीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील.  तसेच स्फोटक पदार्थ तपासणीसायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटीव्हीने सज्ज असून कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे. ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनफॉरेन्सिक किट्सफॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ॲप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणेपुराव्यांशी छेडछाड करून  आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार आहेअसेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला राज्यमंत्री गृह (ग्रामीण) डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकपोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,  मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  प्रधान सचिव राधिका रस्तोगीप्रधान सचिव अनुपकुमार सिंगमहासंचालक (न्याय व तांत्रिक) संजय वर्मान्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा  संचालनालय संचालक डॉ. संगीता घुमटकरउपसचिव राजेंद्र  भालवणे, गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अशी काम करणार फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन

जेव्हा गुन्हा नोंदविला जातोतेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देवून ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन  ॲप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.

राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

 राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील


 सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम


 


मुंबई, दि. २७ : कोपरखैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झाला. 


यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.


रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल सेंट मेरीज स्कुलचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या कर्क रुग्ण सेवा, एचआयव्ही - एड्स रुग्ण सेवा, अनाथ मुलींचे शिक्षण आदी क्षेत्रातील सेवाकार्याचे कौतुक केले.


सेंट मेरीजच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तम प्रदर्शनाचे कौतुक करताना खेळ व शिस्त यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते असे राज्यपालांनी सांगितले. 


शिक्षण मिळवून धनसंपदा अर्जित करणे योग्यच आहे. मात्र केलेल्या धनसंचयाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. 


शाळेत वेळापत्रक महत्वाचे असते तसेच वेळापत्रक जीवनात देखील पाळले गेले पाहिजे कारण त्यातून वेळेचे चांगले नियोजन करता येते, असे राज्यपालांनी सांगितले.


यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी - माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रेसी मॅथ्यूज, आशा नारायण, जलतरणपटू तोषला भिरूड, बाल वैज्ञानिक अर्श चौधरी, माजी विश्वस्त जेकब वर्गीस, जॉन मथाई, के ए थॉमस, फुटबॉल पटू निल थॉमस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 


०००


 


Maha Governor attends Silver Jubilee of St. Mary's ICSE School Navi Mumbai


 


Mumbai 27 : Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the Silver Jubilee celebration of the St. Mary's ICSE School Koparkhairane at Navi Mumbai on Mon (27 Jan).


Metropolitan of the Diocese of Bombay of the Malankara Orthodox Syrian Church Bishop Geeverghese Mar Coorilos, Secretary of the Malankara Orthodox Christian Council of Bombay Fr Thomas Chacko, CEO Fr Abraham Joseph, Principal Blessy Thomas, Vice Principal Fr John Mathew, Trustees, former Principals, teachers, parents and students were present.


The Governor released the Silver Jubilee School magazine and felicitated the School Committee Members and student achievers on the occasion.


            The Governor praised the Church Council of Bombay for its services in the areas of education, Orphan Care, old age care an

d care for special children.


०००


काव्यवाचन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त चौगुले पब्लिक

 काव्यवाचन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त चौगुले पब्लिक स्कूलमध्ये काव्यवाचन उपक्रम

 

नवी दिल्ली२७ : चौगुले पब्लिक स्कूलच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी वर्तमान विषयक तसेच बालकविता सादर केल्या. कोमडे दादा....,सॅण्डविच....आई कशी होती रे.... भारत माता... माणूस...... आयुष्य.... स्त्रीशक्तीकुतूहल.....चिमणीचे लग्न अशा विविध विषयांवरील कवितांचे वाचन केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील चौगुले पब्लिक स्कूलमध्ये कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण २१  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेच्या प्राचार्य पुजा साल्पेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका दिपाली सावंत आणि दिपाली कदम   यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सराव करून घेतला.

मराठी आणि अमराठी  भाषिक सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  सहभागी  झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावेयासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता सातवीची अदिती माने या विद्यार्थींनीने स्त्रीशक्तीवर आधारित कविता सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा सांळुके हिने आयुष्य.....या विषयावरील कविता स्पष्ट उच्चारात सादर केली. तिने  दुसऱ्या क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीतील कमलेश याने आईवर....... सुंदर कविता सादर केली. तर तनुष्का या आठवीतील विद्यार्थ्यांनीने वर्तमान परिस्थितीवर आधारित कविता सादर केली.  या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

    या कविता स्पर्धेस परीक्षक आणि प्रमुख पाहुणे  म्हणून महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारमहाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी

 गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण मंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट

 

मुंबईदि. २७ - शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहावा यासाठी शासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धारावी काळा किल्ला शाळा संकुलातील मुंबई पब्लिक स्कूल तसेच धारावी ट्रान्झिट कॅम्प मधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी श्री. भुसे यांनी शाळेतील बालवाडीसह अन्य वर्गग्रंथालयविद्यार्थ्याला वाचन आणि लिहिता येते कापाढे येतात काकविता वाचनविद्यार्थ्याची शारीरिक स्वच्छता याची पाहणी केली. त्यांनी पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्नपिण्याचे पाणी स्वतः तपासले. स्मार्ट क्लासरूमकंप्युटर लॅबक्राफ्ट रूम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान मिळत आहे की नाही ते जाणून घेतले. परिसर स्वच्छताविद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेली स्वच्छतागृहे तसेच शाळेतील सीसीटीव्ही यांची देखील पाहणी करून मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळांची पाहणी केल्यानंतर श्री.भुसे यांनी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळांमध्ये विद्यादानाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून हा दर्जा असाच कायम राखावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेयासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेतअसे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळजी उत्तर वार्ड च्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरेशाळेतील वर्ग शिक्षक यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री.भुसे यांना शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.

0000

येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता

 येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या 

बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

गाव तेथे नवी एसटी धावणार

 

मुंबईदि.२७ :  एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या   बसेस घेण्याच्या प्रस्तावाला  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेतअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरावित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्तापरिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठीपरिवहन आयुक्त विवेक भीमनवारएस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या  १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेताभविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली.  त्याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

परिवहन मंत्री श्रीसरनाईक म्हणालेदरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ मध्ये या २५  हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३०  हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल" गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी" आपण देऊ शकणार आहोत.

आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी  २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटीवर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी श्रीपवार यांचे आभारही मानले.

0000

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

 क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना

अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 27 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्याअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला. 

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळावा यासाठीही क्रीडा विभागाने समन्वय करावा.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडूंना अधिक संधी  मिळाली पाहिजे यासाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित होण्यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा वापर व्हावाअशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

क्रीडा विभागामार्फत १०० दिवसाच्या कालावधीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२०२३ व २०२३-२०२४ वितरण करणेगट  अ आणि ब  करिता पात्र  खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती आदेश देणेमिशन लक्ष्यवेधविभागीय क्रीडा संकुल नागपूरविभागीय संकुलशिंपोली मुंबईआणि  पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधील पदक प्राप्त खेळाडू व मार्गदर्शकांना बक्षीस वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजनपर्यावरण मंत्री पंकजा मुंडेक्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटीलमत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेमुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशीमदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठीपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगलमत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी उपस्थित होते.

क्रीडा विभागाचे सादरीकरण अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले.

Featured post

Lakshvedhi