Sunday, 26 January 2025

भूतलावरील बलाढ्य* *लोकशाही राष्ट्राच्या* *प्रजासत्ताक दिनाची*

 🇮🇳🌸🇮🇳🔆🌅🔆🇮🇳🌸🇮🇳


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


          *भूतलावरील बलाढ्य*

           *लोकशाही राष्ट्राच्या*

          *प्रजासत्ताक दिनाची* 

      

        *भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!*

        *सर्व देश बांधवांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*


🌹🔆🇮🇳🔆🌼🔆🇮🇳🔆🌹


        *अपि स्वर्णमयी लंका न मे रोचति लक्ष्मण ।*

        *जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥*

        *.... वाल्मिकी रामायण*


        *अर्थात जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आम्हांला आमची मातृभूमी.. हा भारत देशच प्रिय आहे.*  

        *२६ जानेवारी हा दिवस देशवासीयांचा राष्ट्रीय सण. ब्रिटिश कायदे हद्दपार करुन २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानानुसार देशात प्रत्येकाला न्याय देणारा राज्यकारभार सुरु झाला.*

        *स्वातंत्र्यानंतर भारतात राज्य कारभार कसा चालावा यावरचे चिंतन १९३५ पासून सुरू झाले होते. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समिती गठीत झाली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.*

        *यानंतर भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात.. अध्यक्षतेखाली स्थापन झाली. याच्या अनेक बैठका.. चर्चासत्रानंतर  संविधान सभेने अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला. संविधान निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले.*

        *संविधानाचा स्पष्ट उद्देश म्हणजे समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र.. दर्जा व संधीची समानता निश्चित झाली. या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता.. बंधुता मान्य झाली. यामुळेच २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.*

        *आणि.. आणि २६ जानेवारी १९५० पासून ब्रिटिश कायदे कायमचे हद्दपार करुन भारतीयानी तयार केलेल्या स्विकृत संविधानाप्रमाणे स्वतंत्र भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती सुरू झाली.*

        *भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.*

        *भारत.. या देशात आम्ही स्वातंत्र्य अनुभवतो. कोणतेही दडपण न येता मुक्तपणे देशभर फिरू शकतो. इथे आमच्या भावनांना मुक्त वाट करुन देता येते.. स्वतःच्या विवेकाने निर्णय घेता येतात. हे स्वातंत्र्य प्राप्त झालेय ते भारतीय राज्यघटनेने. अशा देशाचे आम्ही भाग्यवंत भारतवासी.*    

        *या देशाला आम्ही मातृस्थानी मानतो. आम्ही जात-पात मानत नाही. मानवता हाच आमचा धर्म. ज्ञान विज्ञानाची कवाडे उघडून जगातील सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करुन त्या योगे मानवी जीवनात क्रांती घडवून आणत आहोत.*

        *आमच्या प्रगतीची भरारी जगाला अचंबित करते आहे. देश प्रगती पथावर नेत जगात आमच्या देशाची मान सतत उंचावणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. भारतमातेचा अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज आमची देवता आहे.*

        

🌹🔆🇮🇳🔆🌼🔆🇮🇳🔆🌹


  *अशोक चक्रांकिता ध्वजा*

  *ही राष्ट्राची देवता*

  *वंदनिया ही स्फूर्तिदायिनी*

  *सार्वभौम भारता*


  *रंगत्रय-भूषिता भगवती*

  *घोषितसे एकता*

  *मानव विश्वालागी*

  *अवघ्या आश्वासी शांतता*

  *पुण्यदर्शने हिच्या स्फुरावी*

  *दास्याते मुक्तता*


  *छायेखाली हिच्या नांदते*

  *समानता, अस्मिता*

  *शतकोटी कर हिची रक्षिती*

  *प्राणपणे योग्यता*

  *भव्य भविष्या हिची उजळीते*

  *तेजस्विनी दिव्यता*


  *अखंड फडकत राहील ही*

  *या भारतीय व्योमी*

  *हिच्या पदतळी सुवर्ण उगविल*

  *भारतीय भूमी*

  *सदा विजयिनी, भाग्यशालिनी*

  *पंचशील पूजिता*


  *शस्त्रे, शास्त्रे सर्व वाहिली*

  *हिच्या प्रतिष्ठेप्रती*

  *हिच्या प्रतिष्ठेसाठी सारी*

  *धृति-कृति-जागृति*

  *धर्मध्वजही हिची मानिती*

  *सर्वंकष श्रेष्ठता*


🇮🇳🔆🌸🌼🇮🇳🌼🌸🔆🇮🇳


  *गीत : ग. दि. माडगूळकर*  ✍

  *संगीत : यशवंत देव*

  *स्वर : आकाशवाणी गायकवृंद*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-२६.०१.२०२५-*


              🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

           🇮🇳 *वंदे मातरम्* 🇮🇳


🌻🔆🥀🇮🇳🌺🇮🇳🥀🔆🌻

आम्ही देशाची आन बान...* *आम्ही देशाची आहोत संतान

 *आम्ही देशाची आन बान...*

*आम्ही देशाची आहोत संतान...*

*तीन रंगाचा तिरंगा आहे आमची पेहचांन...🥳🇮🇳*

*प्रजासत्ताक दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा...🇮🇳✨*.


महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

 

महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

 

नवी दिल्लीदि. 25  : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर यांना जाहीर करण्यात आले.

            देशातील 49 नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरिकांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर करण्यात आले. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येतील. देशातील नऊ जणांना उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत.

या पुरस्काराचे स्वरूप पदककेंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि  रोख रकम असे आहे. हे पुरस्कार संबंधित राज्य शासनामार्फत नंतर प्रदान करण्यात येतील.  

000

 


राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी शाळेला व्दितीय तर सांगलीच्या राजारामबापू पाटील मिलिटरी शाळेला तृतीय पुरस्कार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते

 राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी शाळेला व्दितीय

तर सांगलीच्या राजारामबापू पाटील मिलिटरी शाळेला तृतीय पुरस्कार

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नवी दिल्लीदि. 25: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय विद्यालय बँड स्पर्धेत नाशिक भोसला मिलीटरी मुलींच्या शाळेने व्दितीय पुरस्कार पटकावला. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमी या मुलांच्या शाळेने  तृतीय पुरस्कार पटकावला. आज केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेची महाअंतिम फेरी दिनांक २४ आणि २५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. भारतीय सैन्य दलाच्या प्रत्येक अंगामधून नियुक्त केलेल्या जूरी सदस्यांनी विजेत्यांची निवड केली.

मुलींसाठीचा पाइप बँड पुरस्काराअंतर्गत प्रथम पुरस्कार पीएम श्री कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयपाटमदापूर्व सिंगभूमझारखंड (पूर्व विभाग) व्दितीय पुरस्कार भोसला मिलिटरी स्कूलनाशिकमहाराष्ट्र (पश्चिम विभाग) तृतीय पुरस्कार श्री ठाकुर्ड्वारा बालिका विद्यालयगाझियाबादउत्तर प्रदेश (उत्तर क्षेत्र) यांना प्रदान करण्यात आला.   

मुलांसाठी पाइप बँड पुरस्कार श्रेणीत प्रथम पुरस्कार  सिटी मोंटेसरी स्कूलकानपूर रोडलखनऊउत्तर प्रदेश (उत्तर विभाग)व्द‍ितीय पुरस्कार  नॉर्थ सिक्कीम अकॅडमीनागनसिक्किम (पूर्व विभाग) तृतीय पुरस्कार राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमीइस्लामपूरसांगलीमहाराष्ट्र (पश्चिम विभाग) हे विजेते ठरले.

स्पर्धेतील प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन संघांना प्रथम २१,००० रुपये.व्दितीय १६,००० रुपयेतृतीय ११,००० रुपये आणि ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्येक श्रेणीतील उर्वरित स्पर्धक विद्यार्थी बँड संघांना ३,००० रुपये चा प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेतील प्रथम विजेत्या बँड संघाला २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्यपथावर आयोजित प्रजासत्ताक पथ संचलनात बँड सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. इतर दोन विजेते बँड संघांना २९ जानेवारी २०२५ रोजी विजय चौक येथे बीटिंग रिट्रीट समारंभात सादरीकरण दाखविण्याची संधी मिळेल.

या स्पर्धेचे आयोजन २०२३ पासून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यातर्फे संयुक्तपणे करण्यात येते. यामुळे शालेय बँड विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि देशाबद्दल एकतेचीअभिमानाची भावना निर्माण करतात.


महाराष्ट्राला 48 जणांना ‘पोलीस पदके’ चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

 महाराष्ट्राला 48 जणांना ‘पोलीस पदके’  चार अधिकाऱ्यांना 

नवी दिल्लीदि. 25 :  पोलीस पदकांची आज घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 48  पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) जाहीर झाली आहेत.

           प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदके’ जाहीर करते. यावर्षी  एकूण 942 ‘पोलीस पदके’ जाहीर झाली असून   देशभरातील एकूण 101 पोलिसांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक' (पीएसएम), 95 पोलिसांना पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 746 पोलिसांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी (एमएसएम)  पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 48 पदक मिळाली आहेत.

            देशातील  पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती  विशिष्ठ सेवा पदक’ जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.     

                         राष्ट्रपती विशिष्ट सेवेसाठी पदक (PSM)

 1.     डॉ रविंद्र  कुमार झिले सिंग सिंगल, -अतिरिक्त महासंचालक

 2.    श्री दत्तात्रय राजाराम कराळे- पोलिस महानिरीक्षक

 3.    श्री सुनिल बळीराम फुलारी -पोलिस महानिरीक्षक

 4.   श्री रामचंद्र बाबू केंडे – पोलिस कमांडंट

राज्यातील एकूण 44 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके (MSM)

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1. श्री संजय भास्कर दराडेमहानिरीक्षक

2. श्री वीरेंद्र मिश्रामहानिरीक्षक

3. श्रीमती  आरती प्रकाश सिंहमहानिरीक्षक

4. श्री चंद्र किशोर रामजीलाल मिनामहानिरीक्षक

5. श्री दीपक कृष्णाजी साकोरेउपमहानिरीक्षक

6. श्री राजेश रामचंद्र बनसोडेपोलीस अधीक्षक

7. श्री सुनील जयसिंग तांबेपोलीस उपअधीक्षक

8. श्रीमती  ममता लॉरेन्स डिसूझासहाय्यक पोलीस आयुक्त

9.  श्री धर्मपाल मोहन बनसोडेसहाय्यक पोलीस आयुक्त

10. श्री मधुकर माणिकराव सावंतनिरीक्षक

11. श्री राजेंद्र कारभारी कोतेनिरीक्षक

12. श्री रोशन रघुनाथ यादवपोलीस उपअधीक्षक

13. श्री अनिल लक्ष्मण लाडपोलीस उपअधीक्षक

14. श्री अरुण केरभाऊ डुंबरेसहाय्यक पोलीस आयुक्त

15. श्री नजीर नसीर शेखउपनिरीक्षक

16. श्री श्रीकांत चंद्रकांत तावडेउपनिरीक्षक

17. श्री महादेव गोविंद काळेउपनिरीक्षक

18. श्री तुकाराम शिवाजी निंबाळकरउपनिरीक्षक

19. श्री आनंदराव पुंजाराव मस्केसहाय्यक उपनिरीक्षक

20. श्री रवींद्र बाबुराव वानखेडेउपनिरीक्षक

21. श्री सुरेश चिंतामण मनोरेनिरीक्षक

22. श्री राजेंद्र देवमान वाघउपनिरीक्षक

23. श्री संजय अंबादासराव जोशीसहाय्यक उपनिरीक्षक

24. श्री दत्तू एकनाथ गायकवाडसहाय्यक उपनिरीक्षक

25. श्री नंदकिशोर ओंकार बोरोलेसहाय्यक उपनिरीक्षक

26. श्री आनंद रामचंद्र जंगमसहाय्यक उपनिरीक्षक

27. श्रीमती. सुनिता विजय पवारसहाय्यक उपनिरीक्षक

28. श्री जितेंद्र विठ्ठल म्हात्रेसहाय्यक उपनिरीक्षक

29. श्री प्रफुल्ल रामचंद्र सुर्वेसहाय्यक उपनिरीक्षक

30. श्री राजेंद्र शंकर काळेसहाय्यक उपनिरीक्षक

31. श्री सलीम गनी शेखसहाय्यक उपनिरीक्षक

32. श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळेसहाय्यक उपनिरीक्षक

33. श्री रामभाऊ संभाजी खंडागळेहेड कॉन्स्टेबल

34. श्री संजय भास्करराव चोबेप्रमुख कॉन्स्टेबल

35. श्री सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेनसहाय्यक उपनिरीक्षक

36. श्री विजय दामोदर जाधवहेड कॉन्स्टेबल

37. श्री रामराव वामनराव नागेसहाय्यक उपनिरीक्षक

38. श्री दिलीप भोजुसिंग राठोडहेड कॉन्स्टेबल

39. श्री आयुबखान अकबर मुल्लाहेड कॉन्स्टेबल

सुधारात्मक सेवा - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

1.    श्री विवेक वसंत झेंडेअतिरिक्त अधीक्षक

2.   श्री अहमद शमशुद्दीन मणेरहवालदार

3.   श्री गणेश महादेव गायकवाडहवालदार

4.  श्री प्रल्हाद दत्तात्रय कुदळेहवालदार

 5. श्री तुळशीराम काशिनाथ गोरावेहवालदार

000


 


निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल

राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

 

 नवी दिल्ली, दि. 25 :  निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी  एस. चोक्कलिंगम यांना आज नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.  निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन केल्याबद्दल निवडणूक व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि राज्यांना विविध श्रेणीत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू होत्या. याप्रसंगी केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवालमुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारनिवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारडॉ. सुखबीर सिंग संधू उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या नेतृत्वात राज्याने निवडणूक व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करून निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली. त्यांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आज त्यांचा सन्मान करण्यात आला. मतदारांच्या सहभागात वाढ करून त्यांचा मतदानाचा अनुभव अधिक सुलभ होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे विशेष कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यांनाही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

याशिवाय मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक संजय यादव यांना मतदान केंद्रांवरील विविध सुविधांचा दृष्टीकोन ठेवून विधानसभा निवडणुकांचे सुरळीत संचालन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेचमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना मतदान केंद्रांचे व्यापक सुसुत्रीकरणप्रशिक्षणाची अंमलबजावणी आणि ई-व्होटिंगच्या माध्यमातून यशस्वी निवडणूक आयोजन केल्याबद्दल गौरविण्यात आले.

000

महत्वाची बात मी

 


Featured post

Lakshvedhi