🇮🇳🌸🇮🇳🔆🌅🔆🇮🇳🌸🇮🇳
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*भूतलावरील बलाढ्य*
*लोकशाही राष्ट्राच्या*
*प्रजासत्ताक दिनाची*
*भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!*
*सर्व देश बांधवांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
🌹🔆🇮🇳🔆🌼🔆🇮🇳🔆🌹
*अपि स्वर्णमयी लंका न मे रोचति लक्ष्मण ।*
*जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥*
*.... वाल्मिकी रामायण*
*अर्थात जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आम्हांला आमची मातृभूमी.. हा भारत देशच प्रिय आहे.*
*२६ जानेवारी हा दिवस देशवासीयांचा राष्ट्रीय सण. ब्रिटिश कायदे हद्दपार करुन २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानानुसार देशात प्रत्येकाला न्याय देणारा राज्यकारभार सुरु झाला.*
*स्वातंत्र्यानंतर भारतात राज्य कारभार कसा चालावा यावरचे चिंतन १९३५ पासून सुरू झाले होते. ९ डिसेंबर १९४६ ला घटना समिती गठीत झाली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.*
*यानंतर भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात.. अध्यक्षतेखाली स्थापन झाली. याच्या अनेक बैठका.. चर्चासत्रानंतर संविधान सभेने अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला. संविधान निर्मितीसाठी २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले.*
*संविधानाचा स्पष्ट उद्देश म्हणजे समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र.. दर्जा व संधीची समानता निश्चित झाली. या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता.. बंधुता मान्य झाली. यामुळेच २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.*
*आणि.. आणि २६ जानेवारी १९५० पासून ब्रिटिश कायदे कायमचे हद्दपार करुन भारतीयानी तयार केलेल्या स्विकृत संविधानाप्रमाणे स्वतंत्र भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती सुरू झाली.*
*भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.*
*भारत.. या देशात आम्ही स्वातंत्र्य अनुभवतो. कोणतेही दडपण न येता मुक्तपणे देशभर फिरू शकतो. इथे आमच्या भावनांना मुक्त वाट करुन देता येते.. स्वतःच्या विवेकाने निर्णय घेता येतात. हे स्वातंत्र्य प्राप्त झालेय ते भारतीय राज्यघटनेने. अशा देशाचे आम्ही भाग्यवंत भारतवासी.*
*या देशाला आम्ही मातृस्थानी मानतो. आम्ही जात-पात मानत नाही. मानवता हाच आमचा धर्म. ज्ञान विज्ञानाची कवाडे उघडून जगातील सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करुन त्या योगे मानवी जीवनात क्रांती घडवून आणत आहोत.*
*आमच्या प्रगतीची भरारी जगाला अचंबित करते आहे. देश प्रगती पथावर नेत जगात आमच्या देशाची मान सतत उंचावणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. भारतमातेचा अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज आमची देवता आहे.*
🌹🔆🇮🇳🔆🌼🔆🇮🇳🔆🌹
*अशोक चक्रांकिता ध्वजा*
*ही राष्ट्राची देवता*
*वंदनिया ही स्फूर्तिदायिनी*
*सार्वभौम भारता*
*रंगत्रय-भूषिता भगवती*
*घोषितसे एकता*
*मानव विश्वालागी*
*अवघ्या आश्वासी शांतता*
*पुण्यदर्शने हिच्या स्फुरावी*
*दास्याते मुक्तता*
*छायेखाली हिच्या नांदते*
*समानता, अस्मिता*
*शतकोटी कर हिची रक्षिती*
*प्राणपणे योग्यता*
*भव्य भविष्या हिची उजळीते*
*तेजस्विनी दिव्यता*
*अखंड फडकत राहील ही*
*या भारतीय व्योमी*
*हिच्या पदतळी सुवर्ण उगविल*
*भारतीय भूमी*
*सदा विजयिनी, भाग्यशालिनी*
*पंचशील पूजिता*
*शस्त्रे, शास्त्रे सर्व वाहिली*
*हिच्या प्रतिष्ठेप्रती*
*हिच्या प्रतिष्ठेसाठी सारी*
*धृति-कृति-जागृति*
*धर्मध्वजही हिची मानिती*
*सर्वंकष श्रेष्ठता*
🇮🇳🔆🌸🌼🇮🇳🌼🌸🔆🇮🇳
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत : यशवंत देव*
*स्वर : आकाशवाणी गायकवृंद*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-२६.०१.२०२५-*
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🇮🇳 *वंदे मातरम्* 🇮🇳
🌻🔆🥀🇮🇳🌺🇮🇳🥀🔆🌻
No comments:
Post a Comment