Thursday, 23 January 2025

15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार

दावोसमध्ये इतिहास घडलामहाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार

रिलायन्सअ‍ॅमेझॉनचे मोठे करार15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार




 

दावोसदि. 22 जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असूनपेट्रोकेमिकल्सपॉलिस्टरनवीनीकरणीय ऊर्जाबायोएनर्जीहरित हायड्रोजनग्रीन केमिकल्सऔद्योगिक क्षेत्रविकासरिटेलडेटा सेंटर्सटेलिकम्युनिकेशन्सआदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावेहे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोतअसे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक ही अ‍ॅमेझॉन करणार असूनती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या 2 दिवसांत जे सामंजस्य करार झालेत्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असूनसमतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असूनएमएमआरडीएने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत.

टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यानमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवायमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालकसीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्कलॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे:

21) सिएट

क्षेत्र : ऑटोमोबाईलईव्ही

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : नागपूर

 

22) व्हीआयटी सेमिकॉन्स

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 24,437 कोटी

रोजगार : 33,600

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

23) टाटा समूह

क्षेत्र : बहुविध क्षेत्रात

गुंतवणूक : 30,000 कोटी

 

24) रुरल एन्हान्सर्स

क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक

गुंतवणूक : 10,000 कोटी

 

25) पॉवरिन ऊर्जा

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 15,299 कोटी

रोजगार : 4000

 

26) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 15,000 कोटी

रोजगार : 1000

 

27) युनायटेड फॉस्परस लि.

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 6500 कोटी

रोजगार : 1300

 

28) ईरुलर्निंग सोल्युशन्स

क्षेत्र : शिक्षण

गुंतवणूक: 20,000 कोटी

रोजगार : 20,000

 

29) ऑलेक्ट्रा ईव्ही

क्षेत्र : ऑटोमोबाईलईव्ही

गुंतवणूक: 3000 कोटी

रोजगार : 1000

 

30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील 5000 युवकांना एआयडिजिटल मार्केंटिंगबिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

..........

 

दि. 21 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 6,25,457 कोटी

एकूण रोजगार : 1,53,635

दि. 22 जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

31) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्सपॉलिस्टरनवीनीकरणीय ऊर्जाबायोएनर्जीहरित हायड्रोजनग्रीन केमिकल्सऔद्योगिक क्षेत्रविकासरिटेलडेटा सेंटर्सटेलिकम्युनिकेशन्सआदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: 3,05,000 कोटी

रोजगार : 3,00,000

 

32) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 10,319 कोटी

रोजगार : 3200

कोणत्या भागात : चंद्रपूर

 

33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरीलिथियम बॅटरी)

गुंतवणूक : 42,535 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : नागपूर

 

34) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग

गुंतवणूक : 21,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : रायगड

 

35) इंडोरामा

क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक: 10,200 कोटी

रोजगार : 3000

कोणत्या भागात : रायगड

 

36) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: 8641 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

37) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

38) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 1039 कोटी

रोजगार : 450

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

39) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : 10,000 कोटी

रोजगार : 2500

कोणत्या भागात : तळेगाव

 

40) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: 450 कोटी

रोजगार : 1100

कोणत्या भागात : एमएमआर

 

41) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : 12,780 कोटी

रोजगार : 2325

कोणत्या भागात : नागपूर

 

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : 14,652 कोटी

रोजगार : 8760

कोणत्या भागात : नागपूर

 

43) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : 300 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : जालना

 

44) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: 5000 कोटी

रोजगार : 1300

कोणत्या भागात : विदर्भमराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

 

45) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 16,000 कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : बुटीबोरी

 

46) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : 500 कोटी

रोजगार : 1200

कोणत्या भागात : अहिल्यानगर

 

47) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 43,000 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

48) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 51,600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

49) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 8600 कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

 

50) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : 71,795 कोटी

रोजगार : 83,100

कोणत्या भागात : एमएमआर

 

51) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

 

52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर

 

53) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

..............

दि. 22 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी

एकूण रोजगार : 15.75 लाख

००००


 

 

*15.70 Lakh Crore Investment Through 54 Memoranda of Understanding (MoUs)*

*Historic agreements at Davos, Maharashtra's highest-ever deals*

*Big deals from Reliance and Amazon, leading to 15.95 Lakh job creation*

 

Davos, 22 January: History was made at the World Economic Forum in Davos, with Maharashtra, under the leadership of Chief Minister Devendra Fadnavis, signing a total of 54 MoUs worth ₹15.70 lakh crore by the second day of the event. This is expected to generate 15.95 lakh jobs.

 

The largest investment among today’s MoUs was from the Reliance Group, which will invest ₹3.05 lakh crore across sectors like petrochemicals, polyester, renewable energy, bioenergy, green hydrogen, green chemicals, industrial development, retail, data centers, telecommunications, hospitality, and real estate. This single agreement is expected to generate 3 lakh jobs. Chief Minister Devendra Fadnavis mentioned that the agreement with Reliance, which includes significant investment in the service sector, will contribute significantly to job creation. Anant Ambani of Reliance Group stated that this investment is part of their vision to make Maharashtra the first state with a $1 trillion economy, a goal the government is committed to achieving under the leadership of Prime Minister Narendra Modi.

Another major investment is from Amazon, which will invest ₹71,795 crore in data centers in the Mumbai Metropolitan Region (MMR). This investment will create 83,100 jobs. Over the past two days, MoUs have been signed with investments across all regions of the state, aiming for balanced development. Of these total agreements, the Industrial Department has signed agreements worth ₹11.71 crore, the MMRDA has signed deals worth ₹3.44 lakh crore, and CIDCO has signed agreements worth ₹55,200 crore.

*Meeting with Tony Blair*

Meanwhile, Chief Minister Devendra Fadnavis met former British Prime Minister Tony Blair during the World Economic Forum. The discussion focused on energy and public transportation. Tony Blair expressed his intention to visit India soon. In addition, Chief Minister Fadnavis also met Hyundai Motors' Executive Vice President Bum Kim, and Sultan Ahmed Bin Sulayem, President of DP World, along with Rizwan Somar, the Managing Director and CEO of DP World India. They discussed potential cooperation in Maharashtra in sectors like industrial parks and logistics.

*Here is the detailed list of Memorandum of Understanding (MoU) agreements:*

  1. CEAT
  • Sector: Automobile, EV
  • Investment: ₹500 Crore
  • Employment: 500
  • Location: Nagpur
  1. VIT Semicons
  • Sector: Electronics
  • Investment: ₹24,437 Crore
  • Employment: 33,600
  • Location: Ratnagiri
  1. Tata Group
  • Sector: Diversified sectors
  • Investment: ₹30,000 Crore
  • Employment: (Employment numbers not provided)
  1. Rural Enhancers
  • Sector: Healthcare and Social Sector Investment
  • Investment: ₹10,000 Crore
  • Employment: (Employment numbers not provided)
  1. PowerIn Energy
  • Sector: Green Energy
  • Investment: ₹15,299 Crore
  • Employment: 4000
  1. Open Origin India Industries
  • Sector: Green Energy
  • Investment: ₹15,000 Crore
  • Employment: 1000
  1. United Phosphorus Ltd.
  • Sector: Green Energy
  • Investment: ₹6,500 Crore
  • Employment: 1300
  1. eLearning Solutions
  • Sector: Education
  • Investment: ₹20,000 Crore
  • Employment: 20,000
  1. Electra EV
  • Sector: Automobile, EV
  • Investment: ₹3000 Crore
  • Employment: 1000
  1. Fuel
  • Sector: SkillTech University in Pune
  • Investment: (Specific investment amount not provided)
  • Employment: 5000 youth to be trained in AI, Digital Marketing, and Business Analytics

These agreements will contribute significantly to the development of various sectors in Maharashtra, fostering both investment and employment opportunities.

As of 21st January

  • Total Investment: ₹6,25,457 Crore
  • Total Employment: 1,53,635

MoUs signed on 22nd January:

  1. Reliance Industries Ltd.
  • Sector: Petrochemicals, Polyester, Renewable Energy, Bioenergy, Green Hydrogen, Green Chemicals, Industrial Development, Retail, Data Centers, Telecommunications, Hospitality, and Real Estate
  • Investment: ₹3,05,000 Crore
  • Employment: 3,00,000
  1. Gritta Energy
  • Sector: Steel and Metals
  • Investment: ₹10,319 Crore
  • Employment: 3,200
  • Location: Chandrapur
  1. Vardhan Lithium
  • Sector: Electronics (Lithium Refinery, Lithium Battery)
  • Investment: ₹42,535 Crore
  • Employment: 5,000
  • Location: Nagpur
  1. Indorama
  • Sector: Textile Industry
  • Investment: ₹21,000 Crore
  • Employment: 1,000
  • Location: Raigad
  1. Indorama
  • Sector: Technical Textiles
  • Investment: ₹10,200 Crore
  • Employment: 3,000
  • Location: Raigad
  1. Sotefin India
  • Sector: Infrastructure
  • Investment: ₹8,641 Crore
  • Location: MMR
  1. Blackstone
  • Sector: Infrastructure
  • Investment: ₹43,000 Crore
  • Location: MMR
  1. Ceylon Beverages
  • Sector: Food and Beverages
  • Investment: ₹1,039 Crore
  • Employment: 450
  • Location: Ahilyanagar
  1. Larsen and Toubro Ltd.
  • Sector: Defense Production
  • Investment: ₹10,000 Crore
  • Employment: 2,500
  • Location: Talegaon
  1. Nelson Media Pvt. Ltd.

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडवाव्यात

 राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील

अडचणी त्वरीत सोडवाव्यात

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

·         पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कामे मार्गी लावण्याचे निर्देश

मुबंईदि. २२ :  शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व  करावी. राष्ट्रीय  महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाची कामे दर्जैदार  ही कामे गतीने पूर्ण करावी, भूसंपादनातील अडचणी त्वरीत सोडविण्यात याव्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी येथे दिल्या.

बांधकाम भवन येथे शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी या महामार्गाच्या संदर्भात बैठक झाली. यावेळीआमदार मोनिका राजळेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणालेराष्ट्रीय महामार्ग ७५२ ई पैठण शिरुर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याच्या कामात ज्या गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाहीत्याठिकाणी   संबंधितांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. ज्या भागात काम सुरु झाले आहे त्याठिकाणी  संबधित कंत्राटदारांनी गांर्भियाने कामाचा दर्जा राखावा. विहीत कालमर्यादेत काम पूर्ण करण्यावर  कटाक्षाने  लक्ष द्यावे. तसेच ज्या गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहेत्याच्या मावेजा मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांनी सादर करावा. मार्च एप्रिल २०२५ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.

राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ खरवंडी ते नवगण राजूरी रस्त्याचे दुपदरीकरणाचे कामास गती देण्यात यावीया भागातील १४.३० किमीमधील अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या गावांचे अंतिम निवाडा त्रुटीच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे त्यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकारी यांना विभागाने पत्र देऊन या  कामासंदर्भातील बाबी तत्परतेने पूर्ण करण्याचे सूचित करावे.  लोकांना सोयीचे होईल अशा पद्धतीने सर्व कामांची पूर्तता करावी. या सर्व कामांची गुणवत्ता व गती याची विभागाने पडताळणी करावी,अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधितांना दिल्या.

0000

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानदि. 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विशेष

 बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

 

मुंबई,दि.२२ केंद्र शासनाने ‘बेटी बचाओबेटी पढ़ाओ" हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे.  सन 2021-22 पासून राज्यातील  सर्व  जिल्हयांमध्ये  हे अभियान राबविण्यात येत आहे.  या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती सोहळा महिला व बालविकास मंत्री   अदिती तटकरेराज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू झाले. या उपक्रमामुळे मागील दहा वर्षात मुलींचा जन्मदर वाढला आहे. मुलींच्या प्राथमिक शिक्षणाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून मुलगा - मुलगी भेदभाव करू नये. मुलींना शिकवल्यास त्या कुटुंबाचा आधार होतात. या शिकवणीसह घरातील मुलांना मुलींप्रती चांगली शिकवणसंस्कार देणे गरजेचे आहे. मुलींमध्ये कर्तृत्ववान स्त्री असल्याचा आत्मविश्वास निर्माण करा. असे सांगून हे अभियान  दि. 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विशेष उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे  बोर्डीकर म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या अनेक योजना आणल्या. या योजनांमुळे महिला स्वावलंबी झाल्या.

राज्य शासनाने मुलींना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.  महिला लखपती दीदी झाल्या  पाहिजे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊसावित्री बाई फुलेअहिल्याबाई होळकर यांचा आहे असे सांगून मुलींचा जन्मदर आणि शिक्षण यासाठी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावेत त्यामुळे लोकांचे मनपरिवर्तन होण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवएकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारेविभागीय उपायुक्त, कोकण विभाग, सुवर्णा पवार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खेळाडू महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच , महिला बचत गटांना धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

000

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. २२ - मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केले.

येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एम एम आर डी ए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास कौशल्यरोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढामाहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकआमदार राजन नाईकनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ताअतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमारआश्विन मुद्गलसह महानगर आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्यासह ‘एम एम आर डी ए’ चे अधिकारीकर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

राज्यातील जनतेला मिळालेल्या सोयी सुविधांचा उत्सव म्हणजे आजचा उत्सव विकासाचा ही संकल्पना असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीवेगवान आणि गतिमान विकासाचे शिल्पकार असलेल्या ‘एम एम आर डी ए’ च्या टीमचे अभिनंदन करतो. विकासवारसा आणि संस्कृती यांचा उत्तम मिलाफ ‘एम एम आर डी ए’ मध्ये पहायला मिळतो. पुढील पिढीला या विकासाची फळे चाखायला मिळणार आहेत. मुंबई सह ठाणेरायगड आणि पालघर जिल्ह्याच्या विकासात प्राधिकरणाचा मोठा वाटा आहे. साडेसहा हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आणि साडेतीन कोटी लोकसंख्या असलेल्या परिसराचा विकास प्राधिकरण करत आहे. सल्लागार म्हणून स्थापन झालेली ही संस्था आज वेगाने विकासकामे करत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

 उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की३ लाख कोटी पेक्षा जास्त किमतीची कामे सुरू असणारे हे देशातील एकमेव प्राधिकरण आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करण्याचा उद्देश आहे. पण एकट्या ‘एम एम आर डी ए’ क्षेत्रात दीड ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे सामर्थ्य आहे. जगाचे आर्थिक केंद्र होण्याचे क्षमता महानगर प्राधिकरण क्षेत्रात आहे. ही क्षमता निर्माण करणारे प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो.

राज्य आज थेट परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात क्रमांक एकवर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीदावोस येथे आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व रेकॉर्ड तोडले जातील असा विश्वास आहे. लोकांच्यासाठी शासन काम करत आहे. लोकांना सर्व सोयीसुविधा देणे यासाठी शासन काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आता ‘एम एम आर डी ए’महापालिकासिडकोम्हाडा यांच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकर पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.श्री शेलार म्हणाले कीप्राधिकरण ने ५० वर्षात मोठी झेप घेतली आहे. अशीच शतकी झेप घ्यावी अशा शुभेच्छा देतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे करणारी दुसरी संस्था नाही.

यावेळी ‘एम एम आर डी ए’ च्या विविध शाखांचे व अधिकारी यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्राधिकरणाचे बोधचिन्हकॉफी टेबल बुक प्रकाशन ही करण्यात आले. अशोक हांडे आणि त्यांचा पथकाने मराठी बाणा हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कुमार यांनी तर आभार प्रदर्शन राधा विनोद शर्मा यांनी केले.

Wednesday, 22 January 2025

मराठी भाषा पंधरवडा' व 'विश्व मराठी संमेलन' यानिमित्त 'दिलखुलास', 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विजया डोनीकर यांची मुलाखत

 मराठी भाषा पंधरवडाव 'विश्व मराठी संमेलनयानिमित्त

'दिलखुलास', 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात विजया डोनीकर यांची मुलाखत

 

मुंबई दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'मराठी भाषा पंधरवडाआणि 'तीसरे विश्व मराठी संमेलनयानिमित्त मराठी भाषा संचालनालयाच्या संचालक विजया डोनीकर यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

            ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 24, शनिवार दि.25, सोमवार दि. 27 आणि मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्याची बोली भाषा म्हणजेच 'मराठीभाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण घेतला. ही तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषेची महती आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावीतिचे महत्त्व वाढावे यासाठी मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा वृद्धीगत व्हावी आणि जनमाणसात तीचे महत्व वाढावे यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 ते 28 या कालावधीत 'मराठी भाषा पंधरवडाचे आयोजन केले जाते. या पंधरवाड्यात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर दिनांक 31 जानेवारी व दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी 'तीसरे विश्व मराठी संमेलनआयोजित केले आहे. त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे व कोणकोणत्या विषयांवर या संमेलनातून चर्चा करण्यात येणार आहे याबाबत संचालक श्रीमती डोनिकर यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

मानवी संवेदनेसह सेवा हे टपाल विभागाचे वैशिष्ट्य

 मानवी संवेदनेसह सेवा हे टपाल विभागाचे वैशिष्ट्य

मुंबई, दि. २२ : भारतीय टपाल विभागाने आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीमध्ये मानवी संवेदनेसह सेवा देऊन लोकांशी भावनिक नाते जोपासले आहे. हे भावनिक नाते व विश्वासाची परंपरा  हे डाक विभागाचे बलस्थान असूनआगामी काळात डाक विभाग विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईलअसा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे (महापेक्स २०२५) उदघाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.

कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानामुळे मुले व युवा वर्ग अंकगणना आणि लेखन कौशल्य विसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व युवकांना पत्रलेखनतिकीट संकलन आदी विषयांची गोडी लावण्याचा डाक विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आलेतसेच मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड  माय  स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. 

राज्यपालांच्या हस्ते महापेक्सच्या बोधचिन्हाचे उदघाटन करण्यात आले तसेच जागतिक व्यापार केंद्र मुंबईब्रेल लिपी तसेच डाक सेवा इ सायकल अभियानावर आधारित विशेष आवरणाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र व गोव्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंहजागतिक व्यापार केंद्र मुंबईचे संचालक विजय कलंत्रीटाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉयमानेक शाहकाही देशांचे वाणिज्यदूत व देशाच्या विविध भागातून आलेले पोस्ट तिकीट संग्राहक उपस्थित होते. महापेक्स हे प्रदर्शन ४ दिवस सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*****

 

Maha Governor inaugurates State Philatelic Exhibition

Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 4 - day MAHAPEX 2025 the State Level Philatelic Exhibition organised by the Maharashtra Postal Circle at World Trade Centre in Mumbai on Wed (22 Jan.)

The Governor released the Logo of the Exhibition and also released the Permanent Pictorial Cancellation on Pandav Leni near Nashik and Customised My Stamp on Mulchand G Shah.

The Governor also released the Special Cover on the World Trade Centre Mumbai, Braille Script and the Dak Seva e-bicycle expedition on the occasion.

Chief Post Master General of Maharashtra and Goa Amitabh Singh, Chairman of WTC Mumbai Vijay Kalantri, Times of India Executive Bhavana Roy and Manek Shah were present.

0000


 

मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प

 मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प

मंत्री गुलाबराव पाटील

प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागतिक स्तरावरील बँकांचे सहकार्य

मुंबईदि. 22 : मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खात्रीशीर व कायमस्वरुपी उपाययोजना म्हणुन मराठवाड्यातील 11 मोठी धरणे पाईपलाईनद्वारे जोडून मराठवाड्यातील सर्व शहरेगावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी 'मराठवाडा वॉटर ग्रीडयोजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहेअसे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागतिक स्तरावरील बँकांचा सहभाग असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

'मराठवाडा वॉटर ग्रीडप्रकल्पाबाबत जागतिक स्तरावरील बँकांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे - महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशीजल जीवन मिशन अभियान संचालक ई रवींद्रनजलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे अशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे राजेश यादवएशियन डेव्हल्पमेंट बँकेचे विकास गोयलन्यू डेव्हल्पमेंट बँकचे बिंदू माधव पांडाएन रंगनाथ उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील म्हणाले कीमराठवाड्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. 'मराठवाडा वॉटर ग्रीडप्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे.  तसेच  केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 'मराठवाडा वॉटर ग्रीडप्रकल्पाची उभारणी राज्य शासनाने वर्ल्ड बँकआशियायी विकास बँक यासारख्या बँकांमार्फत कर्ज स्वरुपात निधी उभारणी करुन अंमलबजावणी करण्यात यावीअसे सूचित केले आहे. त्यानुसार ‘मित्रा’ संस्थेमार्फत अशा जागतिक संस्थांशी समन्वय साधून हा प्रकल्प पुढे नेण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात यावा.

0000

Featured post

Lakshvedhi