Friday, 24 January 2025

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे

  

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना

राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे

- परिवहन राज्यमंत्री माधुरी  मिसाळ

बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश

 

मुंबईदि. 23 : राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावाअसे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.  बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,  वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुखमहाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

--

अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत २८ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल

अभियान अंतर्गत २८ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

       

            मुंबई दि. २३ : अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्यभात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. तरीजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  mahadbt.maharashtra.gov.in (farmer login) या संकेतस्थळावर २८ जानेवारी२०२५ पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच कडधान्यामध्ये  बीज प्रक्रिया ड्रम (seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत (pulveriser) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (oil extraction unit ) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यांत्रिकीकरण व सिंचन (Mechanization and Irrigation) या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक दर्जाचे करावे

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील

स्मारक जागतिक दर्जाचे करावे

-         सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री यांनी केली इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी

 

मुंबईदि. 23 : संपूर्ण जगासाठी आकर्षण आणि प्रेरणादायी ठरणारे, दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. एप्रिल 2026 पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या. तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले. दादर इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची आज मंत्री श्री. शिरसाट यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरियाअतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमारसहायक आयुक्त प्रसाद खैरनार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधास्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाय योजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

सध्या येथील इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकामध्ये शंभर फूट उंच पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूने आच्छादित ३५० फुट उंचीचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण परिसर हरित असेलया ठिकाणी एक हजार आसन क्षमता असलेले सभागृहसंशोधन केंद्रध्यानधारणा केंद्रग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

*****

दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत

 दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात

सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

 

मुंबईदि. २३ :  दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्यायाबाबत शासनाचे आक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडकेसह सचिव संजय इंगळेअवर सचिव प्रितमकुमार जावळे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीपूरभूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणेडोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणेपुनर्वसनासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पुनर्वसित ठिकाणी १२ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात तरतूद करण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले कीया धोरणाची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय स्तरावर काही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसारया धोरणात आणखी काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे या धोरणात सुधारणा करणे व आणखी काही बाबींचा समावेश करणेबाबत क्षेत्रीय स्तरावरून सूचना घेणे आवश्यक आहे.

००००

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

     मुंबई, दि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

             मंत्रालयात  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशीमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, दूरदृश्यप्रणालीव्दारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर,अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसेकोकण विभागाचे उपसंचालक हणमंत हेडे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने अनेक पर्यटन प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना व सवलती याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करून सर्व पर्यटन योजनांना गती देण्यात येईल. जिल्ह्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पर्यावरणासह आवश्यक त्या परवानग्या घेवून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून प्रकल्प पूर्ण करा. चांदा ते बांदा प्रकल्पातील मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने करा. सिंधुरत्न योजना, जिल्ह्यात सुरू होणारी सबमरीनदोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील वॉटर स्पोर्टस या कामांना विभागाने गती द्यावी अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी केल्या.

यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

००००


प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

 प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर

दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

 

            नवी दिल्ली, दि 23 : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात  महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून  राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात परेड कमांडर’ म्हणून  जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहनकराटेयोगारायफल शूटिंगखो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक   बेल्टची  सुवर्णपदक विजेती आहे.

0000

 

 


नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

मुंबईदि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन आणि लक्षवेधी नफा मिळवल्याबद्दल नुकताच इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर या  (ICCOA) राष्ट्रीय स्तरावरील जैविक इंडियन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

           सेंद्रिय शेतीमध्ये क्रांतिकारक कार्य केल्यामुळे आणि कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 50 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नंदाताई मुंदे करत असलेली शेती ही सेंद्रिय शेती प्रकल्प  प्रमाणीकरण प्राप्त आहे.

         2022 ते 2024-25 या वर्षामध्ये ताईंनी सोयाबीनतूरगहूहरभरा या पिकांचे दोन एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली. एकूण 26 हजार रुपयांच्या भांडवलात ताईंनी ही सेंद्रिय शेती केली त्यातून 22 क्विंटल सोयाबीन8 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या उत्पादनातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ताईंनी एकूण 1,45,624 रुपये नफा मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि मुख्य संचालन अधिकारी यांनी अभिनंदन केले.

००००

Featured post

Lakshvedhi