Tuesday, 21 January 2025

माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

 माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे

उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबईदि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेमाहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंहसंघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडेउपाध्यक्ष महेश पवारसरचिटणीस प्रवीण पुरोखजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीस्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनीनिर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसापरंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडियाडिजिटल प्लॅटफॉर्म्सआणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवरसोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर एआयचा मोठा प्रभाव पडणार आहे. एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतोमात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्यपारदर्शकताआणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतातअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. मीडिया ट्रायलमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतेएखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्यपारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणेटीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्यासकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडूनमंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले कीसध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्रतरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोवीड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्रमाध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे श्री. चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी शासनाने पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवावे, अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार श्री. यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडेमंदार पारकरखंडूराज गायकवाडसुरेंद्र गांगणसंजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

जेष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन 2023) आणि श्रीमती ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (सन 2024)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023 :

मुद्रित माध्यम - लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्यलोकसत्ता

वृत्तवाहिनी पत्रकार विनया देशपांडेसीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसेलोकमतमुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 :

मुद्रित माध्यम ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटीललोकमत सातारा

वृत्त वाहिनी –  मंदार गोंजारीएबीपी माझापुणे

वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलारपुढारीमुंबई

००००

क्षत्रेक्य परिषद अमृत महोत्सव

 

🌸 क्षात्रैक्य परिषद 🌸
     ☘️"अमृत महोत्सव"☘️
क्षात्रैक्य परिषद आता पंचाहत्तर वर्षाची झाली आहे. छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे.    
  पं.वि.अरविंद हरी राऊत यांनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी "क्षात्रैक्य  परिषद" या नावाने संस्थेची स्थापना केली.            
  क्षात्रैक्य परिषद, समाज बांधवांसाठी गेली ७५ वर्षे अनेक उपक्रम राबवित आहे.
   हा *अमृत महोत्सव * कार्यक्रम                        📅 दिनांक -९ फेब्रुवारी २०२५ रोजी                   🌴🌴मढ-मास्तर वाडी,मालाड  (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.                            🕰️ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी १०ते सायंकाळी ४•३० वा.अशी आहे.                                                                          📕हया  प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. ज्या समाज बांधवांना स्मरणिकेसाठी जाहिरात अथवा देणगी दयायची असेल त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
   सर्व समाज बांधवांना हे आग्रहाच निमंत्रण आहे, आपण या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे. 
 आपला धनादेश "क्षात्रैक्य परिषद " (KSHATRAIKYA PARISHAD) या नावाने द्यावा.  
श्री.जगदीश पाटील मो.9821548919

श्री. विजय पाटील-8976000289

चंद्रकांत पाटील-9821086411
🌸 क्षात्रैक्य परिषद 🌸

     ☘️"अमृत महोत्सव"☘️
क्षात्रैक्य परिषद आता पंचाहत्तर वर्षाची झाली आहे. छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे.    
  पं.वि.अरविंद हरी राऊत यांनी पंचाहत्तर वर्षांपूर्वी "क्षात्रैक्य परिषद" या नावाने संस्थेची स्थापना केली.            
  क्षात्रैक्य परिषद, समाज बांधवांसाठी गेली ७५ वर्षे अनेक उपक्रम राबवित आहे.
   हा *अमृत महोत्सव * कार्यक्रम 📅 दिनांक -९ फेब्रुवारी २०२५ रोजी 🌴🌴मढ-मास्तर वाडी,मालाड (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. 🕰️ह्या कार्यक्रमाची वेळ सकाळी १०ते सायंकाळी ४•३० वा.अशी आहे. 📕हया प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. ज्या समाज बांधवांना स्मरणिकेसाठी जाहिरात अथवा देणगी दयायची असेल त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
   सर्व समाज बांधवांना हे आग्रहाच निमंत्रण आहे, आपण या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे. 
 आपला धनादेश "क्षात्रैक्य परिषद " (KSHATRAIKYA PARISHAD) या नावाने द्यावा.  
श्री.जगदीश पाटील मो.9821548919

श्री. विजय पाटील-8976000289

चंद्रकांत पाटील-9821086411

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील

 मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 

मुंबई,दि. २० : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे डिसेंबर-२०२४ मध्ये दि. १०/१२/२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्रीदि. १४/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेषदि. १८/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव मासिकदि. २१/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २५/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या सोडती काढण्यात आल्या असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2412-A/39878 या लॉटरी भंडारनागपूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रु. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-06-4089 या श्री. गणेश एन्टरप्रायझेस दादरमुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G562976 या महालक्ष्मी लॉटरीछत्रपती संभाजीनगर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-08/5631 या गुरुदेव दत्त लॉटरी एजन्सीपुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ०५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय डिसेंबर - २०२४ मध्ये मासिक सोडतीतून १३९०१ तिकीटांना रू. १,२५,०९,७००/- व साप्ताहिक सोडतीतून ५८८१२ तिकीटांना रू. २,०३,६९,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी,असे आवाहन उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

खो-खो विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केले अभिनंदन

 खो-खो  विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे

क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केले अभिनंदन !

राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडुंनी मानले आभार

 

मुंबईदि. 20 :-खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी नुकताच संवाद साधत अभिनंदन केले.

खो-खोसाठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणालेनिधी देणे ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने  नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.

0000 

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

 क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

                                     -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईदि. 20 एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी  क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावेअसे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी " महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज " ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

            मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की ,  एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरीनिम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.  बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानकेआगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत.  त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100  खाटांचे अद्ययावत रुग्णालयइलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनरेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी  सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेतअसे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष  डॉमनिक रोमेल  व इतर पदाधिकारीविकासकवास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

 


देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक मुंबई, दि. 20 :- नवी

 देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या

पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक

 

मुंबईदि. 20 :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड तरप्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्याकडे असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला.  विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटेअनिकेत पोटेआदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदेकु. रेश्मा राठोडवैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोलेमहिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००००

Aadhaar Face Authentication transactions crosses 100 crore landmark, doubles in five months

 UIDAI conducts stakeholders meet with BFSI, Fintech and Telcos to further enhance smooth service delivery

Aadhaar Face Authentication transactions crosses 100 crore

 landmark, doubles in five months

Nearly 500 industry representatives came together for Aadhaar Samvaad, co-hosted by Govt of Maharashtra

 

Mumbai 20: The Unique Identification Authority of India concluded a day-long stakeholders meet with industry leaders from sectors like BFSI, Fintech and Telecom to deliberate and further enhance service delivery by using Aadhaar.

Nearly 500 senior policy makers, industry leaders, experts, technocrats, from banks, insurance companies, NPCI, market intermediaries, telecom service providers, Fintech  players etc came together for the ‘Aadhaar Samvaad’ co-hosted by Govt of Maharashtra.

 

100-crore Aadhaar’s Face Authentication transactions

 

The event also marked a milestone – Aadhaar’s Face Authentication transaction numbers have crossed the 100-crore mark since it was first introduced in October 2021. The AI/ML based face authentication solution, developed in house by UIDAI, has been witnessing a massive growth in the past year. The cumulative face authentication transactions doubled from 50 crore to 100 crore in around 5 months.

 

Addressing the stakeholders meet, S Krishnan, Secretary, Ministry of Electronics and Information Technology (MeitY) underlined the population scale usage of Aadhaar and how Aadhaar is the foundational layer of India’s digital public infrastructures (DPIs). He encouraged UIDAI to continue working with all the stakeholders for empowering more and more people, and further enhancing Ease of Living.

Bhuvnesh Kumar, CEO, UIDAI emphasized the transformative role of Aadhaar in fostering trust in digital transactions. He said UIDAI has always stayed aligned with the growth path of the country and aspirations of its people.

 

Chairman, UIDAI Neelkanth Mishra and CEO, UIDAI underlined the population scale use of Aadhaar and its immense potential.

 

The achievement of 100 crore face authentication transactions reaffirmed Aadhaar’s position as the backbone of India’s digital identity ecosystem. As a resident centric organisation, our vision is to make life easier for Aadhaar number holders by facilitating smooth delivery of services, Kumar stated. He thanked the Government of Maharashtra for co-hosting the event at Mumbai.

 

This stakeholders’ meet encompassing four focused panel discussions brainstormed ideas, building frameworks and improving user journey. Led by industry leaders, these panel discussions revolved around integrating Aadhaar face authentication for better banking services, enhancing ease of service delivery by NBFCs and Fintechs and further improving Aadhaar authentication experience at telecom service providers The panel also brainstormed ideas around a safer digital future.  The actionable inputs will be considered for service improvement.

 

This is the second episode of the Aadhaar Samvaad series; the first one was conducted in Bengaluru in November.

 

Face Authentication Landmark:

This landmark achievement of 100 crore face authentication transactions underscores the trust and adoption of this new biometric authentication modality across diverse sectors including fintech, finance, and telecommunications. Scores of government services offered by both the centre and states are using it for smooth delivery of benefits to targeted beneficiaries.

Face authentication is also working as a robust alternative and helping senior citizens and all those who have issues with the quality of their fingerprints due to several reasons including manual work or health issues.

As of now, 92 entities both in government and private sector are using Aadhaar face authentication. This AI based modality works both on Android and iOS platforms. It is safe against any video replay attacks and static photo authentication attempts by anti-social elements and a contactless, anytime- anywhere modality.

This authentication modality enables users to verify their identity with just a face scan, ensuring convenience while upholding stringent security standards.

 

*****

Featured post

Lakshvedhi