Tuesday, 21 January 2025

UIDAI और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवाद' कार्यक्रम आयोजित किया, फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार किया, पांच महीनों में दोगुनी वृद्धि

 UIDAI और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवादकार्यक्रम आयोजित किया,

फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार किया,

पांच महीनों में दोगुनी वृद्धि

 

मुंबई, 20 जनवरी 2025 – UIDAI (यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) और महाराष्ट्र सरकार ने संयुक्त रूप से 'आधार संवादकार्यक्रम का आयोजन कियाजिसमें BFSI, फिनटेक और टेलिकॉम क्षेत्रों से 500 हितधारकों ने भाग लिया। इस कार्यक्रम में आधार के विभिन्न अनुप्रयोगों पर चर्चा की गई और सेवाओं की आपूर्ति को बेहतर बनाने के उपायों पर विचार-विमर्श किया गया।

 

फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स का ऐतिहासिक उच्चांक

आधार के फेस ऑथेंटिकेशन ट्रांजेक्शन्स ने 100 करोड़ का आंकड़ा पार कियाजो केवल पांच महीनों में 50 करोड़ से दोगुना हो गया। 2021 में शुरू हुई यह AI/ML आधारित प्रणाली विभिन्न क्षेत्रों में सुरक्षित और सुविधाजनक पहचान सत्यापन के लिए बड़े पैमाने पर उपयोग की जा रही है।

 

हितधारकों की भागीदारी

बैंकिंगएनबीएफसीफिनटेक और टेलिकॉम क्षेत्रों के विशेषज्ञों ने चार पैनल चर्चाओं में भाग लियाजिसमें आधार के माध्यम से सेवा सुधारने के उपायों और नीतियों पर विचार किया गया।

 

डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर में आधार की भूमिका

इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय के सचिव एस. कृष्णन ने आधार के जनसंख्या-आधारित उपयोग के बारे में बताया और यह रेखांकित किया कि आधार ने डिजिटल लेन-देन में विश्वास बढ़ाने में महत्वपूर्ण योगदान दिया है।

 

फेस ऑथेंटिकेशन का उपयोग

वर्तमान में 92 सरकारी और निजी संस्थाएं आधार के फेस ऑथेंटिकेशन प्रणाली का उपयोग कर रही हैंजो सुरक्षितसंपर्क रहित और कभी भीकहीं भी इस्तेमाल करने में आसान है।

 

भविष्य के लक्ष्य

UIDAI के CEO भूवनेश कुमार ने आधार के माध्यम से सेवा वितरण को और अधिक सुविधाजनक बनाने की UIDAI की प्रतिबद्धता को दोहराया। इस कार्यक्रम का उद्देश्य वित्तदूरसंचारफिनटेक और सार्वजनिक सेवाओं में आधार के उपयोग को बढ़ाना है।

 

आधार संवाद कार्यक्रम का दूसरा चरण मुंबई में सफलतापूर्वक आयोजित हुआजबकि पहला चरण नवंबर में बेंगलुरु में आयोजित किया गया था।

000


जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी

 जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई,दि.20 : जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतातील परस्पर संबध अधिक वृध्दींगत होतील, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

           जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेजपानचे वाकायामा प्रातांचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचेजपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजीवाकायामाचे सोनोबे सॅनमहिरा हेदुयेकीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशीमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वालअधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसेयावेळी उपस्थित होते.

 यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे.असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटन मंत्री श्री.देसाई यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/स.सं

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

 महसूल विभागाने शंभर दिवसांसाठी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 20 :-  महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या प्रत्येक कामाशी निगडीत विभाग आहे. महसूल विभागाची सर्वसमवेशक कामेसुविधायोजनांच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे जनसामन्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलदगतीने उपलब्ध करून द्याव्यातअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

महसूल विभाग अंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रमयोजनांचा आढावा महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारउपसचिव अजित देशमुखधनंजय निकमसत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेनागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा on line देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा.  यामध्ये जमीन पोर्टलमहाखनिज पोर्टलआपली चावडीई चावडी  यासारख्या प्रणालींचा वापर करावा.

महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती  करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजनाउपक्रमांचा आढावा घ्यावाअशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.


भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिकस्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख

 भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिकस्तरावर

शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख

- सभापती प्रा.राम शिंदे

पाटणा पीठासीन अधिकारी परिषदेत विचारमंथन

मुंबई, दि. 21 : जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे  वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे, कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते बोलत होते. "भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान" या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होत आहे.

विचार व्यक्त करतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच संकटांचा यशस्वी सामना केला. घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले, मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.

"लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. एकाला सोडून  दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही. तसे झाल्यास लोकशाही  संदर्भातील मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचेल" या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक अशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.

0000

Governor attends 74th Foundation Day Celebration of NAB;

 presents awards to Young Achievers

 

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over the 74th Foundation Day of the National Association for the Blind (NAB) India at its premises in Worli, Mumbai on Mon (20 Jan.) The Governor presented various awards and Young Achievers awards on the occasion.

The Governor lauded NAB India’s initiatives, including the Braille Printing Press, Talking Books, Perfumery Training, and Teacher Training, which equip visually impaired persons with essential skills and opportunities for a dignified life.

The Governor congratulated the award recipients and Young Achievers for their extraordinary contributions, stating that their achievements are a source of inspiration.

President of NAB India Hemant Takle, Honorary Secretary General Harinder Kumar Mallik, Acting Honorary Secretary General Dr. Vimal Dengla, Executive Director Smt. Pallavi Kadam, and others were present.

००००

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा

 राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा

अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २१ : आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. यास्तव अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षणपुनर्वसन व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस संस्थेच्या वरळी मुंबई येथील सभागृहात सोमवारी (दि. २०) संपन्न झालात्यावेळी राज्यपाल बोलत होते.

झारखंड येथे आपण राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला ७३ लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होतातर २०२४ साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आवाहनानुसार ७४० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसाला ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नॅब संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे योगदान होते हे समजल्यामुळे आपला त्यांच्याप्रती असलेला आदर शतपटींनी वाढला आहेअसे सांगून नॅब ही संस्था अंध तसेच दृष्टिबाधित व्यक्तींकरिता आशा जागवणारी व सक्षमीकरणाची हमी देणारी संस्था ठरली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

आपले पूर्ववर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी 'नॅब'ला ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदी करण्यास अर्थसहाय्य केले असल्याचे नमूद करून यापुढे देखील राजभवन नॅबच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे राज्यपालांनी सांगितले.   

आपल्या ब्रेल प्रिंटिंग प्रेसटॉकिंग बुक्सपरफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नॅब दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. 

कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकलेमानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिककार्यकारी महासचिव डॉ विमल देंगडाकार्यकारी संचालक पल्लवी कदमसंस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके वितरण करण्यात आली.

चहा पिणाच्या प्लास्टिक कप वर बंदी


 

Featured post

Lakshvedhi