Monday, 20 January 2025

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील

 मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

 

मुंबई,दि. २० : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे डिसेंबर-२०२४ मध्ये दि. १०/१२/२४ रोजी महाराष्ट्र सहयाद्रीदि. १४/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेषदि. १८/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव मासिकदि. २१/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २५/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या सोडती काढण्यात आल्या असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र सहयाद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2412-A/39878 या लॉटरी भंडारनागपूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रु. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-06-4089 या श्री. गणेश एन्टरप्रायझेस दादरमुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G562976 या महालक्ष्मी लॉटरीछत्रपती संभाजीनगर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.३५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.

महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-08/5631 या गुरुदेव दत्त लॉटरी एजन्सीपुणे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ०५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय डिसेंबर - २०२४ मध्ये मासिक सोडतीतून १३९०१ तिकीटांना रू. १,२५,०९,७००/- व साप्ताहिक सोडतीतून ५८८१२ तिकीटांना रू. २,०३,६९,८००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी,असे आवाहन उपसंचालक (वित्त व लेखा)महाराष्ट्र राज्य लॉटरीवाशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचा यशस्वी उपक्रम नवी दिल्ली येथील पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद

 महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचा यशस्वी उपक्रम

नवी दिल्ली येथील पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद

 

नवी दिल्ली दि. 20: महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त 17 ते 19 जानेवारीदरम्यान महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. येथे आलेल्या प्रकाशकांनीही समाधान व्यक्त केले.

प्रदर्शनात मराठी साहित्यकाव्यसंग्रहचरित्रेइतिहासबालसाहित्य आणि विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध होती. मराठी भाषिक आणि दिल्लीतील साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनालाभेट दिली.

या उपक्रमामुळे मराठी वाचक आणि प्रकाशक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. पुस्तक विक्रीस मिळालेला प्रतिसाद प्रकाशकांनीही समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे नियमित आयोजन व्हावेअशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रकाशकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने राजधानी दिल्लीत पुस्तक विक्री प्रदर्शनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशकांनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे आभार मानले.

०००


.ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला अभिमान’

 .ही विजयश्री अविस्मरणीयमहाराष्ट्राला आपला अभिमान

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिलापुरूष संघांचे अभिनंदन

कर्णधार प्रियंका इंगळेप्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

 

मुंबईदि. 20 :- '..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,' अशा शब्दांत खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरूष संघांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.

या दोन्ही संघांचे कर्णधारपद महाराष्ट्राकडे असताना हा अविस्मरणीय विजय साकारला गेल्याचा विशेष आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिलासंघाची कर्णधार प्रियंका इंगळेपुरूष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचावण्याची अद्वितीय कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.

"पहिल्याच विश्वचषकावर भारताचे नाव कोरण्याची कामगिरी आपल्या महाराष्ट्र सुपुत्रांनी केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी विश्वविजेत्या महिलासंघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह संघातील खेळाडू अश्विनी शिंदेरेश्मा राठोडवैष्णवी पवार तसेच पुरुष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह सुयश गरगटेअनिकेत पोटेआदित्य गनपुले व रामजी कश्यप या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे.

या विजयात पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोलेमहिला संघाच्या प्रशिक्षक प्राचीताई वाईकर आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. या सगळ्यांनी आपल्या सांघिक कामगिरीने देशासाठी अविस्मरणीय विजयश्री खेचून आणली आहे. या यशात खेळाडच्या मेहनतीसहत्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ महत्वपूर्ण आहे. या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि खेळाडूंच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छाअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.

00000


Art


 

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

 क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे

                                     -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबईदि. 20 एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी  क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावेअसे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी " महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज " ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मंत्री बोलत होते.

            मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की ,  एसटी महामंडळाचे राज्यभरात 842 ठिकाणी 1360 हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरीनिम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे.  बांधा वापरा आणि हस्तांतरित करा अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानकेआगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत.  त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान 100  खाटांचे अद्ययावत रुग्णालयइलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनरेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्याच्या सोयीनुसार व्यावसायिक क्षेत्र विकसित करता येईल.

यासंदर्भातील सर्वसमावेशक धोरण लवकरच एसटी महामंडळ आणणार असून यासाठी  सूचना आणि प्रस्ताव क्रेडाई यासारख्या देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामवंत संस्थेने द्यावेतअसे आवाहनही क्रेडाई मंत्री श्री. सरनाईक यांनी केले. याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष  डॉमनिक रोमेल  व इतर पदाधिकारीविकासकवास्तुविशारद उपस्थित होते. एसटी महामंडळातर्फे वास्तुविशारद निलेश लहिवाल यांनी महामंडळाचे सादरीकरण केले.

 

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या

  


देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या


पुण्याचा प्रतिक वाईकर व बीडची प्रियांका इंगळे या कर्णधारांचे


पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन व विशेष कौतुक


 


मुंबई, दि. 20 :- नवी दिल्लीत झालेली पहिली जागतिक अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जिंकून विश्वविजेता ठरलेल्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांतील खेळाडू तसेच संघ प्रशिक्षकांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व प्रतिक वाईकर आणि महिला संघाचे नेतृत्व प्रियांका इंगळे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केले. विशेष म्हणजे प्रियांका मूळची बीड तर, प्रतिक हा पुणे जिल्ह्यातील आहे. योगायोग म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्याकडे असून या विश्वविजेत्या दोन्ही कर्णधारांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.


नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दमदार खेळ करत नेपाळवर एकतर्फी विजय मिळवला. विश्वविजेत्या भारतीय संघात कर्णधार प्रतीक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या पाच महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश होता. तर विश्वविजेत्या महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह कु. अश्विनी शिंदे, कु. रेश्मा राठोड, वैष्णवी पवार या महिला खेळाडू महाराष्ट्राच्या होत्या. या खेळाडूंसह पुरुष संघाचे प्रशिक्षक पुण्याचे शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक पुण्याच्या प्राचीताई वाईकर तसेच फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अभिनंदन केले असून भविष्यातील यशस्वी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दि

ल्या आहेत.


खो-खो विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे

 खो-खो  विश्ववषक विजेत्या महिला-पुरुष संघाचे

क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी केले अभिनंदन !

राज्य शासनाने दिलेल्या दहा कोटींच्या निधीबद्दल खेळाडुंनी मानले आभार

 

मुंबईदि. 20 :-खो-खो चा पहिला विश्वचषक दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांकडून ऐतिहासिक खेळ पहायला मिळाला. भारतीय संघाने नेपाळला हरवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या विजयानंतर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे खेळाडूंशी नुकताच संवाद साधत अभिनंदन केले.

खो-खोसाठी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या निर्देशानुसार दहा कोटींचा निधी नुकताच दिला होता. हा निधी दिल्याबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री श्री. भरणे यांचे आभार मानले. यावेळी मंत्री श्री. भरणे खेळाडूंना म्हणालेनिधी देणे ही आमची जबाबदारी आहे. पण या जनतेच्या पैशाचे खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने चीज केले आहे. भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. खेळाडूंच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.

महाराष्ट्राची कन्या प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. महिला व पुरुष संघाने  नवी दिल्ली येथे अंतिम सामन्यात नेपाळचा मोठ्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या दोन्ही संघाने अंतिम फेरीतही चमक दाखवली.

0000

 

Featured post

Lakshvedhi