Friday, 10 January 2025

महाराष्ट्र सदन येथे 13 जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन ग्रामीण उत्पादनांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न

 महाराष्ट्र सदन येथे 13 जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन

ग्रामीण उत्पादनांना शहरांशी जोडण्याचा प्रयत्न

 

नवी दिल्लीदि. 10 : कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी पर्यंत भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून, ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रदर्शनाची उद्घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे, महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, बांधकाम विभागाचे अभियंते जे. डी. गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवलेमधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणी, सेमी पैठणी, हातमागच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेट, टोपी, हॅन्डबॅग ठेवण्यात आले आहेत.

            नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील 'आमु आखा एक से' या शेतकरी उत्पादक कंपनीची   आमचूर पावडर, तसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे. 

            कोल्हापूरमधील कोल्हापूर एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळ, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे. 

             अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशन, शेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा, जवसतीळ, कारळ यांच्या चटण्याही या  स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या वस्तू खरेदी कराव्या आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 00000


 कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत

इस्राईल येथे रोजगाराची संधी

 कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत


इस्राईल येथे रोजगाराची संधी


 

मुंबईदि. 10 :- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागा अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांनाइस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्यावय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगतभारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (including OJT) आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षणसंबंधित भारतीय अधिका-यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंगफिजिओथेरपीनर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यकतसेच जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग (GDA/ANM/GNM/Bsc Nursing/Post Bsc Nursing) ची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.

००००

चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी

पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

        मुंबईदि. 10 : सध्या चारचाकी संवर्गातील खाजगी परिवहनेत्तर वाहनांकरिता एमएच 01 ईआर ही मालिका संपुष्टात येत आहे. त्यानंतर याच संवर्गातील आगाऊ स्वरूपात सुरू असलेली एमएच 01 ईव्ही मालिका नियमित होणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक / पसंती क्रमांक हवा असल्यास वाहनधारकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई -18 वरून विहीत नमुन्यातील अर्ज  शुल्क  भरून 13 जानेवारी 2025 रोजी दु 12 वाजेपर्यंत प्राप्त करून घ्यावे. 

            एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पद्धतीचा त्याच दिवशी 13 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता अवलंब करून नोंदणी क्रमांक जारी करण्यात येणार आहे.  प्रादेशिक परिवहन मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार आगाऊ शुल्क भरून वाहनाचा नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याची तरतूद आहे. 

  कार्यालयीन विहीत नमुन्यातील अर्जान्वये कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येतो. वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्याकरिता विहीत शुल्काचा धनाकर्ष प्रादेशिक परिवहन अधिकारीमुंबई (मध्य) (Regional Transport Office, Mumbai (central)) यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. या आरक्षीत केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 180 दिवसांकरिता असून 180 दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. संबंधीत कार्यालयाच्या खिडकी क्रमांक ई -18 वर वाहनक्रमांक आरक्षित करण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

  वाहनक्रमांक आरक्षित केल्याच्या पावतीची नोंद वाहनाच्या डेटा एन्ट्रीच्या वेळी वाहन 04 प्रणालीमध्ये घेतल्यास त्या वाहनास आरक्षित केलेला क्रमांक प्राप्त होतो. वाहन क्रमांक आरक्षित करण्याकरिता फोटो असलेले ओळखपत्रनिवासाचा पुरावापॅनकार्डवाहन खरेदीची पावती  ही कागदपत्रे आवश्यक आहेत. इच्छुक वाहनधारकांनी एमएच 01 ईव्ही या मालिकेतील पसंतीचेआकर्षक वाहनक्रमांक नोंदणी करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केले आहे.

0000

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार 'जयंती फलक'

 महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार 'जयंती फलक'

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईदि. 10 :- महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयातराज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आज त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयसर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयेशाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच 'जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अत्यल्प खर्चात,हार्ट सर्जरी पासुन अन्य सुविधा

 


मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन मी

 मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र

३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

मुंबईदि ०९ : केंद्र व राज्य शासनअंगिकृत उद्योगमहामंडळेमहापालिकातसेच २५ किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ER-I) सादर करण्याचे आवाहन अ.मु. पवारसहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमुंबई शहर यांनी केले आहे.

कायद्यानुसारसर्व नियोक्त्यांनी दर तिमाही अखेर (मार्चजूनसप्टेंबरडिसेंबर) मनुष्यबळाची माहिती ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५आहे. 

विवरणपत्र सादर करण्याची प्रक्रिया : 

·         सदर विवरणपत्र महास्वयम वेब पोर्टलवर (https://rojgar.mahaswaym.gov.inऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. 

·         नियोक्त्यांनी पोर्टलच्या एम्प्लॉयर (List a Job)” टॅबवर जाऊन आपले युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे. 

·         ER-I रिपोर्ट पर्यायावर क्लिक करून त्रैमासिक विवरण ऑनलाईन सादर करावे. 

 

ज्या नियोक्त्यांनी अद्याप महास्वयम पोर्टलवर नोंदणी केलेली नाहीत्यांनी तत्काळ पोर्टलवर नोंदणी करून आपल्या आस्थापनेची माहिती भरावी. अधिक माहिती किंवा तांत्रिक अडचणीसाठी mumbaicity.employment@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. हे विवरणपत्र ऑफलाईन स्वीकारले जाणार नाहीयाची कृपया नोंद घ्यावी.

देशभरातील आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि इतर खाजगी विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या छात्र

 छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट

 

         मुंबईदि. 9 : देशभरातील आयआयटीआयआयएमराष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि इतर खाजगी विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याणदुग्ध विकासअपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची मुंबईत भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधला.

             यावेळी मंत्री श्री.सावे यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पनात्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देवून ते म्हणालेयुवा पिढी हे राष्ट्राचे भवितव्य आहेत्यांच्यातील जिज्ञासेला वाव देऊन त्यांच्यातील कौशल्य आणि गुणांना समृद्ध केले पाहिजे.यासाठी आपले सरकार सदैव प्रयत्नशील आहे. अपारंपरिक ऊर्जा या खात्याबद्दल विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री श्री.सावे यांनी उत्तरे दिली व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.


Featured post

Lakshvedhi