Wednesday, 8 January 2025

प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी - क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

  

प्रबळ इच्छाशक्तीकष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी

-         क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. 8 :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाकडे वाटचाल करणे ही आपल्या राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावेअशी अपेक्षा व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्तीकष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीअसे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पी पी टी चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील युवकांशी सह्याद्री अतिथीगृहात क्रीडामंत्री श्री. भरणे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले कीदिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना राष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. खरं तर आपल्या युवकांचे उज्ज्वल भविष्य हेच आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपणच राष्ट्राची खरी शक्ती आहात. युवा पिढी सक्षम होण्यासाठीयुवकांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

            क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले कीपी पी टी चॅलेंज स्पर्धेमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या या संधीचे आपण सोनं करावे. युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत सहभाग वाढावा या उदात्त हेतूने असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी आपली निवड झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे स्पष्ट करत सर्वांना या पुढच्या काळात लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणेसहसचिव मंगेश शिंदेसहसंचालक सुधीर मोरेउपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे

 विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे

-  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबईदि. 8 : शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते.  विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची मंत्री श्री.पाटील यांनी विचारपूस केली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भरशिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षणामध्ये प्रवेशमातृभाषेमध्ये शिक्षण,जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्ततता शिकवतेजे पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही सांगितले.

००००

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

 मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती

 

नवी दिल्ली8 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरेअभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळेतसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मराठी भाषेला मान मिळाल्याचा अभिमान

मंत्री श्री. सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहेहा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार

महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानतमंत्री श्री. सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. "दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. 

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईलअसे मंत्री श्री. सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेलअसे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. 

००००

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी -

 अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी

योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबईदि. 8 :- अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिकशैक्षणिकआर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावीनाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे यांनी आज मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशीसहसचिव मोईन ताशिलदारवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले कीअल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनामौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणेस्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाअशी सूचनाही त्यांनी केली.

0000

युवकांनो...ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!”

 युवकांनो...ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन

             ठाणेदि. 08 (जिमाका) :- देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहासैनिक म्हणून पुढे या.. हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

             मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

            आर्ट ऑफ सायलेन्स (Art of silence) या मूकनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते "नशामुक्त नवी मुंबई" अभियानाच्या चित्रफितीच्या प्रकाशनाने झाले.

             मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतातपरंतु चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागतेत्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. नशामुक्त नवी मुंबई हे अभियान अतिशय महत्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना सांगितले कीआपल्याला ड्रग्स विरुद्ध मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अंमली पदार्थांच्या माध्यमातून देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय.

             ते म्हणालेदेशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला. मात्र भारत ड्रग्जविरूद्धची ही लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत ही लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येवून संपूर्ण भारत ड्रग्स मुक्त करायचा आहेहा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 8828 112 112 या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करावा.

            मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले. पुन:श्च एकदा निर्धार करु या नशामुक्तीसाठी लढण्याचाड्रग्स फ्री नवी मुंबई करण्यासाठी सैनिक होण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

            अभिनेता जॉन अब्राहम यांनी आपल्या मनोगतात नशामुक्त नवी मुंबई या अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन करून आपले आयुष्य हे शिस्तमय असावे. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावेअसे आवाहन केले.

            याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले कीचांगल्या कामाचा ध्यासहीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई महानगरपालिका सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे. तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहीलहा विश्वास आहे.

            सुरुवातीस नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी वनमंत्री गणेश नाईकप्रख्यात अभिनेता आणि नशामुक्त नवी मुंबई या उपक्रमाचे आयकॉन जॉन अब्राहमआमदार मंदा म्हात्रेप्रशांत ठाकूरमहेश बालदीविधानपरिषद सदस्य विक्रांत पाटीलजिल्हाधिकारी अशोक शिनगारेनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदेनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेअपर पोलीस आयुक्त दीपक साकोरेसंजय येनपुरेपोलीस उपायुक्त तिरुपती काकडेप्रशांत मोहितेरश्मी नांदेडकरसंजयकुमार पाटीलमहाविद्यालयीन विद्यार्थीनशामुक्तीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.

0000

तुमच्या घरातील अशा अनेक लोकांना तुम्ही ओळखत असाल ज्यांचे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढले आहे.

 *भारतातील बहुतेक मृत्यू उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराच्या झटक्याने होतात.*



तुमच्या घरातील अशा अनेक लोकांना तुम्ही ओळखत असाल ज्यांचे वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढले आहे.

पण तुम्हाला काही त्रास झाला तर डॉक्टर तुम्हाला अँजिओप्लास्टी करायला सांगतील.

या ऑपरेशनमध्ये, डॉक्टर हृदयाच्या नळीमध्ये स्टेंट नावाचा स्प्रिंग घालतात.

 हा स्टेंट यूएसमध्ये बनवला जातो आणि त्याची उत्पादन किंमत फक्त 3 डॉलर (150-180 रुपये) आहे.

 हे स्टेंट भारतात आणून तीन ते पाच लाख रुपयांना विकले जातात आणि तुम्हाला लुटले जाते.

 डॉक्टरांना लाखो रुपयांचे कमिशन मिळते म्हणून त्यांना अनेकदा अँजिओप्लास्टी करण्यास सांगितले जाते.

ते कधीही कोणासाठी यशस्वी होत नाही.

कारण डॉक्टर हृदयाच्या नळीत जो स्प्रिंग टाकतात तो पेनच्या स्प्रिंगसारखा असतो.

 काही महिन्यांत, स्प्रिंगच्या दोन्ही बाजूंना ब्लॉकेज (कोलेस्टेरॉल आणि चरबी) जमा होऊ लागतात.

 यानंतर दुसरा हृदयविकाराचा झटका येतो.

 डॉक्टरांनी पुन्हा अँजिओप्लास्टी करा असे सांगितले आहे.

 लाखो रुपये लुटले जातात आणि त्यात आपला जीव जातो.

 

काही घरगुती  उपाय.          


आल्याचा रस -

ते रक्त पातळ करते.

हे नैसर्गिकरित्या 90% वेदना कमी करते.

 

 लसूण रस

यामध्ये असलेले एलिसिन तत्व कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करते.

जे हार्ट ब्लॉकेज उघडते.

 

 लिंबू सरबत

 त्यातील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम रक्त शुद्ध करतात.

 यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

 

 सफरचंद व्हिनेगर

 यामध्ये 90 प्रकारचे तत्व असतात जे शरीराच्या सर्व नसा उघडतात, पोट साफ करतात आणि थकवा दूर करतात


 1- एक कप लिंबाचा रस घ्या;

 २- एक कप आल्याचा रस घ्या;

 3- एक कप लसणाचा रस घ्या;

 4-एक कप सफरचंद सायडर व्हिनेगर घ्या;

 

चारही मिक्स करा आणि मंद आचेवर गरम करा, 3 कप राहिल्यावर ते थंड करा

आणि आता त्यात

3 कप मध घाला. आणि औषध काचेच्या बाटलीत  ठेवा. 

 

हे औषध 3 चमचे रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या.

सर्व ब्लॉक काढले जातील.

 

 मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की हा संदेश जास्तीत जास्त पसरवा जेणेकरून प्रत्येकजण या घरातील देशी औषधाने स्वतःला बरे करू शकेल; धन्यवाद

 

 अशा परिस्थितीत, छातीत तीव्र अचानक तीक्ष्ण वेदना होते, जी तुमच्या खांद्यावरून हातातून जाते.

 वरील जबड्यापर्यंत पोहोचते.


 तुम्ही तुमच्या घरापर्यंत सर्वात जवळच्या हॉस्पिटलपासून 5 मैल अंतरावर आहात आणि दुर्दैवाने तुम्ही तिथे पोहोचू शकाल की नाही हे ही तुम्हाला माहीत नाही.


 तुम्ही  ह्याCPR मध्ये प्रशिक्षित आहात पण ते कसे वापरायचे हे तुम्हाला शिकवले जात नाही..(CPR=छातीवर दोन्ही तळहात ठेवून 10 मिनिटे सतत दाब देणे.) 

 

त्या साठी हा उपाय👌

              

हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान बहुतेक लोक एकटे

असल्याने, त्यांना कोणत्याही मदतीशिवाय श्वास घेण्यास त्रास होतो.

असे घडत असते, असे घडू शकते. ते बेहोश होऊ लागतात आणि 

तुमच्या हातात फक्त 10 सेकंद असतात.

अशा परिस्थितीत, पीडित व्यक्ती जोरात खोकून खोकून स्वतःला सामान्य ठेवू शकते. 


प्रमोद पाठक.


*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा 🙏*


*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी आरोग्य मधुमेह मुक्ती  हा ग्रुप जॉईन करा*


*(कॉपी पेस्ट)*


 *

https://chat.whatsapp.com/IcbVuLHejSl9jyWAKFsLZL

गोकरणीचया फुलांचा आरोग्यदायी वापर


 

Featured post

Lakshvedhi