Monday, 6 January 2025

मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस

 मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पाचा मानस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. : रस्ते वाहतूकरेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईलअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. 

 नवी दिल्ली येथे 7 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सादरीकरणानंतर मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे ‘पर्वतमाला परियोजना’ अंतर्गत  सार्वजनिक खासगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने  रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.

            मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पालघर पासून रायगड जिल्ह्यातील उरण-पेणपर्यंत पसरलेल्या एकूण क्षेत्रामध्ये नागरिकरणाचा वेग वाढत आहे.  मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते नागरीकरणवाहनांची वाढती संख्यानवीन रस्ते व रेल्वे सेवाप्रदूषण याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन आधुनिक तंत्रज्ञान व पाश्चात देशातील यशस्वी नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

 मुंबई महानगरास प्राप्त झालेले महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थानसागरी किनारा खाडीचा प्रदेशएलिफंटासारखी प्राचीन लेणीमाथेरानसारखे थंड हवेचे पर्यटन स्थळसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानतुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यासारखी हरित चादर जतन करून मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘रोपवे’च्या माध्यमातून ‘केबल कार’ प्रकल्प राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

0000

पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा

 पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

          मुंबई दि. 6 : राज्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास व पर्यटन उपक्रमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी त्याच बरोबर आगामी शंभर दिवसात राबविण्यात येणा-या उपक्रमांवर भर द्यावा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन सचिव जयश्री भोजपर्यटन संचालक डॉ बी एन पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. देसाई म्हणाले कीदेशातंर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी गाव ते राज्यस्तरापर्यंत जिथे पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे त्याची प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती मागवून पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवावेनवीन पर्यटन धोरणपर्यटन संचालनालयाकडे वर्ग करण्यात आलेली कामेपर्यटन स्थळांची वर्गवारीप्रसिद्धी उपक्रमकृषी पर्यटन धोरणसाहसी पर्यटन धोरणकॅरॅव्हॅन धोरण,बीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

            पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण 2024 ची प्रभावी अंमलबजावणी करणे, विविध पर्यटन धोरण, पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असलेले उपक्रम, प्रादेशिक पर्यटन विकास आराखडेकेंद्र शासनाच्या मदतीने सुरू असलेले प्रकल्प यांना गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे. जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा  पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित पर्यटन उपक्रम राबवावा, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

****

वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबई,दि. 6  वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून 'वाचन संकल्प महाराष्ट्राचाहा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.

 ग्रंथालय संचालनालयांतर्गत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबईच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत समूह वाचनग्रंथप्रदर्शनवाचन कौशल्य कार्यशाळाग्रंथपरिक्षण व कथनव्यवसाय मार्गदर्शन,  वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 या प्रसंगी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकरग्रंथालय उपसंचालक श्री.काकडयंग लेडीज हायस्कूलच्या शिक्षिका उषा वर्मासुजाता महाजनवर्षा शिंदे यांच्यासह विद्यार्थीनीइतर वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी वाचन कार्यशाळेचे उद्घाटन करून वाचनाचे महत्व सांगून कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा. शामकुमार पां. देशमुखदयानंद कला व शास्त्र महाविद्यालयसोलापूर यांनी मार्गदर्शन केले. वाचन म्हणजे कायत्याचे फायदेकाय वाचावेवाचण्याच्या विविध पद्धतीचे सविस्तर विवेचन केले. वाचनाने मनाची ताकदआकलन क्षमतावैचारीक पातळी वाढते. वाचनाचे मुलभूत अंग या प्रसंगी विशद करण्यात आले. वाचनाचे चार स्तर असून प्रत्येक स्तरावर आपल्या वैचारीक पातळीत बदल होतो. वाचनाची सवय लावण्यासाठी दररोज आवडीच्या विषयावर किमान 20 मिनिटे वाचन करण्याचे स्वत:ला बंधन घातले पाहिजे असेही त्यांनी उपस्थित वाचक आणि  विद्यार्थ्यांना  सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन  योगेश बिर्जेजिल्हा ग्रंथालय अधिकारीराज्य मध्यवर्ती ग्रंथालयमुंबई यांनी केले.

0000

आपलं सरकार’ वेब पोर्टल आता सक्षम आणि नव्या स्वरूपात; ‘आपलं सरकार’ ॲप तयार करावे

 आपलं सरकार’ वेब पोर्टल आता सक्षम आणि नव्या स्वरूपात;

‘आपलं सरकार’ ॲप तयार करावे

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 6  : महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे "आपलं सरकार" (1.0) वेब पोर्टल अधिक सक्षमअद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करावे. त्याचबरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲपतयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावेअसे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालय येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीयाराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूरमहा आयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वेमहा आयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. शेलार म्हणाले कीआपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्यात यावी. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतीलतसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईट वापरण्याची पध्दत सुलभ असायला हवीअधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह  ए आय चा वापर करुन  त्या वेबसाईट वापरण्यास सुलभ बनवाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक ॲप तयार करुन  सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

महाराष्ट्र शासनाच्या 485 सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्य राज्यांचा यासंदर्भातील अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाच्या 485 व्यतिरिक्त 285 अधिकच्या नवीन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि महा आयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर 770 सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार  राज्याचा "स्टेट ओन क्लाउड" तयार करण्याचे निर्देशही ॲड. शेलार यांनी दिले.

****

आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवावा

 आनंददायी शिक्षणाद्वारे

राज्याचा लौकिक वाढवावा

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि. 6 :- शिक्षणसंस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावेअसे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधींचे चर्चासत्र यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले कीसर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षणसंस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्थाचालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाचा कृतिवर अधिक भर असल्याने  शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामासउपक्रमास सहकार्य केले जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञसंस्थाचालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या  मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे.  

चर्चासत्रात संस्थाचालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरतीसंच मान्यतापवित्र पोर्टल११ वी प्रवेश प्रक्रियारोस्टर तपासणीजुनी पेन्शनसेवा ज्येष्ठताअशैक्षणिक कामे यासंदर्भातील मुद्यांचा प्राधान्याने विचार केला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

चर्चासत्रास आमदार  ज्ञानेश्वर म्हात्रेशालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावारप्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावीमाध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशीमहेश पालकरबालभारतीचे के.बी. पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.

एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरण व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करावा

 सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुबंईदि. 6 : एन डी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मंत्रालयात एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदीसांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी  तसेच एनडी स्टुडिओचे  संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.शेलार म्हणाले कीमराठी निर्मातेकलाकारतंत्रज्ञ  यांना  सहाय्यक  ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने एनडी स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याचा परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी निर्माण करण्यावर भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या  दृ्ष्टीनेही  नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामुख्याने मराठी सिरियल्ससिनेमावेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्मातेकलाकारांसाठी आवश्यक सुविधा  उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या.

००००

लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

 लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर

 

मुंबई, दि. 6 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. 6) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवनमुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या कामकाजासंबंधीचा 51 वा वार्षिक एकत्रित अहवाल  सादर केला.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२3 या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे हजार 790 नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला 4 हजार 583 प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२3 मध्ये 9 हजार 373 प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली 4 हजार 555 प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२3 च्या वर्षअखेरीस 4 हजार 818 प्रकरणे प्रलंबित राहिलीअसे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गा- हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात 

Featured post

Lakshvedhi