Monday, 6 January 2025

राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

 राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी

- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

       मुंबईदि. 6 : गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध होण्यासाठी  योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी. प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

   गृहनिर्माण विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली.

                गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणालेसर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळातर्फे (महा हाऊसिंग)म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणीही वाढत आहे. राज्यातील प्रगतीपथावरील गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी कामांची गती वाढवावी.

                 ज्येष्ठ नागरिक धोरण २०२४प्रधानमंत्री आवास योजनागिरणी कामगारांना घरेसर्वसमावेशक गृहनिर्माण योजनाधोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

   या बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह,धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस्.व्ही.आर्. श्रीनिवासम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

****

अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू

 अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू

स्थानिक आमदार यांनी शिरोळ तालुक्यातील पूर नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री म्हणालेअलमट्टीबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावू असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार

 नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ’ दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांना सकल जैन समाज आणि नांदणी मठाच्यावतीने प्रजागर्क’ पदवी

 

कोल्हापूरदि. 6 : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला लवकरच तीर्थक्षेत्र ’ दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात श्री. फडणवीस बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असताना मला आनंद होत असून जैन समाजातील ऐतिहासिक व सर्वात मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले. नागपूर येथे जैन ट्रेड ऑर्गनायझेशन कार्यक्रमात जैन समाजातील वेगळे स्वरूप पाहता आले. आज पुन्हा याच समाजाचे आगळेवेगळे स्वरूप पाहायला मिळाले. जैन समाजातील व्यवसाय आणि व्यापारात देशासाठी योगदान देणारे लोक नागपूर येथे भेटले आणि आज कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटलेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरआमदार सर्वश्री डॉ.राजेंद्र पाटील - यड्रावकरराहुल आवाडेअमल महाडिकअशोक मानेशिवाजी पाटीलमाजी मंत्री सुरेश खाडेमाजी खासदार निवेदिता मानेमाजी खासदार राजू शेट्टीमाजी आमदार प्रकाश आवाडेजैन समाजातील आचार्य विशुद्ध सागर महाराजमठाधिपती, 10 आचार्य महाराज, 7 मुनी महाराज उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वस्तुत्व महाकाव्य ग्रंथाच्या प्रतिकृतीचे प्रकाशन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने प्रजागर्क’ पदवी देण्यात आली.

नांदणी मठात एक वेगळं जीन शासन पाहायला मिळत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआचार्यांचे आशीर्वाद आणि सर्व भाविकांच्या दर्शनाचा लाभ यासाठी कार्यक्रमाला येण्याचे ठरवले. जैन तत्त्व जगा आणि जगू द्या’ अशी आहेत. जगामध्ये बरेच विचार आले आणि नष्ट झाले. परंतु जैन विचार अजूनही शाश्वत आहेत. जन्माला आलाय तो जगेल आणि समाज त्याला जगवेल’ असा विचार जैन समाजाचा आहे. सर्वाधिक समाजसेवा करणारा जैन समाज असून समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे. संपूर्ण जीवसृष्टी वाचविण्याचे विचार जैन विचारात आढळून येतात. समाजाला सशक्त आणि सन्मार्गावर ठेवणे हे मोठे काम आचार्य करतात. जैन समाजातील आचार्य, तीर्थंकार यांनी परंपरा आणि विचार आजही जीवित ठेवले आहेत. हेच संस्कार काल आणि स्थान यांचा विचार करीत नव्या स्वरूपात नव्या रूपाने समाजापर्यंत पोहचवले जातात.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीधर्मशास्त्र कधीच राजशक्तीवर अवलंबून राहिले नाही. परंतु धर्मसत्तेच्या विकासाच्या यात्रेमध्ये राजसत्ता निश्चितच प्रयत्न करेल. देशातील पहिले जैन महामंडळ राज्यात स्थापन केले आहे. महामंडळाच्या सुधारणांबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महामंडळ अधिक बळकट करू. नांदणी मठात मिळालेल्या मानपत्राला पात्र होण्याचा प्रयत्न करूअसे आश्वासनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले

-li.आनंदी°पहाट.il-

 ⚜🚩⚜🚩🕉🚩⚜🚩⚜


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                          

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

             *संतकवी, महिपती*

             *दासगणू महाराज*

            *यांच्या जन्मदिनाची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


⚜🚩⚜🚩⚜️🚩⚜🚩⚜    


    *जे जे तुम्ही वदवाल कांही ।*

    *तेंच लिहीन कागदीं पाहीं ।*

    *स्वतंत्रता मजला नाही ।*     

    *मी पोषणा तुमचना असें ॥*          

        *.... संत दासगणु*.


        *लिहण्याची प्रतिभा लाभणे ही परमेश्वर कृपाच. पण त्याला अपेक्षितच लिहतात ते संतच. यामुळेच त्यांचे लिखाण भक्तांना अमृत ठरतय. शंभर वर्षे कोट्यावधी भक्तांना त्यांच्या भक्तीरसपुर्ण शब्दानी संजीवन दिलेय. आज शिर्डी असो वा शेगाव जगभर भक्त दासगणुंचे ऋणी आहेत.*

        *आधुनिक महिपती.. संत दासगणू म्हणजेच नारायण दत्तात्रय सहस्रबुद्धे (१८६८-१९६२). जन्म आकोळनेर. गणपतीसारखे त्यांचे पोट म्हणून घरच्यांनी  नाव ठेवले गणेश. हे सहस्रबुद्धे घराणे हे मूळचे कोतवडे जि. रत्नागिरी येथील पण कामानिमित्त अहमदनगर येथे स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण चौथी पर्यत. सुखी परिवारात जन्म.*

        *त्यांच्या जीवनातील घटना बघता त्यांच्याकडून मोठे कार्य घडावे हीच परमेश्वर इच्छा होती. त्यांना बालपणापासून काव्याची आवड. पण शिक्षणात लक्ष नव्हते. तेव्हा तमाशात त्यांच्या काव्याला मागणी होती. पण "तुझे कर्तुत्व काही नाही, गावात जो मान आहे तो आमच्यामुळे", असे घरच्यांचे बोल ऐकताच स्वाभिमानाने घर सोडले. लावणीकार ते संत प्रवास सुरू झाला.*   

        *देहयष्टी उत्तम होतीच. एका इंग्रजी पोलीस अधिकाऱ्याने बघताच त्यांना पोलीस म्हणून नोकरी दिली. दहा वर्षे नोकरी आणि तमाशासाठी काव्यलेखन सुरू होते. अनेक गावात दरोडे टाकून दहशत पसरवणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी नेमणूक झाली. त्यासाठी हे गणेश एका मंदिरात रामदासी वस्त्र घालून मुक्कामाला असतांना त्या डाकूला सुगावा लागला. त्याने गणेशांच्या दोन साथीदारांना मारले पण गणेशांना सोडले. त्या मंदिरात केलेल्या सेवेचे फळ म्हणून जीव वाचला असे वाटले. त्यांचे जीवनच बदलले. त्यांनी नोकरी सोडली.* 

        *त्यांना वामनशास्त्री इस्लामपूरकर हे गुरु लाभले. त्यांनी शिवमंत्र दिला तरीही पंढरपूर वारी करायला सांगितले. त्यांनी त्यांचे दास म्हणून दासगणू नाव स्विकारले. तमाशा सोडून महाराजांची प्रतिभा भक्तीरसात चिंब होवू लागली. त्यांचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. ते सहजतेने तत्त्वज्ञान मांडायचे. कीर्तनकार दासगणूंच्या रसाळ वाणीने राज्यभर भक्तीचा महिमा वाढला. शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. बाबांच्या उपस्थितीतच संस्थान उभे राहीले अन् त्या संस्थानचे अध्यक्ष म्हणून ३९ वर्षे भक्तीभावाने पद सांभाळले. तिथे बाबांच्या समोरच रामनवमी उत्सव प्रारंभ केला. स्वतः दरवर्षी कीर्तन केले.*

        *दासगणु महाराज निस्पृह अन् मृदू मनाचे. त्यांनी बालपणापासून अनाथ मुलाचा घरात सांभाळ केला.. संस्कार केले. यामध्ये वरदानंद भारती एक. तर दुसऱ्या छगनराव बारटक्केंना गजानन विजय ग्रंथ लिहून काढण्याचे पुण्य लाभले. ते पण पूढे कीर्तनकार झाले. दासगणुंनी प्लेगच्या साथीत अनेकांना मदत केली. नांदेड जवळ गोरटे येथे भक्त देशमुख कुटुंबाने त्यांना शेत दान दिले.. मंदिर बांधून दिले. आज गोरटे संस्थान दासगणूंचे संस्थान ओळखले जाते. वरदानंदानी दासगणुंचे साहित्य प्रकाशित केले.*

        *आज आणि.सदासर्वकाळ दासगणुंचे नाव घराघरात घेतले जाणारच. गजानन महाराज स्तोत्र असो वा विजय ग्रंथ, साईबाबांची पोथी याची लाखो पारायणे होतात. आरती नित्य म्हटली जाते. दासगणुंनी वयाच्या ७२ व्या वर्षी हा गजानन महाराज विजय ग्रंथ लिहला. याचे हक्क संस्थानला दिले. या ग्रंथाचे इंग्रजी.. हिंदी.. गुजराथी.. कानडी, तेलगू.. तमिळमध्येही अनुवादीत आहे.*   

        *दासगणू असामान्य प्रतिभेचे धनी होती. ८५ संतांची चरित्र.. अनेक आरती, संतकथामृत.. भक्तीसारामृत, सुमध्वविजय सारामृत.. आद्य शंकराचार्यचरित्र, विष्णू सहस्त्रनाम.. उपनिषदावर टीका, अमृतानुभव, शांडिल्यसुत्र टीका तसेच १२५ बोधकथा असे प्रचंड लिखाण भक्तांना अत्यंत सुलभपणे रसाळ भाषेत उपलब्ध करुन दिलेय. दासगणूंची जीवनभरातील संत वृत्तीने संत म्हणून ओळख जगात आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी १९६२ मध्ये संत ज्ञानेश्वर समाधी दिवशीच पंढरपूरला देह ठेवला हे पण त्यांच्या भक्तीचे फळ.*

        *आमच्या जीवनात भक्तीभावाची बीजे रुजविणाऱ्या संत दासगणूंना जन्मदिनी त्रिवार वंदन.*


⚜🔆⚜🔆🚩🔆⚜🔆⚜

  1️⃣

  *गण गण गणात बोते*

  *हे भजन प्रिय सद्गुरुते*

  *या श्रेष्ठ गजानन गुरुते*

  *तुम्ही आठवित रहा याते*


  *हे स्तोत्र नसे अमृत ते*

  *मंत्राची योग्यता याते*

  *हे संजीवनी आहे नुसते*

  *व्यवहारिक अर्थ न याते*


  *मंत्राची योग्यता कळते*

  *जो खराच मांत्रिक त्याते*

  *या पाठे दुःख ते हरते*

  *पाठका अती सुख होते*

  *हा खचित अनुग्रह केला*

  *श्री गजानने तुम्हांला*

  *घ्या साधुन अवघे याला*

  *मनी धरून भाव भक्तीला*


  *कल्याण निरंतर होई*

  *दुःख ते मुळी नच राही*

  *असल्यास रोग तो जाई*

  *वासना सर्व पुरतिलही*

  *आहे याचा अनुभव आला*

  *म्हणुनिया कथित तुम्हांला*

  *तुम्ही बसून क्षेत्र शेगांवी*

  *स्तोत्राची प्राचिती पहावी*

  *ही दंतकथा ना लवही*

  *या गजाननाची ग्वाही*


  *रचना : संतकवी दासगणू*  ✍️

  *स्वर : अनुराधा पौडवाल*


⚜🔆⚜🔆🌹🔆⚜🔆⚜

  2️⃣

  *संतकवी दासगणू रचित अभंग*  

  *स्वर : ह. भ. प. विक्रमबुवा*

  *नांदेडकर (दासगणू)*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-०६.०१.२०२५-*


🌻🥀🔆🌸🌻🌸🔆🥀🌻

Sunday, 5 January 2025

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे

 गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी

शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे

-         शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे


मुंबईदि. 5 :-   गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतातआणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावेअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद महाविद्यालयमुंबई येथे आयोजित चर्चसत्रात मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार जयंत आजगावकर,
प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावीमाध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी
 आणि राज्यातील  प्राथमिकमाध्यमिक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणालेराज्याच्या शिक्षण विभागाचे आपण सर्वचजण  एक घटक आहोत. आपण भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे जे पवित्र काम करत आहात ते अतुलनीय व भाग्याचे आहे. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती हा आव्हानात्मक विषय असला तरी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तो यशस्वीपणे राबविला जाईल याची खात्री आहे. विद्यार्थ्यांसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागाचा एक रोडमॅप आपण ठरवू. येणाऱ्या काळात शैक्षणिक धोरण राबविताना सर्वांना सोबत घेऊन आपण काम करूयाअसे आवाहन त्यांनी केले.

शिक्षकांना त्यांचे मुख्य उद्दिष्ट यशस्वीरित्या पार  पाडता यावे यासाठी त्यांना वेळ दिला जाईल. शिक्षण व शिक्षकासाठी जे-जे शक्य आहे ते केले जाईल. समाजामध्ये शिक्षकाला मानाचे स्थान आहे. हा त्याचा मान अधिक उंचावण्यासाठी शिक्षण विभागामार्फत पुढाकार घेतला जाईल. आजच्या चर्चासत्रात शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या अनुभवातून चांगले मुद्दे/सूचना मिळाल्या आहेत, असे मंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत आदर्श शिक्षकांच्या ज्ञानाचात्यांच्या अनुभवाचा उत्तम प्रकारे उपयोग करून घेण्यात येईल. अशा शिक्षकांची एक डाटा बँक तयार करून त्यांच्या ज्ञानाचीअनुभवाची शिदोरी राज्याच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील ग्रामीणआदिवासी भागातील शाळांना शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाचे अधिकारी भेट देतील असेही ते म्हणाले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

एनएसएच हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन




 

नागपूर दि.5 येथील भांगडिया फाऊंडेशनच्या एनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

            नागपूर शहरातील गंगाबाई घाट चौक परिसरात भांगडिया फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडेकृपाल तुमानेकिर्तीकुमार भांगडियामाजी खासदार डॉ. विकास महात्मेएनएसएच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे अध्यक्ष मितेश भांगडियाहृदयरोग विशेषज्ञ डॉ. वैभव बियाणीबालरोग न्यूरोलॉजिस्ट डॉ. उमेश बियाणीरेडिओलॉजिस्ट डॉ. नेहा बियाणीस्त्रीरोग विशेषज्ञ डॉ.निकिता बियाणीविनय बियाणी श्रीकांत भांगडिया आदी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

एनएसएच हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय असून याच्या उभारणीमुळे अनेक दुर्धर आजाराच्या रुग्णांना निश्चितच योग्य उपचार मिळतीलअसा विश्वास व्यक्त करून श्री.फडणवीस यांनी एनएसएचचे अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाची यावेळी पाहणी केली व तेथील अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांबाबत  तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तसेच या रुग्णालयातील विविध कक्षांनाही त्यांनी भेट दिली.

जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी

 जैन महामंडळाच्या गतीमान कामकाजासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी


मुंबई ः जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक सुरक्षितता व गरजु लोकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ‘जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ’ चे कामकाज गतीमान व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित होणार असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असुन महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू होऊन समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तिपर्यंत याचे लाभ पोहोचले पाहीजेत अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामंडळाचा अहवाल सादर करून आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेण्यास मान्यता देवुन तशा सुचना अधिकार्‍यांना दिल्या. सदर बैठकीस अल्पसंख्यक कार्य मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्यक कार्य राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, प्रधान सचिव - सामान्य प्रशासन विभाग, प्रधान सचिव - वित्त, प्रधान सचिव - नियोजन, सचिव - अल्पसंख्यक कार्य विभाग, सहसचिव - अल्पसंख्यक कार्य विभाग, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी ललित गांधी यांनी अल्पसंख्यक विभागाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी सहसचिव मो.बा.ताशिलदार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जी.पी.मगदूम यांचे समवेत बैठक घेवुन पहिल्या 100 दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासंबंधी चर्चा करून अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

Featured post

Lakshvedhi