Saturday, 4 January 2025

राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा

 राज्यात ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

 

                मुंबईदि.4 : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी  ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेविभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अद्यावत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी  नियोजन करा. औद्योगिक आस्थापनांचा सहयोग वृध्दिंगत करण्यात येणार आहे. स्टार्टअप सहाय्य योजनेतून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.विभागाच्या योजनांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात येणार असल्याचेश्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकता  आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहलअपर मुख्य सचिव ओ पी गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव गणेश पाटीलमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

 

नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

मुंबई दि.4 - राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढामहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्य मंत्री माधुरी मिसाळराज्य मंत्री पंकज भोयर आदी उपस्थित होते.

 

नगरविकास विभाग(एक)चे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी विभागाचे सादरीकरण केले. त्यांनी सादरीकरणातून नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेले विविध नियोजन प्राधिकरण यांचे सक्षमीकरण करणेशहरां जवळील सुमारे साडेतीन हजार गावांत रस्ते विकासाचे नियोजन करणेराज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविणेइमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणेपर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीराज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेतअशा सूचना दिल्या.

 

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल कातसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावाअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सोलापूर स्मार्ट सिटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी. यामुळे सोलापूरवासियांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ. श्रीकर परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.

 

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा मी

 सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा

                                  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा

 

मुंबई दि.4 : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाहीपुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतीलअसे नियोजन कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

 

यावेळी श्री फडणवीस म्हणालेअनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेतत्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेतत्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेतयाचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतत्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईलयाबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

 

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनगरविकास विभाग (1) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरठाणे महापालिका आयुक्त सौरभ रावमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार अश्विन मुदगलमहामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवालझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

000000

प्रयाग्राजमुखं वळे हाथी का दर्शन

 


१ जानेवारी ते ३१डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार*

 *१ जानेवारी ते ३१डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार*



भोगी १३/०१/२०२५-सोम 

मकरसंक्रांत १४/०१/२०२५-मंगळ

श्री. गणेश जयंती ०१/०२/२०२५-शनि 

महाशिवरात्री २६/०२/२०२५-बुध

एकादशी १०/०३/२०२५-सोम

होळी १३/०३/२०२५-गुरु

गुढिपाडवा ३०/०३/२०२५-रवि

वटपौर्णिमा १०/०६/२०२५-मंगळ

नागपंचमी  २९/०७/२०२५-मंगळ

नारळी पौर्णिमा ०८/०८/२०२५-शुक्र

रक्षाबंधन ०९/०८/२०२५-शनि

श्रीकृष्ण जन्माष्टमी- १५/०८/२०२५-शुक्र

श्रीगणेश चतुर्थी २७/०८/२०२५-बुध

गौरी विसर्जन ०२/०९/२०२५-मंगळ

अनंत चतुर्दशी ०६/०९/२०२५-शनि

महालयारंभ ०८/०९/२०२५-सोम

घटस्थापना २२/०९/२०२५-सोम

दसरा ०२/१०/२०२५-गुरु

धनत्रयोदशी १८/१०/२०२५-शनि

अभ्यंगस्नान २०/१०/२०२५-सोम

लक्ष्मीपूजन 

२१/१०/२०२५-मंगळ

दिपावली पाडवा 

२२/१०/२०२५-बुध

भाऊबीज २३/१०/२०२५-गुरु

तुलसी विवाहारंभ ०२/११/२०२५-रवि

त्रिपुरी पौर्णिमा ०५/११/२०२५-बुध

देव दीपावली २१/११/२०२५-शुक्र

श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव ०४/१२/२०२५-गुरु 

_*मराठी सणवार*_

महिन्याला दोन आनंदोत्सव, काय ही आपली श्रीमंती सभासद

ऋतुचक्राप्रमाणे घडले आहेत, उत्सव आहार, संलग्न सवयी

तरुणांपासून स्वर्गीयांची, बूज राखीली आहे कल्पकतेने

प्रत्येक तारखेची महती, संस्मरणीय त्याच्या वैशिष्ट्याने।।।।

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे

पारदर्शक व गुणवत्तापूर्ण करावी

 

- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. १ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावेअसे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकरवित्तीय नियंत्रक अभय धांडेउपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदेअच्युत इप्परविजय चौधरी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले कीप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईलजेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला.

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

 आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा. आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला कुठेही पैसे भरावे लागू नयेअशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी. महात्मा फुले जन आरोग्य अभियानातील अंगीकृत असलेल्या रुग्णालयांचे कामकाज चुकीचे आढळल्यास चौकशी करून संबंधित रुग्णालय पॅनलवरून कमी करण्यात येईल. महिलांमध्ये सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर महिलांमधील कर्करोगाचे निदान व तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानवैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरतीसध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ व रिक्त पदेमानसिक आरोग्य आस्थापनाडायलिसिस व अन्यसेवांचा विस्तारअर्थसंकल्पीय तरतुदीमाता व बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम१५ व्या वित्त आयोगाचा निधीराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमनियमित लसीकरणराष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमसिकलसेल निर्मूलन कार्यक्रमकर्करोग निदान कार्यक्रमराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमराष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य कार्यक्रम, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य अभियानमोबाईल मेडिकल युनिट, महाराष्ट्र वैद्यकीय आपत्कालीन सेवा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Featured post

Lakshvedhi