Friday, 3 January 2025

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात

 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात

-         वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबईदि. ३ :-  राज्यात नव्याने होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात. या महाविद्यालयांच्या इमारतीरुग्णालयांची बांधकामे दर्जेदार असावीतअशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी वैद्यकीय शिक्षण  विभागाचा आढावा घेतला. मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकरउपसचिव वैशाली सुळेशंकर जाधवश्वेतांबरी खडेतुषार पवार आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण श्रीमती मिसाळ म्हणाल्याशासनाने आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या आरोग्य सेवा रुग्णांना विनासायास उपलब्ध व्हाव्यात. रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वसतीगृहे दर्जेदार असावीत. रुग्णालयाप्रमाणेच वसतिगृहांमध्येही स्वच्छता असावी.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत  आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणांतर्गत सुरू असलेली बांधकामेसाधनसामग्रीनवीन  महाविद्यालये बांधकामे  प्राप्त निधीझालेला खर्च याबाबतचा आढावा घेऊन प्राप्त निधी मार्चपूर्वी खर्च करावाअशा सूचना मिसाळ यांनी दिल्या.

दिवसेंदिवस कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब असून कर्करोग सेवांचे बळकटीकरण करणे महत्वाचे आहे.  पुणे येथे सर्व  सुविधायुक्त कर्करोग रुग्णालयासाठी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी,  अशा सूचना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

        बैठकीत राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी राज्यातील शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयेविद्यार्थी संख्यानवीन  वैद्यकीय महाविद्यालये पदभरतीकेंद्र शासन अंतर्गत प्रकल्परिक्त पदे भरती प्रक्रियादेश का प्रकृती परीक्षण अभियान,  आयुष संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदींचा आढावा घेतला.

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावी -

 जलजीवन मिशनची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावी

-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

*पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने 100 दिवसात करावयाच्या कामांचा घेतला आढावा

 

मुंबई, दि. 3 : जलजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून ग्रामीण जनतेला लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळू शकेल यासाठी प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती देऊन कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीअसे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता  विभागाच्या पुढील 100 दिवसाच्या कामाकाजाच्या अनुषंगाने विभागामार्फत 100 दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आणि कामकाजासंदर्भात सविस्तर आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जल जीवन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठीस्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि संबंधित विभागांनी समन्वय साधणे आवश्यक आहे. कार्यरत नसलेल्या बोअरवेलचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. यावेळी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाकाजाचा आढावाही त्यांनी घेतला.

यावेळी विभागामार्फत  100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. शंभर दिवसात गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करावेत. दहा हजार गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व जिल्ह्यांचे गोबरधन प्रकल्प पूर्ण करावे. प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्दीष्टे पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) 2.0 चा आढावा घेत त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधकामजिल्हानिहाय कचरा संकलन वाहन स्थितीसांडपाणी व्यवस्थापनहागणदारी मुक्त गावांची सद्यस्थिती, वर्ष निहाय आर्थिक प्रगतीवार्षिक कृती आराखडा आदी विषयाचा आढावा घेतला.

000000

रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा

 रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा


- मंत्री भरत गोगावले


 


मुंबई, दि. ३ : ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांसाठी रोजगार हमीची कामे ही रोजगार मिळवून देणारी आहेत. त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर त्यांची उपजीविका चालते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात श्री. गोगावले यांनी रोजगार हमी विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.


रोजगार हमी मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. याचा विचार करून मजुरीचे दर ठरवण्यात यावेत. ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या सर्वांचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत. रोजगार हमीच्या माध्यमातून शेतीविषयक कामांसाठी जास्त मजूर उपलब्ध होतील यांचे नियोजन करावे. जेणेकरून शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागाचा विकास साधता येईल. रोजगार हमीचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने रोहयो विभागामार्फत ठोस कामे शंभर दिवसात हाती घेण्यात यावीत. हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे. रोजगार हमी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवड कार्यक्रमाविषयी जनजागृती करावी. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होत आहे. त्यामुळे फळबाग लागवड कार्यक्रमास प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. गोगावले यांनी यावेळी दिल्या.


बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, रोहयोचे सचिव गणेश पाटील, उपसचिव अतुल कोदे, ज. व. वळवी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शंभर दिवसात करावयाच्या कामांचा कृती कार्यक्रम तयार करावा

 शंभर दिवसात करावयाच्या कामांचा कृती कार्यक्रम तयार करावा

- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

फलोत्पादन विभागाची आढावा बैठक

 

मुंबईदि. ३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषगाने कार्यक्रम निश्चित करावा अशा सूचना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

 

        फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून फलोत्पादन मंत्री श्री.गोगावले म्हणाले कीराज्यात अनेक पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. त्यामुळे फलोत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. योजनेसाठी केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचा पाठपुरावा करावा. कोकणात हळदी सारखी पिके घेतली जातात त्यामध्ये वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

 

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीफलोत्पादन विभागाचे संचालक कैलास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


ससुन डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक - बंदरे विकास मंत्री नितेश राणे

 ससुन डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक


- बंदरे विकास मंत्री नितेश राणे


· ससून डॉक येथील विविध कामांची केली पाहणी


 


            मुंबई, दि. ३ : ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम करणा-या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.


 


         बंदरे विकास मंत्री श्री.नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून अधिकारी,कर्मचारी व मत्स्यव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत, ससून डॉकमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ करावीत. परिसरात अत्यावश्यक असणारी कामे गतीने करावी. तसेच ससून डॉक परिसरात कार्यरत सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना श्री.राणे यांनी दिल्या.


 


         बंदरे विकास मंत्री श्री.राणे म्हणाले की, ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून, मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे. ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवाना धारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्थाशीत गृह, ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नवीन धक्का दुरूस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. स्वच्छता गृहांची उभारणी करावी. मत्स्यव्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी विभागाकडून राबविण्यात येणा-या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


 


       यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार,मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम,ससून डॉकचे कार्यकारी अभियंता(प्रशासक)दीपक पवार यासह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एमपीएससी’त मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एमपीएससी’त

मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

 

                सातारा,दि.3 :  नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘महाज्योती’ने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या 'इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी' (राजपत्रित) पदाच्या अंतिम निकालात महाज्योती संस्थेच्या मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या  मैत्रेयी अविनाश जमदाडे हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुण्यात राहणाऱ्या मैत्रेयी जमदाडे हिने महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बहुजन कल्याण व स्त्रीशिक्षण या विचारांवर उभारण्यात आलेल्या महाज्योती’ संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन हे यश प्राप्त केले आहे. या घवघवीत यशामुळे आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

०००००

असावा मित्र

 ही संकल्पना मला आवडली. आपणाकरिता पाठवीत आहे 

🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦

             *🌹मित्र🌹*

*****************************

*मैत्री केली तर*

*गरज पाहू नका,*

*आणि मदत केली तर*

*ती बोलून दाखवू नका.*

*कारण कोणत्याही*

*बाटलीचा सील,*

*आणि दोस्तांचा दिल*

*एकदा तोडला की*

*विषय संपला.* 

*मित्र गरज म्हणून नाही*

*तर सवय म्हणून जोडा,*

*कारण गरज संपते पण*

*सवय कधीच सुटत नाहीत.* 

*"मित्र" नावाची ही दैवी देणगी*

*जीवापाड जपून ठेवा,*

*कारण..जीवनांतील*

*अर्धा गोडवा हा*

*मित्रांमुळेच असतो.*

*कोणीतरी विचारले*

*मित्रांमध्ये एवढे काय विशेष*

*नातेवाईकां पेक्षा.*

*त्यांना सांगितले,*

*मित्र हे फक्त मित्र असतात.*

*त्यात सख्खे,चुलत,मावस, सावत्र*

*असं काही नसते.*

*ते "थेट" मित्रच असतात.*

*“मैत्रीचे धागे हे*

*कोळ्याच्या जाळ्या पेक्षाही*

*बारीक असतात.*

*पण लोखंडाच्या तारेहुनही*

*मजबूत असतात.*

*तुटले तर श्वासानेही तुटतील,*

*नाहीतर वज्राघातानेही*

*तुटणारच  नाहीत.*

*प्रत्येक दुखण्यावर*

*दवाखान्यात उपचार*

*होतातच असे नाही.*

*काही दुखणी*

*कुटुंब आणि मित्र मंडळी*

*यांच्या बरोबर हसण्या आणि*

*खिदळण्यानेही बरी होतात.*

 *माणसाने*

*कितीही प्रयत्न केले तरी*

*अंधारात "सावली"*

*म्हातारपणात "शरीर"*

*आणि..*

*आयुष्याच्या*

*शेवटच्या काळात "पैसा"*

*कधीच साथ देत नाहीत ,*

*साथ देतात ती*

*फक्त आपण जोडलेले*

*"जवळचे मित्र.*

*मित्र बोलवित आहे,*

*पण तुम्हाला जावेसे*

*वाटत नसेल तर..*

*समजा की तुम्ही म्हातारे झालात.*

*म्हातारपण येवू न देणे*

*आपल्या हातातच आहे ना .*

*मित्रांसोबत रहा व आनंदात*

 *जीवन भर जगत राहा.*

**********************

    *सर्व जिवलग मित्रांसाठी*🌹

Featured post

Lakshvedhi