Friday, 27 December 2024

सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मितीमी

 सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मिती

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य विभागाचा घेतला आढावा

मुंबईदि. 26 : सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाबरोबरच सांस्कृतिक कार्य विभागाशी निगडीत विविध माध्यमातून रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असून विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटीलसह व्यवस्थापकीय संचालक डॉ.धनंजय सावळकरउपसचिव महेश वाव्हळउपसचिव नंदा राऊतअवर सचिव बाळासाहेब सावंतअवर सचिव परसराम बहुरेसांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरेदर्शनिका विभागाचे संपादक डॉ.दिलीप बळसेकरपु.ल. महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकररंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणचे सचिव संतोष खामकरराज्य साहित्य अकादमीचे सहसंचालक सचिन निंबाळकरपुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित कुमार उगले आदी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी 100 दिवसात करावयाचे उपक्रमयोजनाप्रकल्पकार्यक्रम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यात एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रीकरणासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली महाराष्ट्रभर लागू करणेपु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचा पुनर्विकास करून उद्घाटन सोहळा आयोजित करणेपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विशेष प्रकाशन सोहळा आयोजन करणेमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अशा विविध विषयांसंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी आढावा घेतला.

000

*🍁 तुलसी मैया की महिमा 🍁मु

 *🍁 तुलसी मैया की महिमा 🍁*


     राजस्थान में जयपुर के पास एक कस्बा है– लदाणा। पहले वह एक छोटी सी रियासत थी। उसका राजा एक बार शाम के समय बैठा हुआ था। उसका एक सेवक किसी काम से वहाँ आया। राजा की दृष्टि अचानक उसके गले में पड़ी तुलसी की माला पर गयी।

 

      राजा ने चकित होकर पूछाः “क्या बात है, क्या तू भगत जी बन गया है ?”


    सेवक बोला- “नहीं, महाराज!! भगत नहीं बना हूँ।”


राजा ने पूछा- “तो ये तुलसी की माला क्यों गले में डाल ली है ?”


सेवक बोला- “राजासाहब ! 


*तुलसी की माला की बड़ी महिमा है।*


राजा ने पूछा- “क्या महिमा है?”

सेवक ने कहा- “राजासाहब! मैं आपको एक घटना सुनाता हूँ।


    कुछ दिन पूर्व मैं अपने ननिहाल जा रहा था। सूरज ढलने को था। इतने में मुझे दो छाया-पुरुष दिखाई दिये, जिनको साधु संत यमदूत बोलते हैं। उनकी डरावनी आकृति देखकर मैं घबरा गया। 


    तब उन्होंने कहा -आज  “तेरी मौत नहीं आयी है। अभी यंहा एक युवक किसान बैलगाड़ी भगाता-भगाता आयेगा। 


          यह जो गड्ढा है उसमें उसकी बैलगाड़ी का पहिया फँसेगा और बैलों के कंधे पर रखा जुआ टूट जायेगा। 

बैलों को प्रेरित करके हम उद्दण्ड बनायेंगे, तब उनमें से जो दायीं ओर का बैल होगा, वह विशेष उद्दण्ड होकर युवक किसान के पेट में अपना सींग घुसा देगा और इसी निमित्त से उसकी मृत्यु हो जायेगी। हम उसी की जीवात्मा को लेने आये हैं।


    राजासाहब !  मैंने उन यमदूतों से हाथ जोड़कर प्रार्थना की कि ‘यह घटना देखने की मुझे अनुमति मिल जाय।’ उन्होंने अनुमति दे दी और मैं दूर एक पेड़ के पीछे खड़ा हो गया। थोड़ी ही देर में उस कच्चे रास्ते से बैलगाड़ी दौड़ती हुई आयी और जैसा उन्होंने कहा था ठीक वैसे ही बैलगाड़ी को झटका लगा, बैल उत्तेजित हुए, युवक किसान उन पर नियंत्रण पाने में असफल रहा। बैल धक्का मारते-मारते उसे दूर ले गये और बुरी तरह से उसके पेट में सींग घुसेड दिया और वह मर गया।


 राजा ने उत्सुकता से पूछा- “फिर क्या हुआ ?”


सेवक - “महाराज ! युवक किसान की मौत के बाद मैं पेड़ की ओट से बाहर आया और दूतों से पूछा - "इसकी (जीवात्मा) कहाँ है, कैसी है ?”


        वे बोले - "वह जीव हमारे हाथ नहीं आया। मृत्यु तो हमारे निमित्त से हुई थी, किंतु जहाँ उसने प्राण त्यागे वहाँ तुलसी का पौधा था। और जहाँ तुलसी होती है वहाँ मृत्यु होने पर जीव भगवान श्रीहरि के धाम में जाता है। पार्षद आकर उसे ले जाते हैं।"


सेवक ! महाराज तबसे मुझे ऐसा ज्ञान हुआ कि मृत्यु के बाद मैं स्वर्ग जाऊंगा या नर्क यह तो मुझे पता नहीं, किन्तु तुलसी की माला तो पहन लूँ ताकि कम से कम भगवान नारायण के धाम में जाने का तो अवसर मिल ही जायेगा और तभी से मैं तुलसी की माला पहनने लगा।"


कैसी दिव्य महिमा है तुलसी-माला धारण करने की ! इसीलिए हिन्दू धर्म में किसी का अंत समय उपस्थित होने पर उसके मुख में तुलसी का पत्ता और गंगाजल डाला जाता है, ताकि जीव की सदगति प्रप्त हो जाय।

Thursday, 26 December 2024

लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस

 लोककेंद्रित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी

विभागांनी 100 दिवसांच्या आराखड्यातून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 :  राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा सर्व विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोककेंद्रीत योजनातंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावाअसे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.  

            सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षणवन व कृषि विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराप्रधान सचिव अश्विनी भिडेउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीवन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डीसचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाच्या सचिव जयश्री भोजकौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटीलवित्त विभागाच्या सचिव शैला ए आदी उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वन्य प्राणी व मानव यामधील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना कराव्यात. मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी. या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यात अशा उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. वृक्षलागवडीचा संस्कार रूजण्यासाठी असे अभिनव उपक्रम कायमस्वरूपी अंमलात आणावे. या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काम करण्यात यावे. 

            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे देण्याची व्यवस्था करावी. बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढविण्यात यावी. विभागाने कार्बन क्रेडीट कंपनी स्थापन करण्याबाबत धोरण तयार करावे. शहरी भागातील वनीकरण वाढविण्यासाठी मियावाकी वृक्षलागवड पद्धत शहरांमध्ये उपयोगात आणावी. कृषि विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून  शैक्षणिक संकुल निर्माण करावे.

            यावेळी संबंधित विभागाच्या सचिवांनी विभागांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

0000

धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे

 धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे

-         कामगार मंत्री आकाश फुंडकर

 

मुंबई दि. 26 : अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला.

कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले कीबाष्पके संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.  सर्वेक्षणानंतरही अपघात झाल्याचे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघातग्रस्त कामगारांना शासन आर्थिक मदत देते मात्रत्यांचा जीव वाचणे महत्वाचे असल्याने त्यादृष्टिने ठोस कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचना श्री. फुंडकर यांनी दिल्या.

माथाडी कामगारांची नोंदणी वाढण्यासंदर्भात कार्यवाही करावीमाथाडीकामगार संहिता सुधारणे संदर्भात उपाययोजना आखण्यात याव्यात, असे निर्देश श्री.फुंडकर यांनी दिले. यावेळी असंघटीत कामगार, श्रम एवम रोजगार मंत्रालयाचे ई-श्रम पोर्टलमहाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळऔद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयराज्य कामगार कायदेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची संरचना आणि कामांबाबत आढावा कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी घेतला.

बैठकीत असंघटीत कामगार, विकास आयुक्त तुकाराम मुंढेकामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोडऔद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक दिलिप पोफळेसंचालक ध.प्र. अंतापूरकरबांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळाचे विवेक कुंभार आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

०००

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर

 शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण विभाग आढावा बैठक

 

मुंबईदि. 26 : येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल,  अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेउपसचिव अनिल  आहेरउपसचिव शंकर जाधवउपसचिव तुषार पवारउपसचिव श्वेतांबरी खडेसंचालक (आयुष) डॉ. रामण घोंगळकर,  कोल्हापूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय कागल येथील अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील व  शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयउत्तूर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सन २०२४-२५ पासून मुंबई आणि नाशिक येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेचे आणि अंबरनाथ (जिल्हा -ठाणे)गडचिरोलीहिंगोलीवाशिमअमरावतीबुलढाणाजालना आणि भंडारा या जिल्हयांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजनांबाबत PSU द्वारे होणाऱ्या बांधकामाचा आढावा घेतला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयकागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयआजरा येथीय उत्तूर  निसर्गोपचार महाविद्यालय संदर्भात आढावा घेण्यात आला. यंत्रसामुग्री निधी वितरण व पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच 2024 - 25 मधील विविध योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

अधिक पारदर्शकतेने ग्राहकांना सेवा द्याव्यात

 अधिक पारदर्शकतेने ग्राहकांना सेवा द्याव्यात

- अन्ननागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे

स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्थेला प्राथमिकता देणार

 

मुंबई दि. 26 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसुत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्ननागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही श्री. मुंडें यांनी यावेळी सांगितले.

 सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा श्री. मुंडे यांनी घेतला.

 शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करत असताना विभागाचे डिजिटायजेशनआधुनिक गोदाम व्यवस्था याचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देऊन अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीधान्य खरेदी ते धान्य वितरण या प्रत्येक टप्प्यावर त्याची अद्ययावत माहिती घेणारी यंत्रणा निर्माण करावीधान्याचे वितरण जलद होण्यासाठी ‘एक गाव एक गोदाम’ ही योजना तातडीने कार्यान्वित करावीस्मार्ट गोदाम उभारण्यात यावीतवितरण व्यवस्था सुधारल्यामुळे होणारे नुकसान कमी होऊन ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना फायदा होईललाभार्थ्यांना स्मार्ट शिधा पत्रिका वितरण करण्याची कार्यवाही सुरू करावीधान्य खरेदी ही विकेंद्रित करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा तसेच जास्तीत जास्त गोदामांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीग्राहक संरक्षण आणि धान्य वितरण यासाठी डिजिटल डॅश बोर्ड विकसित करावाग्राहक संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, त्यामध्ये शाळामहाविद्यालय यांना सहभागी करून घ्यावेलाभार्थ्यांना सुलभ आणि त्वरित तक्रार निवारण होईल, अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करावी.

बैठकीस अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओलसहसचिव रामचंद्र धनावडेउपसचिव राजश्री सारंगसंतोष गायकवाड यांच्यासहअवर सचिव व अधिकारी उपस्थित होते.

००००


 


 

महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

 महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी

अधिक गतीने कार्य करणार

- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

मुंबईदि. २६ : राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग  अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार, असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री, अदिती तटकरे यांनी केले.

 मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी विभागाचा पदभार स्विकारला. त्यानंतर विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादवमहिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरेएकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या कीएकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (PMJJBY) व ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSBY) लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याकरिता  केंद्र सरकारचा ६०टक्के  तर राज्य शासनाकडून ४० टक्के हिस्सा असणार आहे. या योजनेकरिता पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येईल. तसेच अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका या पदावर निवडीने नियुक्ती करण्याबाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही कु. तटकरे यांनी सांगितले. ग्राम बालविकास केंद्राच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता नागरी बालविकास केंद्र (UCDC) लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi