Thursday, 26 December 2024

वीर बालदिवस निमित्ताने

 वीर बालदिवस निमित्ताने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

 

मुंबईदि. २६ : वीर बालदिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 यावेळी अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

0000

वृत्त क्र. 232

 

वीर बाल दिवसानिमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून

 मंत्रालयात अभिवादन

 

मुंबईदि २६ वीर बालदिवस निमित्ताने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रालयात साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदेसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव व मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

0000





दोन डोळे आणि तीस म्हणी पहा माय मराठीची समृद्धी , डोळे हे जुलमी गडे

 दोन डोळे आणि तीस म्हणी

पहा माय मराठीची समृद्धी

                                            


१.डोळा लागणे (झोप लागणे)


२.डोळा मारणे (इशारा करणे)


३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)


४.डोळे येणे (नेत्रविकार होणे)


५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे)


६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे)


७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे)


८.डोळे खिळणे (एकटक पाहणे)


९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)


१० डोळे दिपणे (थक्क होणे)


११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)


१२.डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)


१३.डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)


१४.डोळे भरून येणे (रडू येणे)


१५.डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)


१६.डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)


१७.डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)


१८.डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)


१९.डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)


२०.डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)


२१.डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)


२२.डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)


२३.डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)


२४.डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)


२५.डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)


२६.डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)


२७.डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)


२८.डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)


२९.डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)


३०.दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे) 🙂

*आपली मराठी भाषा*

Wednesday, 25 December 2024

राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 राज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान  गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

 

खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी

हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

मुंबई, दि. 25 : 27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

 

27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल. शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. 

 

28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे. या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. 

 

29 डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहिला मिळेल, आणि 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल. 

 

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.  प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संगीत माणसाला जोडण्याचे काम करते - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राज्यपालांच्या हस्ते 'मोहम्मद रफी' पुरस्काराचे वितरण

 संगीत माणसाला जोडण्याचे काम करते - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपालांच्या हस्ते 'मोहम्मद रफी' पुरस्काराचे वितरण


मुंबई, दि. 25 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४) वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९ व्या 'मोहम्मद रफी' पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 'स्पंदन आर्ट' संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत ही कला जात, धर्म, पंथ, भाषा या पलिकडे जाऊन माणसाला जोडण्याचे काम करते, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या मजरुह सुलतानपुरी यांना या वर्षीचा 'मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' (मरणोत्तर) तसेच हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या जावेद अली यांना 'मोहम्मद रफी पुरस्कार २०२४' ने राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मजरुह सुलतानपुरी यांचा जीवनगौरव पुरस्कार त्यांचे पुत्र अंदलिब मजरुह सुलतानपुरी यांनी स्वीकारला. एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रुपये व स्मृतीचिन्ह असे 'मोहम्मद रफी पुरस्कारा'चे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. प्रतिमा शेलार तसेच मोहम्मद रफी, मजरुह सुलतान पुरी व जावेद अली यांचे कुटुंबीय व संगीत प्रेमी उपस्थित होते.

यावेळी 'फिर रफी' या बहारदार मैफिलीत प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर केली.

 


पुणे मध्ये ज्येष्ठनागरिक व रुग्णासाठी आता घरी येउन त्यांची सेवा करण्यासाठी "मुक्ताई हेल्थ केयर २४ प्रा लि

 पुणे मध्ये ज्येष्ठनागरिक व रुग्णासाठी आता घरी येउन त्यांची सेवा करण्यासाठी "मुक्ताई हेल्थ केयर २४ प्रा लि कंपनी" हे पूणे शहरवासीयांच्या सेवेत सुरू केले आहे.

       "मुक्ताई हेल्थ केयर २४ प्रा लि कंपनी "अंतर्गत आम्ही ज्येष्ठ नागरिकांना / रुग्णांना घरी ८ तास, १० तास, 12 तास ,24 तास रात्रपाळी तसेच दवाखान्यात रुग्णाजवळ थांबणे, त्यांची घरी  शुश्रुषा करणे, त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधुन त्यांचा एकटेपणा दुर करणे, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची पूर्णपणे काळ्जी घेणे अशी

 " पे "सेवा सुरु केली आहे.

"मुक्ताई*हेल्थ केयर २४ प्रा लि कंपनी "कोर्स  झालेले प्रशिक्षित असे मुलं/मुली अनुभवी वर्ग आहे जो काळजीपूर्वक सेवा करेल व त्यांना आनंदी ठेवेल. आमच्याकडील सर्व स्टाफ चे आरोग्य तपासणी करुनच सेवा पुरवितो "तरी जास्तीत जास्त लोकांना  माहिती व्हावी यासाठी आपण आपल्या सर्व ग्रूप व आपले मित्र- परिवारात हा मेसेज पाठवावा व या सेवेचा जास्तीत जास्त" लोकांनी  लाभ घेउन आपल्या लोकांची खऱ्या अर्थाने काळजी घेतल्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती मी *धनजंय शिंदे करत आहे ...🙏🏻🙏🏻

ज्याना कोणालाही सेवेकरी (Care Givers) पाहिजे असल्यास खालील फोन वर *संपर्क साधावा :- 

 8652820777 

 8097009201 

8097009202

9892758007     


 www.muktaihealthcare24.com   

 Registered and trained Nurses Also Provide all overall Pune


कृपया जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत  मेसेज पोहचवुन गरजावंताचा आशिर्वाद घ्या मुक्ताई हेल्थकेअर 24 प्रायव्हेट लिमिटेड आपली  सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे 🙏

दिलखुलास', कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत

 दिलखुलास', कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत

 

मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'मौखिक आरोग्य आणि खबरदारी' या विषयावर ठाणे जिल्हा, शासकीय रूग्णालयाच्या, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

जगभरात मौखिक आरोग्याच्या दृष्टीने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध असून दातांची कीड, हिरड्याचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणारे मुखाचे आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात याचा समावेश होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. त्याअनुषंगाने मौखिक आजाराचे प्रकार आणि या आजारांबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत 'दिलखुलास' कार्यक्रमातून डॉ. अर्चना पवार यांनी माहिती दिली आहे.

 

'दिलखुलास' कार्यक्रमात डॉ. पवार यांची मुलाखत शुक्रवार दि. 27, शनिवार दि. 28, सोमवार दि.30 आणि मंगळवार दि.31 डिसेंबर 2024 तसेच बुधवार दि. 1 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, निवेदक सुचिता गरूडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

सावधान

 क्या आपने अवास्तविक लाभ का वादा करने वाली योजनाओं में पैसा गवां दिया है? शिकायत दर्ज करने और संबंधित अधिकारियों से संपर्क के लिए https://sachet.rbi.org.in पर रिपोर्ट करें। -RBI

Featured post

Lakshvedhi