Tuesday, 24 December 2024

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

 स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ

विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ उभारावे

-उपमुख्यमंत्री

पुणेदि.23: श्री क्षेत्र तुळापूर येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तुळापूर (ता. हवेली)  येथील बलिदान स्थळ विकास कामांची त्यांनी पाहणी केली. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटकेप्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाणअधीक्षक अभियंता बाप्पा बहीरकार्यकारी अभियंता अमोल पवारतुळापूरच्या सरपंच ॲड. गुंफा इंगळेवढू बुद्रुकच्या सरपंच अंजली शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले,  छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्णदर्जेदारटिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतीलयाकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीतयाबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीवकोरीव बांधकाममातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा. 

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) विकास आराखडा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील  एकूण 264 कोटी रुपयाच्या कामाबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास शासनस्तरावर बैठक घेऊन त्वरित मंजूरी देण्यात येईल.  या कामांचे सविस्तर  आराखडे व अंदाजपत्रक तयार करुन निविदा काढण्याची कार्यवाही करावी.

नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावेतसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषानिळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावेअशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी श्री. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ वढू बु. (ता. शिरुर) स्मारक विकास आराखड्याबाबत माहिती घेतली तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मुख्य अभियंता श्री. चव्हाणअधीक्षक अभियंता श्री. बहीर आणि कार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.

****


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पेरणे फाटा येथील

विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

-उपमुख्यमंत्री

पुणेदि.23: पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यातसोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा याकरीता सर्व संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावेयाकरीता शासनाच्यावतीने निधीची कमतरता पडू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हवेली तालुक्यातील मोजै पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटकेप्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलपिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारेपोलीस अधीक्षक पंकज देशमुखसार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाणअधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणालेयेत्या 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करावे. गतवर्षीच्यावेळी राहिलेल्या त्रुटींची पूर्तता होणार नाहीयाबाबत दक्षता घ्यावी. परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याकरीता वाहतूक व्यवस्थावाहनतळाचा आराखडा तयार करावास्वच्छतेसाठी पथकांची नियुक्ती आणि स्वच्छतागृहांसाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची सुविधा करावी. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्याही विचारात घ्यावी.

पोलीस विभागाने वाहतुकीचे नियोजन करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन करावे. पीएमपीएमएलने पुरेशा बसेसची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. अनुयायांची संख्या लक्षात घेऊन सर्व  आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्येष्ठ नागरिकदिव्यांग नागरिकांही सुलभरित्या विजयस्तंभास अभिवादन करता येईलयाबाबत दक्षता घ्यावी. रुग्णवाहिकाप्रथमोपचार पेटी पुरेशा प्रमाणात ठेवाव्यात. एकंदरीत अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने समन्वयाने कामे करावीतअशाही सूचना श्री. पवार म्हणाले.

बैठकीपूर्वी श्री. पवार यांनी विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

श्री. पाटील म्हणालेविजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.  विभागीय आयुक्तपोलीस आयुक्त यांनी स्वतः विजयस्तंभ परिसराला भेट देवून आढावा घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. विविध संघटनेच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांच्या सूचनाही विचारात घेतल्या जात आहेतअभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहेअसेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरणप्रकाशव्यवस्थास्टॉलमंडप उभारणीवाहनतळवाहतूक आराखडाआरोग्य सुविधाभोजनव्यवस्थापिण्याचे पाणीरस्त्यांची दुरुस्तीतात्पुरते शौचालय उभारणीस्वच्छतेसाठी घंटागाड्यास्वच्छताआपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्थाविद्युत व्यवस्थाहिरकणी कक्षआपत्ती व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे शहरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवेहवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागपुणे महानगरपालिकापीएमआरडीए अग्नीशमन विभागजिल्हा परिषदपोलीस विभागपीएमपीएमएलआरोग्य विभागराज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचे अधिकारी तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळेमाजी उप महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते.

****


प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार

 प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार

-          केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे

-          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे, दि. 23 : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेतंर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था अर्थात अटारी, शिवाजीनगर येथे किसान सन्मान दिवसानिमित्ताने शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आयसीएआर, नवी दिल्लीचे सहायक महासंचालक डॉ. संजय कुमार सिंह, राज्याचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख आदी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. चौहान पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कोणताही गरीब घरापासून वंचित राहणार नाही, प्रत्येकाला पक्के घर मिळाले पाहिजे असा संकल्प केला आहे. हा संकल्प आमचे सरकार लवकरच पूर्ण करणार आहे याचाच एक भाग म्हणून, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्रात 6 लाख 37 हजार 89 पक्की घरे देण्यात येत आहेत. आता पुन्हा नव्याने 13 लाख 29 हजार 678 पक्की घरे देण्यात येतील. सर्व मिळून एकूण 19 लाख 66 हजार 767 घरे देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कार्यक्रमात आज केली. यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त पक्की घरे निर्माण करणारे राज्य ठरेल. असे त्यांनी यावेळी सांगितले. या संदर्भातील पत्र केंद्रीय कृषीमंत्री श्री. चौहान यांनी मुख्यमंत्री श्री फडवणीस यांना कार्यक्रमाप्रसंगी दिले.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने देशातील शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी विविध नवीन योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संस्थांतर्गत कर्जात पूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून 7 लाख कोटी रुपयांपरुन 25 लाख कोटी रुपये पीक कर्ज मिळत आहे. देशाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या तरतुदीत 1 लाख 27 हजार कोटी रुपये इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात अन्न धान्याच्या किमान आधारभूत किंमतीत दुप्पट वाढ करण्यात आली असून मोठया प्रमाणात खरेदी देखील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक असून रासायनिक खतांचा वापर कमी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी झाली असून देशात लखपती दीदी योजनेतंर्गत तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात येणार आहे. या महिलांनाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी कमाल उत्पन्नाची अट 10 हजारावरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच अडीच एकर बागायती किंवा पाच एकरापर्यंत कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृषीमधील पारंपरिक विज्ञानदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आज पुन्हा संपूर्ण जग नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहे. नैसर्गिक बाबींचा वापर अधिकाधिक करुन उत्पादकता कशी वाढवता येईल तसेच खाद्यामध्ये विषयुक्त पदार्थांचा वापर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राने देखील नैसर्गिक शेतीचे अभियान स्वीकारले असून 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील रहावे लागेल. शेतीचे क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न करावा लागेल. यामुळे पर ड्रॉप मोअर क्रॉपयोजनेपासून वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणल्या. आता त्यांनी ड्रोन दीदीची संकल्पना आणली आहे. अशा प्रकारे शेतीमध्ये परीवर्तन होत आहे.

शेती क्षेत्रात शेतमजूर मिळण्याची संख्या कमी होत असल्यामुळे यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मात्र हे यांत्रिकीकरण छोट्या शेतकऱ्यांना परवडणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील काळात गट शेती, सामुहिक औजारांची बँक सुरू केली. राज्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेततळी, यांत्रिकीकरण आदी मदत करण्याचा प्रयत्न केला. तसेच मागेल त्याला शेततळे अशा प्रकारचा कार्यक्रम आखून त्या माध्यमातून शाश्वत सिंचन देण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाने मॅग्नेट सारख्या योजना आणल्या आहेत. गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कृषी व्यवसाय संस्थांमध्ये (ॲग्रो बिझनेस सोसायटी) रुपांतरीत करण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजार गावांमध्ये हे काम सुरू आहे. या संस्था शेतकऱ्यांची बाजारपेठेसोबत मूल्यसाखळी निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळून ग्राहकालाही योग्य दरात शेतमाल मिळणार आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासनाने ई-मार्केट, डिजिटल मार्केट उपलब्ध करुन दिले आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहा हजार रुपयांची भर घालून प्रतिवर्षी 12 हजार रुपये देण्यास सुरुवात केली. लवकरच त्यात वाढ करुन एकूण 15 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. एक रुपयात पीक विमा योजनेतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8 हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

2011 च्या जनगणनेवेळी सामाजिक, आर्थिक आणि जात जनगणनेनुसार यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जात होता. त्यात त्रुटी असल्याने केंद्र शासनाने नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून आवास प्लस योजनेंतर्गंत महाराष्ट्रातील अतिरिक्त 26 लाख कुटुंबांना घरकुलांचा लाभ होणार आहे. देशात एकाच वर्षात मोठ्या प्रमाणावर घरे राज्यातील गरीब, गरजूंना मिळणार असल्याने केंद्र शासनाचे आभार मानत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी आयसीएआर- अटारीचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमात केंद्र शासनाच्या कृषीविषयक तसेच ग्रामविकास विषयक योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात प्रगतिशील शेतकरी तसेच लघुउद्योजक आणि ग्रामविकास विभागाच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मान्यवरांनी अटारी संस्थेच्यावतीने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी करुन उत्पादक व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

 


शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून पणन व्यवस्था बळकट करणार पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी घेतला पणन विभागाचा आढावा

 शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यातून पणन व्यवस्था बळकट करणार

पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी घेतला पणन विभागाचा आढावा




     मुंबई –दि.23: शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचाशी समन्वय साधून शेतक-यांचे हित कसे जोपासता येईल यावर पणन विभागाने भर दयावा अशा सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा बैठकीत दिल्या.

मंत्री श्री. रावल यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथिगृह येथे पणन विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र कृषी व पणन महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक संजय कदम, पणन संचालक विकास रसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री.खंडागळे यांच्यासह पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. रावल म्हणाले की, सर्व अधिका-यांनी शेतक-यांसाठी सदहेतूने काम करून शेतमालाचे  योग्य त-हेने मार्केटींग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. अधिका-यांनी संवेदनशिलपणे कामकाज करावे याकरीता कृती आराखडा तयार करावा.कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाचे महत्वाचे अंग आहे, त्यादृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पुरक बदल कसे करता येतील याबाबत चर्चा केली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही दररोज कोटयावधींची उलाढाल करणारी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे त्यादृष्टीने त्याठिकाणी आवश्यक सुधारणा व बळकटीकरण कसे करता येईल याबाबत चर्चा केली. पणन विभागामध्ये मार्केटींग साठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकिया व कार्यपध्दती राबवण्यावर भर दयावा शेतमालाची साठवणूक वाहतुक व विक्री यासाठी आधुनिक पध्दतीचे तंत्रज्ञान वापरले पाहिजे त्यादृष्टीने पणन विभागाकडून नियोजन करण्यात यावे.

यावेळी मंत्री श्री. रावल यांनी महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ पुणे, पणन संचालक, व आशिया खंडातीलसर्वात मोठया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

 


संगीत मानापमान अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा

 संगीत मानापमान अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग

 

मुंबई दि. 23- नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. मराठी संगीत नाट्य संगीत ही अभिजात आहे. आपली ही कला- संगीताची परंपरा नव्या पिढीसमोर नव्या स्वरूपात येणे गरजेचे आहे. संगीत मानापमान हा चित्रपट आपले अभिजात मराठी कला आणि संगीत रिइन्व्हेंट करणारा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संगीत मानापमान चित्रपटाचे ट्रेलर लाँच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेते तथा चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे, अभिनेते सुमीत राघवन, अभिनेत्री वैदेही परशुरामी, अमृता खानविलकर, जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, सुनील फडतरे, निखिल साने, चित्रपटाचे संगीतकार शंकर, एहसान, लॉय यांच्यासह चित्रपटातील कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.         

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की संगीत मानापमान हे नाटक गेली 113 वर्ष मराठी मनाला भुरळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हे अजरामर नाटक नव्या स्वरूपात पाहायला मिळत आहे, याचा आनंद आहे. या चित्रपटांतून संगीत नाटकाच्या नाट्यपदांचे सौंदर्य नव्या पिढीसमोर पोहोचणार आहे असे सांगून या प्रयत्नाबद्दल चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन ही त्यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की येत्या काळात मराठी कला आणि कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी शासनाच्या माध्यमातून काम करण्यात येईल. मराठी चित्रपटांना चांगले प्लॅटफॉर्म मिळावेत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर शंकर महादेवन, बेला शेंडे आर्या आंबेकर यांनी चित्रपटातील गाणी सादर केली.

 

पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली

 पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट


      मुंबई दि. 23- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. याप्रसंगी महोत्सवाचे आयोजक आमदार पराग अळवणी, पार्ले टिळक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू, विलेपार्ले सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त अजित पेंडसे, साठे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे, डॉ. अलका मांडके, अजित देशमुख, अरविंद प्रभू, सुशम सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्र ही महत्त्वाची आहेत. या क्षेत्रात सहभागी होणारी पिढी ही समाज आणि देश घडवणारी ठरते. या क्षेत्रातूनच संवेदनशीलता आणि स्पोर्ट्समन स्पिरिट नव्या पिढीमध्ये निर्माण होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, पार्ले महोत्सव हा पार्लेकरांचा हक्काचा महोत्सव आहे. या महोत्सवामुळे पार्लेकरांच्या कला- क्रीडा अशा सर्व गुणांना व्यासपीठ मिळाले आहे. गेल्या 24 ते 25 वर्षात पार्ले महोत्सवात सहभागी अनेक स्पर्धक आज विविध क्षेत्रात नामवंत झाले आहेत.विलेपार्ले येथील एका मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याचे आणि विलेपार्ले येथील महामार्गावरील उड्डाणपुलाला डॉ. नीतू मांडके यांचे नाव देण्याबाबत विविध बाबी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी  दिले.

यावेळी आमदार पराग अळवणी यांनी पार्ले महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली.

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 २७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

मुंबई, दि.२४: कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi