Monday, 23 December 2024

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत 31 जानेवारी, 2025 पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी

 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत

31 जानेवारी, 2025 पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी

मुंबई दि.23 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी  आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी  दि. 1 ते 31 जानेवारी,2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर  इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

 

या सहा वाङ्मय प्रकाराला मिळणार अनुदान

 

(1) कविता (64 ते 96  मुद्रीत केलेली  पृष्ठे 80 कविता)

(2) कथा (128 ते 144  मुद्रीत केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 45000 शब्द

(3) नाटक/एकांकिका (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त 28000 शब्द)

(4) कादंबरी (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 45000 शब्द)

(5) बालवाङ्मय  (64 ते 96 मुद्रीत केलेली पृष्ठे जास्तीत जास्त 28000)

(6) वैचारिक लेख, ललितलेख, चरित्र, आत्मकथन, प्रवास वर्णन (128 ते 144 मुद्रीत केलेली पृष्ठे - जास्तीत जास्त  

      45000 शब्द) 

या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकुराला अनुदान देण्यात येईल. नमूद केलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही.

या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना 2025 माहितीपत्रक व अर्ज' या शीर्षाखाली तसेच 'What's new' या अंतर्गत 'Navlekhak Grant Scheme Rules Book and Application Form' या शीर्षकाखाली तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दूरध्वनी क्र. 2432 5931 यावर संपर्क साधावा.

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि.23 :- सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय  पुरस्कार  देण्यात येणार आहे.  1 जानेवारी 2024  ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. लेखकांनी पुरस्काराच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी  प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या  http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात.

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

 

0000


मानवी मृत्यू कारण...! ADR म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन -

 मानवी मृत्यू

कारण...!


ADR  म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण  जगामध्ये  मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. आपण जी अलोपॅथिक औषधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.  


सर्वच प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत,नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.


कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह (Diabetis) होतो.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे "ओव्हर डोस अमेरिका"  या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहमसन या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की,अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य अलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.


अँटिडिप्रेसंट औषधी, Antiboitics,कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला भ्रमीत केले जात आहे.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे "DEATH BY PRESCRIPTION" या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर Dr Ray Strand आहेत.  


आज 'संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या अलोपॅथिक औषधी आहेत, हे Dr Ray Strand यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे....


जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत. इतर कोणत्याही कारणांपेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी  मरणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे.- Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)


लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया धोकादायक व अनिश्चित असतात - डॉ. अतुल गावंडे (HOD, सर्जरी डिपार्टमेंट - बोस्टन युनिव्हर्सिटी)


हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा / औषधी / रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे Famous डॉ. B M हेगडे येथे नमूद करतात,की देवाची कृपा आहे की,हे ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान फक्त 100-150 वर्ष जुने आहे. त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे.


मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर अलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.


हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा  कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन,गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.


अलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (Dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो.


अनावश्यक रक्त - लघवी तपासणी, X-Ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी, अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. *यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व  कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात.* जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.


अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा धंदाही फार जोमात आहे.अनेक लसी अनावश्यक असून या  लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. *मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे.*


औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.


Unreasonable  Profit Making हा फंडा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून,अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.


 *रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e.g. Bypass, Angioplasty करायला भाग पाडले जाते.*


असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला, तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार  अथवा  ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.


व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.


*स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी  सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*


डॉ निलेश वंजारी, MBBS - Boston University...... हे सर्व वाचल्यावर सुज्ञ लोकांच्या लक्षात आले असेलच की आजारी पडून डॉकटर कडे जाण्यापेक्षा आजारी न पडलेले केव्हाही नक्कीच चांगले. 

ही संकल्पना मला आवडली

 ही संकल्पना मला आवडली. आपणाकरिता पाठवीत आहे 

🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦🟦

             *🌹मित्र🌹*

*****************************

*मैत्री केली तर*

*गरज पाहू नका,*

*आणि मदत केली तर*

*ती बोलून दाखवू नका.*

*कारण कोणत्याही*

*बाटलीचा सील,*

*आणि दोस्तांचा दिल*

*एकदा तोडला की*

*विषय संपला.* 

*मित्र गरज म्हणून नाही*

*तर सवय म्हणून जोडा,*

*कारण गरज संपते पण*

*सवय कधीच सुटत नाहीत.* 

*"मित्र" नावाची ही दैवी देणगी*

*जीवापाड जपून ठेवा,*

*कारण..जीवनांतील*

*अर्धा गोडवा हा*

*मित्रांमुळेच असतो.*

*कोणीतरी विचारले*

*मित्रांमध्ये एवढे काय विशेष*

*नातेवाईकां पेक्षा.*

*त्यांना सांगितले,*

*मित्र हे फक्त मित्र असतात.*

*त्यात सख्खे,चुलत,मावस, सावत्र*

*असं काही नसते.*

*ते "थेट" मित्रच असतात.*

*“मैत्रीचे धागे हे*

*कोळ्याच्या जाळ्या पेक्षाही*

*बारीक असतात.*

*पण लोखंडाच्या तारेहुनही*

*मजबूत असतात.*

*तुटले तर श्वासानेही तुटतील,*

*नाहीतर वज्राघातानेही*

*तुटणारच  नाहीत.*

*प्रत्येक दुखण्यावर*

*दवाखान्यात उपचार*

*होतातच असे नाही.*

*काही दुखणी*

*कुटुंब आणि मित्र मंडळी*

*यांच्या बरोबर हसण्या आणि*

*खिदळण्यानेही बरी होतात.*

 *माणसाने*

*कितीही प्रयत्न केले तरी*

*अंधारात "सावली"*

*म्हातारपणात "शरीर"*

*आणि..*

*आयुष्याच्या*

*शेवटच्या काळात "पैसा"*

*कधीच साथ देत नाहीत ,*

*साथ देतात ती*

*फक्त आपण जोडलेले*

*"जवळचे मित्र.*

*मित्र बोलवित आहे,*

*पण तुम्हाला जावेसे*

*वाटत नसेल तर..*

*समजा की तुम्ही म्हातारे झालात.*

*म्हातारपण येवू न देणे*

*आपल्या हातातच आहे ना .*

*मित्रांसोबत रहा व आनंदात*

 *जीवन भर जगत राहा.*

**********************

    *सर्व जिवलग मित्रांसाठी*

🌹 

Sunday, 22 December 2024

महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळ




बीजविरहित खजूर खरेदी करू नका, खाऊ नका आणि देऊ नका. Pl share

 😡😡😡 *बीजविरहित खजूर खरेदी करू नका, खाऊ नका आणि देऊ नका.  जेव्हा एका मित्राने तोंडाने बिया काढण्याबद्दल सांगितले तेव्हा मी विश्वास ठेवला नाही पण आता रविशंकरजींचा वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर मला विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे जे अत्यंत अविश्वसनीय आणि खरोखर धक्कादायक आहे!*


Saturday, 21 December 2024

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज

 विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत केलेली 4 विधेयक विधानसभेत संमत करण्यात आली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 1 असून 1 सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

००००

Featured post

Lakshvedhi