Friday, 15 November 2024

*💠त्रिपुरारी पौर्णिमा*💠

 *‼️ श्री स्वामी समर्थ ‼️*

  *💠त्रिपुरारी पौर्णिमा*💠


 *त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यांस संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला. परंतु व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने 'मला अमरत्व प्राप्त व्हावे' असा वर मागितला.*


वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला *देव दीपावली* असेही म्हणतात. 


*देवाप्रमाणे आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान* *शंकरांच्या मंदिरात ७५० वाती जाळून, दिवे लावून साजरा करतात  या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय.*

*तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जळल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण सांबाच्या (शिवाच्या) पिंडीला लावतात .कारण शिवाला भस्म प्रिय आहे.*


*त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे  प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे.* 

*संदर्भ ....सण,वार,  व्रत- वैकल्ये दिंडोरी प्रणित ग्रंथ*🌷


दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

 दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी

"इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

 

 

मुंबईदि. १५ : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावीयासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूरदृश्यबातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.

मतदान दिनी तसेच मतदानाच्या एक दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटनाआचारसंहितेचा भंगकायदा व सुव्यवस्था आदींबाबत बातम्या प्रसारित झाल्यास अशा घटनांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत किंवा संबंधित यंत्रणेमार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटरद्वारे तत्काळ दखल घेतली जाणार असून त्याबाबतचा कृती अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र संदर्भातील बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव (माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती) यांना सहमुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस माहिती व जनसंपर्क संचालक दयानंद कांबळे, अवर सचिव तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी शरद दळवीकक्ष अधिकारी विवेक जगदाळेकक्ष अधिकारी श्रीमती कल्पना कारंडेक्षेत्रीय कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी)गट-क या संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९१० व ११ ऑक्टोबर२०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदेअनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पदअनुसूचित जमाती (माजी सैनिक) ०१ पदआर्थिकदृष्टया दुर्बल घटक (माजी सैनिक) ०१ पदइतर मागास वर्ग, (माजी सैनिक) २ पदे अशी एकूण ०८ पदे राखीव होती. या वर्गवारीकरिता त्या - त्या वर्गवारीचे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी दिव्यांगाकरिता राखीव ०२ पदांपैकी ०१ पदाकरिता (कर्णबधीर) दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रानुसार अराखीव (सर्वसाधारण) वर्गवारीचे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

 जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अनाथांकरिता ०१ पद राखीव होते. त्याकरिता अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार या अराखीव वर्गवारीचे ०१ पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.


आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली; ५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 आचारसंहिता भंगाच्या ६,३८१ तक्रारी निकाली;

५३६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 

मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ६ हजार ३८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ६ हजार ३८१ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

 

५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 मलबार हिल विधानसभा मतदारसंघात

८५ वर्षावरील २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

            मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र ‘१२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत मलबार हिल विधानसभा मतदारसंघात २६८ ज्येष्ठ नागरिक व १० दिव्यांग अशा एकूण २७८ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत कर्तव्य बजावले.

            लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे', असा महत्वपूर्ण संदेश या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान करून कृतीद्वारे इतर मतदारांना दिला आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी २६८ मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२ ड’ भरून जमा केले होते. अशा एकूण २७८ मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे. 

            ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी घरून मतदान करण्याच्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करीत निवडणूक पथकाचे आभार मानले.             

मुंबई शहर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

 मुंबई शहर जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

 

मुंबईदि. १४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला.

            राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी,  सैन्यदलातील अधिकारी,  दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोग यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२’ किंवा १२ अ’ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संबधित निवडणूक अधिकारी यांनी पडताळणी करून टपाली मतपत्रिका दिली. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावीसायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या सात मतदारसंघात आज निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्साहात टपाली मतदान केले.

            सायन कोळीवाडाशिवडीभायखळामलबार हिलमुंबादेवीकुलाबा या मतदारसंघात १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावी मतदारसंघात केवळ आजच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळा मतदारसंघात १५ ते १७ नोव्हेंबरवरळी मतदारसंघात १६ ते १७ नोव्हेंबरमाहीम मतदारसंघात १६  नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी टपाली मतदान केल्याचे समाधान पोलिस कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. टपाली मतदानानंतर अनेक पोलीस कर्मचारी अतिशय उत्साहानेअभिमानाने मतदान केल्याची निशाणी असलेले आपले बोट अभिमानाने उंचावत सेल्फी काढताना दिसून येत होते

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील

११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

            मुंबईदि. १४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता २० नोव्हेंबर२०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेअंतर्गत शिवडी विधानसभा मतदारसंघात ११५ ज्येष्ठ नागरिक व १५ दिव्यांग अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.  

             मुंबई शहर जिल्ह्यातील शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ ज्येष्ठ नागरिक मतदार असून त्यापैकी ११५  मतदारांनी तर ३४ पैकी १५ दिव्यांग मतदारांनी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या एकूण १३० अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

             मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.           

****

Featured post

Lakshvedhi