Tuesday, 12 November 2024

विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 विधानसभा निवडणुकीसाठी

४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

 

            मुंबई दि. १२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.            

            नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३गोंदिया ३२ आणि सोलापूर २९मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिमसिंधुदुर्गगडचिरोली हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

            महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

            'महिला नियंत्रित मतदान केंद्रस्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालयपोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहीलअशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

            जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२अकोला ६अमरावती ८औरंगाबाद १३बीड ८भंडारा ८बुलढाणा ७चंद्रपूर ९धुळे ५,  जालना ६कोल्हापूर १०लातूर ६मुंबई शहर १२नागपूर १३नांदेड ९नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४पालघर ६परभणी ८पुणे २१रायगड ९रत्नागिरी ६सांगली ८सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

००००

-li.आनंदी°पहाट.il-

 🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                       *२/२*


            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

           *संत नामदेव महाराज*

                    *जयंतीची*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

                     

🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹


  *हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां ।*

  *शोक मोह दु:खा निरसूं तेणें ॥*

  *एकमेकां करूं सदा सावधान ।*

  *नामीं अनुसं-धान तुटों नेदूं ।*

  *घेऊं सर्वभावें रामनाम दिक्षा ।*

  *विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ।*

  *नामा ह्मणे शरण रिघों पंढरीनाथा ।*

  *नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥*

        *भारतीय संस्कृतीचा देशाप्रती एकात्मता भाव मनामनात रुजविण्यात संत परंपरेचे मोठे योगदान आहे. त्यांनी परमेश्वराविषयी विश्वास.. प्रेम, आपुलकी जागवली. भक्तीमार्गामुळे समाजात परस्पर संबंधात विश्वासाची.. प्रेमाची.. आपुलकीची नाती निर्माण झाली.*

        *संत नामदेव (१२७०-१३५०). जन्म नरसी नामदेव (हिंगोली) मराठवाडा, यांनी देशभर भक्तांची साखळीच जोडली.* 

        *"देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव".. म्हणणाऱ्या वारकरी संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांची आज जयंती.*

        *संत नामदेव यांचे बालपण पंढरपूरात गेले. त्यांना विठ्ठलाचा लळा लागला. संत विसोबा खेचर हे त्यांचे गुरु. तर संत चोखामेळा.. संत जनाबाई या शिष्या. बालपणापासूनच विठ्ठलाशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने शेवटचा मुक्काम पंढरपूरला विठ्ठलाच्या महाव्दारीच केला.* 

        *उद्धव हे जसे श्रीकृष्णाचे सखा होते तशीच विठ्ठलाचा सखा म्हणून संत नामदेव यांची ओळख आहे. संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे समकालीन. संत ज्ञानदेवांच्या समाधीनंतर ५० वर्षे त्यांनी देशभर भागवत धर्माचा प्रसार केला.*

        *संत नामदेव हे कोमलहृदयी. बालपणी वडिलांनी मंदिरात देवाला नैवेद्य अर्पण करायला सांगितला तेव्हा देव तो खाण्याची वाट बघत ते उपाशी राहिले. कुत्र्याने त्यांच्या पोळ्या पळवल्या तर कोरड्या का खातो म्हणून तुपाची वाटी कुत्र्याला नेवून दिली. याच निर्मळ भक्तीभावामुळे विठ्ठलाने त्यांना आपले मानले.*

        *"नाचू कीर्तनाचे रंगी.. ज्ञान दीप लावू जगी" हे त्यांचे  जीवन ध्येय. त्यांनी समाजात एकोपा निर्माण केला. संत नामदेवांच्या कीर्तनात अनेक ग्रंथांचे संदर्भ यायचे. ते बहुश्रुत होते. देहभान विसरुन कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनाने श्रोते भक्तीरसात न्हावून निघायचे. कीर्तनात असा काही रंग चढायचा की 'नामदेव कीर्तन करी, पूढे नाचे पांडुरंग' अशी अनुभूती यायची.*  

        *संत नामदेव यांनी ८० वर्षाच्या जीवनात अनमोल असे विपुल लेखन केले. भागवत धर्म प्रसार पंजाब पर्यंत केला. संत नामदेवाची अभंगगाथा (२५०० अभंग) शौरसेनी भाषेतही अभंग (१२५ पदे) लिहली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. तसेच आदि, समाधी व तीर्थावळी या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.*

        *संत नामदेवांनी भक्तीचे मर्म सहज शब्दांत सांगितलेय. ईश्वर प्राप्ती.. तो भेटणे म्हणजे जीवनात आमुलाग्र बदल होत जीवनात सुख.. समाधान.. शांतता.. आनंद लाभणे. ईश्वर प्राप्ती म्हणजे काय तर जीवातील सर्व वासना संपण्याची अवस्था प्राप्त होणे. हा विलक्षण आनंद संत नामदेवांनी अनुभवला. दर्शनासाठी व्याकुळते नंतर श्रीहरी दर्शनाचा आनंद म्हणजे चंद्र किरणे बघून चकोराला होणारा आनंद किंवा मेघ बघून उत्स्फुर्त नाचणाऱ्या मयुराचा आनंद. हाच मीरेच्या भक्तीतील आर्तभावाचे दर्शन घडविणारा संत नामदेव यांचा हा अभंग.*

        *आमच्या जीवनात भक्तीचा ज्ञानदीप जागविणाऱ्या जेष्ठ श्रेष्ठ भक्त शिरोमणी संत नामदेव यांना जयंती निमित्य त्रिवार वंदन.*

    *नामदेव ऐसा भक्त कलयुगी*

    *प्रमाण त्रिजगी दुजा नाही*

    *निरुपम नामा देवा आवडता*   

    *तयासी समता नाही दुजा*

    *शतकोटी ग्रंथ अभंग वदला*

    *शिरोमणि जाला भक्त एक*

    *तुकाविप्र म्हणे धन्य नामदेव*

    *.... तुकाविप्र (हे बीडचे पेशवाईतील संत)*

      

🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹

  

  *सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।*

  *पाहतांही भूक तहान गेली ॥१॥*


  *भेटली भेटली विठाई माऊली ।*

  *वासना निवाली जिवांतील ॥२॥*


  *चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।*

  *वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥*


  *नामा म्हणे पाप आणि ताप*

  *दुख: गेले ।*

  *जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥*


🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹


  *रचना : संत नामदेव महाराज*  ✍️

  *संगीत : वसंत देसाई*

  *स्वर : वाणी जयराम*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *‼जय जय रामकृष्ण हरि‼*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-१२.११.२०२४-*


🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻

क्षात्रेक्य परिषदेचा अमृतमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

 नमस्कार 🙏🏻 या वर्षी क्षात्रेक्य परिषदेचा अमृतमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. आपल्यापैकी इच्छुक देणगीदारांनी कृपया खालील क्रमांकावर देणगी आपल्या नाव आणि पत्त्यासहित  पाठवावी. 


Gpay no: 9167876135

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिक व ११ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिक व

११ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

 

मुंबईदि. ११ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्याप्रपत्र १२ ड भरलेल्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात आज एकूण १०३ ज्येष्ठ नागरिक आणि ११ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी मतदारसंघात ८५ वर्षांवरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेतत्यापैकी १०३ अर्जदारांनीतसेच १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. या ११४ अर्जदारांचे आज गृह टपाली मतदान घेण्यात आले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत ८५ वर्षांवरील २१३७ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या घरपोच मतदान सुविधेचे स्वागत केले असूनटपाली मतदान पथकाचे आभार मानले आहेत.

Monday, 11 November 2024

मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमांत जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

 मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमांत

जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

 

मुंबईदि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ - मतदान दिवसाअगोदर आणि मतदानाच्या दिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊदिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नयेज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईलअशा जाहिराती  प्रकाशित होऊ नयेतयाबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्षनिवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा  सार्वत्रिक निवडणुका२०२४ मतदानाच्या दिवशी ( दि. २० नोव्हेंबर २०४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित  माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरातजोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाहीतोपर्यंत प्रकाशित करु नयेअशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयमहाराष्ट्र यांनी कळवले आहे.

उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी

 उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना

२० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी सुट्टी

 

मुंबईदि. ११ : येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावायासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योगऊर्जाकामगार आणि खनिकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे.

लोकप्रतिनिधीत्व कायदा१९५१ मधील कलम १३५ (ब) नुसारनिवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायव्यापारऔद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूहमहामंडळेकंपन्याऔद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळेउद्योग समूहकंपन्याऔद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्याससंबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईलअसे परिपत्रकात उद्योगऊर्जाकामगार व खनिकर्म विभागाने नमूद केले आहे.

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’कार्यक्रमात मुलाखत

 अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची                 जय महाराष्ट्रदिलखुलासकार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित जय महाराष्ट्रआणि दिलखुलासकार्यक्रमात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 'राज्य निवडणूक आयोगाची तयारीयाविषयावर राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

डॉ. कुलकर्णी यांची मुलाखत 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे.

 

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

 

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

 

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

 दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेची ही निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत नियोजनबद्ध तयार करण्यात आली आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोई सुविधामतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले उपक्रमकायदा व सुव्यवस्थाराज्यातील सर्वच घटकातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी केलेली तयारी याबाबत अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिलखुलासआणि जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली 

Featured post

Lakshvedhi