Saturday, 9 November 2024

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात 'ये पुढे मतदान कर' या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण

 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचा'

राज्यस्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात

'ये पुढे मतदान कर' या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण

 

मुंबईदि. ८ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गतमतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचाअभिमान महाराष्ट्राचाहे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

             भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमारउप निवडणूक आयुक्त संजय कुमारसंचालक पंकज श्रीवास्तवप्रधान सचिव अविनाश कुमारसचिव सुमन कुमारअवर सचिव   अनिल कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, मुंबई शहर व उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीमुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सदिच्छा दूत श्रीगौरी सावंत आणि दिव्यांग मतदार सदिच्छा दूत निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगांवकरमतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेत्री अनन्या पांडे, हास्य कलाकार भारती सिंगहर्ष लिंबाचियागायक राहुल सक्सेना, रॅपर सुबोध जाधव, अभिनेते मनोज जोशी, अभिनेता बजाज आनंद, अभिनेत्री सोनाली खरेअभिनेता अली असगर यांच्यासह विविध नामवंत कलाकार, अभिनेते तसेच विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.   

आवर्जून मतदान करण्याचे मान्यवरांचे आवाहन

        अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या की, प्रत्येक मत महत्त्वाचे असून तो महत्त्वपूर्ण अधिकार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत याचा आवर्जून लाभ घेवून मतदानाचा अधिकार बजवावा.

अभिनेत्री सोनाली खरे म्हणाल्या की, आपल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य उपाय म्हणजे मतदान करणे हेच आहे. मी देखील 20 नोव्हेंबर रोजी मतदान करणार आहे. आपण देखील मतदान करा.

        दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाले की, 20 नोव्हेंबर रोजी अवश्य मतदान करावे. तो प्रत्येकाचा हक्क आहे तो आपण बजवावा.

          हास्य कलाकार भारती सिंग म्हणाल्या, प्रत्येक सण आणि उत्सव आपण न सांगता साजरे करतो. मतदान करणे हा देखील लोकशाहीचा उत्सव आहे. आपण देखील २० नोव्हेंबरला मतदान करा मी देखील मतदान करणार आहे.

          अभिनेता बजाज आनंद म्हणाले कीमनोरंजनासाठी आपण अनेकदा वेळेचा विचार करत नाही. मतदान हे पवित्र कार्य आहे यासाठी देखील आपण जरूर वेळ काढावा.

            अभिनेत्री अनन्या पांडेअभिनेते मनोज जोशी यांनी देखील मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे, असे आवाहन केले.

            क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे म्हणाले की२० नोव्हेंबर रोजी मी स्वतः माझे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलून या दिवशी मतदान करणार आहे.  

या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे व मतदारांची सक्रिय भागीदारी निश्चित करणे हा आहे. त्यादृष्टीने या कार्यक्रमात विविध कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

 

            यावेळी मुंबई पोलीस दलाच्या वाद्यवृंद पथकाकडून सादरीकरण करण्यात आले. तरडाक कार्यालयाने निवडणूक विषयक तयार केलेल्या डाक तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

             त्याचप्रमाणे यावेळी मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. मतदार जनजागृतीचा संदेश देणारी विद्युत रोषणाई देखील समुद्रातील बोटींवर करण्यात आली होती. मतदार जागृती रॅलीमतदार जागृती व्हॅनचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्यापर्यंत मतदार जागृती रॅली

या कार्यक्रमानंतर गेटवे ऑफ इंडिया ते कुलाब्याच्या निवासी ठिकाणापर्यंत विशेष मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये नागरिकांना मतदान प्रक्रियेतील महत्त्व आणि त्यांचा सहभाग वाढवण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

0000


 

Friday, 8 November 2024

सी-व्हिजिल (cVIGIL)

 सी-व्हिजिल (cVIGIL)

सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रेश्राव्यकिंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ‘सी-व्हिजिल चा अर्थ सतर्क नागरिक’ असा आहे.  हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग  करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा  घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.

सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक. गुगल प्लेस्टोअरमध्ये  https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN ॲपल स्टोअर  https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541  वर उपलब्ध  आहे.

सुविधा ॲप 2.0

 सुविधा ॲप 2.0

भारत निवडणूक आयोगाने (ECI) 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणेप्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणेअर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रियानिवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.

गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

ॲफिडेविट पोर्टल ‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज

ॲफिडेविट पोर्टल ‘ॲफिडेविट पोर्टल’ निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनाची संपूर्ण यादी पाहता येते. कोणताही नागरिक ‘ॲफिडेविट पोर्टल’चा उपयोग करून उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र पाहू शकतो व डाउनलोड ही करू शकतो. नागरिकांच्या सुविधेसाठी नामांकन दाखल, स्वीकारले, नाकारले, मागे घेतले, उमेदवार स्पर्धेत आहे याची माहिती मिळते. पोर्टलची लिंक : https://affidavit.eci.gov.in

निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी

 निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.                          

केवायसी ॲप :- (know your Candidate)*

 केवायसी  ॲप :- (know your Candidate)*

मतदारांना त्यांच्या उमेदवारांबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशीलउमेदवाराची माहिती इत्यादी पाहता येऊ शकते.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.ksa

 ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/kyc-eci/id1604172836

सक्षम ॲप*

 सक्षम ॲप*

            भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता  हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

            निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नावपत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईलत्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थाव्हीलचेअरसहाय्यकमदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.

       सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थानमतदान केंद्रउपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे.

 गुगल प्ले स्टोअर मध्ये https://play.google.com/store/apps/details?id=pwd.eci.com.pwdapp

ॲपल फोन धारकांसाठी https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568

Featured post

Lakshvedhi