Monday, 4 November 2024

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का 💥?*

 *💥दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का 💥?*


*नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते !*


*गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. सर्वाना प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा ? करंज्या अशा कशा दिसतात ? लाडू गोलच का करतात ? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो ? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का ? या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.*


*असो, तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:। ..  महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असताना जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले, तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.*


*आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.*


*आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच- पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’ चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.*


*आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.*


*गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते.*


*दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.*


*बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ  होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ  असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.*


*लाडू…*

*उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात खराब न होणारा, कुठेही, केव्हाही, कधीही सहज खाता येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू. लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. आळीव, खोबरे, तीळ, बडिशोप, बाळंतशोप, डिंक, गोडंबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.*


*करंजी.*

*आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.*


*चकली.*

*वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ  होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.*


*चिवडा.*

*तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू पंचमहाभूत प्रदान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाह्यांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाह्यांना चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाह्यांपासून  बनविलेल्या पोह्यांचा चिवडा केला जातो. लाह्यांमधील  आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू पंचमहाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाह्या असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोह्यांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोह्यांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोह्यांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ  शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोह्यांसारखे  जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोह्यांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोह्यांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.*


*अनारसे.*

*अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला  महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ  लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले की त्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ  शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.*


*अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ  लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पंचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.*


Diabetics treatment

 Sou. Manisha Suryawanshi is a diabetic person. Her sugar level was 234 tested on


1st July 24.


 From 17th of July  Ashsadi Ekadashi she joined Vitthal Health Clap Mission and kept consistency till today. Along with it she also did one leg exercise told to her. All these days she was unable to follow proper diet required for a diabetic person.


 Still her sugar came down to 178  checked on 20th Oct 24.

She thanks Vitthal Health Clap Mission for their work.v

*☝🏽यज्ञ / हवन पर किये गए वैज्ञानिक शोध के सुखद परिणाम जो सबको पता होने चाहिए ।*

 *☝🏽यज्ञ / हवन पर किये गए वैज्ञानिक शोध के सुखद परिणाम जो सबको पता होने चाहिए ।*


Sunday, 3 November 2024

स्टॅम्प पेपर ची मागणी बाबत न करणेबाबत

 



देवाकडे काय मागावं

 *👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻*


तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते...

ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत...

आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या...

पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत...

अशी अकरा वर्षे गेली.

बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना.

ती आपल्या पतीला म्हणाली की...

"जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच."

बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!!

ते म्हणाले...

" मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही"

कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही.

पती पत्नी पंढरपुरास निघाले.. 

तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!!

यात्रतेतली बांगड्याची, खेळण्यांची दुकाने हरखुन पहात पहात ती बोल्होंबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले...

बोल्होबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहीली...


*इकडे बोल्होबा मंदीरात पोहोचल्या बरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली...* 


रखुमाईने पांडुरंगाला विचारले की...

"सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली की झुकली??"

यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले कि...

"तो जो सावकार असतो ना..त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी."

म्हणजे बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली...


*इतकी भक्ती केली की, प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला...*


*बोल्होबा फक्त भक्तीचे डिपाँझिटच करीत राहीले मागणीचे विड्राँवल कधी केलेच नाही...*


*त्यांनी संपुर्ण आयुष्यभर देवाची भक्ति केली पण त्याच्याकडे कधीही काहीही मागितलेच नाही.*

*परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी ..!!!*

*(आम्ही दोनशे.पाचशे.रुपयाचे प्रसाद हार.नारळ चढवतो आणी लाक्खो रुपयांची मागणी करतो)*

इकडे बोल्होबा पांडूरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली...

तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पहात राहीली.. 

तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले...

*"बोल तुला काय पाहीजे..??"*

कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे?? 

पतीची आज्ञा तर मोडता येत नाही... 

*पण मनुष्य मोठा हुषार प्राणी आहे बरं का...*

*चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते!!*

तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगीतलेय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगीतलेय की देव जर स्वत:हून काही देत असेल तर घेऊ नकोस...!!

ती पाडुरंगाला म्हणाली "पोटी संतान नाही."

देव म्हणाला "जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल."

ती खुप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का? हिनेही बर्याच प्रदक्षिणा घातल्या...

इकडे बोल्होबा बाहेर वाट पहात होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तीने देवाकडे काहीतरी मागितले असणार...

असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली...

तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगीतला...

ते सारे ऐकताक्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले...

पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले...

"याने तुला आशिर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा...!!!"

"जर मला तु पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे..!!!!"


*आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला...*

ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय...

*फळाची आशा धरून देवाची भक्ती कधीच करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर हि अशी असावी मागणी..!!!*

*🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻*

'लक्ष्मीची पाऊलं'*

 *🏮💥दिवाळी विशेष 🌟🪔*


*'लक्ष्मीची पाऊलं'*

~सचिन श. देशपांडे


देवधर आजोबा... गोरेपान, घारे डोळे, मराठी आठाच्या आकड्याचं नाक,  वयाच्या मानाने अजूनही डोक्याशी प्रामाणिक राहिलेले केस, चुकूनही कधी दाढीचे खुंटं दिसणार नाहीत अशी केलेली रोजची गुळगुळीत दाढी आणि टेरीकाॅट पॅन्टवर घातलेला हाफ बुशशर्ट... शक्यतो प्लेन फिकट रंगाचा. अजिबात न सुटलेलं पोट आणि बघितल्यावर लगेच एकेकाळच्या, आपल्या रुंदीची कल्पना देणारे खांदे नी छाती. थोडक्यात मामला... 'खंडहर बता रहा है, के इमारत बुलंद थी'... असा. 

तर असे हे देवधर आजोबा... घरी एकटेच रहात असत, चार टापटीप ठेवलेल्या खोल्यांच्या फ्लॅटमध्ये. रोज न चुकता माॅर्निंग वाॅक कम जाॅग. मग एका वरिष्ठ नागरीक संस्थेच्या हाॅलमध्ये योगा. कुठल्याही कट्ट्याच्या सहाणेवर... चार समदुःखी टाळक्यांच्या खोडाने, म्हातारपणाचं चंदन न उगाळत बसता, तडक घर गाठणं. घरी आल्यावर विदाऊट शुगरचा चहा पिणं, नी आदल्या रात्री त्यांनीच भिजत घातलेलं... वाटीभर मोड आलेलं, कुठलं ना कुठलं कडधान्य खाणं. आन्हिकं आटोपत असतांना, एकीकडे डाळ भाताचा कुकर चढवणं. आणि दुसरीकडे प्राणापलिकडे जपलेल्या ग्रामोफोनवर, हार्डकोअर क्लासिकल ऐकणं. अलिबाबाचा खजिना होता त्यांच्याकडे या गात्या तबकड्यांचा. "भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, जितेन्द्र अभिषेकी हे माझे चार खांदे आहेत... तेच मला सोडून येणार"... असं म्हणत ते गमतीत. अंगाची योग्य ती साफसफाई झाली की... अजिबात अघळ पघळ न रेंगाळता, डोक्यावर कॅप चढवून तडक बाहेर पडत. मग बँकांची कामं, पोस्टाची कामं, आणि निरनिराळ्या गुंतवणुकींसदर्भात ट्रेडर्सच्या आॅफिसांतून चकरा. नंतर ठरलेल्या रसवंती गृहातून... एक फुल ग्लास 'विदाऊट बरफ' उसाचा रस, नी मग बॅक टू पॅव्हेलियन. 

घरी आल्यावर... डाळ भात किंवा मुगाची खिचडी पैकी ज्या कोणाचा नंबर असेल, त्याने यज्ञकर्म समजून उदर भरण करणे. एकही शीत ताटात मागे न ठेवता, चार घास भूक पोटात ठेऊनच ताटावरुन उठणे. पोटाला तडस लागेपर्यंत तर त्यांनी, बायकोच्या हातचं गरम जेवणही कधी खाल्ल नव्हतं. जेवल्यानंतर मेन डोअर पासून सगळ्या खोल्यांतून फिरुन, किमान अर्धातास शतपावली करणे. मग पु. ल., व. पु., शं. ना. या त्रिकुटापैकी कोणा एकाला चाळता चाळता, छातीशी कवटाळुन झोपून जाणे. फक्त तासभरच. मग पुन्हा सळसळ सुरु... दुपारचा एखाद् तास शांत राहून, कंटाळलेल्या गुलमोहराच्या झाडासारखी. पुन्हा एक बीनसाखरेचा चहा, नी पुन्हा दोन चपला पायात सरकवून स्वारी उंबरठ्याबाहेर. लायब्ररी, रोटरी क्लब, लायन्स क्लब वगैरे करुन, 'सातच्या आत घरात'. रात्री फक्त फलाहार... आणि एक ग्लासभरुन कढत हळद दुध, त्यात सुंठ नी जेष्ठीमधाची केलेली पावडर घालून. रात्री नवाच्या सुमारास बंद करायच्या सगळ्या गोष्टी... उदा. दारं, पडदे, नळ, दिवे सगळं चोख बंद करुन... न चुकता गजराच्या घड्याळाचा पाचाचा अलार्म लाऊन, डोळेही बंद करुन झोपी जाणं. "गजराचं घड्याळ, बापासारखं कान चिमटीत पकडून उठवतं... मोबाईलचा गजर आईच्या उठवण्यासारखा असतो, प्रेमाने... थांब गsss असं ओरडलो आपण, की दहा मिनिटं चुप्प होणारा"... असं म्हणत ते. स्वतःपुरत्या शिस्तीच्या लावलेल्या कुंपणाआत, देवधर आजोबा राहायचे... ज्याचा इतरांना कधीच त्रास झाला नाही. 

तर असे हे देवधर आजोबा... लक्ष्मीपुजनाच्या दिवशी त्यांच्याकडे असलेल्या तीन पावलांच्या ठशांना, खूप मनोभावे पुजत. बाकी मग... लक्ष्मीची मुर्ती / फ्रेम, चांदीचं काॅईन, नोटांचं बंडल वगैरे काहीही पुजत नसत ते. मी एकदा त्यांना विचारलं की... "आजोबा.. हे नक्की काय आहे? ही तीन पाऊलांच्या ठशांची 3D effect frame, इतर दिवशी तुमच्या पलंगाशेजारील काॅर्नरपीस वर असते. पण लक्ष्मीपुजनादिवशी, तुम्ही ह्याच फ्रेमची पुजा करता. असं का?". तेंडुलकरला जसा बाॅलर बाॅल सोडायच्याआधीच, त्याच्या ग्रीपवरुन तो कळायचा... तसा माझा प्रश्न तोंडातून फुटायच्याआधीच, माझ्या तोंडावर उमटलेल्या मोठाल्या चिन्हातून त्यांना कळला असावा... ते तयारच होते. 

त्या पावलांकडे थरथरतं बोट (ज्याच्या टोकावर अजूनही त्यांनी मला चकवून, एका डोळ्यातून टिपलेला एक थेंब चमकत होता) नेऊन ते म्हणाले... "हे अनुक्रमे माझ्या आईच्या... बायकोच्या... नी एकुलत्या मुलीच्या पाऊलांचे ठसे आहेत. एकीने जन्म दिला... एकीने तिचा जन्म माझ्यावरुन ओवाळला... तर एकीने आयुष्यात येऊन, माझा जन्म सार्थकी लावला. माझ्या तिशीत आई गेली... आणि ती जायच्या आधी, मी तिच्या डाव्या पायाचा ठसा घेतला. त्या वर्षीपासून नित्याने लक्ष्मी पुजनादिवशी, मी तो ठसा पुजू लागलो. मी सत्तरीत असतांना, बायको गेली सोडून मला पाऊण वाटेवरच. मग मी तिच्या पायाचा ठसा घेतला, नी त्यावर्षीपासून एक पाऊल वाढलं पुजण्यासाठी. पाच वर्षांपुर्वी माझी मुलगी मला 'पुन्हा एकदा' सोडून गेली, पण यावेळी कायमची. मग कॅन्सर झालेली ती... हाॅस्पिटलमध्ये मरणाशी शेवटचा हात करत असतांना, मी तिच्याही पायाचा ठसा घेतला. तिला त्याही परिस्थितीत ते कळलं होतं, आणि तिने हात जोडले होते मला. धाय मोकलून रडलो होतो आम्ही दोघंही त्यादिवशी, शेवटचच. तर गेल्या पाच वर्षांपासून हे तिसरं पाऊलही आलं, या आधीच्या जोडीच्या जोडीला. माझ्या आयुष्यातल्या ह्या तीनच... पण खूप महत्वाच्या बायका, ज्यांचा एकही 'शब्द' मी कधीच पडू दिला नाही. आणि ह्या तीघींनी पडू दिला नाही, माझा 'मान' ही... कधीच. ह्याच तीन बायकांमुळे... माझ्या आयुष्यात सुख आलं, सुबत्ता आली. ह्या तीन पाऊलांतूनच... माझी एकट्याची, माझ्यापुरती लक्ष्मी वसलेली आहे अरे. त्यामुळेच कदाचित मला वेगळी कुठलीही मुर्ती, वा तत्सम काही पुजायची गरजच भासली नाही कधी. आणि आत्तापर्यंत तरी एकंदरीत... कधीच कुठल्याही गोष्टीची वानवा न पडलेली बघता, त्या खर्‍या लक्ष्मीपर्यंतही माझ्या भावना थेट पोहोचल्या असाव्यातसं दिसतंय".

एवढं बोलून, छानसं हसून... देवधर आजोबांनी, एक बत्तासा माझ्या हातावर टेकवला. माझं लक्ष माझ्याच तळहातावर पडलं. आम्ही सामान्य लोकं... 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणत असतांना, एका आजोबांनी स्वतःची लक्ष्मी... फक्त स्वतःच्या माणसांच्या पाऊलांतून शोधली होती. 

प्रत्येकाकडेच अशी लक्ष्मीची पाऊलं असतात. परंतू ती वेळीच ओळखून... त्यांची पुजा नाही, तर निदान जाण ठेवता येणंही... त्या प्रत्येकालाच जमू शकेल असं नाही. समाजात सामान्य तर्‍हेने राहूनही, जगायचं मात्र स्वतःपुरतं... असामान्य. हे देवधर आजोबांच्याच शब्दांत सांगायचं तर... "बाहेरुन देवळावर कितीही दिपमाळा सोडता येत असल्या, तरी लामण दिवा मात्र एखादाच ठेवता येतो तेवत... अंधार्‍या गाभार्‍यातून. भले लोकांना आपण त्या दिपमाळांतील एक वाटत असू, पण खुद्द देवाला माहित असतं की... आपण तो एक लामण दिवा आहोत, सतत त्याच्या सोबतीला असलेला". 

🪔🪔🪔🪔🪔🪔

*खरी भाऊबीज.

 *खरी भाऊबीज.*


*परवा एका जागेच्या व्यवहारासाठी वकीलांकडे गेलो होतो. दिवाळी असल्यामुळे कार्यालयात स्टाफही नव्हता आणि ग्राहकही. त्यामुळे गप्पा रंगल्या. ते म्हणाले, "वाडवडीलर्जीत इस्टेटीची भांडणे म्हणजे डोक्याला ताप असतो. त्या भांडणातून फायदा कोणाचाच होत नाही. कारण एकाच्या बाजूने निकाल दिलाकी दुसरा पुढे अपील करतो, त्या निकालानंतर पराभूत होणारा आणखी वरच्या न्यायालयात जातो. पैशाचा आणि आयुष्यातील बहुमूल्य वर्षांचा अपव्यय ! पण भावंडाना शेवटपर्यंत लक्षात येत नाही. त्यापेक्षा एकदाच एकत्र बसून मार्ग काढा, ती संपत्ती तुम्हाला सुख देईल. पण नाही.....*


*प्रत्यक्ष न्यायाधीशासमोर मारामारी करणारी भावंडे पहिली आहेत.  अरे, पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती आणि भांडताय तुम्ही ! जी संपत्ती मिळवण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही, त्या संपत्तीचे वाटप करताना झाले थोडे इकडेतिकडे तर काय बिघडले ?*


*भावाबहिणीचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे रक्षाबंधन किंवा भाऊबीज या सणाला कळत नाही, तर रजिस्ट्रारच्या कार्यालयात कळते. पण लोक मूर्ख असतात त्यामुळे वर्षानुवर्षे खटले तुंबतात आणि आमची घरे चालतात....."*


*वकीलसाहेब प्रांजळपणे सांगत होते. पण त्यांनी सातारच्याच एका कुटुंबाचे उदाहरण दिले, आणि लक्षात आले की नाती अगदीच तकलादू उरलेली नाहीत.*


*सातारच्या एका कुटुंबात एक भाऊ आणि सात बहिणी. वडील अकाली निवर्तल्यानंतर भावाने सर्व बहिणींची जबाबदारी घेतली. स्वतःचा संसार सांभाळून त्यांची शिक्षणे केली आणि लग्नेही करून दिली. सर्व बहिणींनी त्याची जाणीव ठेवून राहता वाडा भावाच्या एकट्याच्या नावे करून दिला. कालांतराने सर्वजण म्हातारे झाले तसा वाडाही म्हातारा झाला. ती जागा बिल्डरला द्यायचे भावाने ठरवले. जागा आता त्याच्या मालकीची असल्यामुळे त्याला कोणाची परवानगी लागली नाही. पण भावाने येणा-या रकमेचे समान आठ भाग करून प्रत्येकाच्या नावे वेगळा चेक काढायला बिल्डरला सांगितला. त्याचे म्हणणे असे की, मी रहात होतो, म्हणून बहिणींनी जागा माझ्या नावावर केली. पण आता मला यातून प्राप्ती होतेय, मग त्यात बहिणींचा वाटा आहेच, तो मी देणार !*


*सात बहिणींपैकी चारजणी जिवंतही नव्हत्या. मग त्यांच्या वारसांच्या नावे चेक काढायला त्याने सांगितले. सर्वाना एकत्र बोलावल व ज्याचे त्याचे चेक ज्यालात्याला दिले.*


*पुढे काय घडावे ? सर्वांनी ते चेक त्याच्यासमोर फाडून टाकले आणि सांगितले की दादा, तुम्ही आमच्यासाठी इतके केलंय, की आता जर ही संपत्ती तुमच्याकडून घेतली तर बाबा स्वर्गातून आम्हाला रागावतील. आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात, ती संपत्ती नको."*


*जगात अशीही भावंडे असतात म्हणजे ! ज्या दिवशी त्या लोकांनी चेक फाडले तोच दिवस खरा भाऊबीजेचा ! भेटायला हवे त्या कुटुंबाला एकदा !!*

Featured post

Lakshvedhi