Thursday, 31 October 2024

a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any

 Dear all,


I wish to inform you all that the Govt. of India has set up a Senior citizen help line phone no. 14567 (just dial the number *directly* without any area code or any prefix).  I checked on this phone and I was pleasantly surprised by the response by a lady.  This centre provides any help / support needed by Senior citizens between 8 am and 8 pm.  One can refer to a case of Senior citizens in distress, medical help needed, or protection from harassment, vaccination centres nearby etc.  I was very impressed by the person who expressed concern with the  promise for immediate help.  I would suggest we must share and circulate this information widely to help those in need of help.


Please note that the service is available between 8 am to 8 pm only and this service is available in every State except in Haryana and West Bengal, where it has not started as yet but will shortly.  Will you please circulate this message to all the Senior citizens in your circle (friends, relatives, neighbours).  This is a great initiative taken by the Government of India and will definitely extend benefits to those Senior citizens who are in need of assistance.

 

Very informative, it’s working.  Please share the same in all of your groups.

Saint Amma hospital , फरिदाबाद

 



Wednesday, 30 October 2024

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे

 मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे

 

मुंबईदि. ३० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना 'विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबईमित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारतआठवा मजलानेताजी सुभाष मार्गचर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळकैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागेमरीन ड्राईव्हमुंबई - 400002या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावाअसे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

          सर्व अधिनस्त कार्यालयेशिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / मनपाप्राचार्यकनिष्ठ महाविद्यालयेमुख्याध्यापकपालकविद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावीअसे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.

00000

भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित

 भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी

 गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित

 

मुंबईदि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी अर्ज दाखल केलेल्या मतदारांना गृह टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहे.

मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणारे निवडणूक कर्तव्याच्या कामावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांना प्रपत्र १२ ड’  दाखल केलेल्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी खास केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघात १८९ प्रौढ आणि ४९ दिव्यांग मतदारांसाठीगृह टपाली मतदान १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.

भायखळा विधानसभा मतदारसंघ कार्यालयरिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेडतळ मजला हॉलजे. जे. रोडह्युम हायस्कूल शेजारीभायखळा येथील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक १ येथे टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहील.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांसाठी टपाली मतदान रिचर्डसन अँड क्रूडास लि.तळ मजला हॉलजे. जे. रोडह्युम हायस्कूल शेजारीभायखळा येथील आवारातील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक २ येथे मध्ये उपलब्ध आहेज्या ठिकाणी १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान करता येईल. भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ आणि दिव्यांग मतदारतसेच निवडणूक कर्तव्याचे अधिकारी आणि पोलिसांनी टपाली मतदानाची सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा

 केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील

 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा

 

मुंबईदि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी१७९-सायन-कोळीवाडा१८०-वडाळा१८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठीमुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर श्री. वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कममद्यसाठाभेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावाअसे निर्देशही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यातयासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

००००

कोकणी आकाशकंदिल नीसर्गिक उत्पादन

 कोकणी आकाशकंदिल


आगतं दीपावली पुण्या सकलार्थ प्रदायिनी।
शुभं भवतु सर्वेषां सा दिव्या विश्वमोहिनी ॥

पुण्यकारक अन् सगळ्यांना सगळी सुखं देणारी, दिव्य,विश्वाला मोहून टाकणारी अशी दीपावली आली आहे ती सर्वांना शुभकारक आणि सुखकारक होवो ही शुभकामना. 

निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली

 निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून

निवडणूक कामकाजाचा आढावा

 

मुंबई दि 30 :- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.

या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी मतदार जागृती कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन श्री बाली यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही श्री बाली यांनी यावेळी दिले. निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी सादरीकरण केले.

------000------

केशव करंदीकर/विसंअ/


Featured post

Lakshvedhi