Tuesday, 22 October 2024

मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच

 मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा

 

मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहेतथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहेयाबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :-

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 होते. 20 ऑक्टोबरपर्यंत 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार आहेतलोकसभा निवडणुकीनंतर, 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SSR-2024) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतरवेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी उपलब्ध होता आणि या दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली.

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य प्रक्रिया अवलंबली आहेलोकप्रतिनिधी कायदा, 1950, मतदार नोंदणी नियम, 1960 आणि भारत निवडणूक आयोगाच्या 11 ऑगस्ट 2023 च्या पत्रातही मतदार यादीबाबत तरतुदी नमूद केल्या आहेतया तरतुदींनुसारफॉर्म क्रमांक 6 सादर करून मतदार यादीतील नाव नोंदले जाऊ शकते आणि फॉर्म क्रमांक 7 सादर करून वगळले जाऊ शकते. फॉर्म क्रमांक 8 सादर करून मतदाराच्या नोंदीमध्ये कोणताही बदल (नावपत्ताबदलणे इ.) करता येईल आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध आहेतदावे आणि हरकतींसाठी सात दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहेआक्षेपांचा योग्य विचार केल्यानंतरमतदार नोंदणी आधिकारी योग्य ते निर्णय घेतातमहाराष्ट्र राज्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांबाबतची खालील आकडेवारी स्वयं-स्पष्ट आहे.


 

संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (SSR-2019)

मसुदा मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Draft Publication of 1st SSR 2019) ( 1-09-18)

अंतिम मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Final Publication of 1st SSR 2019)

( 31-01-19)

वाढ (Addition)

वगळले

(Deletion)

निव्वळ फरक (Net Difference )

8,44,87,905

8,73,29,910

35,74,067

7,32,062

28,42,005

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (1ST SSR-2024)

मसुदा मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 1st SSR 2024) ( 23-10-24)

अंतिम मतदार यादी

पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 1st SSR 2024) ( 23-01-24)

वाढ (Addition)

वगळले (Deletion)

निव्वळ फरक (Net Difference)

9,08,32263

9,12,44679

24,33,766

20,21,350

4,12,416

 

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (2ND SSR-2024)

मसुदा मतदार यादी

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 2st SSR 2024) ( 06-08-24)

अंतिम मतदार यादी

दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 2nd  SSR 2024)

( 30-08-24)

वाढ (Addition)

वगळले

(Deletion)

निव्वळ फरक (Net Difference )

9,36,75,934

9,53,74302

20,78,081

3,79,713

16,98,368

 

0000


 

Press Note Dated: 21.10.2024

            There was allegation of registration of electors around 10,000 per Assembly Constituency after Lok Sabha Election by Some Political Parties. The procedure of updating of Electoral Roll is done strictly as per prescribed rules. The factual position related to the issues is as follows :

At the time of Lok Sabha Elections, total electors in State were 9,29,43890. There is net increase of 36,31,279 electors till 20th Oct and electors on 20th Oct are 9,65,05958. After Lok Sabha Elections, 2024 Draft Electoral Roll was published on 06-08-2024 during 2ND SSR-2024, Thereafter, period of nearly 14 days was available for submitting claims and objections as per schedule and after due consideration of these claims and objections, final Electoral Roll was published.

Before and after SSR, proper procedure of addition and deletion has been followed by the concerned Electoral Registration Officers for updating Electoral Roll. Provisions regarding addition and deletion in Electoral Roll are specified in Representation of People Act, 1950, Electoral Registration Rules, 1960 and also in ECI’s letter dated 11-08-2023. As per these provisions, the name in the voter list can be added by submitting form no 6 and deleted by submitting form no 7, Any change in the voter (name, address, shifting, etc.) can be done by submitting form no 8 and all these forms are available online also. There is provision of seven days’ notice for claims and objections. After due consideration of the objections, the ERO takes the decision. The details about Maharashtra State SSR 2019 SSR -1 2024, SSR – 2 2024 given below and the data is self-explanatory.     

SSR-2019,

Electors at Draft Publication of 1st SSR 2019 ( 1-09-18)

Electors at Final Publication of 1st SSR 2019 ( 31-01-19)

Addition

Deletion

Net Difference

8,44,87,905

8,73,29,910

35,74,067

7,32,062

28,42,005

1ST SSR-2024

Electors at Draft Publication of 1st SSR 2024 ( 23-10-24)

Electors at Final Publication of 1st SSR 2024 ( 23-01-24)

Addition

Deletion

Net Difference

9,08,32263

9,12,44679

24,33,766

20,21,350

4,12,416

2ND SSR-2024

Electors at Draft Publication of 2st SSR 2024 ( 06-08-24)

Electors at Final Publication of 2nd  SSR 2024 ( 30-08-24)

Addition

Deletion

Net Difference

9,36,75,934

9,53,74302

20,78,081

3,79,713

16,98,368

 

Press Note given by Office of the Chief Electoral Officer, Maharashtra

                                          --------------------------------------

 


 


Monday, 21 October 2024

बेल्ज‍ियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्ज‍ियम वाणिज्यदूतांची माहिती हिऱ्यांशिवाय लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार

 बेल्ज‍ियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्ज‍ियम वाणिज्यदूतांची माहिती

हिऱ्यांशिवाय लॉजिस्टिक्सउत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार

 

मुंबई, दि. २१ :  बेल्ज‍ियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार - उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्ज‍ियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्ज‍ियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली.

वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

बेल्ज‍ियमचा महाराष्ट्र आणि गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्ज‍ियम आता भारताशी लॉजिस्टिक्सउत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले.

बेल्ज‍ियम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे  फ्रॅंक गिरकेंस  यांनी  सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्ज‍ियम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

**

 

Belgian Economic Mission to visit Mumbai : Princess Astride to lead the Mission

Belgium keen to enhance cooperation in logistics, manufacturing and health care

 

Mumbai, 21st Oct : The Consul of Belgium in Mumbai Frank Geerkens today informed that Belgian Economic Mission to be led by Princess Astride, the sister of King Philippe of Belgium, will visit India in the month of March. He said apart from the existing trade in diamond and other commodities, emphasis will be laid on enhancing cooperation in logistics, manufacturing and healthcare.

The Consul General was speaking to Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Monday (Oct 21).

The Consul General said Belgium has a large diamond trade with Maharashtra and Gujarat. Stating that Belgium is the hub of healthcare, he said efforts are being made to increase cooperation in this field also.

He informed the Governor that the Federation of European Businesses in India (FEBI) is working to increase India-Europe trade. He said that Belgium is also cooperating with the Skill agency in Maharashtra to promote skill development.

Maharashtra Governor Radhakrishnan expressed the hope that free trade agreement between India and Europe when signed will double the multilateral trade.

0000

--

फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक

 फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी उत्सुक

- जॉन मार्क सेर शार्ले

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही;

अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती

मुंबई, दि. २१ : आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले.

वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

आयआयटी मुंबई व फ्रान्सचे इकोल पॉलिटेक्निक यांच्यात शैक्षणिक सहकार्य व विद्यार्थी परस्पर आदानप्रदान याबाबत नुकताच करार झाला असल्याचे फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

फ्रान्सच्या अंदाजे ५०० कंपन्या मुंबईपुणेनागपूर व नाशिक येथे कार्यरत असून त्याठिकाणी रोजगार निर्मिती तसेच कौशल्य वर्धन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्स भारताशी वैज्ञानिक नवोन्मेष (इनोव्हेशन) व संशोधन क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असल्याचे सेर शार्ले यांनी सांगितले.

२०२६ हे वर्ष फ्रान्स - भारत नवोन्मेष वर्ष साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अलियान्स फ्रान्सेस  ही संस्था मुंबई पुणे यांसह इतरत्र फ्रेंच भाषा अध्यापनाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्समध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहत असून हा समुदाय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्स - भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये  मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. भारत – फ्रान्स या देशांमध्ये संरक्षण क्षेत्रापासून अनेक क्षेत्रात उत्तम सहकार्य असून ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण असणाऱ्या फ्रान्सने भारताला स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

भारत व फ्रान्स दोन्ही लोकशाही राष्ट्रे असून विद्यार्थी व सांस्कृतिक आदानप्रदानामुळे उभय देशांमधील लोकांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

 

Consul General of France meets Governor Radhakrishnan

The Consul General of France in Mumbai Jean Marc Sere Charlet called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Monday (21 Oct).

The Consul General told the Governor that France was keen to expand academic collaboration with Maharashtra in the form of student and cultural exchange. He told the Governor that it is not necessary to know French to study in France. He added that more than 1700 University programmes in France are offered in English. The Consul General told the Governor that the year  2026 is being commemorated as the France-India Year of Innovation. 

**


 


हिंदू संस्कृती रक्षणार्थ


 

खास गृहिणी साठी फराळ बनवायला tipa

 👆


*या वेळी दिवाळीचे तळण सुरुवात करून संपवावे. तेल कमी लागेल.*


*भरतीची वेळ विचारात घेऊन तयार केले आहे.*


*21 Oct 2025 ते 27 Oct 2025*


▪︎ 21 OCT: कृ .5 // 12.30 ते 3.30 pm

▪︎ 22OCT: कृ .6 // 1.30 ते 4.30 pm

▪︎ 23 OCT: कृ .7 // 2.25 ते 5.25 pm

▪︎ 24 OCT: कृ .8 // 3 ते 6 pm

▪︎ 25 OCT: कृ .9 // 3.30 ते 6.30 pm

▪︎ 26 OCT: कृ .10 // 4.30ते 7.30 pm

▪︎ 27OCT: कृ .11 // 5.30 ते 8.25 pm


*भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?*


उत्तर: हो


▪︎ एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.


▪︎ जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.


*भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ?*


ती खालील प्रमाणे वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत. 

पंचागावर आजची तिथी बघावी  ,उदारणार्थ आजची कृ. ५ आहे , तिथी कृ. ५ × ३/४ = ३.७५ , आता ३.७५ म्हणजे दुपारी ३.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १२.३०  वाजल्यापासून ते दुपारी ०३.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १२.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.


▪︎ जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.


▪︎ वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal),


▪︎ स्पष्टीकरण: -


भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त एक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले होर्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मूठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभू शकते.


▪︎ तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.


▪︎ याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.


पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरीरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहतीचा परिणाम होतो हे वाचून धन्य झालो. 


कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा लेख.


जगातला कोणताही आरोग्यशास्त्र तुलनात्मकरीत्या भारतीय आरोग्यशास्त्र च्या जवळपास ही नाही असे आमचे महान अभ्यासपूर्ण भारतीय आरोग्यशास्त्र तसेच धन्य ते भारतीय धन्वंतरी ज्यांनी भारतीय आरोग्य शास्त्रास श्रीमंत केले नि करत आहात .


*दिवाळीचा फराळ न्यूजपेपरवर ठेवू नका, तर गंभीर आजाराचा धोका!*


दिवाळीला काही दिवस बाकी आहेत. दिवाळीचा फराळ करण्यात अनेक जण मग्न असतील. मात्र, तुम्ही तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी न्यूजपेपरचा वापर कराल तर गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.


दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते दिवाळी फराळाचे. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकर पाळ्या, अनारसे आदी अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळलेले असतात. त्यामुळे तेल टिपण्यासाठी न्यूजपेपर पसरले जातात. मात्र, न्यूजपेपरसाठी जी शाही वापरतात ती आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.


*हा धोका अधिक वाढतो?*


- मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही असतो. 


- शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. 


- न्यूजपेपरमधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतूलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. 


- पेपरपेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. 


- पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.  


- टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा.


सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ७७३ निकाली ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ७७६ तक्रारी प्राप्त;

यापैकी ७७३ निकाली

३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

 मुंबईदि. २१ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ७७६ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ७७३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

 सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३१ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

 पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपालमुख्यमंत्री यांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबईदि. 21 : पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरविविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत व प्रतिनिधीवरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित यांनी देखील पोलीस स्मृतिस्तंभाजवळ जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. सुरुवातीला राज्यपालांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेले 39 पोलीस अधिकारी व 177 पोलीस अमलदारांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांची नावे वाचून दाखविल्यानंतर पोलीस बँड पथकाद्वारे सलामी शस्त्र धून वाजविण्यात आली. यावेळी गणवेशधारी अधिकारी व जवानांनी सलामी दिली तसेच पोलिसांतर्फे अभिवादन रूपात बंदुकीच्या तीन फैरी झाडण्यात आल्या.

राज्यपालांनी निमंत्रित देश-विदेशी पाहुणे,वरिष्ठ पोलीस अधिकारी व हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.                                                                                                                   

00000

Maha Governor, CM salute police martyrs on Police Commemoration Day

Mumbai, Dated 21 Oct : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan accompanied by State Chief Minister Eknath Shinde laid wreaths at the Police Martyrs' Obelisc and paid tribute to the police martyrs who laid down their lives in theline of duty during the last one year at Naigaon Police headquarters in Mumbai on Mon (21 Oct).Director General of Police Rashmi Shukla, Brihanmumbai Police Commissioner Vivek Phansalkar, diplomats from various countries and senior police officers and invitees also paid their homage to the police martyrs on the occasion. Earlier the Governor, in a message, paid tribute to the 39 police officers and 177police personnel from the country who




sacrificed their lives while discharge ingthe duty in the country during the last year. Afterr eading out the names of all the martyred police officers and enforcers, the 'Salami Shastra' was played by the police band. All the uniformed officers, jawans and dignitaries saluted the martyrs. Three rounds of gun were fired by the police.The Governor met the diplomats, senior police officers and the families of the martyrs on the occasion.

00000

Featured post

Lakshvedhi