Tuesday, 15 October 2024

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

 मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ

मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आज १४ ऑक्टोबर मध्यरात्री बारा वाजेपासून याची अंमलबजावणी होईल.

हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना ही पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल.  पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

Monday, 14 October 2024

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपट्याच्या पानांद्वारे मतदार जागृती संदेश दसऱ्यानिमित्त 'स्वीप' अंतर्गत अनोख्या उपक्रमाचे आयोजन

 मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात

आपट्याच्या पानांद्वारे मतदार जागृती संदेश

दसऱ्यानिमित्त 'स्वीपअंतर्गत अनोख्या उपक्रमाचे आयोजन

 

मुंबई दि. १४ :- 'केंद्रस्तरिय अधिकारी आपल्या दारीहा उपक्रम १७१- मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच झालेल्या कार्यक्रमात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 'स्वीपअंतर्गत या संकल्पनेतून दसऱ्याचे औचित्य साधून शिवाजीनगर येथील स्थानिक नागरिक व मतदारांना आपट्याच्या पानांवर नैतिक मतदानाचा संदेश देण्यात आला.

आपले मत अमूल्य आहे....

दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे.. त्या निमित्ताने आपट्याच्या पानांवर 'आपले मत सोन्यासारखे अमूल्य आहेत्याचे मोल करू नका.. मतदान नक्की करा', 'आपण खास आहात आणि आपले मतहीअसे संदेश असणारे सोनं म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यात आली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर यांच्या व १७१- मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी श्री सुदाम परदेशी यांच्या  मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या समन्वय अधिकारी मनिषा पंडित व अन्य सहकारी यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला व उपस्थित नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

-----000-----

गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार

 गिरणी कामगारांसाठी ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार

- मंत्री अतुल सावे

 

            मुंबईदि. १४ : गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहेत. गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबई महानगर क्षेत्रात ८१ हजार घरे बांधण्यासाठी करार करण्यात येत आहे. गिरणी कामगारांचे १ लाख ७४ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले असून कामगार विभागाने १ लाख ८ हजार अर्ज वैध ठरविले आहेत. गिरणी कामगारांसाठी यापुढेही जास्तीत जास्त घरे बांधण्यात येतीलअसे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज केले.

            प्रकल्प प्रवर्तकांच्या निवडीसाठी स्वारस्थ अभिव्यक्ती प्रक्रीयेत पात्र ठरलेल्या (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) कर्मयोगी एव्हीपी रिॲलिटी आणि चढ्ढा डेव्हलपर्स ॲण्ड प्रोमोटर्स या पात्र प्रवर्तकांना मंत्री श्री.सावे यांच्या हस्ते हेतू पत्र (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आलेयावेळी ते बोलत होते. गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग यावेळी उपस्थित होत्या.

            मंत्री श्री.सावे म्हणाले कीसन १९८२ च्या संपानंतर बृहन्मुंबईतील ५८ बंद झालेल्या आणि आजारी कापड गिरण्यांतील गिरणी कामगारांसाठी म्हाडामार्फत एकूण १५ हजार ८७० सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. म्हाडामार्फत आणखी  २८७४ सदनिकांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. उर्वरीत गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यात आली असून अजून साधारणत: १ लक्ष घरांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री.सावे म्हणाले कीदेशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. ८१ हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहेत. ५ लाख ५० हजार रूपये शासन देणार तर उर्वरित ९ लाख ५० हजार रूपये पात्र लाभार्थी गिरणी कामगार किंवा त्याच्या वारसदारांना द्यावी लागतील. हे घर १५ लाख रूपयांत मिळणार असून पुढील ३ वर्षामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यात ३०० चौ.फूटाचे राहण्यायोग्य घरकूलकम्युनिटी हॉलबागलहान मुलांसाठी खेळण्याची जागाज्येष्ठ नागरिकांसाठी छोटे उद्यान असेलअशीही माहिती मंत्री श्री.सावे यांनी यावेळी दिली.

000

शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्यपुरस्काराचे स्वरूप

 शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानाच्या

दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना पारितोषिक वितरण

            मुंबईदि. १४ : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेतअसे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्रस्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरप्रधान सचिव आय.ए.कुंदनशालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेशाळा हा आपल्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो. शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करतात. शाळा ही आयुष्यातील ज्ञान मंदिर असते. शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि देश घडवते. आईवडील जन्म देतात तर शिक्षक हे आयुष्य घडवतात. विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडवण्यासाठी मोठे योगदान देतात. त्यामुळे गुरूजनांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            शेतकरीयुवाज्येष्ठ नागरिकमहिला अशा समाजातील सर्व घटकांसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. शिक्षक आणि शासकीय कर्मचारी हा देखील महत्त्वाचा घटक असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. राज्य उद्योगजीडीपीविदेशी गुंतवणूक अशा विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असून हे स्थान कायम राखण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

            शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थीशिक्षक आणि शाळांच्या उन्नतीसाठी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. 30 हजार शिक्षक भरतीकेंद्र प्रमुखांच्या जागा भरणेविद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढविद्यार्थ्यांना मोफत गणवेशविद्यार्थ्यांच्या पाठीवरील बोजा कमी करण्यात आलेले यशटप्पा अनुदान लागू करणे असे विविध निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्काराचे स्वरूप -

            राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 51 लाख रुपयेद्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 31 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाख रुपये. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला 21 लाखद्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 15 लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला 11 लाख रुपये. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला 11 लाखद्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपये. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाखद्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक तसेच प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले गेले.

मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांची यादी -

            राज्यस्तरीय पुरस्कार - शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गट – प्रथम- जिल्हा परिषद आदर्श पाथमिक शाळा धानोरेजिल्हा पुणेद्वितीय - नवी मुंबई महानगरपालिका राजश्री शाहू महाराज विद्यालय शाळा क्रमांक 55; तृतीय - जवाहरलाल नेहरू नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा रामनगरजिल्हा- गडचिरोली.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा - प्रथम - प्रभात किड्स स्कूल अकोला जिल्हा अकोलाद्वितीय -कर्मवीर आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेरजिल्हा धुळेतृतीय - कै. दशरथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडा खुर्दजिल्हा जालना.

            बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र गट- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - प्रथम- कलेक्टर कॉलनी मनपा उ.प्रा. हिंदी शाळा शिवशक्ती नगरचेंबूरमुंबईद्वितीय- मुंबई पब्लिक स्कूल वरळी सीफेस मनपा उ.प्रा. इंग्रजी शाळावरळीमुंबईतृतीय- महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा रामकृष्ण परमहंस मार्गवांद्रे पूर्वमुंबई.

            उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा - श्रीराम वेल्फेअर सोसायटीज हायस्कूलमुंबईसीईएम मायकल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयकुर्लाद बयरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशनचर्नी रोड पूर्वमुंबई.

            वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र गट - शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - प्रथम - पुणे मनपा भारतरत्न पंतप्रधान स्व.अटलविहारी वाजपेयी विद्यानिकेतन क्र.16, वडगाव बुद्रुकपुणेद्वितीय - महानगरपालिका शाळा क्रमांक 86 (मुली) पाथर्डीगावनाशिकतृतीय- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेशन क्र.1, शुक्रवार पेठपुणे.

            उर्वरित इत्तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा - न्यू इंग्लिश स्कूलटिळक रोड सदाशिव पेठपुणेसरस्वती विद्यालय माध्यमिक शाळानागपूरश्री शिवाजी मराठा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजशुक्रवार पेठपुणे.

            मुंबई विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद शाळाकोटबी बुजडपाडाजिल्हा पालघरद्वितीय - रायगड जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वडगावजिल्हा रायगडतृतीय - जिल्हा परिषद शाळा कालवारजिल्हा ठाणे.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा - प्रथम -जिंदाल विद्यामंदिर वाशिंदजिल्हा ठाणेद्वितीय - श्री स.तु. कदम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयपालघरजिल्हा पालघरतृतीय - जनता शिक्षण संस्थेचे श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतनजिल्हा रायगड.

            पुणे विभाग - शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - प्रथम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळासंवत्सरजिल्हा अहिल्यानगरद्वितीय - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे)जिल्हा – सोलापूरतृतीय - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूरजिल्हा पुणे.

            उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळा- प्रथम- गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगावजिल्हा पुणेद्वितीय- सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठजिल्हा अहिल्यानगरतृतीय - महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयबार्शीजिल्हा सोलापूर.

            नाशिक विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - प्रथम - शासकीय विद्यानिकेतन धुळेजिल्हा धुळेद्वितीय - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळपाडाजिल्हा नाशिकतृतीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलखेडेजिल्हा जळगाव.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयनंदुरबारजिल्हा नंदुरबारद्वितीय - माध्यमिक विद्यालय करंजजिल्हा जळगावतृतीय- अनु.कै.डी.एन.देशमुख आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा आठंबेजिल्हा नाशिक.

            कोल्हापूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद शाळा सिद्धेवाडीजिल्हा सांगलीद्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे (मिलिटरी)जिल्हा सातारातृतीय- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5, जिल्हा रत्नागिरी.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा - प्रथम- अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीजिल्हा सांगलीद्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाटजिल्हा कोल्हापूरतृतीय- ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय शिरवळजिल्हा सातारा.

            छत्रपती संभाजी नगर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - प्रथम - जिल्हा परिषद आदर्श उच्च माध्यमिक शाळा जळगाव मेटेजिल्हा छत्रपती संभाजी नगरद्वितीय - जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय प्राथमिक शाळा बोरगव्हाणजिल्हा परभणीतृतीय -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपिंपळगावजिल्हा जालना.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- हु. बहिर्जी स्मारक विद्यालय वसमतजिल्हा हिंगोलीद्वितीय - सरस्वती साधना विद्यामंदिर शांतीवन आर्वीजिल्हा बीडतृतीय- श्री  संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडीजिल्हा परभणी.

            अमरावती विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक (मराठी) कन्या शाळाकॅम्प अमरावतीजिल्हा अमरावतीद्वितीय- आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडीजिल्हा बुलढाणातृतीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा तिवसाजिल्हा यवतमाळ.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- जे.सी. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज कारंजा लाडजिल्हा वाशिमद्वितीय-  सीताबाई संगई कन्या शाळा सुरजीजिल्हा अमरावतीतृतीय- डी.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दाताळाजिल्हा बुलढाणा.

            नागपूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा – प्रथम- पी एम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीजिल्हा गोंदियाद्वितीय- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चनकापूरजिल्हा नागपूरतृतीय - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डाजिल्हा चंद्रपूर.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम - नवजाबाई हितकारिणी हायस्कूल ब्रह्मपुरीजिल्हा चंद्रपूरद्वितीय - नवजीवन विद्यालय अँड ज्युनिअर सायन्स कॉलेज जमनापूर साकोलीजिल्हा भंडारातृतीय- सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/ मोरजिल्हा गोंदिया.

            लातूर विभाग- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा- प्रथम- जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरीजिल्हा नांदेडद्वितीय- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सताळा (बु.)जिल्हा लातूरतृतीय- पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला ईटजिल्हा धाराशिव.

            उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा- प्रथम- श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिवजिल्हा धाराशिवद्वितीय- कै. जनार्दनराव राजेमाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) आश्रम शाळाजानवळजिल्हा लातूर. तृतीय- श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकरजिल्हा नांदेड.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

 कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.

पद्मविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण असेल. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला.

----

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

 अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ ४२ हजार ८४२ शेतकऱ्यांना होईल.

सध्या राज्यात २ हजार ६५९ उपसा सिंचन सहकारी संस्था असून २६१ संस्थांकडे बँकांची थकबाकी आहे. या संस्थांपैकी १४४ संस्था सध्या सुरु असून ४७ संस्था अवसायनात व ७० संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे.  आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अवसायानातील व नोंदणी रद्द झालेल्या ११७ संस्थांचे मुद्दल कर्ज ८३ कोटी ९ लाख माफ करण्यास मान्यता देण्यात आली.  त्याच प्रमाणे सध्याच्या कार्यरत १४४ संस्थांचे ५० टक्के मुद्दल कर्ज अशी ४९ कोटी ४५ लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली.  अशा प्रकारे एकूण १३२ कोटी ५४ लाख मुद्दल कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली.

-----०-----

किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज समान हप्त्यात परतफेडीस मान्यता

 किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज

समान हप्त्यात परतफेडीस मान्यता

किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह समान हप्त्यात परतफेड करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

१९८१-८२ चे केन पेमेंट देण्यासाठी शासन हमी वरील ३ कोटी ४२ लाख ७० हजार तसेच २००२-०३ मधील एसएमपी प्रमाणे शासन हमी वर कर्जाचे २ कोटी ८५ लाख ५३ हजार आणि कर्जावरील हमी शुल्कावरील ६१ लाख २५ हजार अशा ६ कोटी ८९ लाख ४८ हजार रकमेस कर्ज परतफेडीच्या धोरणानुसार ८ वर्षात समान हप्त्याने परतफेडीस मान्यता देण्यात आली.

-----०-----

Featured post

Lakshvedhi