Friday, 11 October 2024

तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय

 तुळजापूरवणी-यवतमाळ येथे न्यायालय

            धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करून त्यासाठी पदे मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सध्याच्या केळापूर सहदिवाणी न्यायलयातील 683 प्रकरणे वणीच्या नव्या दिवाणी न्यायालयात हस्तांतरीत होणार आहेत तर तुळजापूर येथे धाराशीव येथील जिल्हा व सत्र न्यायालयातून 831 प्रकरणे हस्तांतरीत होतील.

८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

 ८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

 

            मुबंईदि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.४३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड ११ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. 

"परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१" अन्वये महाराष्ट्र शासनाने वरील दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १२ नोव्हेंबर, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४(२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

 तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.४३ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस " प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.", असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे - रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

००००

 

विजयादशमी निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

 विजयादशमी निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. ११ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

            दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतोअसा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो.      यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंदसमाधान व संपन्नता  घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 0000 

Governor C. P. Radhakrishnan greets people on Vijayadashmi

 

            Mumbai, 11 Oct : The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan has greeted the people on the auspicious occasion of Dussehra or Vijayadashmi. In his message, the Governor has said: “The festival of Vijaya Dashmi or Dussehra symbolizes the victory of goodness over evil. The festival reassures that Truth shall always prevail.  May the festival bring peace, bliss and prosperity to all.  I extend my heartiest greetings to the people on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

0000

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

 कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

            पुण्यातील कात्रज कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी विनंती केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री पिसोळी रस्त्यावर बाळासाहेब देवरस एक हजार खाटांचे नियोजित रुग्णालय उभारणी सुरु आहे. त्यामुळे या चौकाला व भुयारी मार्गाला बाळासाहेब देवरस यांची नाव देण्याची विनंती होती. त्यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास मान्यता देण्यात आली.

-----०----

वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार

 वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार

            वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणेसदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती ठरवणे याबाबत निर्णय घेईल.

-----०-----

राज्यात 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन

 राज्यात 15 ऑक्टोबर रोजी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन


               मुंबईदि. 10 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 

या वर्षीही सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयेशासकीय संस्था/ मंडळेसार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत.

वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत प्रसारमाध्यमांनी उचित दखल घेऊन त्यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावाअसे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे. 

राज्याला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींचे कर हस्तांतरण भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना

 राज्याला केंद्र सरकारकडून 11,255 कोटींचे कर हस्तांतरण

भांडवली खर्च आणि कल्याणकारी उपक्रमांना मिळणार चालना

सणासुदीच्या काळात  भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

 

            नवी दिल्ली, दि. 10 : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.

            केंद्र सरकारने सर्व राज्यांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.

            महाराष्ट्राला या हस्तांतरणातून 11,255 कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहेज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 31,962 कोटी रुपयेबिहारला 17,921 कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला 13,404 कोटी रुपये मिळाले आहेत.

            हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेलज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.

0000

Featured post

Lakshvedhi