Tuesday, 8 October 2024

दिलखुलास' कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत

 'दिलखुलासकार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन विभागाचे

आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत

मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्न व पूरक उत्पादने खरेदीबाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत गोडधोड खाद्यपदार्थंची रेलचेल असते. या दिवसात खवामावामिठाईखाद्यतेलवनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ व उत्पादने उपलब्ध व्हावीतनागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर वेळीच विशेष खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येणारी देखरेखनागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत डी. आर. गहाणे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर, गुरूवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीची मासिक, साप्ताहिक सोडत जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीची मासिक, साप्ताहिक सोडत जाहीर

 

          मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक व ११४ साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गणपती मालिकेचे ५० लाखाचे तर सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी सोडतीमधून प्रथम क्रमांकाचे सात लाखांची एकूण आठ बक्षीसे जाहीर झाली आहेत. तसेच एकूण एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विविध रकमेच्या तिकिटांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी दिली आहे.

          सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजारावरील बक्षिसाची मागणी वाय ए -१अतिरिक्त शॉप कम गोडऊनएपीएमसी मार्केटसेक्टर १९ बीवाशीनवी मुंबई या कार्यालयाकडे करावी. रक्कम दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडे करावी. अधिक माहितीसाठी ०२२-२७८४६७२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपसंचालक यांनी सांगितले आहे.

          सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र गणपती, महाराष्ट्र सह्याद्रीमहाराष्ट्र गणपती विशेषमहाराष्ट्र गौरवमहाराष्ट्र तेस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र गणपती मालिका तिकिट क्रमांक GBOO/29466 या समित एजन्सीमुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्र सोडतीमधून रक्कम रू सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत. २२६०७ तिकीटांना रू. एक कोटी पाच लाख ६४ हजार व साप्ताहिक सोडतीतून १८६१४ तिकीटांना रूपये एक कोटी पाच लाख एक हजार ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

०००

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चा

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चा

 

          मुंबईदि. : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्यावतीने वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने यावर्षीही वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार असून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चक म्हणून डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

          तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय आणि वैचारिक जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा पाश्चिमात्य आणि भारतीय ज्ञान परंपरांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचे हे सर्व दुर्लभ वाङ्मय एकत्रित स्वरुपात 18 खंडांमध्ये प्रकाशित केले आहेत. या ग्रंथावर रविवारदिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर)पाचवा मजलापु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसरसयानी मार्गमुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

          वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विद्यापीठेसाहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभागशिवाजी विद्यापीठकोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कथांचे अभिवाचनʼ हा कार्यक्रममराठी विभागमुंबई विद्यापीठमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजनमराठी विभागस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्याभिवाचनʼ हा कार्यक्रममहावीर महाविद्यालयकोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान व अभिवाचनʼ हा कार्यक्रमलोकमान्य टिळक महाविद्यालयवणीजि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याखानपरिसंवाद व ग्रंथप्रदर्शनʼ हा कार्यक्रमसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थापुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ, धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूरजि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक नाट्यलेखन कार्यशाळाʼ, नारायण देसाई फाऊंडेशनपवईमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

          याबरोबरच 1) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमुंबई 2) मराठवाडा साहित्य परिषदछत्रपती संभाजीनगर 3) मुंबई मराठी साहित्य संघमुंबई 4) महाराष्ट्र साहित्य परिषदपुणे 5) विदर्भ साहित्य संघनागपूर 6) कोकण मराठी साहित्य परिषदरत्नागिरी 7) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभाकोल्हापूर या सात साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देखील वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

00000

सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या प्रदर्शनाला मंत्री छगन भुजबळ यांची भेट

 सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची

या प्रदर्शनाला मंत्री छगन भुजबळ यांची भेट

 

          मुंबईदि. 8 : ‘सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

          मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शासनाच्या सर्व विभागांची माहिती देणारे हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल मंत्री श्री.भुजबळ यांनी कौतुक केले. चित्रकार नरेंद्र बोरलेपवार यांनी यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

 मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ८ : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन  झाले.

 मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरअतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसादप्रधान सचिव राधिका रस्तोगीमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागरराजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी ते हॉटेल ताज पॅलेसमुंबई येथे रवाना केले.

मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत

 मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार

- गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत

 

             मुंबई, दि. 8 : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन

म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहेअसे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

              म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.

              यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंहम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालमुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकरमुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

              यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

                मंत्री श्री.सावे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वासाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्पमध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत. राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून  यातली अडीच लाख घर ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. आजच्या या लॉटरीसाठी दोन हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिकपुणेकोकणछत्रपती संभाजीनगरनागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत. मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगरकामाठीपुराशहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

म्हाडामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना घराचा दिलासा

- पालकमंत्री दीपक केसरकर

          म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. धारावीबीडीडीचाळ यांच्या पुनर्विकासामुळे या भागातील नागरिकांच्या हक्काच्या  घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून ही विकास करण्यात येत आहे. तसेच मुंबईच्या विकासासाठी लवकरच क्लस्टरची योजना सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून  मुंबईत लक्षावधी घरे उपलब्ध होतील असेही यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

              अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या कीआजची लॉटरी प्रणाली ही पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित आहे. ही लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे झालेली आहे. म्हाडा म्हणजे विश्वास. म्हाडाचे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरूनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचं स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे.

             प्रास्ताविकात श्री. जयस्वाल म्हणाले२ हजार ३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

            सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. या प्रकल्पात मुंबईतील गोरेगावमालाडजुहूदादरवरळीताडदेववडाळाकन्नमवारनगरपवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची  प्रक्रिया राबविण्यात आली  होती.

            जयश्री कोटकर आणि कृपाल पटेल या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पत्र यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मिलिंद बोरीकर यांनी यावेळी मानले.

ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*

ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*





 05.10.2024

*Good News*


*State govt has waived off the British Era N.A Tax across Maharashtra*


*ब्रिटिश कालीन अकृषिक कर राज्य सरकारने अखेर संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता रद्द केला.*


*_Satya Muley_*

*Advocate Bombay High Court*

For the Petitioner

*Maharashtra/Pune Housing Federation*

7028005951

Featured post

Lakshvedhi