Monday, 7 October 2024

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत १० ऑक्टोबर रोजी सुनावणी

 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत

१० ऑक्टोबर रोजी सुनावणी

 

          मुंबईदि. ७ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत गुरुवार,  दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्रशासकीय इमारत (डेअरी विभाग), पहिला मजला, अब्दुल गफारखान मार्ग, वरळी सी फेसमुंबई येथे सुनावणी होणार आहे. अनुसूचित जाती जमाती  प्रवर्गातील अर्जदारांच्या तक्रारींवर आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्याकडे सुनावणी होणार आहे. संबंधित अर्जदार व संबंधित शासकीयनिमशासकीयजिल्हा परिषदमहानगरपालिका यांच्या बाबतीत तक्रारींच्या अनुषंगाने  सुनावण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहेअसे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची बुधवारी बैठक

 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाची बुधवारी बैठक


 


           मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्रशासकीय इमारत (डेअरी विभाग), पहिला मजला, अब्दुल गफारखान मार्ग, वरळी सी फेस, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.


           या बैठकीस आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, सदस्य गोरक्ष लोखंडे, वैदेही वाढाण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक आदी उपस्थित असणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी कळविले आहे.


****

पाशा पटेल यांचा 'हरित नायक' पुरस्काराने सन्मान

 पाशा पटेल यांचा 'हरित नायकपुरस्काराने सन्मान

 

          मुंबई, दि. 7 : देशामधील बांबू आधारित  उत्पादकांना 'होमेथॉन-2024' व्यासपीठ देऊन पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवड आणि प्रक्रियेची चळवळ उभारणाऱ्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांना यंदाचा 'हरित नायक' (Green Hero) पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

          देशामध्ये वास्तु निर्माणाच्या क्षेत्रातील 'नरेडकोमहाराष्ट्राच्यावतीने होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2024' या प्रदर्शनाचे आयोजन 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेशन सेंटर बीकेसी येथे करण्यात आले होते.

          काल झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकरनरेडको महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा आणि नरेडकोचे  सचिव राजेश दोशी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की, ' होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-2024' प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बिल्डर आणि शेतकरी यांच्यात समन्वय झाला आहे. प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या जोडीने बांबूआधारीत उत्पादने फर्निचर रिअल इस्टेट उद्योजक आणि ग्राहकांच्या पसंतीस पडले आहे.

           पाशा पटेल यांनी मानव जातीच्या रक्षणासाठी बांबू लागवड आणि बांबू आधारित उत्पादने वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले. जवळपास बांधकाम क्षेत्राकडून 28% कार्बन उत्सर्जन होते. ‘घर बांधा पण झाड तोडू नका’ हे तत्व स्वीकारून यापुढील काळात सर्व बांधकाम क्षेत्रातील दरवाजे फर्निचरसह बांबूपासून बनवलेले फ्लोरिंग देखील वापरण्यावर बांधकाम व्यावसायिकांची सहमती झाली आहे.

          होमेथॉन एक्स्पो २०२४ चा प्रसार हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध जोडी रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी केले होते. १००० हून अधिक असे महाराष्ट्रातील प्रथितयश व्यावसायिकांचे प्रकल्प सादर करण्यात आले. याशिवाय हे प्रकल्प परवडणाऱ्या घरांसह लक्झरी विभागात असून त्यांची किंमत रु १९ लाखांपासून ते रु ९ कोटींपर्यंतचे होते. या प्रदर्शनात काही सवलती जसे ‘नो स्टॅम्प ड्युटी’ किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस सह प्रतिशय वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज योजना सुध्दा सादर करण्यात आल्या. या एक्स्पोमध्ये मुंबई आणि एमएमआर रिजनसह ठाणेकल्याणनवी मुंबईपनवेलरायगडमिरारोडवसईविरार इत्यादीसह पुणेनाशिक आणि नागपूर येथील प्रकल्पही उपलब्ध आहेत.

सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

  

‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’

या प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

 

          मुंबईदि. 7 : ‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली.

          माहिती व जनसंपर्क विभागामार्फत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रदर्शनाला यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे यांनीही भेट दिली. यावेळी चित्रकार नरेंद्र बोरलेपवार उपस्थित होते.

          मंत्री श्री. लोढा यांनी प्रदर्शनात शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली तसेच कौशल्य विकास विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या निर्णयांच्या दालनांबाबत समाधान व्यक्त केले. कौशल्य विकास विभागाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजनाप्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनाआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनामहाराष्ट्र इंटरनॅशनलरोजगार मिळावेछत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरमहाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018स्टार्टअप वीकराज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अकादमीच्या सहा ठिकाणी झालेल्या स्थापनेसह विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती प्रदर्शनात लावली आहे अशी माहिती चित्रकार नरेंद्र बोरलेपवार यांनी मंत्री श्री. लोढा यांना दिली.

          राज्यात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

बोरिंग ला पाणी सांगणारा नंदी🙏🏻🙏🏻🙏🏻


 बोरिंग ला पाणी सांगणारा नंदी🙏🏻🙏🏻🙏🏻

पवनपुत्र, अंजनिसुत तर पहा

 *होटल में बैठी महिला की गोद में बंदर आ के बैठ गया, जब महिला ने श्रीराम नाम जपना शुरु किया तो बंदर की प्रतिक्रिया देखें।*

*जो लोग श्री राम को काल्पनिक मानते हैं उनको कहना चाहूंगा कि त्रेता युग में भगवान राम भी थे और उनके परम प्रेमी भक्त चिरजीवी हनु


मान जी भी हैं।*

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगरदि.6, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाककान आणि डोळे आहेत. गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात दिले.

        महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ  समृद्धी लॉन्सहर्सूल सावंगी रोड येथे आयोजित करण्यात आला होता. पोलीस पाटीलांचे मानधन शासनाने 15 हजार रुपये केले त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार पोलीस पाटील संघटनेने व्यक्त केले. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार,शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाटआ. प्रदीप जयस्वालआ. रमेश बोरनारेविभागीय आयुक्त दिलीप गावडेजिल्हाधिकारी दिलीप स्वामीतसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष  महादेव नागरगोजे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

        दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरुवात झाली. प्रास्ताविक महादेव नागरगोजे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पोलीस पाटील यांनी सत्कार केला.

        सत्काराला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीपोलीस पाटील हे प्रशासनाचे नाक कान आणि डोळे आहेत. आपल्याला 24 बाय 7 काम करावे लागते. सरकारही असेच 24 बाय 7 काम करणारे आहे.  आपले हे प्रामाणिक काम असल्यानेच शासनाने आपले मानधन साडेसहा हजार रुपयांवरुन 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. सढळ हस्ते न्याय दिला आहे.

        मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी शासनाने राबविलेल्या योजनांचा उल्लेख करुन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कीकुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे. शिक्षणआरोग्यआर्थिक सबलीकरणशेतकरी अशा सर्व घटकांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पाटील यांनी आपल्या गावात या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारभारी पाटील यांनी आभार मानले.

०००००


 

Featured post

Lakshvedhi