Friday, 27 September 2024

शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील ‘महावाचन उत्सव’चे प्रशस्तीपत्र अचूक

 शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील

महावाचन उत्सवचे प्रशस्तीपत्र अचूक

 

मुंबईदि.२७ : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते. विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेले हे प्रशस्तीपत्र अचूक असल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे.

महावाचन उत्सव २०२४ मधील सहभागाबाबत मिळणाऱ्या  प्रशस्तीपत्रामध्ये चुका असल्याचे काही माध्यमांमधून दाखविण्यात येत आहे. हे प्रशस्तीपत्र खरे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महावाचन उत्सव २०२४ मध्ये सहभागी होण्याऱ्या विद्यार्थ्यांची माहिती वेब ॲप्लीकेशनमध्ये भरल्यानंतर शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानंतर ही माहिती शाळेच्या डॅश बोर्डवर दिसते. ही माहिती योग्य असल्यास डॅशबोर्ड वर जनरेट सर्टिफिकेट लिंकवर क्लिक केल्यानंतर यासाठी विकसित करण्यात आलेल्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर प्रशस्तीपत्र ऑनलाईन उपलब्ध होत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

बनावट प्रशस्तीपत्रामध्ये उल्लेख असलेल्या शाळेला याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईलअसे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही

 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील

एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न

 

शिर्डीदि.२७ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूलपशूसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकासमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,  आमदार मोनिका राजळेआमदार आशुतोष काळे,  माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटीलसदाशिव लोखंडेजिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील,  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरश्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरअपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमहिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीणलखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८‌ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.

            महिलांना एसटी बसमध्ये पन्नास टक्के तिकिट सवलत देण्यात आली‌. यामुळे तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली. शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे काम करित आहे. मुलींच्या शिक्षणासाठी ५०६ महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले कीरात्रंदिवस  काबाडकष्ट करणाऱ्या लाडक्या बहीणींना योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील‌. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईलअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले.

राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणालेशेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून ८ हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगरनाशिकसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहेअसेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी सांगितले.

शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. शिर्डी नवीन विमानतळांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहेअसेही ते म्हणाले.

 

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले कीशिर्डीतील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटनाने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख बहींणींनी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले‌‌ आहेत. यातील अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मुलींचे शिक्षण मोफत करण्यात आले‌. शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्यात आले.‌ शिर्डी संस्थानामधील ५८४ कर्मचाऱ्यांना शासकीयसेवेत कायम करण्यात आले‌. उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत ही लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील 'विकासयात्राया पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या १५ लाभार्थी महिलांनालखपती दीदी योजनेच्या ४ महिलांनामुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत २ लाभार्थ्यांनाआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेंतर्गत डेअरी फार्मसाठी कर्ज वितरणकृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर वितरण आदी लाभांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन

            यावेळी मान्यवरांच्या हस्ते आभासी पद्धतीने निमगाव कोऱ्हाळे येथील श्री साईबाबा संस्थानाचे शैक्षणिक संकूलसावळीविहिर खुर्द येथे नवीन पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयमौजे लोणी बु. येथील भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळाशिर्डी येथील थीमपार्कमहसूल भवन इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अकोले येथील तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणजिल्ह्यातील २६ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन व ३५ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले.

गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाच्या १९१ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या प्रकल्प अहवालास मान्यता प्रदानमदर डेअरी व राहाता तालुका दूध संघ यांच्यामध्ये प्रतिदिन एक लाख लीटर दूध संकलनाचा करारही यावेळी करण्यात आला.

००००००


रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन

 रविवारी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन

 

मुंबई दि. २७ : राज्यात कृषिफलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतकऱ्यांचा आणि कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी  करणा-या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्नवसंतराव नाईक कृषिभूषणजिजामाता कृषिभूषणकृषिभूषण (सेंद्रिय शेती)उद्यान पंडीतवसंतराव नाईक शेतीमित्रवसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरीपीकस्पर्धा विजेतेपद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

          राज्य शासनामार्फत सन २०२०२०२१ व २०२२ या वर्षाच्या एकूण ४४८  पुरस्कार्थींचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थिती असणार आहे. रविवार दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता,नॅशनल स्पोर्ट्स  क्लब ऑफ इंडिया (डोम )वरळी मुंबई येथे हा कार्यकम होणार आहे.

http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषि विभागाच्या युटुयब चॅनेलवरुन तसेच https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM या फेसबुक पेजवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

विविध पुरस्कार विषयी संक्षिप्त माहिती

१)डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- (संख्या-१)

कृषि क्षेत्रातील कृषि विस्तारकृषि प्रक्रियानिर्यातकृषि उत्पादनपीक फेरबदलकृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादीमध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या राज्यातील कोणत्याही एका शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत सन्मानित करण्यात येते.

रु.३,००,००० /- रोख रकमेचे पारितोषिकस्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

२)वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार- (संख्या -०८)

             कृषिपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादनग्रामीण विकासज्यामध्ये बायोगॅसचा वापरशेतक-यांचा विकास इत्यादी संलग्नक्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण (०८) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.   

रु.२,००,००० /- रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र  व सपत्नीक सत्कार

३)जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- (संख्या - ८)

            राज्यातील शेतीक्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुनशेतीसामाजिकशैक्षणिकराजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेतीविकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाबतसेच शेतीक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्याकार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत पुरस्काराची सुरुवात केली आहे.

रु. २,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,

४)कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार- (संख्या-८)

सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यात प्रोत्साहन देऊन शेती करणाऱ्या तसेच उत्पादीत सेंद्रीय मालाची विक्री व्यवस्था करणे या मुख्य हेतुने राज्यातील जे शेतकरी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.

,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार,

५)वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- (संख्या ८)

जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषी ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतीलतसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांनात्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग (उदा. कुक्कुटपालनदुग्धव्यवसायमधुमक्षिकापालनरेशीम उद्योगगांडुळशेती इत्यादीमधील) वैशिष्टपूर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा-या महिलाकृषि विकास मंडळ ज्या गावात सक्रिय आहे. अशा शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.

रु.१,२०,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्हसन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

६)उद्यान पंडित पुरस्कार- (संख्या-८)

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थितीजमिनीची प्रत व हवामानातील विविधता यामुळे फलोत्पादनास मोठा वाव आहे. भाजीपाला पिकेफळ पिकेफुल पिकेमसाला पिकेऔषधी व सुंगधी वनस्पती पिके यापासून शेतक-यांना मोठया प्रमाणात लाभ होत आहे. तसेच राज्यात फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांने शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येते.

रु.१,००,००० /- रोख रक्कम,स्मृतिचिन्हसन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

७)वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार- (संख्या-४०)

शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापरजमिनीच्या प्रतवारी प्रमाणे पिकांची लागवडजमिनीचे सपाटीकरणकंटुर पध्दतीने पेरणीरासायनिक खतांचा सुयोग्य वापरविहीर / नाला इत्यादी मधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापरपिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणीशेती पुरक व्यवसायहलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाडइत्यादींची लागवड करणेस्वत:च्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवडशेतक-यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणेराज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण 40 (चाळीस) शेतक-यांना सन्मानित करण्यात येते.

रु.४४,००० /- रोख रक्कमपारितोषिक,स्मृतिचिन्हसन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

८)पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील,कृषि सेवारत्न पुरस्कार- (संख्या-१०)

पुरस्कार सुरु सन -२०१४

राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणाऱ्या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यास राज्यशासनाद्वारे सन्मानित करण्यात येते..

९)युवा शेतकरी  पुरस्कार- (संख्या-०८)

पुरस्कार सुरु सन -२०२०

वय वर्ष १८ ते ४०

रु.1,20,000/- रोख रक्कमपारितोषिक,स्मृतिचिन्हसन्मानपत्र व सपत्नीक सत्कार

१०)अन्नधान्यकडधान्यव गळीतधान्य पिकांच्या राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

ही स्पर्धा एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येते. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्यजिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येते.

पीकस्पर्धेतील पीके : या स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश आहे.

खरीप पीके -भातज्वारीबाजरीमकानाचणी (रागी)तूरमूगउडीदसोयाबीनभुईमुगसुर्यफुल  

               (एकूण ११ पिके)

रब्बी पीके- ज्वारीगहूहरभराकरडईजवस (एकूण ०५ पिके)

पिकस्पर्धा विजेते - बक्षिसाचे स्वरूप व वितरण

सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये

तालुका पातळी पहिले पाच हजार रुपये, दुसरे तीन हजार रुपये, तिसरे दोन हजार रुपयेजिल्हा पातळी पहिले दहा हजार रुपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रुपयेराज्य पातळी पहिले पन्नास हजार रुपयेदुसरे चाळीस हजार रुपयेतिसरे तीस हजार रुपये आहे.

0000

नको मला मेहनत, शॉर्टकट भरपूर मनी पाहिजे

 


*एकाच वेळी एकाच दिवशी चार ठिकाणी शुगर टेस्ट साठी ब्लड दिले आणि किती भयानक रिपोर्ट आले.. व्हिडीओ पहा आणि शहाणं व्हा 🙏🏻🙏🏻*


 

शासकिय निमशासकीय कर्मचारी जूनी नवी पेन्शन चार्ट

 


मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 

         मुंबई, दि. २७  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्जआधार कार्डपदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावापासपोर्ट आकाराचा फोटोहमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

0000

 

Featured post

Lakshvedhi