Sunday, 22 September 2024

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम रविवारी सह्याद्री वाहिनीवर

 राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम रविवारी सह्याद्री वाहिनीवर

 

            मुंबईदि.21 :- राज्यातील 109 गुणवंत शिक्षकांचा 5सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते 'क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारदेऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कार समारंभाचे प्रसारण रविवार दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून केले जाणार आहे.

 

            मुंबईतील एनसीपीएच्या सभागृहात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांना हा समारंभ पाहता आला नाहीत्यांच्यासह सर्वांनी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणारा हा कार्यक्रम अवश्य पाहावाअसे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. निर्माता जयु भाटकर आणि वैष्णो व्हिजन यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.


देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे मोलाचे योगदान

 देशाच्या आर्थिकसामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे मोलाचे योगदान

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 

मुंबई दि.21 :- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनने आपला व्यवसाय वृद्धिंगत करतांना सामाजिक बांधिलकी जपून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. आपण केलेले कार्य हे फक्त स्वतःपुरते मर्यादित नसून देशाच्या आर्थिकसामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत त्याचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काढले.

 

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जिटो) च्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिओ  सेंटर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन बोलत होते. या कार्यक्रमास जिटो चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

 

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन च्या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. संघटनेने व्यवसाय वाढीसाठी उभारलेले नेटवर्ककोरोना महामारीच्या काळात दिलेली आरोग्यसेवाशिक्षण क्षेत्रात केलेली मदतयुवकांना रोजगार मिळावा यासाठी उपलब्ध करून दिलेली संधीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना केलेली निःस्वार्थ मदत हे अमूल्य योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

राज्यपाल म्हणाले कीजिटो ने दाखवून दिले आहे की जेव्हा व्यवसाय आणि व्यक्ती योग्य हेतूने आणि उद्देशाने एकत्र येताततेव्हा ते एकाच वेळी व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगती साधून समाजाच्या भल्यासाठी योगदान देऊ शकतात. जिटो ने त्याच उत्साहाने आणि वचनबद्धतेने त्यांचे मिशन सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. संस्थेने सुरु केलेले 'शिकाकमवा आणि परत द्याहे कार्य आणि समर्पण असंख्य व्यक्ती व समुदायांना प्रेरणा देत राहीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

या कार्यक्रमाप्रसंगी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या यश आणि प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेत काम करून समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाजाचे आभार मानले.

 

.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत” “ठाणे विकास परिषदेचे” उद्घाटन संपन्न

 डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत

 ठाणे विकास परिषदेचे उद्घाटन संपन्न

 

ठाणे दि.२१(जिमाका): विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी,  “ठाणे विकास परिषद-2024चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या कार्यक्रमाचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करुन नियोजनबध्द आराखडा केला जात आहे. यानुषंगाने या विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे strategic प्लॅन चे सादरीकरण केले. तद्नंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी  परिषदेच्या उद्देश व उद्दिष्टांची माहिती दिली.

या विकास परिषदेत सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर शासनाचे अधिकारी व संबंधित क्षेत्रातील मान्यवरांमध्ये चर्चासत्रही संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.

00000

विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन

 विरोधी पक्षांच्या चुकीच्या माहितीमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन : फडणवीस


 महाराष्ट्रात अधिक प्रमाणात गुंतवणूक करणार : रिन्यू कंपनीचे निवेदन 

मुंबई दि, २१ (प्रतिनिधी) : काँग्रेस आणि शिवसेना यूबीटी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष आता 'रिन्यू डिसइन्व्हेस्टमेंट' वादावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असून 
सुमारे ३ हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असलेली रिन्यू पॉवर लिमिटेडची १८ हजार  कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातमध्ये हलवण्यात आली असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मालिन होत असल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, हा दावा "दिशाभूल करणारा आणि तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा " असल्याचे सांगून रीन्यू कंपनीने हे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत. तसेच  १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ५५० मेगावॅटची स्थापित क्षमता आणि निर्माणाधीन व अतिरिक्त २ हजार मेगावॅटसह सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर प्रकाश टाकताना कंपनीने महाराष्ट्राप्रती आपले प्रेम असल्याचा पुनरुच्चार कंपनीने दिलेल्या निवेदनात केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या दाव्यांवर जोरदार टीका केली असून कोणतेही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत, असे स्पष्ट केले आहे. रिन्यू कंपनीने आपण महाराष्ट्र बाहेर जात नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चांगलेच धारेवर धरले असून विरोधी पक्ष सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. 

कंपनीचे स्पष्टीकरण असूनही, सध्याच्या प्रशासनावर 'निष्काळजीपणा' आणि गुजरातमध्ये लक्षणीय गुंतवणूक गमावल्याचा आरोप करत विरोधक दिशाभूल करणारे वृत्त पसरवत आहेत.हा एनडीए सरकारविरुद्धच्या द्वेषपूर्ण मोहिमेचा भाग असल्याचे म्हटले आहे. या कथनाच्या राजकीय व्यवहार्यतेमुळे आंधळे झालेले आणि फडणवीसांना लक्ष्य करणारे विरोधक या दाव्यांचा राज्याच्या आर्थिक विकासावर आणि व्यावसायिक वातावरणावर होणारा नकारात्मक परिणाम विचारात घेण्यात अयशस्वी ठरले आहेत. असे कथन केवळ दिशाभूल करणारेच नाही तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आणि संभाव्य गुंतवणूकदारांसाठीच्या त्याच्या आकर्षणासाठीही हानिकारक आहे असे महाराष्ट्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी राज्याचे हित धोक्यात घालू नये, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सध्या फडणवीस यांना बळीचा बकरा बनविण्याचा विरोधकांचा मानस असून  विरोधकांची कृती हि संशयास्पद असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणणुकीच्या तोंडावर  राज्य सरकारला बदनाम करण्याच्या आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून विरोधकांनी सातत्याने तोफ डागली आहे. मग तो  कोणताही मुद्दा असो, विरोधी पक्ष सर्व दोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर देताना दिसून येत आहे. मात्र सत्ताधारी सरकार  विरोधकांकडे दुर्लक्ष्य करून महाराष्ट्राचा औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. अलीकडेच, राज्य सरकारने नवी मुंबईत आर. आर. पी. इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने १२.,०३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन केलेल्या राज्याच्या पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन ओएसएटी (आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट) प्रकल्पाचे उद्घाटन केले. आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे आणि सुमारे ४०० रोजगार निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडणार - केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील

 भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडणार            - केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील

 

पुणे, दि. 21 :- प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन 'हर घर जल' राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले.

 

गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते.

 

            केंद्रीय मंत्री श्री. पाटील म्हणाले, 'हर घर जल' योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले आहेत. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला आहे. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती देण्यात येत आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या 18 टक्के लोकंसख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ 4 टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील 20 नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पर्याप्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरु आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले काम यादृष्टीने अत्यंत प्रशंसनीय आहे.

 

जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये 'नाम' फाउंडेशनचा मोठा वाटा

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नाम फाउंडेशनने राज्यातील सर्वाधिक दुष्काळी भागात परिवर्तन घडवून आणले.  जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये नाम फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. देशातील सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील 55 टक्के भाग अवर्षणप्रवण आहे. महाराष्ट्रातील पाणी समस्येवरील उपाय शोधण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाची शासनाने आखणी केली. या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनने लोकचळवळीत रुपांतरीत केले.

ते म्हणाले, नाम फाउंडेशनने एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये वेगवेगळी कामे केली. दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामे,  शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, मुलींचे लग्न, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम त्यांनी केले. सर्वसामान्यांची दुःखे आत्मसात करुन नाम कार्य करत आहे. महाराष्ट्रात जोपर्यंत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत, पाण्याचा थेंब न थेंब जोपर्यंत जमिनीत मुरणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. हे ओळखून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना प्राधान्याने राबविली. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाली. अनेक गावे पाणीदार झाली आहेत. जलसंधारणामुळे शेती समृद्ध झाली. हे काम अव्याहत चालणारे असून जलसंधारणाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी नाम फाउंडेशन सारख्या अन्य संस्थानी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन श्री फडणवीस यांनी केले.

 

             यावेळी नाम फाऊंडेशनबद्दल बोलताना ते म्हणाले, नाम फाऊंडेशनने लोकांची मानसिकता बदलली. लोकांना पाण्याचे इंजिनिअरिंग शिकविले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यात सामान्य माणसाचे दु:ख जगण्याची क्षमता असल्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. त्यांच्या संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजपरिवर्तन घडवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.

 

श्रीगणपतीचे साडेतीन पीठाची माहिती......🚩*

 *🚩श्रीगणपतीचे साडेतीन पीठाची माहिती......🚩*


 सर्व साधारणपणे लोकांना अष्टविनायक माहित आहेत पण गणेशाची साडेतीन पीठे माहित नसतील म्हणून हा लेखनप्रपंच. 


महाराष्ट्रामध्ये गणेशाची साडेतीन पीठे आहेत. मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला त्याचे शीर जिथे पडले ते प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर  येथे दुसरे पीठ .कमरे पासून पाया पर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ महान गाणपत्य मोरया गोसावी याना करा नदीत स्नान करताना त्याच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली .हि मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगांवी जात असत. मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला. म्हणून हे अर्ध पीठ ओळखले जाते. "गणपती बाप्पा मोरया " हा घोष  हा तेव्हा पासून सुरु झाला.

 

*पहिले पीठ श्रीक्षेत्र मोरगाव*


 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.


*दुसरे पीठ श्रीक्षेत्र राजुर (जालना)*


श्री राजूरेश्वर - राजूर म्हणजेच पूर्वीचे राजापूर. वरण्य राजाचा राजवाडा या भागात होता. कृष्णाच्या तोंडून म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून अर्जूनाने गीता ऐकली. तद्वत साक्षात गणेशाने आपल्या मुखातून वरण्य राजाला गणेशगीता सांगितली. त्यामुळे गाणपत्य सांप्रदायात या स्थानाला  फार महत्व आहे. राजा वाराण्याने प्रतिष्ठापना केलेल्या या क्षेत्राला राजूरचा 'महागणपती' म्हणतात.

         

मराठवाड्यातील जालन्यापासून २२ कि.मी. वर हे क्षेत्र आहे. राजूर गावानजीक एका टेकडीवर हे गणेश मंदिर असून येथे वरण्य राजाची मूर्ती आहे. या ठिकाणाला गड म्हणतात.

               हा गणपती नवसाच्या समईला पावतो. येथील मूर्तीपुढे अंदाजे सव्वाशे समया रोज तेवत असतात. शेकडो समयांतील ज्योतींच्या मंद व मंगल प्रकाशात ही मूर्ती फारच विलोभनीय दिसते. पराशर ऋषींच्या आश्रमातून श्री गणेशाला वरण्य राजाने चैत्र शु.प्रतिपदेला राजूर, राजापूर येथे आणले, म्हणून गुढीपाडव्याला या गणेशाचे दर्शन घेणे ही पर्वणी मानली जाते. 


*तिसरे पीठ पद्मालय (जळगाव)*


पद्मालय - येथे दोन गणेश मूर्ती आहेत. महान दत्तभक्त सहस्त्रार्जुनाने स्थापन केलेला 'प्रवाळ गणेश' आणि त्याच्या शेजारी शेषाने स्थापन केलेला 'धरणीश्वर गणेश'. यातील गणेशाची मूर्ती एक उजव्या सोंडेची व दुसरी डाव्या सोंडेची आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून ८ कि.मी. वर पद्मालय आहे. हे मंदिर डोंगरावर असून तेथील तलावात विविध प्रकारची पद्म (कमळे) फुलतात. म्हणून या क्षेत्राला 'पद्मालय' असे नाव पडले.

               समुद्रमन्थनाच्या वेळी शेष समुद्रतळाशी होता. अमृत कुंभ देवांना आपल्यामुळे मिळाला असा अहंकार त्याला निर्माण झाला. त्याचा अहंकार पाहून संतप्त होऊन शिवाने त्याला खडकावर आपटले. त्याच्या डोक्याचे दहा तुकडे झाले. नारदाने त्याचे सांत्वन करून त्याला गणेश उपासना करावयास सांगितले. त्यानुसार त्याने ती केली. गणेश त्यावर प्रसन्न झाले व तू सहस्त्रवदन होशील आणि माझा सहवास तुला लाभावा यासाठी मी तुला माझ्या उदरावर धारण करीन. तसेच पृथ्वी,तू तुझ्या फण्यावर फुलासारखी तोलून धरशील असा आशीर्वाद दिला. म्हणून शेषाने स्थापन केलेल्या मूर्तीला 'धरणीश्वर गणेश' म्हणतात.


*अर्धपीठ श्रीक्षेत्र चिंचवड*


चिंचवड - चिंचवड हे गणपती क्षेत्र पुराणोक्त नाही. महान गाणपत्य साधू मोरया गोसावींच्या मुळे याला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. मोरया गोसाव्यांना मोरगाव येथे करा नदीत स्नान करताना गणेश तांदळा स्वरुपात आला. तो घेऊन ते मोरगांवी वारी करीत असत. सध्या तो तांदळा चिंचवड येथे देऊळवाड्यात आहे. मोरया गोसावींनी मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १३८३ रोजी जिवंत समाधी घेतली.

नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार

 नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार                   

                           - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

 

वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न

                                          - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे, दि.21 :- पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

 

श्री. गडकरी म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे 12 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे 42 हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.

 

एनएचएआय मार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात 1 लाख 50 हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

 

वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न

              -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात वारीचे महत्व मोठे आहे. देहू, आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता वर्षांनुवर्षे, शतकानुशतके अडचणीचा सामना करुन वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आशेने पंढरपूरकडे  मार्गक्रमण करीत असतात. वारीत पोहचू न शकणारे भाविक आपआपल्या देशातून दर्शनाचा लाभ घेतात, त्यामुळे आपली वारी आता वैश्विक झाली आहे. वारकऱ्यांना योग्य प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे, पालखी मार्ग वेगळा करुन त्या मार्गावर सर्व प्रकारच्या सोई असल्या पाहिजे यादृष्टीने काम होत आहे. वारकऱ्यांना पालखी तळावरही विविध सोई-सुविधा देण्याकरीता त्याठिकाणी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यानंतर केंद्र सरकारच्या मदतीने कामे करण्यात येईल. येत्या काळात वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

 

पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वर्तुळाकार मार्गाबाबत आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्याहून सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबईकडे जाताना वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत औद्योगिक विकासाला लागणाऱ्या पूरक बाबीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात विविध पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सार्वजनिक  वाहतूक व्यवस्थेकरिता मोठ्या प्रमाणात ई-बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आगामी काळात 1 हजार ई-बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व सोई-सुविधांयुक्त महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. पुणे नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नामकरण करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल, आणि केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. पुण्याच्या मेट्रोचे एक एक टप्पे पूर्ण करण्यासोबत नवीन टप्पे मंजूर करण्याचे काम सुरु आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी 3 लाख 50 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. हे पाहता पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे मेट्रोचे जाळे अधिक विस्तारित करण्याचे काम करण्यात येत आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री श्री. मोहोळ म्हणाले, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी मार्गांचे बांधकाम होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक महामार्ग निर्माण झाले आहेत, असेही श्री. मोहोळ म्हणाले.

 

सहकार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, पुणे शहर एक मोठे केंद्र झाले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता पुणे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिक तसेच तळेगाव ते चाकण रस्त्यांची प्रलंबित कामे करुन प्रश्न मार्गी लावावी. देहू, आळंदी आणि पंढरपूर विकास आराखड्याला गती देण्याकरीता केंद्र शासनाने सहकार्य करावे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पालखी महामार्गांवरून जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत; दिवसेंदिवस वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखीतळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी निवारा आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी सूचना करुन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सहकार्य करण्यात येईल, असे श्री. पाटील म्हणाले.

 

यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी, श्रीमती सुळे व आमदार श्री. तापकीर यांनीही विचार व्यक्त केले. श्री. श्रीवास्तव यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 अंतर्गत दिवेघाट ते हडपसर या पॅकेज 6 च्या कामाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण लांबी 13.25 किलोमीटर इतकी असून त्याची किंमत 819 कोटी रुपये असणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील मुळा व मुठा नदीवरील पुलांचे बांधकाम तसेच सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंतच्या सेवा रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे, या प्रकल्पाची एकूण किंमत 80 कोटी रुपये इतकी असणार आहे, या कामांचे कळ दाबून आभासीपद्धतीने भूमीपूजन करण्यात आले.

 

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

0000 

                                                                   दि


Featured post

Lakshvedhi