Friday, 20 September 2024

संसार में दो प्रकार के पेड़ पौधे होते हैं

 🌳 संसार में दो प्रकार के पेड़ पौधे होते हैं



🌳प्रथम: अपना फल स्वयं दे देते हैं,

🍎जैसे:- सेब, आम, अमरुद, केला इत्यादि.


🌿द्वितीय : अपना फल छिपाकर रखते हैं,

🥔जैसे:- आलू, अदरक, प्याज इत्यादि.


🍑जो फल अपने आप दे देते हैं, उन वृक्षों को सभी खाद-पानी देकर सुरक्षित रखते हैं, और ऐसे वृक्ष फिर से फल देने के लिए तैयार हो जाते हैं.


🥕किन्तु जो अपना फल छिपाकर रखते है, वे जड़ सहित खोद लिए जाते हैं, उनका वजूद ही खत्म हो जाता हैं.


☝️ठीक इसी प्रकार… जो व्यक्ति अपनी विद्या, धन, शक्ति स्वयं ही समाज सेवा में समाज के उत्थान में लगा देते हैं, उनका सभी ध्यान रखते हैं और वे मान-सम्मान पाते है.


☝️वही दूसरी ओर… जो अपनी विद्या, धन, शक्ति स्वार्थवश छिपाकर रखते हैं, किसी की सहायता से मुख मोड़े रखते है, वे जड़ सहित खोद लिए जाते है, अर्थात् समय रहते ही भुला दिये जाते है.


प्रकृति कितना महत्वपूर्ण संदेश देती है, बस समझने, सोचने और कार्य में परिणित करने की बात है..✍️🏾

कलाकाराला salute


 

Thursday, 19 September 2024

दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

 दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

 

नवी दिल्ली 19 : नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय "कलगीतुरा" या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजीसायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. 

"कलगीतुरा" हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असूननाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीचे नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजनविमल ननावरेनिलेश सूर्यवंशीअर्णव इंगळेआणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत.

नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असूनरोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या माध्यमातून पारंपरिक "कलगी" आणि "तुरा" या लोकपरंपरेचा संघर्ष रंगमंचावर सादर होतोजो अंधारात हरवलेल्या लोककलेचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

"कलगीतुरा विषयी

"कलगीतुरा" हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध लोककला परंपरा आहे. यामध्ये पारंपरिक लावणींचा प्रयोग केला जातोज्यामध्ये गावातील शेतकरी आणि लोक आपल्या गाण्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी करतात. "कलगीतुरा" विशेषतः अत्यंत सुरस व मजेशीर असतोज्यामध्ये जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून सामोरे जाता येते.

एनसीपीए मुंबईच्या 'दपर्णलेखन उपक्रमात विजेते ठरलेले हे नाटक आधीच मुंबई रंगभूमीवर खूप लोकप्रिय झाले आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे आणि लेखक दत्ता पाटील यांची जोडी मराठी रंगभूमीवर यापूर्वीही अनेक गाजलेली नाटके सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.

0000

कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी जयंतीदिनी तालुकास्तरीय मेळावे

 कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारार्थ

महात्मा गांधी जयंतीदिनी तालुकास्तरीय मेळावे

कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

मुंबई दि. 19 : कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारासाठी कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यात मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजउपसचिव संतोष कराडउपसचिव प्रतिभा पाटीलदूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विजयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले कीराज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळपुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळमहाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळआत्मा प्रकल्पकृषी उत्पादक गटशेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मेळावे आयोजित करून प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी. यासाठी येत्या महात्मा गांधी जयंतीला राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई

 विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई

तातडीने अदा करावी

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

 

मुंबई, दि. 19 : विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाने निर्गमित केलेला निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरित करण्यात यावाअशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.

विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत व त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री. मुंडे बोलत होते.

संत्रा व मोसंबी उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठवला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर मदत वितरित करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागास केल्या, त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्पांतर्गत संत्रा पिकासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेऊन गती देण्याच्या सूचना केल्या. बांगलादेश येथे महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्काच्या 50% प्रमाणे शासन अनुदान देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची सूचना केली

बैठकीस आमदार देवेंद्र भुयारमाजी आमदार आशिष देशमुखपणन महामंडळाचे संचालक चरण सिंह ठाकुर, नरखेड येथील सभापती नरेश आरसडे, अशोकराव धोटे तसेच कृषी विभागाच्या  सचिव जयश्री भोजकृषी संचालक विनयकुमार आवटेयांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत

 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई

राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

मुंबई दि 19 : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचेतसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीतअसे निर्देश  कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा व नियोजन बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोजकृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे.

36 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण

राज्यात कापूस व सोयाबीन खातेदारांची एकूण संख्या 96.17 लाख आहे. त्यापैकी 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमती पत्रे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 64.87 लाख खातेदार शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे. त्यापैकी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या डाटा सोबत 46.8 लाख शेतकऱ्यांचा डाटा जुळला आहे. तर ई पीक पाहणी नावांच्या डेटा पैकी 36 लाख नावे जुळलेली आहेत. त्यामुळे 10 लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत. हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावीत - मुंडे

 केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव घोषित केले आहेत. यावर्षी सोयाबीनचे 73.27 लाख मेट्रिक टन इतके बंपर उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली असून नाफेड व एनसीसीएफ मार्फत सोयाबीन खरेदीची केंद्रे उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत. राज्य शासन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण;

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील


संत-महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण;


संत आणि महापुरुषांची स्मारके प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


बुलढाणा, दि. 19 (जिमाका) : शहरात उभारण्यात आलेले संत, महापुरुष यांची स्मारके आपल्या सर्वांना नेहमीत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील. ही स्मारके ऊर्जा देण्यासोबतच भावी पिढीला समतेचा आणि मानवतेचा संदेश देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात संत आणि महापुरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवरत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई, महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले, संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज, शासकीय विश्रामगृह जवळील वसंतराव नाईक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, तहसील चौकातील नरवीर तानाजी मालूसरे आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे, कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे, जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, शहिद जवान युध्द स्मारकाचे अनावरण करण्यात आले.


           यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री संजय गायकवाड, संजय रायमूलकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, श्रीमती श्वेता महाले, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


0

000



 


Featured post

Lakshvedhi