Thursday, 19 September 2024

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त

 पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Ø  जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन

Ø  चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

मुंबई,दि. १८ : जागतिक तापमानातील वाढवातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

१८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागीपद्मश्री कमल सिंगपद्मश्री गेनाजी चौधरीपद्मश्री सुलतान सिंगपद्मश्री चंद्रशेखरपद्मश्री जगदिश प्रसाद पारेखमनरेगाचे महासंचालक नंदकुमारप्रधान सचिव प्रवीण दराडेदूरदर्शन निवेदिका मेघाली दास व्यासपीठावर उपस्थित होत्या.

श्री. पटेल पुढे म्हणाले कीभारतातील राज्यांमध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे. दुबईत सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनामुळे क्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. क्सिजन वाढविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. मानवजाती आणि पृथ्वीचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनविण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक क्सिजन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे. या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरीशास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बांबू शेतीसाठी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काम करावे लागेलअसे आवाहन श्री पटेल यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांचा गौरव

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्रासंबंधी निर्णयाचे जगभरातील बहुतांशी देशांनी कौतुक केले आहे. त्यामुळे जगभरातील १७ देशातील आणि भारतातील १७ राज्यांच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव होत आहे. महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासह बांबू शेती क्षेत्रात मोठे काम होत आहे. जगभरात त्याची दखल घेतली जात आहेअसे गौरवोद्गार श्री पटेल यांनी काढले.

पद्मश्री भारत भूषण त्यागी यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी मानवी चेतना जागृत करण्याची गरज आहे. बांबू हे केवळ झाड नसून नैसर्गिक संरचनेतील महत्त्वाचा अंग आहे. बांबू शेतीची महाराष्ट्रातून पायाभरणी होत असल्याची मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी एमआरईजीएसचे महासंचालक नंदकुमारप्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र’ या योजनेविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमात राजस्थानगुजरातउत्तराखंडउत्तरप्रदेशझारखंडआसामपंजाबमध्यप्रदेशकर्नाटकपश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रगतीशील शेतकरीआयआयटी दिल्लीखरकपूरविविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञउद्योजकशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने

 मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

मुंबईदि. १८:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबरते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने  मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

              सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे १५०० रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणसार्वजनिक आरोग्यनगरविकासग्रामविकास विभागधर्मादाय आयुक्त कार्यालयमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठनिरामय सेवा फाऊंडेशनधर्मादाय रुग्णालयेधर्मादाय संस्थामेडीकल असोसिएशनशासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि  लोक सहभागातून हे आरोग्य शिबिरे पार पडणार आहे.

   झोपडपट्ट्यांमध्येवाड्यावस्त्यांवर २५ हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत या शिबिरांचे आयोजन होणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

   शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच ५९ प्रकारच्या रक्त चाचण्याइ.सी.जी. यासारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे.  त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- आभा कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.  रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष’ समन्वय साधणार आहे.  या कक्षाच्या माध्यमातून  वैद्यकीय सहाय्याचा आलेख दिवसें-दिवस चढता राहिला आहे. अवघ्या ८ महिन्यांत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना १३ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली गेली.

   उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हृदय रोगकर्करोगयकृत प्रत्यारोपणसारख्या  गंभीर व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरील आजारांवर धर्मादाय रुग्णांलयात उपचार होत आहेत. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी विशेष वैद्यकीय मदत कक्ष तत्परपणे कार्य करत आहे.

              प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचारासाठी  आणि १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोफत व सवलतीच्या दरात जास्तीत जास्त गरजुंना उपचार घेता यावेत यासाठी आपण वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील वाढवली आहे. निर्धनांसाठी ती १ लाख ८० हजार रुपये तर दुर्बल घटकांसाठी ३ लाख ६० हजार रुपये एवढी वाढवली आहे. त्यामुळे कुणीही निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही.

              मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवण्याकरिता अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ०२२- २२०२००४५ या दूरध्वनीवर संपर्क साधावाअसे आवाहनही उपमुख्यमंत्री कार्यालयांतर्गत कार्यरत वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.

000

राज्य शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे

 राज्य शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे

                                            - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Ø      आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 

 

ठाणे, दि.18(जिमाका): एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहेहे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करी असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले.

ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर,  उद्योग मंत्री उदय सामं, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळेविकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाहठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारेनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदेमुंबई पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्ण प्रकाश, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, हे शासन दिलेला शब्द पाळणारे आहेलाडकी बहीण योजना यशस्वी करुन दाखविली. इतर योजनाही यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या दृष्टीने जलद गतीने कामे सुरु आहेत. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई मधील दोन तासाचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांवर आले आहे. महाराष्ट्रात बदल घडविणारे प्रकल्प आम्ही साकार रीत आहोत. राज्य शासनाने दाओसमध्ये पाच लाख करोडच्या उद्योग करारांवर सहया केल्या आहेत. लोकांच्या हातांना निश्चित काम मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर युनिटमध्ये 400 लोकांना काम मिळणार आहेया माध्यमातून अडॅव्हान्स टेक्नोलॉजी आपल्या राज्यात येत आहे. हे  शासन सर्वांसाठी आहे. उद्योजकांना ससीडी देण्यात ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था अकरा क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली आहे. 

लवकरच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर ण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत मोठे उद्योग महाराष्ट्रात आले आहेतआणखी येत आहेत. शेतकऱ्याला केंद्र बिंदू मानून हे शासन काम करीत आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला चांगले सहकार्य लाभत आहे.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सेमिकंडक्टर हा भारतातला पहिला प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरु होत आहेयाचा सर्वांना अभिमान वाटत आहे. एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा हा प्रकल्प सुरु केलासुरुवात करणारा महत्वाचा असतो. आपण आपला भारत देश सामर्थशाली घडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतत्यासाठी ही चिप खूप महत्वाची आहे. आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो. पण जे रियल हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी कमतरता भासत होती. आणि विशेषत: भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आले की, ग्लोबल सप्लायर चैन खंडित झाली. चीन, जपान यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनि चिप्स आणि तत्सम गोष्टी या त्यांच्याच देशातून येतात. गातील बहुतांश देश त्यांच्यावरच अवलंबून होते. आपल्या देशाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर आपल्या देशात हा उद्योग नियोजनबध्दरित्या वाढवावा लागेल. मला या गोष्टीचा आनंद आहे की, सेमिकंडक्टर क्षेत्रामध्ये आपले स्वत:चे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ज्या प्रकारे डिजिटायझेशन झपाट्याने वाढत आहे, त्याच प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल इकोसिस्टिम आपल्या संपूर्ण जीवनाला बदलते आहे.  उद्योग क्षेत्रातील येणारा काळ हा भारतासाठी उज्ज्वल असणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणाले की, सेमिकंडक्टर प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्यातील उद्योगाला गती मिळणार आहे. महाराष्ट्रासाठी हे महत्वाचे पाऊ ठरणार आहे. डिजिटल क्रांतीला गती मिळणार आहे. इच्छा शक्तीच्या जोरावर हा प्रकल्प उभा राहिला आहे. महाराष्ट्राला उद्योगाची परंपरा आहे. राज्याच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. हा प्रकल्प औद्योगिक विकासासाठी महत्वाचा असणार आहे. उद्योग क्षेत्राला गती देण्याचे निर्णय सरकारने घेतले आहेत. उद्योगाचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्योगासाठी अनेक प्रकारच्या सवती देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये 12 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरु राहणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्तावित करताना आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चोणकर यांनी या प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर, जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि असे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कायम सहकार्य करण्याची हमी दिली.

या कार्यक्रमासाठी विविध उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा जगाकडून गौरव -राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

 

महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा जगाकडून गौरव -राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 

महाराष्ट्राला शेती क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 18:- जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झालेअशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.

पर्यावरण रक्षणशाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगेफोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दारआफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादाअमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन्फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ एमजे खानमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

            वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे नमूद करून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यपाल म्हणाले कीराज्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्राशी संबधीत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करत असल्याचा सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री यांना मिळालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील यशाचे आणि शाश्वत शेतीतील प्रयोग आणि प्रयत्नांचे जागतिक पटलावर प्रतिबिंबित करणारा आहे. हा पुरस्कार केवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचेच नव्हेतर महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पना आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये केलेल्या जागतिक पातळीवरील योगदानाचा सन्मान आहे. महाराष्ट्राने भारताच्या कृषी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान आबाधित राखले आहे. आपले शेतकरीआपल्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांच्या जिद्दी आणि कष्टांनी देशाचा कणा बनले आहेत.

यावेळी राज्यपाल म्हणाले कीदुष्काळपाण्याची कमतरतापूर आणि हवामान बदल यांसारख्या असंख्य आव्हानांनंतरहीमहाराष्ट्राने आपली ताकद आणि अनुकूलता दाखवली आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्रगत बियाणेखत आणि आधुनिक शेती साधनांनी सुसज्ज केले आहेतसेच सूक्ष्म सिंचन यांसारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे. कृषी विद्यापीठांशी असलेल्या सहकार्यामुळे अत्याधुनिक संशोधनाचे प्रत्यक्ष वापरामध्ये रूपांतर होऊन उत्पन्न वाढले आहे.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले कीआजच्या पर्यावरण बदल आणि तापमान वाढीचा काळात पर्यावरण संरक्षण आणि कृषी यांचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आजचा हा पुरस्कार स्वीकारतो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. आजच्या काळात अन्न सुरक्षा महत्वाची आहे. लोकांचे पोट भरण्याचे महत्वाचे काम शेतकरी करतो. त्यामुळे त्याला अन्नदाता म्हणतात. शेतकरी आणि शेती महत्वाची आहे. वातावरण बदल आणि तापमान वाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळेच तापमानवाढ कमी करणे ही गरज असून त्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण कृती समितीची स्थापना केली आहे. राज्यात 21 लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पूरअतिवृष्टीदुष्काळ या सारथ्य नैसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी हा नवीन बदलांनाही स्वीकारत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. सिंचनाच्या 125 प्रकलपणा मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यंमत्र्यांनी सांगितले.

                मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमहाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. रोजगारथेट परकीय गुंतवणूकविकास यामध्ये राज्य देशात आघाडीवर आहे. कृषी विकासातही राज्य आघाडीवर आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. 1 रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्र शासनाच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासन 6 हजार रुपये देतेअसे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळत आहेत. येत्या दोन वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे  उद्दीष्ट आहे. तसेच 17 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट आहे. शेतीला चोवीस तास विद्युत पुरवठ्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली जाते. 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर करण्यात आली आहे. देशाची आर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन करण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले असून यामध्ये महाराष्ट्र 1 ट्रिलीयन अर्थव्यवस्था निर्माण करून भरीव योगदान देईल. पर्यावरण संरक्षणविकास आणि कृषीचा शाश्वत विकास यासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज आहे. यात उद्योग आणि अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि शेतकऱ्यांचेही महत्वपूर्ण योगदान राहीले.

                वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे उपाध्यक्ष विल्यम दार यांनी प्रस्तावनेमध्ये पुरस्काराचे स्वरूप आणि निवड पद्धती याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन जागतीक कृषी परिषदेचे राष्ट्रीय संचालक एम.जे.खान यांनी व्यक्त केले.

०००००


 

Wednesday, 18 September 2024

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त

                                                                 

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Ø  जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन

Ø  चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

मुंबई,दि. १८ : जागतिक तापमानातील वाढवातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.

१८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागीपद्मश्री कमल सिंगपद्मश्री गेनाजी चौधरीपद्मश्री सुलतान सिंगपद्मश्री चंद्रशेखरपद्मश्री जगदिश प्रसाद पारेखमनरेगाचे महासंचालक नंदकुमारप्रधान सचिव प्रवीण दराडेदूरदर्शन निवेदिका मेघाली दास व्यासपीठावर उपस्थित होत्या.

श्री. पटेल पुढे म्हणाले कीभारतातील राज्यांमध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे. दुबईत सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनामुळे क्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. क्सिजन वाढविण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. मानवजाती आणि पृथ्वीचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनविण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक क्सिजन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे. या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरीशास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बांबू शेतीसाठी महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काम करावे लागेलअसे आवाहन श्री पटेल यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्र्यांचा गौरव

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्रासंबंधी निर्णयाचे जगभरातील बहुतांशी देशांनी कौतुक केले आहे. त्यामुळे जगभरातील १७ देशातील आणि भारतातील १७ राज्यांच्या प्रतिनिधींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव होत आहे. महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासह बांबू शेती क्षेत्रात मोठे काम होत आहे. जगभरात त्याची दखल घेतली जात आहेअसे गौरवोद्गार श्री पटेल यांनी काढले.

पद्मश्री भारत भूषण त्यागी यांनी महाराष्ट्रात होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासाठी मानवी चेतना जागृत करण्याची गरज आहे. बांबू हे केवळ झाड नसून नैसर्गिक संरचनेतील महत्त्वाचा अंग आहे. बांबू शेतीची महाराष्ट्रातून पायाभरणी होत असल्याची मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी एमआरईजीएसचे महासंचालक नंदकुमारप्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र’ या योजनेविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमात राजस्थानगुजरातउत्तराखंडउत्तरप्रदेशझारखंडआसामपंजाबमध्यप्रदेशकर्नाटकपश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रगतीशील शेतकरीआयआयटी दिल्लीखरकपूरविविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञउद्योजकशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

 अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Ø  ६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका

Ø  सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा

मुंबई, अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा


निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा


दि. १८ : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे)विधानपरिषद सदस्य प्रसाद लाडगृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंहम्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालमुख्याधिकारी मिलींद बोरीकरउपसचिव अजित कवडेअवर सचिव अरविंद शेटेअभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकरउपाध्यक्ष विलास सावंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ हे ६३५ चौरस फूट पेक्षा जास्त असावेभविष्याच्यादृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावीसदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेवून पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढाअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

विधानपरिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांनी अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी राज्य शासन घेत असलेल्या निर्णयाबाबत शासनाचे विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या निर्णयामुळे सुमारे अभ्युदय नगर वसाहतीतील १५ हजार रहिवाशांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील मराठी माणूसकामगार आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी स्ट्रक्चरलचे पैसे भरले आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळखला जावा. काँक्रीटचे जंगल न होता चांगले काम व्हावे अशी मागणी करुन शासनाच्या क्रांतीकारक निर्णयांचे कौतुक महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी केले.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली.

०००

Featured post

Lakshvedhi