Thursday, 12 September 2024

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता मुंबईच्या पायाभूत सुविधातील पुढचे पाऊल

 धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता

मुंबईच्या पायाभूत सुविधातील पुढचे पाऊल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

        मुंबईदि. 12 : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारकजलददिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या  प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते वांद्रे सी लिंक हा प्रवास केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार असल्यामुळे वेळइंधन वाचेल आणि प्रदुषण कमी होऊन मुंबईकरांची कार्यक्षमताही वाढेलअसा विश्वास मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

        धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढागृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहलमुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

        मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईतील ‘गेमचेंजर’ प्रकल्पाचे टप्पे पुढे जात असून यानंतर वर्सोवाभाईंदरविरारपर्यंत हा प्रकल्प सुद्धा पुढे नेत आहोत. भविष्यात मुंबई ते वर्सोवा मधील 3-4 तासाचे अंतर हे केवळ 40 ते 50 मिनिटात पार करण्यात येईल. या पुलाच्या उभारणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा प्रकल्प बांधताना कोळी बांधवांची देखील काळजी घेण्यात आली असून त्यांना देखील न्याय दिला आहे. किनारी रस्ता पुढे पालघरपर्यंत जाणार आहे. वाढवण बंदरालादेखील या किनारी रस्त्याचा फायदा होणार आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्याबरोबरच सर्व रस्ते काँक्रिटचे करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी तसेच प्रदुषण कमी करण्यासाठीही सर्व उपाययोजना करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने झाले आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येत आहेत.

*प्रकल्प थोडक्यात...

हा प्रकल्प मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत बांधण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरुपात वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील 827 मीटर लांबीच्या पुलावरुन उत्तर वाहिनीवर सुरू होत असलेली वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील.

महत्त्वाचे टप्पे - 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 9.29 किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका, 10 जून रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन 6.25 किमी उत्तरवाहिनी मार्गिका, 11 जुलै रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका (तात्पुरत्या स्वरुपात3.5 किलोमीटर) सुरू.

 

पुढील नियोजन : सद्यस्थितीत प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण, प्रकल्पातील वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा उत्तर वाहिनीवरील मुख्य पूल व वरळी आंतरबदल डिसेंबर 2024 पर्यंत तर हाजीअली आंतरबदल येथील उर्वरित कामे (मार्गिका क्रमांक 1, 6  7मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

*प्रकल्पाची वैशिष्ट्ये* :

• बोगदा खनन संयंत्राच्या (TBMसहाय्याने भारतातील सर्वात मोठा व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती.

• भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणालीचा वापर.

• भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी.

• एकाच प्रकल्पामध्ये रस्तापूलउन्नत मार्गउतरण मार्गआच्छादित बोगदासमुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदाहरितक्षेत्राची निर्मिती.

• भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम

• या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.

• प्रवाहकीय अंदाजानुसार भारतात प्रथमच २४०० मेट्रिक टन वजनाची आणि १३६ मीटर लांबीची महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन.

000

दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त

 प्रशांत सपकाळे यांची मुलाखत

 

मुंबई, दि.12: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची तयारी' या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु असून मुंबईतील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्यशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव आनंदात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येते. मंगळवार 17 सप्टेंबर, 2024 रोजी अनंत चतुर्दशी दिनी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली तयारी यासंदर्भातील माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. सपकाळे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात दिली आहे.

 

'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार, दि. 13 आणि शनिवार दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

---000---

राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; राज्यपालांकडून बाप्पाला निरोप

  


राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन;


राज्यपालांकडून बाप्पाला निरोप


 


 


मुंबई, दि. 12 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. 11) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.


            राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्ती विसर्जन करताना पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे, अशी सूचना राज्यपालांनी केल्यामुळे मूर्तीचे विसर्जन हौदात करण्यात आले.


नाशिक मध्यवर्ती कैद्यांनी तयारी केली शाडूची मुर्ती


राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली गणेशाची मूर्ती शाडूची होती. ही मूर्ती नाशिक येथील कारागृहातील कैद्यांनी तयार केली होती. विसर्जनाच्या वेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


00000


 


Governor's Eco-friendly Ganesh murti immersed in artificial pond


Governor bids farewell to Lord Ganesh


 


 


 


Mumbai, Date 12 -The eco-friendly Ganesh, installed at the residence of Maharashtra Governor C. P. Radhakrishnan was immersed in an artificial pond at Raj Bhavan on the fifth day of Ganeshotsav on Wed (11 Sept).


 


The Governor bid farewell to Ganesh after performing the aarti along with his family members and officers and staff of Raj Bhavan.


 


The Governor had desired that the Ganesh idol should be immersed in an artificial pond in order to prevent the pollution of sea water. Accordingly the murti was immersed in the neighbourhood artificial pond.


 


            Principal Secretary to the Governor Pravin Darade, Joint Secretary Shweta Singhal, Comptroller Jitendra Wagh and other officers and employees were present.


 


            The Ganesh idol installed at Raj Bhavan was made of clay. It was created by an inmate of the Nashik Central prison.

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत

 वृत्त क्र. 1599

वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून

हमीपत्र लिहून घेण्याबाबत कोणतेही निर्देश नाहीत

 

मुंबई, दि.१२ :- शासकीय/महानगरपालिका/अनुदानित/खाजगी विनाअनुदानित आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे हमीपत्र लिहून घेण्याबाबत निर्देश देण्यात आले नसल्याचे वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 

सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच, विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एससी, एसटी ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून प्रवेशाच्यावेळी कोणतेही शिक्षण शुल्क न आकारता त्यांना प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहे.

 

ज्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे, त्यांचेकडून फक्त ५० टक्के शिक्षण शुल्क घेऊन, त्यांना प्रवेश देण्यात यावा. शैक्षणिक संस्थांनी योजनेबाबतची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देऊन संबंधित योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याबाबत कळवावे.सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

 

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याकरीता प्रयत्न करावेत. प्रथम वर्षाशिवाय इतर पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीकरीता पात्र असतील तर त्यांच्याबाबतही याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे संचालनालयामार्फत निर्देश देण्यात आले असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने कळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’

 विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’

 

मुंबई, दि. 12 : व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद मिळतो. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करावे आणि लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागामार्फत महावाचन उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात 11 सप्टेंबर, 2024 पर्यंत 96,639 (88.95 टक्के) शाळांमधून 12,30,557 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी दिली आहे.

 

मोबाईल, टीव्ही, संगणक आदी स्क्रीनच्या वेडामुळे हल्ली मुले वाचनाच्या आनंदापासून दूर जाताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना पुन्हा पुस्तकांच्या सहवासात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महावाचन उत्सव या उपक्रमाची सुरुवात केली आहे. हा उपक्रम 20 सप्टेंबर, 2024 पर्यंत सुरू राहणार आहे.

महावाचन उत्सवाचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन

मागील वर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये 66 हजार  शाळा व 52 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याची पडताळणी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ मार्फत करण्यात आली होती. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. हा प्रतिसाद लक्षात घेऊन सन 2024-25 या वर्षी देखील रिड इंडिया यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाकरीता ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात असून त्यांनी देखील सर्वांना दररोज किमान 10 मिनीटे नवीन काही वाचनाचे आवाहन केले आहे.

            राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात आले आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे. दर्जेदार साहित्याचा व लेखक, कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे ही या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत. 

उपक्रमाचे स्वरुप

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी www.mahavachanutsav.org या नावाने वेब ॲप्लीकेशन विकसित करण्यात आले असून राज्यातील सर्व शाळा नोंदणी करीत आहेत. सहभागी विद्यार्थ्यांनी आवडत्या पुस्तकाचे वाचन करुन वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय लेखन करावयाचे आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना वाचन केलेल्या पुस्तकाविषयी अभिप्राय देण्यासाठी एका मिनिटाचा व्हिडिओ/ ऑडिओ क्लिप अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक हे राज्यस्तरीय नोडल अधिकारी असून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) व तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत हा उपक्रम राविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असणार आहे.

 

परिक्षण व पारितोषिके

विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड तीन गटांसाठी स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. विजयी विद्यार्थ्यांना पुस्तक स्वरुपात पारितोषिक तर सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

ग्रंथ प्रदर्शन/ पुस्तक मेळाव्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना नवनवीन पुस्तकांची माहिती मिळावी व वाचनास प्रोत्साहित करावे या उद्देशाने यावर्षी प्रत्येक तालुक्यात ग्रंथ प्रदर्शन / पुस्तक मेळावे घेण्यात आले आहेत. या मेळाव्यात त्या-त्या जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी ग्रंथालयांना तसेच विविध प्रकाशकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती आर.विमला यांनी दिली आहे.

14 सप्टेंबर रोजी जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

 14 सप्टेंबर रोजी जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन

पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद

 

मुंबई दि.12 : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे शनिवार 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.30 वाजेपर्यंत जिओ पारशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय  अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार हे समुदायाशी संवाद साधणार आहेत.

 

पारशी  लोकसंख्या स्थिर करण्यासाठी आणि भारतातील पारशी लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने केंद्राने जिओ पारसी योजना सुरू केली. पारशी जोडप्यांना वैद्यकीय आणि समुदायाचे आरोग्य (HOC) घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते.  राज्य शासनाद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि इतर पडताळणीनंतर योजनेतील मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) मोडद्वारे नागरिकांना जारी केली जात आहे. योजनेची माहिती समुदायातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पारशी मुख्य धर्मोपदेशक उदवाडाचे श्री. दस्तूरजी  आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, उपाध्यक्ष केरसी के.देबू उपस्थित राहणार आहेत. पारशी समुदायातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागाने केले आहे.

                                                       

मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

 मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

 

         मुंबई दि. १२ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

 

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. उद्या शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

00000

Featured post

Lakshvedhi