Friday, 30 August 2024

सध्या वय ५० +/- वर्षे असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे. हे 👇वाचा म्हणजे लक्षात येईल..

 सध्या वय ५० +/- वर्षे असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे. 

हे 👇वाचा म्हणजे लक्षात येईल..


*आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशिर्वाद प्राप्त आहेत..*

▪️आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.

▪️शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..

▪️आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो - नेट फ्रेंड्स सोबत नाही..

▪️तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते - आपल्याला कधी बिसलेरी घ्यावी लागली नाही..

▪️आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो - पण आजारी नाही पडलो..

▪️आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड, स्थुल नाही झालो..

▪️आपण कितीदा अनवाणी फिरलो - तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..

▪️आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..

▪️आपली खेळणी आपणच बनवली - दोन रिकाम्या काडेपेट्या सुध्दा आपल्यासाठी गाडी, फोन किंवा पिस्तूल बनायच्या..

▪️आपला भरपुर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..

▪️आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते - कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..

▪️आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही - आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..

▪️आपण एक अद्भुत रसायन आहोत. कारण आपणच आहोत एक अशी पिढी, ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली...

▪️आपण भले स्पेशल नसु पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

▪️आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, खरे तारूण्य अनुभवले - आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत ...

▪️आपणच फक्त "कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत" अनुभवली..


आणि शेवटी.....


आठवतंय का....आपण 'मदर्स, फादर्स डे' कधी साजरा केल्याचं ??

नाही........ना ?

*कारण आई वडीलच आपलं जग होतं आणि आहे.* 

*😊 *👌*👍...

*//राम कृष्ण हरी//*

Thursday, 29 August 2024

गोविंदा आला रे

 


Santam लायब्ररी, पुराण,महाभारत,रामायण, अन्य ,pl share

 


गणपती साठी रोषणाई अंधाच्या रोजगानिर्मिती साठी

 


राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांची 'दिलखुलास','जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत

 राज्य प्रकल्प संचालक आर विमला यांची

'दिलखुलास','जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत

 

मुंबईदि.29: शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महावाचन उत्सव -2024 बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांची मुलाखत 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातील मुलाखतीत प्रकल्प संचालक आर. विमला यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित 'महावाचन उत्सव 2024' च्या आयोजनामागची भूमिकाउपक्रमाचे स्वरुपविद्यार्थ्यांचा सहभाग व उपक्रमाची व्याप्ती याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखतशुकवार दि.30 आणि शनिवार दि. 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक शिवानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR  

मऱ्हाटी' महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवात प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान

 'मऱ्हाटीमहाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या

विक्रीला उत्साहात सुरुवात

प्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार

 

नवी दिल्ली, 29: दिल्लीतील प्रसिद्ध 'मऱ्हाटीमहाराष्ट्र एम्पोरियममध्ये महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन व विक्रीची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनात 6 इंच ते 3 फुट उंचीच्या विविध आकारांच्या आठशेहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तीची किंमत 500 रूपयांपासून 26 हजार रूपयांपर्यंत असून हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या कलेला राजधानीत प्रोत्साहन मिळावे, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती दिल्लीतील गणेशभक्तांपर्यंत पोहोचवणे हे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उद्दिष्ट आहे.

दिल्ली परिक्षेत्रातील 30 गणेश मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातोज्यामध्ये अमराठी भक्तांचाही मोठा सहभाग असतो. गेल्या 25 वर्षांपासून ठाणे येथील मूर्तिकार मंदार सूर्यकांत शिंदे हे आपल्या उत्कृष्ट शाडूच्या गणेशमूर्तींच्या विक्रीसाठी 'मऱ्हाटीएम्पोरियममध्ये सहभागी होत आहेत. याशिवायमुंबईच्या नीता भोसले यांनी मार्बलफायबरआणि रेडियमच्या शिवाजी महाराजगणपतीकृष्णविठ्ठल रुक्मिणी यांच्यासह विविध मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

'बाबा खडकसिंह मार्गावरील 'मऱ्हाटीमहाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु राहणार असूनअधिक माहितीसाठी 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

0000

 

 

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

  

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी

राज्य शासन प्रयत्नशील

                                                                 - मंत्री अतुल सावे

            मुंबईदि.२९ : नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहनही मंत्री श्री. सावे यांनी केले.

  नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) यांच्यावतीने द रिअल इस्टेट फोरम २०२४’ चे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी नारडेकोचे अध्यक्ष प्रशांत शर्माचेअरमन किशोर भतिजासंदिप रुणवालराजेश दोषीगृहनिर्माण विभागाच्या सचिव वल्सा नायरमुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

 मंत्री श्री. सावे म्हणाले कीप्रधानमंत्री आवास योजनारमाई आवास योजनाशबरी घरकुल योजनामोदी आवास योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सदस्यांनी सहकार्य करावे.

            राज्य शासनाने महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केलेली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे. मुद्रांक शुल्क अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेन करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

            राज्यात येत्या वर्षभरात १ लाख घरे  देण्याचा आपला संकल्प आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावेअसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे दीड लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात  पुढील पाच वर्षांत ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी अर्थसंकल्पात ७४२५ कोटींची तरतूद केली आहे. यासाठी नरडेकोने पुढे यावे. आजच्या चर्चासत्राद्वारे केल्या जाणाऱ्या सूचनांचा नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेलअसे मंत्री श्री.सावे म्हणाले.

Featured post

Lakshvedhi