Friday, 30 August 2024

टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत

 टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत

- सांस्‍कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबईदि. २९ :-  राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी या चित्रपट खेळांच्या दरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने  तातडीने योग्य पावले उचलावीअशा सूचना वनेसांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.

टुरिंग टॉकीज, तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरेचित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीजचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.

सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीटुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट  दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट खेळादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाहिरात प्रसारणामुळे टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना आर्थिक बळकटीही मिळेल. टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान एक रक्कमी देण्याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी सूचना केल्या.

०००००

महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ

 महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पाठबळ

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल

 

मुंबईदि. 29 :  राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रकल्प सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारजागतिक बँकआशियाई डेव्हलपमेंट बँक आदी मार्फत निधी उभारणी केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी पाठबळ असून एमएमआर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आयोजित पुढारी न्युज पहिला वर्धापन दिन निमित्य  महाराष्ट्राचा विकास व भविष्यातील महाराष्ट्राची वाटचाल या विषयावर प्रसन्न जोशी यांनी घेतलेल्या मुलाखत प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या विकासाचा पट उघडून दाखविला. विकास कामांमुळे गुजरात व कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र देशात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. मेट्रो लाईन–3 प्रकल्प सप्टेंबर मध्ये जनतेसाठी खुला केला जाईल. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंकरेल्वेचे पायाभूत सुविधा व वाहतूक प्रकल्पबुलेट ट्रेनहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता - कोस्टल रोड या प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.

      मुख्यमंत्री म्हणालेमुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) एक ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठू शकतो असे नीती आयोगाने म्हटले आहे. या दृष्टीने लॉजिस्टिक्स पार्कवाढवणदिघीऔद्योगीक हाय-ग्रोथ इंडस्ट्रीयल हबविकासीत करण्यात येत आहे. नागरी विकासाच्या व उत्पादन प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत  विकासाला दिलेले प्राधान्य  महत्त्वाचे आहेअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न तसेच युवकमहिलाशेतकरीविद्यार्थी यांच्याबाबत राज्य सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना  त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांतून व विकास कामातून 45 हजार कोटी रुपये खर्च केले असून मुलींना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय ,अभियांत्रिकी सारख्या अभ्यासक्रमांना शंभर टक्के फी सवलत दिली आहे.

            'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीणयोजनेबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेयामुळे अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. रक्षाबंधनपूर्वी बँक खात्यात आलेल्या रकमेतून आपल्या गरजांच्या पूर्तीसाठी त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. भविष्यात ही रक्कम 3000 पर्यंत वाढविण्यात येईल. असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

बदलापूर येथील घटनेच्या अनुषंगाने कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे पुढारी मीडिया हाऊस तर्फे पद्मश्री प्रतापराव जाधव यांनी 'वेध महाराष्ट्राचा'हे कॉफी टेबल बुक व पुढारी न्युज च्या 'गोल्डन बूमचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार केला. याप्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकरमहिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरेसमूह संपादक योगेश जाधवविविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा

 केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

मुंबईदि. २९ : उसाचा रसबी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहेअसे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.

राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रससिरपबी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

००००

मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती

 मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती


दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच नवीन पुतळा उभारण्यासाठी समित्या गठीत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या निरनिराळ्या मूर्तिकारांशी भेटीगाठी


 


मुंबई, दि.29 :- मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आहे. यासाठी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी नुकत्याच काही शिल्पकारांच्या भेटीही घेतल्या आहेत.


मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी काल वर्षा निवासस्थानी विशेष बैठक घेतली होती.


या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिल्पकार विनय वाघ आणि शशिकांत वडके यांची मते देखील जाणून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सुतार त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली. यासोबतच अजूनही काही मूर्तिकारांची ते भेट घेणार असून त्यांचीही याबाबतची मते ते जाणून घेणार आहेत.


दरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने दोन तांत्रिक समित्या स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर केली आहे. यात झालेल्या दुर्घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी पहिली समिती गठीत केली असून, भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून जास्त अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती काम करेल. झालेल्या दुर्घटनेसाठी नक्की कोण जबाबदार आहेत याची जबाबदारी ही समिती निश्चित करेल. तर दुसरी समिती ही त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुतळा उभारण्याबाबतची कार्यपद्धती ही समिती नि

श्चित करेल.


आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे · याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार · मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित

 आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत

भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·         याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार

·         मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पेसा भरतीबाबतचे आंदोलन स्थगित

 

मुंबई दि. 29 : आदिवासी भागातील पेसा कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेचा निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विनंती न्यायालयाला करण्यात येईलअशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नासह इतर विषयांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पेसा क्षेत्रातील भरतीसाठी नाशिक येथे उपोषणास बसलेल्या जे.पी. गावित यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेतले.

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणालेकी आदिवासी बांधवांचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय आहे. आदिवासी भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी तेथील गावाच्या विकासासाठी ग्रामसभा सक्षम करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली जातील. याकरिता पेसा क्षेत्रातील आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांची पद प्राधान्याने भरण्यात येतील. आदिवासी भागाच्या विकासासाठी नव्या दमाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. तसेच ग्रामसभेला काही प्रमाणात निधी खर्चाचे अधिकार देण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच आदिवासींच्या कब्जातील हक्कदारांच्या सातबाऱ्यावर त्यांची स्वतंत्रपणे नोंद करण्यात येईल. क्रीडापटू कविता राऊत यांची शासकीय सेवेत लवकरच थेट नियुक्ती करण्यात येईल असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळआदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाची 30 ऑगस्टला पायाभरणी · 76000 कोटी रुपयांचा प्रकल्प · वाढवण हे देशातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरणार

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाची

 30 ऑगस्टला पायाभरणी

 

·         76000 कोटी रुपयांचा प्रकल्प

·         वाढवण हे देशातील सर्वात मोठे खोल पाण्यातील बंदर ठरणार

·         भारताची सागरी जोडणी वाढणार, जागतिक व्यापार केंद्र म्हणून स्थान मजबूत होणार

 

 

नवी दिल्ली 29 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई आणि पालघरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024ला संबोधित करतील. त्यानंतर सिडको मैदानपालघर येथे विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे.

प्रधानमंत्री पालघरमध्ये

30 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. 76000 कोटी आहे. अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट संपर्क प्रस्थापित करेलज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात खोल बर्थकार्यक्षम माल हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतीलस्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि या प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात गती मिळेल. यावर भर देण्यात येत आहे. वाढवण बंदर प्रकल्पात पर्यावरणीय परिणाम कमी करण्यावर आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रित करून शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यावरही भर देण्यात आला आहे. कार्यान्वित झाल्यानंतर हे बंदर भारताची सागरी जोडणी वाढवेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत करेल.

देशभरातील या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने 1560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

360 कोटी रुपयांचा खर्च राष्ट्रीय जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणालीचा आरंभही प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत किनारपट्टीवरील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यांत्रिक आणि मोटरयुक्त मासेमारी जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपॉन्डर्स बसवले जातील. जहाज दळणवळण आणि सहाय्य प्रणाली हे इस्रोने विकसित केलेले स्वदेशी तंत्रज्ञान आहे. मच्छिमार समुद्रात असताना द्विमार्गी दळणवळण स्थापित करण्यात हे तंत्रज्ञान मदत करेल आणि बचावकार्यात मदत करेल तसेच मच्छिमारांची सुरक्षा सुनिश्चित करेल.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या अन्य उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक ॲक्वापार्कचा विकासतसेच रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टम आणि बायोफ्लॉक यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब यांचा समावेश आहे. हे प्रकल्प अनेक राज्यांमध्ये राबवले जातील आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठीव्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त ठरतील.

मत्स्य बंदरांचा विकाससुधारणा आणि आधुनिकीकरणमत्स्य लँडिंग केंद्रे आणि मत्स्य बाजारपेठेचे बांधकाम यासह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय पायाभूत प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात  येणार आहे. यामुळे मासे आणि सागरी खाद्यपदार्थांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आणि स्वच्छ परिस्थिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला प्रधानमंत्री श्री.मोदी संबोधित करणार आहेत. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे जीईएफचे आयोजन केले आहे. भारत आणि इतर विविध देशांतील धोरणकर्तेनियामकवरिष्ठ बँकर्सउद्योगपती आणि शिक्षणतज्ज्ञांसह सुमारे 800 वक्ते या परिषदेत 350 हून अधिक सत्रांना संबोधित करणार आहेत. यात फिनटेक क्षेत्रातील नवीन कल्पना देखील मांडण्यात येतील. जी. एफ. एफ. 2024 मध्ये अंतर्दृष्टी आणि उद्योगाची सखोल माहिती देणारे 20 हून अधिक अभ्यास अहवाल आणि श्वेतपत्रे प्रकाशित केली जातीलअसे प्रधानमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००


महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ

 महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन

जनतेच्या विकासासाठी शेवटच्या घटकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि.29 :- महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. ते देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्य सरकार महिलायुवक, शेतकरीज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

आयटीसी ग्रँट सेंट्रल हाँटेल मुंबई येथे न्युज १८ इंडिया या वाहिनीच्या डायमंड  स्टेट समिट महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे प्रगतिशील महाराष्ट्र या चर्चेत बोलत होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले,राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचे दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफतमहिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात ३ कोटी लखपती दीदी बनविण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील ५० लाख दीदींचा समावेश राहील. देश ५ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा राहणार असून १ ट्रिलियन डाँलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 राज्यात विकासाची विविध कामे प्रगतीपथावर आहेत. समृद्धी हायवेकोस्टल रोड बनवला. मेट्रो प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर आहेत. राज्यात रस्त्याची कामेही वेगाने सुरू आहे. मुंबईत वेगाने मेट्रोचे जाळे पसरत आहे. दोन वर्षात देशाच्या विकासात राज्याचे मोठे योगदान आहे. राज्यात पयाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. दावोसमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहे. महाराष्ट्रात उद्योग क्षेत्र वेगाने विकासित होत आहे.यामुळे राज्यात रोजगार निर्मितीसाठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. साडेपाच हजार कोटी खर्च करून दिघी बंदर उभारण्यात येणार आहे. तब्बल ६ हजार एकर परिसरात हे बंदर उभारण्यासाठी  केंद्र शासनाने ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले आहे. भुमीपूतन समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात  मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत. त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या उद्योगांना  शासनाविषयी विश्वास निर्माण झाला असल्याने अनेक नवीन सामंजस्य करार करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात पायभुत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्गअटल सेतु, कोस्टल रोड नागरिकांना वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळेनागरिकांचा वेळ,पैसे यांची बचत होवून आणि प्रदूषण नियंत्रण होण्यासही मदत झाली आहे.

सर्वसामान्य घरातील महिलांना घर चालविण्यात येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन आम्ही 'मुख्यमंत्री-लाडकी बहीण' योजना सुरू केली. १ कोटी पेक्षा जास्त  महिलांनी या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना सुरू झाली आहे.त्या अंतर्गत आपण मुलांना सहा हजारआठ हजार, दहा हजार याप्रमाणे विद्यावेतन देवून कौशल्य विकासावर आधारित रोजगार निर्मिती करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांसाठी अनेक सवलतीयोजना सरकारने तयार केल्या आहेत. एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे ७.५ एचपी पर्यंतचे वीज बील माफ करण्यात आले आहे. जे शेतकरी सोलर पंप लावण्यास इच्छुक असतील त्यांना देखील सरकार मदत करत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील नक्षलवाद हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. नक्षलग्रस्त भागात शाळामहाविद्यालयेरुग्णालये इत्यादी सुविधांमुळे आता राज्यातील नक्षलवाद नष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi