Tuesday, 16 July 2024

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

 पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

 

            मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

            सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते.

            त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.

भवताल

 भवताल मासिक : जून २०२४ अंक प्रसिद्ध !


नमस्कार.
"भवताल मासिका"चा जून २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.

• भूजलाच्या नव्या वाटा
(डॉ. हिमांशू कुलकर्णी)
आपण भूजलाचा वारेमाप उपसा करीत आहोत. मात्र, उपशाच्या प्रमाणात जलपुनर्भरण होत नाही. शाश्वत पाणी मिळण्यासाठी भविष्यात आपल्याला वैज्ञानिक मार्गांनी पराकाष्ठा करावी लागणार आहे. भूजलाच्या नव्या वाटांचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा ‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल’ हा अंदाज खरा ठरेल... याबाबत वस्तुस्थिती मांडणारा लेख.

• पाऊस... तेव्हाचा आणि आताचा !
(प्रा. डॉ. एस. आर. यादव)
पावसाळा... सृष्टीचे जीवनचक्र अव्याहतपणे चालवणारा सर्जनाचा ऋतू! पाऊस वर्षानुवर्षे पडतोय. तो अनुभवण्याची पद्धत मात्र बदलतेय. लहानपणी थय-थय नाचत येणारा
तुफान पाऊस मी अनुभवलाय अन् काळानुसार पावसाळ्यातील विलोभनीय दृष्य दृष्टीआड होताना, अवतीभवतीची जैवविविधता नष्ट होतानाही मी पाहतोय. गेल्या ३० वर्षांत बदललेल्या पावसाच्या अनेक रूपांचा मी साक्षीदार आहे! सांगताहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव.

• निसर्गातील भन्नाट शाळा
(ओवी थोरात)
निसर्ग शिक्षण आणि शाळेत शिकवले जाणारे पर्यावरणशास्त्र यांच्यामध्ये फरक मुख्यतः शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत असतो. शाळेत पुस्तक हेच महत्त्वाचे साधन असते. मग परीक्षाही असते. निसर्ग शिक्षण मात्र निरीक्षण आणि अनुभव यांचा जास्त वापर करून घेते. अशाच एका भन्नाट निसर्गशाळेची आगळी-वेगळी गोष्ट! 

• भिजणे आणि पाऊस मोजणे
(अभिजीत कुलकर्णी)
या पावसाळ्यात तुम्हाला आनंद अन् ज्ञान देणारं काहीतरी भन्नाट करायचंय का? तर मग तुम्ही 'भवताल'च्या भिजूया आणि 'भिजूया आणि मोजूया' या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. त्या अंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व भागांतील लोक मिळून दररोज पाऊस मोजत आहोत, वेगवेगळी निरीक्षणे घेत आहेत. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाविषयी...

• इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.

• भवताल बुलेटीन
'भवताल'चे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...
...
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.

नावनोंदणीसाठी लिंक:

(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल"चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)

वर्गणी भरण्यासाठी,
G-pay: 9822840436
UPI: abhighorpade@okhdfcbank

- संपादक


Monday, 15 July 2024

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

 व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबईदि. १५ : कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले.

               एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री.आठवले बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील,आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, कौशल्य विकास विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री.आठवले म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत.त्याच धर्तीवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री यांनीही राज्याच्या कौशल्य विकासाला गती दिली आहे.उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार केले जावे यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे.

                        अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

      मंत्री श्री.लोढा म्हणाले की,राज्यात रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभाग,उद्योजक यांच्या समन्वयातून सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे आणि विभागाला यशाकडे नेण्यासाठी  सर्वांनी या कामात  उत्स्फुर्त सहभाग घ्यावा.

            कौशल्य विकास विभागाचे सचिव श्री. पाटीलआयुक्त श्रीमती चौधरीमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पालकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कौशल्य विकास विभाग आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत सामंजस्य करार झाला. जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाव्दारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल यशस्वी उमेदवारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनांचे (MAPS) पोर्टलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्पर्धेतील विजेत्या संस्थांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी चांदूरबाजारजिल्हा - अमरावती या संस्थेला प्रथम क्रमांकशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदेडजिल्हा- नांदेड संस्थेला व्दितीय क्रमांक तर  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाऔंध. पुणे (मुलींची)जिल्हा-पुणे या संस्थेचा तृतीय क्रमांक आला.

            विभागीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मुंबई विभागात फादर अॅग्नेल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थावाशी, जिल्हा- ठाणेपुणे विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरुरजिल्हा-पुणे,नाशिक विभागात औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकळवणजिल्हा नाशिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जिल्हा जालना विभाग,अमरावती विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदगाव खंडेश्वरजिल्हा अमरावती,नागपूर विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थावर्धाजिल्हा वर्धा यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

                                                            ००००

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

 अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

-  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

  

            मुंबई, दि. १५  : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

            मंत्री कु.तटकरे म्हणाल्या कीएकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीतअशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

            याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेतअसे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.


कोबी.......बीको


 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

            बारामतीदि.14:  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेराज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

            बारामती पंचायत समिती येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरीउपविभागीय अधिकारी वैभव नावडकरगटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,  सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने आदी उपस्थित होते.

            श्री. पवार म्हणालेराज्याच्या विकासाकरीता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरणस्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन  देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजनामहिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई-रिक्षायोजनामहिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाआठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

            'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजना एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  21 ते 65 वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावेऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविकापर्यवेक्षिकाग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

            ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये. अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये 19 ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आजअखेर 1 लाख 34 हजार  498 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती  तालुक्यात 7 हजार 648 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शुन्य रक्कमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे. सर्व घटकातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रशासनासोबत सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे. महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढे यावेअसे आवाहन श्री. पवार यांनी केले.

            यावेळी श्री. पवार यांच्या उपस्थितीत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ महिलांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज स्विकारण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बागल यांनी केले.

000000

देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना लाभ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

 देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्राराज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना लाभ!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

            मुंबई दि. 14 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होतेत्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज  सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.भारतातील एकूण 73   महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

            देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावेयासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.

    या योजनेअंतर्गत राज्यातील व  देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहेतसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे .यामध्ये प्रत्यक्ष प्रवास.भोजन. निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल .लाभार्थी वार्षिक उत्पन्न लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष साठ वरील ज्येष्ठ नागरिक असावा.
           सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत . सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय.आर. सी. टी. सी. (IRCTC ) समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत  कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.
            प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. सदर योजनेच्या राज्य स्तरावरील सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्य स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची समिती कार्यरत असेल सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सदस्य सचिव असतील. तर राज्यस्तरावर आयुक्त समाजकल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील.

चौकट:-
            देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा ,माता वैष्णवी यात्राअमरनाथ यात्रा इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असतेपुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असतेपरंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळेतसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.  राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे याचे आम्हाला समाधान आहेनिश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा व प्रेरणा मिळेल.:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Featured post

Lakshvedhi