भवताल मासिक : जून २०२४ अंक प्रसिद्ध !
नमस्कार.
"भवताल मासिका"चा जून २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.
• भूजलाच्या नव्या वाटा
(डॉ. हिमांशू कुलकर्णी)
आपण भूजलाचा वारेमाप उपसा करीत आहोत. मात्र, उपशाच्या प्रमाणात जलपुनर्भरण होत नाही. शाश्वत पाणी मिळण्यासाठी भविष्यात आपल्याला वैज्ञानिक मार्गांनी पराकाष्ठा करावी लागणार आहे. भूजलाच्या नव्या वाटांचा शोध घ्यावा लागणार आहे. अन्यथा ‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल’ हा अंदाज खरा ठरेल... याबाबत वस्तुस्थिती मांडणारा लेख.
• पाऊस... तेव्हाचा आणि आताचा !
(प्रा. डॉ. एस. आर. यादव)
पावसाळा... सृष्टीचे जीवनचक्र अव्याहतपणे चालवणारा सर्जनाचा ऋतू! पाऊस वर्षानुवर्षे पडतोय. तो अनुभवण्याची पद्धत मात्र बदलतेय. लहानपणी थय-थय नाचत येणारा
तुफान पाऊस मी अनुभवलाय अन् काळानुसार पावसाळ्यातील विलोभनीय दृष्य दृष्टीआड होताना, अवतीभवतीची जैवविविधता नष्ट होतानाही मी पाहतोय. गेल्या ३० वर्षांत बदललेल्या पावसाच्या अनेक रूपांचा मी साक्षीदार आहे! सांगताहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. एस. आर. यादव.
• निसर्गातील भन्नाट शाळा
(ओवी थोरात)
निसर्ग शिक्षण आणि शाळेत शिकवले जाणारे पर्यावरणशास्त्र यांच्यामध्ये फरक मुख्यतः शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत असतो. शाळेत पुस्तक हेच महत्त्वाचे साधन असते. मग परीक्षाही असते. निसर्ग शिक्षण मात्र निरीक्षण आणि अनुभव यांचा जास्त वापर करून घेते. अशाच एका भन्नाट निसर्गशाळेची आगळी-वेगळी गोष्ट!
• भिजणे आणि पाऊस मोजणे
(अभिजीत कुलकर्णी)
या पावसाळ्यात तुम्हाला आनंद अन् ज्ञान देणारं काहीतरी भन्नाट करायचंय का? तर मग तुम्ही 'भवताल'च्या भिजूया आणि 'भिजूया आणि मोजूया' या उपक्रमात नक्की सहभागी व्हा. त्या अंतर्गत महाराष्ट्राच्या सर्व भागांतील लोक मिळून दररोज पाऊस मोजत आहोत, वेगवेगळी निरीक्षणे घेत आहेत. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाविषयी...
• इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.
• भवताल बुलेटीन
'भवताल'चे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...
...
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.
नावनोंदणीसाठी लिंक:
(आपण २०२४ या वर्षाची वर्गणी भरली नसल्यास रु. ५९० इतकी वार्षिक वर्गणी भरावी, जेणेकरून आम्हाला "भवताल"चा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)
वर्गणी भरण्यासाठी,
G-pay: 9822840436
UPI: abhighorpade@okhdfcbank
- संपादक
No comments:
Post a Comment