Monday, 15 July 2024

कोबी.......बीको


 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

            बारामतीदि.14:  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'अंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेराज्यातील एकही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

            बारामती पंचायत समिती येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरीउपविभागीय अधिकारी वैभव नावडकरगटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,  सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने आदी उपस्थित होते.

            श्री. पवार म्हणालेराज्याच्या विकासाकरीता मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरणस्वावलंबनाला चालना तसेच विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन  देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजनामहिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई-रिक्षायोजनामहिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाआठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

            'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणयोजना एक महत्वकांक्षी योजना असून या योजनेसाठी एका वर्षाकरीता 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  21 ते 65 वर्षे वयोगटातील अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावेऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरीता गावतील अंगणवाडी सेविकापर्यवेक्षिकाग्रामसेवक आदी स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा. अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

            ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांनादेखील जुलै महिन्यापासून लाभ मिळणार असल्यामुळे महिलांनी अर्ज करण्याकरीता गर्दी करु नये. अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीचे निराकारण करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे मिळून ३ हजार रुपये 19 ऑगस्टपर्यंत (रक्षाबंधन) थेट त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

            जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आजअखेर 1 लाख 34 हजार  498 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बारामती  तालुक्यात 7 हजार 648 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने शुन्य रक्कमेवर आधारित महिलांचे खाते उघडण्यात येत आहे. सर्व घटकातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता प्रशासनासोबत सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे. महिला वर्गांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता पुढे यावेअसे आवाहन श्री. पवार यांनी केले.

            यावेळी श्री. पवार यांच्या उपस्थितीत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेअंतर्गत तालुक्यातील ५ महिलांचे प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज स्विकारण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बागल यांनी केले.

000000

देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना लाभ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

 देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्राराज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठांना लाभ!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

            मुंबई दि. 14 : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होतेत्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज  सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.भारतातील एकूण 73   महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

            देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावेयासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.

    या योजनेअंतर्गत राज्यातील व  देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रात पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहेतसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार आहे .यामध्ये प्रत्यक्ष प्रवास.भोजन. निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल .लाभार्थी वार्षिक उत्पन्न लाख 50 हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष साठ वरील ज्येष्ठ नागरिक असावा.
           सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत . सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय.आर. सी. टी. सी. (IRCTC ) समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत  कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.
            प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. सदर योजनेच्या राज्य स्तरावरील सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्य स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची समिती कार्यरत असेल सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सदस्य सचिव असतील. तर राज्यस्तरावर आयुक्त समाजकल्याण हे नोडल अधिकारी म्हणून काम करतील.

चौकट:-
            देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा ,माता वैष्णवी यात्राअमरनाथ यात्रा इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असतेपुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असतेपरंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळेतसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.  राज्य शासन हे राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे याचे आम्हाला समाधान आहेनिश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा व प्रेरणा मिळेल.:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 *आजचे आतचे पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन,पंढरपूर 🙏🙏❤️❤️✨✨*🚩🚩🙏🙏


Sunday, 14 July 2024

बिकवापुजा


 

दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयांच्या आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत

                         

दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयांच्या आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत  

         मुंबईदि. 14महाराष्ट्र शासनाचा कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही रोजगार मिळवून देण्यासाठी अग्रेसर आहे. युवकांनी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल घडवावे असे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजक्ता आयुक्तालयाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात केले आहे.

            15 जुलै या 'जागतिक युवा कौशल्य दिनाच्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रममुख्यमंत्री युवा  कार्य प्रशिक्षण योजना,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनास्टार्टअप वीक,  प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनाआचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनाशॉर्ट टर्म्स स्किलिंग, 'आयटीआयमार्फत इंडस्ट्री सोबत सामजंस्य करारअप्रेंटिस योजनातसेच रोजगार मेळावे यासंदर्भात सविस्तर माहिती श्रीमती. चौधरी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखतसोमवार दि. 15, मंगळवार दि. 16 आणि बुधवार दि. 17 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही  मुलाखत मंगळवार दि. 16 जुलै, 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स-https://twitter.com/mahaDGIPR

फेसबुक-https://www.facebook.com/mahaDGIPR

युट्युब-https://www.youtube.

ठाणे जिल्ह्यातील शिळगावात महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

 ठाणे जिल्ह्यातील शिळगावात महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना उचित शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी- डॉ. नीलम गोऱ्हे

        मुंबईदि. 13 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेले मौजे शिळगावात एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी  9 जुलै रोजी उघडकीस आली. मौजे शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार करुन हत्या केली. या घटनेतील आरोपीना शिक्षा व्हावी याकरीता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

        महिलांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करणे हे शासनाचे धोरण आहे. अशा परिस्थितीत सदरील घटना महिलांच्या मनोधैर्यावर विपरीत परीणाम करु शकतात. मंदिर परिसरात आरोपींनी एका विवाहीत महिलेवर सामूहिक अत्याचार केले. ही घटना अत्यंत लाजीरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.

            डॉ.गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात अशा घटना भविष्यात्त घडु नये याकरीता राज्यातील सर्व मंदिरेप्रार्थनास्थळे येथे सीसीटीव्ही बसविण्यात यावे व तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. धार्मिक स्थळामध्ये कार्यरत सर्व कर्मचारीपुजारी व इतर पूर्णवेळ सेवक यांची नजीकच्या पोलीस स्टेशन मार्फ़त चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. तसेच महिलेचे आप्त व कुटुंबियांना मानसोपचार सेवा व समुपदेशन पुरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.


Featured post

Lakshvedhi