Saturday, 13 July 2024

वो फिर नहीं आते

 ❗ *वो फिर नहीं आते*…


आयुष्यभर अगदी कधीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या संसाराच्यागाड्यात ती एकाएकी हरवून जातात. ....

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का?”* अशा या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी  हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं….. संपर्कात रहायला हवं. 

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना ?…. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. 


ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. 

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का ? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो …..  *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं *भेटण्यापेक्षा* ती *लाभणंच* जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो. 


गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि, ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं,*

*लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल*

*मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से* 

*खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़*

*जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से*

*मिलते नहीं*

*उम्र भर चाहे*

*कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…*


माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. *भावनाशून्य* या जगात जगताना आपण थोडं *भावनाप्रधान* व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि.......

ही मैत्री नावाची 'नाव" अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है,*

*क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का*

*दुश्मन है*

*अपने दिल में*

*इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े*

*याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर*

*उनको जाने न दो*

*बाद में प्यार के*

*चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 


आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना….  नसेल तर….? खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल ...नाही का...? 

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत.. शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्‍या  प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत  हीच ती  सुंदर माणसं.... तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी .. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची....

 सच लिखा है लिखा है 'गुलजार'जी ने...


*...वो फिर नही आते....*


*असं हे किशोर कुमार यांनी गायलेलं सुंदरसं गीत.....* 


*" वो फिर नही आते..."😢🙏*🙏

आला वारा संग पावसाच्या धारा, चला खेळ खेळू


 

DJ वाला बाबू

 आज-काल कोणी जन्माला आला तर डीजे, कोणी मेला तर डीजे, लग्नाला डीजे, श्राद्धाला डीजे ,पूजेला डीजे,  जिंकले तर डीजे, हारले तर डीजे,... डीजे ऐकून ऐकून गल्लीतल्या कुत्र्यांचे काय हाल झाले आहेत बघा😄


😅

डेंग्यू पासुन घ्यावयाची काळजी

 


हवामान खात्याने दिला इशारा

 भारतीय हवामान खात्याने आपल्या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय, मुंबई.

अग्निपथ योजना 24 जूनपासून सैन्य नोंदणीसाठी आणि ऑनलाइन परीक्षा 25 जुलैपासून सुरू होईल ही माहिती आजूबाजूच्या मुलांपर्यंत पोहोचवा.

 https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02iS1bAsbPA4CKGa78Y4WMKifQyAUHBe7S86LEkL2MujifkiwSmkAoGSZgUmTpgfqNl&id=100081508882716&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6


2300000 लाख रुपयांची अग्निपथ योजना 24 जूनपासून सैन्य नोंदणीसाठी आणि ऑनलाइन परीक्षा 25 जुलैपासून सुरू होईल ही माहिती आजूबाजूच्या मुलांपर्यंत पोहोचवा.


 ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्कीच पाठवा.


 तयारी कोणासाठी केली जात आहे हे तुम्ही समजून घेत असाल, त्यामुळे वेळ असताना आपणही भरतीची तयारी सुरू केली पाहिजे


 पहिले वर्ष- 21,000×12= 2,52,000

 दुसरे वर्ष - 23,100×12= 2,77,200

 तिसरे वर्ष- 25,580×12= 3,06,960

 चौथे वर्ष- 28,000×12= 3,36,000


 चार वर्षांत एकूण 11 लाख 72 हजार 160 रुपये, त्यानंतर सेवानिवृत्तीवर 11 लाख 71 हजार रुपये दिले जातील.


 सैन्यात नोकरी, जेवण, उपचार वगैरे सर्व मोफत आहे, म्हणजे जे वय चहा-सिगारेटमध्ये घालवलं जातं, त्यात 23 लाख 43 हजार 160 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी आहे. ती 4 वर्षे.


 तुम्ही 17 ते 23 वयोगटातील मुलांनी अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यात भरती होणे आवश्यक आहे.  समजून घ्या मोदी जी तुम्हाला सरकारी पैशाने 4 वर्ष सैन्य प्रशिक्षण देणार, सोबत एवढ्या पैशात नोकरी नाही, 12वी किंवा ग्रॅज्युएशन करून थेट अग्निपथच्या वाटेवर जा, हे तुमचे भविष्य आहे आणि आमचेही.


 त्यानंतर वयाच्या 24-25 व्या वर्षी सेवानिवृत्तीनंतर या पैशातून व्यवसाय सुरू करा, नाहीतर भारतीय लष्कराच्या प्रशिक्षणासोबतच लष्कराची शिस्तही तुम्हाला खूप उपयोगी पडेल.  जीवन आता ज्या मार्गाने जात आहे त्यापेक्षा नक्कीच चांगले आहे.  त्यामुळे अग्निपथ योजनेच्या निषेधाचा भाग बनू नका, तर समजून घ्या की सैन्यात मोठ्या प्रमाणात पोहोचू नये म्हणून तुमच्यासाठी असलेले आरक्षण आता संपले आहे.


  आणि विचार करा वयाच्या 24 व्या वर्षी सैन्याचे प्रशिक्षण घेऊन एकूण 0 ते 11 लाख रुपये, पगार म्हणून मिळणारे सगळे पैसे संपवले तरी निवृत्तीच्या वेळी मिळणारे 11 लाख 71 हजार रुपये कमी नाहीत.


 जास्तीत जास्त मुलांना सांगा 🏃🏃🏃सदस्यांना फॉरवर्ड करा

कांदा, कापूस, सोयाबीन संदर्भात दिलासा मिळणार राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

 कांदाकापूससोयाबीन संदर्भात दिलासा मिळणार

राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

 

            नवी दिल्ली, दि. 12 : कांदाकापूस आणि सोयाबीन संदर्भात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

             केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीनंतर श्री. पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले कीकापूससोयाबीन आणि कांदा पिकांच्या विषयासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि वाणिज्य मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

            श्री. पटेल यांनी बैठकीत कापूससोयाबीन आणि कांदा या पिकांसंदर्भात वस्तुस्थिती श्री. गोयल यांच्यासमोर मांडली.

            शेतमालाचे आयात-निर्यात धोरण व अनुषंगिक बाबी याबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असून लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल," असे श्री. पटेल यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi