Saturday, 13 July 2024

मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार

 मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील

शिक्षकांची रिक्त पदे भरणार

-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबई, दि. १२ : मराठवाडा विभागातील मुख्याध्यापकांची पदे लवकरच भरण्यात येतील. याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे उत्तर विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

            मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.

            श्री.केसरकर म्हणाले की, मराठवाडा विभागामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वर्ग-२ ची पदे रिक्त असल्यामुळे वर्ग च्या मुख्याध्यापकांना पदावनत करून वर्ग ३ चा दर्जा  दिलेला नाही. तसेच जी शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती लवकरच भरण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना योजनेतंर्गत लातूर शैक्षणिक विभागात एकूण ११६ आदर्श शाळा बांधकामे पूर्ण झाली आहेत.राज्यात जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियांनांतर्गत निजामकालीन शाळांच्या दुरूस्ती व बांधकामासाठी रूपये २०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत.

          या प्रश्नाच्या चर्चेत सर्वश्री ज.मो.अभ्यंकरकिरण सरनाईक,ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नव्हे, तर ते एक पवित्र अभियान

 विकसित भारताची संकल्पना हे एक लक्ष्य नव्हे, तर ते एक पवित्र अभियान

- उपराष्ट्रपती जगदीप धनखड

 

             मुंबईदि. 12 : विकसित भारत @2047 हे केवळ एक लक्ष्य नसून ते एक पवित्र अभियान आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. हे दशक भारताचे दशक आहे असे ठाम प्रतिपादन करत प्रत्येक नागरिकप्रत्येक संस्था आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी केले.

            उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी आज मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी - विद्यार्थिनीप्राध्यापकांना संबोधित केले. याप्रसंगी राज्याचे राज्यपाल रमेश बैसउपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेलएन एम आय एम एस अभिमत विद्यापीठाचे कुलपती अमरीश पटेलकुलगुरू रमेश भट उपस्थित होते.

            उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी 'भारताचे सक्षमीकरण : विकसित भारत 2047 घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिकायाविषयी विचार व्यक्त केले.

            ते म्हणाले,  2047 मधील विकसित भारतासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य आहे. मी यास 1947 नंतरचे हे दुसरे मिशन म्हणून पाहतो आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडवते आहे. शिक्षण नवोन्मेषाला चालना देतेआर्थिक वाढीला प्रोत्साहन देते आणि स्वप्ने तसेच महत्वाकांक्षासाठी मार्ग बनवते. शिक्षण हे व्यक्तीसमाजआणि देशाच्या विकासात मोठे काम करते. व्यक्ती आणि समाजाला सक्षम बनवण्याची शक्ती शिक्षणातून निर्माण होते.उच्च शिक्षण हे राष्ट्राच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे युवक व विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असून भविष्यातील देशाचे आधारस्तंभ आहेत.

            ते म्हणाले2047 मधील विकसित भारताला घडविण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान बहुमूल्य ठरणार आहे. विद्यार्थी व युवकांनी कोषामधून बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घ्यावाआजची युवा पिढी चांगल्या पद्धतीने विकसित झाली पाहिजेत. आपण अजूनही स्पर्धा परीक्षांच्या गराड्यात आहोत. फार प्राचीन काळापासून नालंदातक्षशिलाविक्रमशिला अशा सर्वोत्कृष्टनामांकित विद्यापीठांचाप्राचीन शिक्षण पद्धतीचा परंपरेचा वारसा भारताला लाभला आहे. या संस्थांनी भारताला एक शक्ती स्थानी बसवले आहे. जागतिक पटलावर भारत मुत्सद्देगिरीतील मोठी सुप्त शक्ती आहेया प्रेरणादायी इतिहासाचा उच्चार त्यांनी केला.

            उपराष्ट्रपती श्री.धनखड मार्गदर्शन करताना पुढे म्हणालेमनात जिद्द आणि चिकाटी असली की विदयार्थी कुठेही पोहचवू शकतो. युवकांनी बाहेर पडून भविष्यातील या संधीचा वेध घेतला पाहिजे.  पण काही नकारात्मक बाबींचा धोका देखील आहे त्या ओळखून त्यावर मात करता आली पाहिजे. जीवनामध्ये चांगला मार्ग निवडणे गरजेचे आहे यशासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका. कायद्याचा आदर करणे म्हणजे राष्ट्रवादाचा आदर,  लोकशाहीचा आदरआणि गुणीजनांच्या गुणवत्तेचा आदर करणे होय. म्हणूनचकायद्याच्या योग्यतेवर आपला विश्वास असला पाहिजे. न्यायापुढे सर्व समान असतात, असेही त्यांनी सांगितले.

            युवा पिढीसाठी असलेल्या अमर्याद संधींबाबत बोलताना उपराष्ट्रपती श्री.धनखड यांनी नवीन शिक्षण धोरण हे फक्त पदवी देणारे नसून माणूस घडवणारे ठरेल असे सांगितले. त्यांनी 1947 नंतर आतापर्यंत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. सरदार वल्लभभाई पटेलभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटित एकसंघ भारताच्या उभारणीतील योगदानाचा उल्लेख केला. आजची जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांसाठी आकर्षण असणारी तिसरी सर्वात मोठी भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे. युरोपीय युनियन मधील देशांसाठी महत्त्वाचे ठरली आहे.  जी20,  भारत मंडपमवर्ल्ड पार्लमेंट या घटना त्याच्या निदर्शक आहेत.  चांद्रयान मोहिमेचे यशस्टार्ट अप इंडियाग्रीन हायड्रोजन मिशनहर घर जलसोलर पॉवर होमडिजिटालायझेशनडी बी टीभारताचे निर्यातीतील बलस्थान अशा विकासाच्या अनेक पाऊलखुणांबद्दल त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे काम महत्त्वाचे आहे. अत्याधुनिक उद्योगांनी या उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये संशोधन व विकासासाठी प्रयोगशाळा म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले. या वेगात बदलणाऱ्या विकसित भारताच्यामध्ये योगदानासाठी युवा विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे सांगून नवी दिल्ली येथील नवीन संसद भवन येथे भेट देण्यासाठी त्यांनी या युवा विद्यार्थ्यांना आमंत्रण दिले.

कार्यक्रमात सुरुवातीस विद्यापीठाचे कुलपती श्री. पटेल यांनी उपराष्ट्रपती श्री. धनखड व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. खासदार श्री. पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू श्री. भट यांनी प्रास्ताविक केले.

000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आज शुभारंभ

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आज शुभारंभ

 

            मुंबईदि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र शासनाच्या या निर्णयावर आधारित राज्यात मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विकास विभागामार्फत  ग्रामीण व शहरी रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'  सुरू केली जात आहे. राज्यातील युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन  रोजगार  मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन मैदान येथे १३ जुलै रोजी सायंकाळी  ५.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीयुवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी शासन त्यांच्यासोबत आहे. १२ वी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्णपदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण यामधील युवकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. उद्योजक आणि बेरोजगार युवकांमध्ये  संवाद निर्माण करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

          मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असूनउमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील असावेउमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपयेआयटीआय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. तसेच कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने असणार आहे. या योजनेचा युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावाया प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावाअसे आवाहन मंत्री श्री. प्रभात लोढा यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे सचिव गणेश पाटीलमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

००००

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 

            मुंबईदि. १२ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा  विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास २ मिनिटे कामकाज

            विधानसभेत प्रत्यक्षात ९१ तास  २ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८८.४८  टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही ६७.७८ टक्के इतकी होती.

            विधानसभेत पुर्न:स्थापित १० शासकीय विधेयके मांडण्यात आली. त्यापैकी ८ विधेयके संमत झाली.  तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ४ असून ४ सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी मान्य केलेल्या  दोन सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

००००

विधान परिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

 विधान परिषदेचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित


            मुंबईदि. १२ : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.ही घोषणा उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी विधान परिषदेत केली.

            यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

            दि. २७ जून ते दि. १२ जुलै२०२४ या दरम्यान अधिवेशनाच्या  कामकाजात एकूण बैठकींची संख्या १३, प्रत्यक्षात झालेले कामकाज ६० तास, २६ मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज ४ तास ३८ मिनिटे, अन्य कारणांमुळे वाया गेलेला वेळ.

६ तास १० मिनिटेनवनिर्वाचित सदस्यांचा परिचय  ०४ सदस्य,  अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले ०२शोक प्रस्ताव ५, अभिनंदनपर प्रस्ताव १,

            तारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १४९४स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या ४२८उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या ५५ अशी होती.

            अतारांकित प्रश्न प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या २तारांकित प्रश्नांतून अतारांकित झालेल्या प्रश्नांची संख्या  ३५६,  प्राप्त झालेल्या उत्तरित प्रश्नांची संख्या (मागील सत्रातील स्वीकृत प्रश्नांसह) १८०, अल्पसूचना प्रश्न प्राप्त झालेली संख्या निरंक,स्वीकृत झालेली संख्या निरंक, उत्तरित झालेली संख्या निरंक            सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीसंबंधी अर्धा तास चर्चेच्या सूचना प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या - प्राप्त झालेली संख्या २४, स्वीकृत झालेली संख्या १३चर्चा झालेली संख्या ०१, इतर बाबीतील (सर्वसाधारण) प्राप्त झालेली संख्या ४१, स्वीकृत झालेली संख्या ३३, चर्चा झालेली संख्या ०४ 

            म.वि.प. नियम ९३ अन्वयेच्या सूचना : प्राप्त सूचना ५२स्वीकृत सूचनांची संख्या १३सभागृहात निवेदने झालेल्या सूचनांची संख्या १३, सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेली एकूण निवेदने ९म.वि.प.नियम २६० अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या ०४,

            म.वि.प.नियम २८९ अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या ३३, मान्य झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक, चर्चा झालेल्या प्रस्तावांची संख्या निरंक.

            शासकीय ठराव, सूचनांची संख्या १, लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ५४९, मान्य झालेल्या सूचनांची संख्या १२८,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या ३३विशेष उल्लेखाच्या सूचना प्राप्त सूचनांची संख्या  १९०, मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनांची संख्या : १५७.

औचित्याचे मुद्दे : प्राप्त झालेले औचित्याचे मुद्दे १०९मांडण्यात व पटलावर ठेवण्यात आलेले औचित्याचे मुद्दे  ८३, नियम ४६ अन्वये मंत्री महोदयांनी केलेली निवेदने  ०२,  नियम ४७ अन्वये केलेली निवेदने निरंक.

            अल्पकालीन चर्चा (म.वि.प.नियम ९७ अन्वये )प्राप्त सूचनांची संख्या ०८,  मान्य झालेल्या सूचनांची संख्या ०८, चर्चा झालेल्या सूचना निरंक.             

            शासकीय विधेयके – विधानपरिषद ०३, विधानपरिषद विधेयके पुरःस्थापित करण्यात आली ०३,संमत करण्यात आलेली विधेयके.

विधानसभा विधानसभा विधेयके पारित करण्यात आली ०६, विधानसभेकडे शिफारशीशिवाय परत पाठविण्यात आलेली विधेयके (धन विधेयक) ०३संयुक्त समितीकडे पाठविलेले विधेयकअशासकीय विधेयकेप्राप्त झालेल्या सूचना ०६स्वीकृत सूचना ०३, पुरःस्थापना ०३विचारार्थ ०३,

        अशासकीय ठराव : एकूण प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या ९०, स्वीकृत झालेल्या सूचनांची संख्या ७५,चर्चा झालेल्या सूचनांची संख्या निरंकअंतिम आठवडा प्रस्तावाची संख्या ०१सन्माननीय सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती ९० टक्के, कमीत कमी उपस्थिती ४४ टक्के, एकूण सरासरी उपस्थिती ७७.०८ टक्के

विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर

 विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर

 

      मुंबईदि. 12 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता आज 12 जुलै 2024 रोजी मतदान व मतमोजणी करण्यात आली.

            या निवडणुकीत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडेयोगेश कुंडलिक टिळेकर,डॉ.परिणय रमेश फुके,अमित गणपत गोरखेडॉ. प्रज्ञा राजीव सातवकृपाल हिराबाई बालाजी तुमानेभावना पुंडलिकराव गवळीशिवाजीराव यशवंत गर्जेराजेश उत्तमराव विटेकरसदाभाऊ रामचंद्र खोत आणि मिलिंद केशव नार्वेकर हे11 सदस्य विजयी झाले आहेतअशी घोषणा विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जितेंद्र भोळे यांनी केली.

            विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा श्यामसुंदर कायंदेविजय विठ्ठल गिरकरअब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणीनीलय मधुकर नाईकॲड. अनिल दत्तात्रय परब,रमेश नारायण पाटीलरामराव बालाजीराव पाटीलडॉ. वजाहत मिर्झा अथेर मिर्झाडॉ. प्रज्ञा राजीव सातवमहादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे 27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक घेण्यात आली होती.

000

महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

 महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवनउभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. १२: महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून सातत्याने अनेक कल्याणकारी योजना आखल्या. शासनाने गेल्या दोन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार केला आहे. लोकोपयोगी योजनांमध्ये शेतकरीकामगारमहिला-भगिनीयुवाज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याचे सांगत राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवर संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केलेल्या घोषणा अशा :

•           राज्यात वीरशैव कक्कय्या आर्थिक विकास महामंडळमहाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार

•           चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकास आराखड्यासाठी २५० कोटी देणार

•           मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास. सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यामध्ये वाढ

•           १५ वर्षाच्या आतील परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्याचा निर्णय

•           पालघरला विमानतळ करणार

विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीआम्ही गेली दोन वर्ष सुखाचा आणि समृध्दीचा मंत्र घेऊन राज्याचा गाडा रुळावर आणला. आम्ही जनतेच्या दारात जाऊन काम केलं. त्यांच्या समस्या सोडवितानाच हे राज्य सर्व आघाड्यांवर देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न केले. आज महाराष्ट्र देशात अनेक पातळ्यांवर अव्वल आहेही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सुखी कुटुंबाचा विचार..

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वर्षाला १८ हजार रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही देतोय.अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडरमहिलांना ५० टक्के तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभशेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठामुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहेयुवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १० लाख सुशिक्षित तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंडमहात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविलीज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजनाही आणली एका सुखी कुटुंबासाठी काय हवं काय नको याचा विचार करून सरकारने योजना आखल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नियम अटी बाजूला सारत शेतकऱ्यांना मदत

            नियम अटीं बाजूला सारत आम्ही शेतकऱ्यांना मदत केली. शेतकऱ्यांना १ रुपयांत पीक विमाकिसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे ३६ हजार कोटी रुपये दिले. ४४ हजार कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राबवतोयशासनाने १२३ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. त्यामुळे १६ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आम्ही दोन वर्षांत २८४ कोटींची मदत दिली आहे. आमच्या काळात २ लाख ३९ हजार कोटींची थेट परकीय गुंतवणुक आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीशासनाने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या संपूर्ण योजनांचा विचार केला, तर गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना ७५ हजार ७१० कोटींचा लाभ दिला आहे. अन्नदात्याच्या पाठिशी उभं राहता आल्याचे आम्हाला समाधान आहे. कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत नुकतेच राज्य सरकारला कृषी नेतृत्व समितीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारही मिळाला आहेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुन्हा मिळवली उद्योग स्नेही राज्याची ओळख

            आमच्या काळात गुंतवणूक आलीउद्योग आले आणि त्यातून रोजगारही निर्माण होत आहे. उद्योग स्नेही राज्य ही महाराष्ट्राची ओळख आम्ही पुन्हा मिळवली. राज्यात उद्योग येऊ लागल्याने त्याचा परिणाम परकीय गुंतवणुकीत दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम आहे. जुलै २०२२ ते आजतागायत १९१ उद्योगांना देकारपत्र दिले आहेत. राज्यात १ लाख ७१ हजार कोटी गुंतवणूक आणि १ लाख २० हजार रोजगार निर्माण होणार आहेत. राज्यात मेगा लेदर फूटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंटपीएम मित्रामल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क करण्यात येत आहे. राज्याचे आयटी धोरण तयार केले असून नवे वस्त्रोद्योग धोरणातून अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. रत्नागिरीमध्ये आंबा-काजू पार्क करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गेम चेंजर ठरणार

            मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीअशी ग्वाही देताना मराठवाडा वॉटर ग्रीड योजना या भागासाठी गेम चेंजर ठरणारी आहे. अनेक वर्ष या योजनेची चर्चा आहे. परंतुआम्ही ही योजना आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी मित्रा’ मार्फत जागतिक संस्थांकडून आवश्यक निधी उभारण्यासाठी कार्यवाही सुरू असून बोलणी अंतिम टप्प्यात आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर युद्धपातळीवर काम हाती घेण्यात येईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे

            राज्यात ८ लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू असल्याचे सांगत येत्या दोन वर्षांत मुंबईतले १०० टक्के रस्ते काँक्रिटचे होणार असून कोस्टल रोडची वरळीपर्यंतची मार्गिका आम्ही खुली केली आहे.  महिनाभरात सी लिंकलाही हा रस्ता जोडला जाईल. मुंबईचा हाच कोस्टल रोड आम्ही विरारहून पुढे डहाणूपर्यंत नेणार असून रेसकोर्सवर ३०० एकरमध्ये जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारतोयअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठाओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही

            आम्ही मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे १० टक्के आरक्षण दिले. हा निर्णय घेतल्यापासून शिक्षणपद भरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना लाभ झाला आहे. आमच्या शासनाने ५ हजार अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली. दोन वर्षांत १ लाख सरकारी पदभरती पूर्ण करण्यात आली. दरवर्षी १० लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही. आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित रहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे.

००००


 

वृत्त क्र. 851


Featured post

Lakshvedhi