Saturday, 13 July 2024

सन 2024 चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन

 सन 2024 चे महाराष्ट्र विधानमंडळाचे (पावसाळी) अधिवेशन

 

दोन्ही सभागृहात संमत विधेयके  : 10

(1)       महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(2)       सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक2024 (कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

(3)       महाराष्ट्र विनियोजन  विधेयक2024 (वित्त विभाग)

(4)      महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)

(5)       महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक2024 (वित्त विभाग)

(6)       महाराष्ट्र कर  विषयक   कायदे  (सुधारणा) विधेयक2024  (वित्त

विभाग)

(7)      महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक2024.

(8)       महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक2024 (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)

(9)       महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक2024 (नगर विकास विभाग)

(10)     महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक2024 (विधि व न्याय विभाग)

 

०००००


चौदाव्या विधानसभा कार्यकाळात

चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज मुंबई, दि. १२ : चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९६.६५ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.६७ टक्के इतकी होती. विधानसभेत पुर्न:स्थापित १९७ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी १८३ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण २८ सूचनांवर चर्चा झाली. १४ वी विधानसभा दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. तर सभागृहाची पहिली बैठक दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली.

प्रलंबित, तडजोडपात्र प्रकरणासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

 प्रलंबिततडजोडपात्र प्रकरणासाठी

२९ जुलै ते  ऑगस्ट २०२४ पर्यंत विशेष लोकअदालत सप्ताह

            मुंबईदि.   : लोकअदालतीद्वारे पक्षकारांना जलद गतीने मिळणारा दिलासा लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन केले आहेही विशेष लोकअदालत २९ जुलै ते  ऑगस्ट २०२४ या दरम्यान होणार आहे.

            लोकअदालतीमध्ये तडजोडीद्वारे निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे प्रकरणातील पक्षकारांसोबत शासन आणि समाज या दोन्ही घटकांना मोठा लाभ प्राप्त झाला आहेलोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहेन्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे सामंजस्यातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरिता लोकअदालत हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आलेले आहेयामुळे विशेष लोकअदालती मार्फत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडपात्र प्रकरणे लोकअदालतीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहेत.

            सर्वोच्च न्यायालयाने लोकअदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी  https://legalservices.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/MAHARASHTRA.pdf  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहेतरी ज्यांची प्रकरणे या यादीमध्ये असतील त्यांनी स्वतः अथवा किलांमार्फत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई किंवा संबंधि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून याचा लाभ पक्षकारांनी घ्यावाअसे आवाहन सदस्य सचिवमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांनी केले आहे.

            संपर्कासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे संपर्क क्रमांक (कंसातपुढीलप्रमाणे :  अकोला  (८५९१९०३९३०), बीड (८५९१९०३६२३), चंद्रपूर (८५९१९०३९३४), गोंदिया (८५९१९०३९३५), कोल्हापूर (८५९१९०३६०९), नांदेड (८५९१९०३६२६), धाराशिव (८५९१९०३६२५), रायगड (८५९१९०३६०६), सातारा (८५९१९०३६११), ठाणे (८५९१९०३६०४), यवतमाळ (८५९१९०३६२९), अहमदनगर (८५९१९०३६१६), अमरावती (८५९१९०३६२७), भंडारा (८५९१९०३९३६), धुळे (८५९१९०३६१८), जळगाव (८५९१९०३६१९), लातूर (८५९१९०३६२४), नंदरबार (८५९१९०३९३९), , परभणी (८५९१९०३६२२), रत्नागिरी (८५९१९०३६०८), सोलापूर (८५९१९०३६१३), वर्धा (८५९१९०३९३२), मुंबई (८५९१९०३६०१), छत्रपती संभाजीनगर (८५९१९०३६२०), बुलढाणा (८५९१९०३६२८), गडचिरोली  (८५९१९०३९३३), जालना (८५९१९०३६२१), नागपूर (८५९१९०३९३१), नाशिक (८५९१९०३६१५), पुणे (८५९१९०३६१२), सांगली (८५९१९०३६१०), सिंधुदूर्ग (८५९१९०३६०७), वाश (८५९१९०३९३७आणि मुंबई उपनगर (८५९१९०३६०२).

000

विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाची लक्षणीय कामगिरी

 विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शासनाची लक्षणीय कामगिरी

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबईदि. 12 : मागील दोन वर्षात विविध क्षेत्रात राज्य सरकारने प्रकल्प हाती घेतले असून अटल सेतूसागरी किनारा मार्गसमृद्धी महामार्गमेट्रोसिंचन आदी प्रकल्पांच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी केली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. अटल सेतू हा आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा सागरी सेतू असून अटल सेतू तसेच सागरी किनारा मार्ग हे केवळ मुंबईचेच नाहीतर भारताचा अभिमान असलेले प्रकल्प आहेतअसे त्यांनी सांगितले.

            नियम 259 अन्वये मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला श्री.फडणवीस उत्तर देत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या कामगिरीचा आढावा घेतला. 

सिंचन आणि पाणी पुरवठा

            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेशासनाने 123 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे ज्याची किंमत एक लाख 347 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे 16 लाख 57 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत आहे. विदर्भातील सिंचनाचा मोठा अनुशेष दूर करण्यात येत आहे. महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला आता राज्यपालांनी मान्यता दिली आहे. मराठवाडा विभागात एकूण एक हजार 66 सिंचन प्रकल्प असून 948 पूर्ण झाले असून 11.88 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. कृष्णा कोयनाटेंभू या प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील प्रकल्पांची कामेही करण्यात येत आहेत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी सल्लागार नियुक्तीचे काम प्रगतीपथावर आहे. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे 10.64 टीएमसी पाणी मिळून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी

            राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांचे वीज पंप हे सात अश्वशक्तीच्या आतील आहेत. त्यामुळे सात अश्वशक्तीच्या आतील पंपांना वीज बिल माफी देण्यात आली आहे. मागेल त्याला सौप पंप योजना हाती घेतली आहे. यासाठी नऊ लाख पंप मंजूर करण्यात आले असून मागील वर्षीपर्यंतचे एक लाख 24 हजार 130 पंप दिले असून केवळ 30,821 पेड पेंडिंग राहिले आहेतहे याच वर्षात दिले जाणार आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या भावात कमतरता आल्याने राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात मदतीचे पैसे देण्यात येणार आहेत.

रस्ते प्रकल्प

            मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई शहर विभागात 396 किमीचे रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराने निविदा अटीचे पालन न करणाऱ्या कंत्राटदाराचे काम रद्द करण्यात आले असून त्याला दंडही ठोठावण्यात आला. दुसऱ्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरात 516 किमी ची 216 कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्व 182 किमीची 89 कामे सुरू होती यातील 19 कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यात 910 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो मुंबई महापालिकेच्या पैशातून करण्यात आलेला नाहीकेवळ राजशिष्टाचाराच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेला खर्च करण्यात आलेला आहे.

            भेंडीबाजार भागात अर्बन रिन्युअलचे उत्कृष्ट काम सुरू आहे. धारावीचे पुनर्वसन धारावीतच असेच नियोजन करून प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हा देशातला सर्वात मोठा नागरी विकास प्रकल्प सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            शिक्षक भरती प्रक्रियेत सुमारे 11,885 शिक्षकांची भरती झाली असून 6745 शिक्षक रुजू देखील झाले आहेत. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. यातून शाळांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. माझी शाळासुंदर शाळा या उपक्रमामुळे शाळांमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

 

कायदा व सुव्यवस्था

            राज्यात गंभीर गुन्ह्यात तीन टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली असून दोषसिद्धीच्या प्रमाण 45 टक्के म्हणजेच 3.2 टक्क्यांनी वाढले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईच्या संख्येत देखील वाढ झाली. डायल 112 वर पोलिसांचा प्रतिसाद कालावधी 2022 मधील 15.41 मिनिटांच्या तुलनेत आता 6.30 मिनिटांवर आला आहे. महिला अत्याचारामध्ये मे 2023 च्या तुलनेत 3.6 टक्क्यांची घट झाली आहे. तर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढले आहे. नागपुरमधील बेपत्ता झालेल्या मुलींपैकी परत आलेल्यांचे प्रमाण 97 टक्के असून नागपूरमधील परिस्थिती दाखविली जाते तितकी वाईट नसल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांविषयीच्या गुन्ह्यांच्या बाबतीत शासन अतिशय संवेदनशील असल्याचे त्यांनी सांगितले. वाळू माफियांवरील कारवाईमध्ये यावर्षी मे महिन्यापर्यंत 1849 जणांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. मराठा आंदोलकांवर 31 जानेवारी 2024 पूर्वी दोषारोप दाखल झालेले 157 गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली आहे. 53 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस करण्यात आली आहे तर काही गुन्हे समितीच्या विचारार्थ असल्याचे ते म्हणाले. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया असून दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी कोर्टात जावे लागतेते परस्पर सरकारला मागे घेता येत नाहीतअसे त्यांनी सांगितले.

पोलीस भरती

            पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून दोन वर्षात जवळपास 42 हजार पोलिसांची भरती करण्यात येत आहे. 18 हजार पदांची भरती प्रकिया झाली असून 17 हजार पदांची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच आणखी नऊ हजार पोलीस भरतीची जाहिरात दिली जाणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने बांधली जात असून त्यांच्या वैद्यकीय उपचारांची सोय करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबईतील महापे येथे 837 कोटी रुपयांच्या खर्चाचा सायबर सिक्युरिटी प्रकल्प सुरू होत असून हा देशातील सर्वात डायनॅमिक प्रकल्प आहे. यामुळे बँकेतील गेलेले पैसे परत मिळवण्यातील रिस्पॉन्स टाइम कमी होण्यास मदत होणार आहे. इतर राज्यांनीही असा प्रकल्प सुरू करावा अशी सूचना केंद्र सरकारने इतर राज्यांना केली आहे. कोतवालांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

 

खास महिलांसाठी... ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

 खास महिलांसाठी...

‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

 

          महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यातयासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे.

          राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठीत्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.

       राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणेमहिलांचे आर्थिकसामाजिक पुनर्वसन करणेराज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणेमहिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

          या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला 1 वर्षात 18 हजार रूपये मिळणार आहेत.

       या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यादृष्टीने आपल्या शासनाने अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 या वयोगटातील विवाहितविधवाघटस्फोटितपरित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

          या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. जिथे अशक्य आहेतिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविकासेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल. आणि घरच्या घरी  मोबाईलवरुनही नारीशक्तीदूत अँपवरून ऑनलाईन अर्ज भरता येईल.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-

  २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ

  लाभार्थी  महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे  आवश्यक.

 लाभार्थी महिलेच्या बँक  खाते असणे  आवश्यक .

 लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक  उत्पन्न 2.50 लाख  रूपयांपेक्षा जास्त  नसावे

 पिवळे व  केशरी   रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला  प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.

 विवाहित,विधवाघटस्फोटीत,परितक्त्यानिराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.

 योजनेचा लाभ  मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र  नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्डमतदार ओळखपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्रजन्मदाखला यापैकी  ग्राह्य   धरण्यात येणार आहे.

 परराज्यात  जन्म  झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह  केला असल्यास पतीचा  जन्मदाखलाशाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा  अधिवास प्रमाणपत्र   ग्राह्य धरण्यात  येणार आहे.

या  योजनेचा लाभ  मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 योजनेच्या  लाभासाठी ऑनलाईन अर्ज.

 लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.

 महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला

 सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा  दाखला.

 बॅक खाते पासबुकच्या पहिल्या   पानाची छायांकित प्रत.

 पासपोर्ट  साईजचा फोटो.

 रेशन कार्ड

 या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

 

या योजनेत अर्ज कसा करता येईल ?

 ज्या   महिलेस  ऑनलाईन अर्ज करता येत नसेलत्याच्यासाठी अर्ज  भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध आहे.

 अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी  यांनी  ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम  अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल

 अर्ज करण्याची  प्रक्रिया  विनामूल्य आहे.

 अर्जदार  महिलेने  स्वत:  अर्ज  करताना उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो  काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल.

      महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसोबत सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राज्य शासन पाठीशी उभे आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात असून महिलांना आर्थिक आधार देण्यात येत आहे.

0000

- वर्षा फडके- आंधळे

वरिष्ठ सहायक संचालक ( माहिती)


राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी

 राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

            मुंबईदि. १२ : गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरीकष्टकरीमहिलाज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

            २७ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यविधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

            मुख्यमंत्री पुढे म्हणालेया सरकारच्या काळातील हे शेवटचे अधिवेशन होते. राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरु केल्या. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’अन्नपूर्णा योजनाशेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची योजनातीन गॅस सिलेंडर देण्याची योजना आणि युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत १० लाख सुशिक्षित युवकांना १० हजार रुपये स्टायपेंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे समाजातील विविध घटक सरकारच्या कामावर समाधानी असल्याचे  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            मंत्रिमंडळातील सहकारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांच्या सहकार्याने हे अधिवेशन सुरळीतपणे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

००००


Featured post

Lakshvedhi