Friday, 12 July 2024

स्वयं अर्थसहाय्यित शाळांना आवश्यक सहकार्य करणार

 स्वयं अर्थसहाय्यित शाळांना आवश्यक सहकार्य करणार

-   शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबई, दि.१२ : राज्य विधिमंडळाने महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम२०१२ संमत केलेला असून त्याअनुषंगाने महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) नियम२०२० करण्यात आले आहेत. त्यानुसार स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचे अधिकार हे शिक्षण विभागाला नसून अधिनियमता सुधारणा करण्याचा अधिकार सभागृहाला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात सांगितले. 

            स्वयं अर्थसहाय्य तत्वावर मान्यताप्राप्त शाळांच्या दर्जावाढ,नवीन परवानगीसाठी अट या संदर्भात सदस्य ज्ञानेशवर म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.केसरकर विधानपरिषदेत बोलत होते.

            स्वयं अर्थसहाय्यीत शाळांना आवश्यक ते सहकार्य शासन करेलयामध्ये कुठल्याही प्रकारे शाळांची मान्यता रद्द करण्यात येत नसून स्वयंसहाय्यीत शाळांना स्व अर्थसहाय्याची मुभा देण्यात आली आहे. अधिनियमात विद्यार्थाच्या दीर्घकालीन शिक्षणाचे हीत लक्षात घेता संबंधित संस्थेच्या नावाने जमीन असणे किंवा संस्थेच्या नावाने ३० किंवा त्याहुन अधिक वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करणे आवश्यक आहे.             शाळेचे आर्थिक स्थैर्य जोपासण्याच्या दृष्टीने अधिनियमामध्ये दान निधीची निर्मिती करण्यासंबंधात तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसारसंस्थेच्या व शिक्षणाधिकारी यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेतील किमान ३ वर्ष मुदतीची संयुक्त मुदतठेव (FD) बाबत तरतूद करण्यात आली आहे. सदर मुदतठेव ही एकप्रकारे तारण म्हणून ठेवण्यात येते. तसेचअधिनियमातील तरतुदींनुसार शाळा मान्यतेसाठी करावयाच्या अर्जासोबत भरावयाचे शुल्क शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. सन २०१२ ते २०२२ पर्यंत शाळा मान्यतेसाठी ऑफलाईन पद्धतीने मान्यता देण्यात येत होती. तदनंतरराज्यातील शाळांना मान्यता देण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ऑगस्ट २०२२ पासून सदर प्रक्रीया ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्य शासनाद्वारे दि. जानेवारी २०२२ व दि. नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष कार्यक्रम आयोजित  एकूण ४०४ इरादा पत्र आणि मान्यता पत्र वितरीत केले आहेत. गेल्या दोन वर्षामध्ये संस्थाना १४४५ के इरादापत्र व ६३९ इतके मान्यतापत्र देण्यात आले आहेत.  यासंदर्भात कोणत्याही संस्थेची किंवा शाळेची शासनाकडे तक्रार प्राप्त असल्याचे दिसून येत नाही. तसेच ३० ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षणसंचालक (प्राथमिक)महाराष्ट्र राज्य यांच्याकडे बैठक योजित करण्यात आली होती.तथापि अधिनियमातील अटी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास क्षेत्रीय स्तरावरुन प्राप्त झालेला नाहीअसे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

            या चर्चेत सदस्य किरण सरनाईक, जयंत आसगावकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व्यवहारांतील दोषींवर कारवाई

 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व्यवहारांतील दोषींवर कारवाई

-  सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबई,दि. १२ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कामकाजाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुंषगाने विभागीय सहनिबंधक ,सहकारी संस्था कोल्हापूर यांनी केलेल्या चौकशीनुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. जबाबदारी  निश्चितीसाठी  प्राधिकृत अधिका-याची नेमणूक करुन त्यानुसार चौकशी सुरु आहेअसे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सांगली या बॅंकेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या पार्श्वभुमीवर शासनाने करावयाच्या कार्यवाही व उपाययोजनाबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.वळसे पाटिल बोलत होते.

            सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जदार संस्थांना बोगस कर्ज वाटप केल्याचे निदर्शनास आलेले नाही. तथापिविभागीय सहनिबंधकसहकारी संस्था (लेखापरीक्षण) कोल्हापूर यांनी केलेल्या चौकशीनुसार बँकेने सन २०१२-२०१३ व २०१९-२०२० या कालावधीत ३ कंपन्यांना मंजूर केलेल्या कर्जप्रकरणात अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. बँकेने सन २०१९ या कालावधीत केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीत २ उमेदवारांनी अनुभवाचे बोगस दाखले सादर केल्याचे आढळून आले आहे. त्यानुषंगाने या तांत्रिक कर्मचाऱ्यांवर बँकेच्या स्तरावरुन कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री श्री.वळसे पाटील यांनी सांगितले.

            बँकेच्या कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या आदेशान्वये  डी. टी. छत्रीकरविभागीय सहनिबंधकसहकारी संस्था (लेखापरीक्षण)कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. सदर चौकशी समितीने  तिचा अहवाल सहकार आयुक्त यांना सादर केला आहे. सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थाकोल्हापूर यांनी  कलम ८३ अन्वये चौकशी करण्यासाठी उपनिबंधकसहकारी संस्थाकराड यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. चौकशी अधिकारी यांनी त्यांचा अहवाल सादर केला आहे. सदर अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे तांत्रिक पदांच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थाकोल्हापूर यांनी कलम ७९ अन्वये बँकेस निर्देश दिले आहेत.

            बँकेने  ६ मालमत्ता रारफेसी कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने रु. २६४ कोटी एवढ्या रकमेस खरेदी केल्या आहेत. त्यापैकी २ मालमत्ता बँकेने भाडेतत्वावर चालविण्यास दिल्या असून ४ मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत. विभागीय सहनिबंधकसहकारी संस्थाकोल्हापूर विभागकोल्हापूर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६० चे कलम ८८(१) अन्वये जबाबदारी निश्चितीसाठी उपनिबंधकसहकारी संस्थाकोल्हापूर शहर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यानुसार सध्या चौकशीचे कामकाज सुरु असल्याचे मंत्री श्री.वळसे पाटील यांनी सांगितले. या चर्चैत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

निवासी आदिवासी आश्रमशाळेची वेळ विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊनच -

 निवासी आदिवासी आश्रमशाळेची वेळ

विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊनच

- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत

            मुंबईदि. १२ - आदिवासी आश्रमशाळा या निवासी स्वरूपाच्या आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही तेथेच राहून विद्यार्थ्यांना समजून घेणेत्यांच्याशी संवाद राखणे अभिप्रेत आहे. या अनुषंगाने विद्यार्थी सकाळी लवकर उठावेतत्यांना शिस्त लागावी यासाठी शाळेची वेळ सकाळी 8.45 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य किशोर दराडे यांनी आश्रमशाळेची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य सर्वश्री सत्यजित तांबेआमश्या पाडवीसुधाकर अडबालेधीरज लिंगाडेकिरण सरनाईकप्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

            आश्रमशाळेच्या वेळेबाबत समर्थन करताना मंत्री डॉ. गावित म्हणाले कीआदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी निवासी पद्धतीने आश्रमशाळा चालविल्या जातात. मुख्याध्यापकशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांसमवेत जास्तीत जास्त वेळ राहून त्यांचे शिक्षण चांगले होईलत्यांच्यावर चांगले संस्कार होतीलयाची दक्षता घेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांसाठी निवासस्थाने बांधण्यास देखील सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांचे वेतन वेळेत होतीलयाची दक्षता घेण्यात येईलअसेही ते म्हणाले.

            विद्यार्थ्यांसाठी शाळेची वेळ काय असावी याबाबत तज्ज्ञांचे मत घेऊन संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा करावी तसेच विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत सर्व सुविधा मिळाव्यातअशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने केली.

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार

 विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबई, दि. १२ : शासकीय महाविद्यालयेशासन अनुदानितअशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            मंत्रालयात राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीतंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकरउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरउपसचिव अशोक मांडेमुंबई विद्यापीठाचे निबंधक श्री. गायकवाडएसएनडीटी विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीराज्यातील शासकीय महाविद्यालयेशासन अनुदानित अशासकीय महाविद्यालयेअंशतः अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठेशासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसशासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) (व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकीज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क  घेण्यात येऊ नयेत.

            जर विद्यापीठमहाविद्यालय यांनी शिक्षण शुल्कपरीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा सूचना मंत्री श्री.  पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना बैठकीमध्ये दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/


 

वृत्त

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विधानसभेच्या 274 सदस्यांनी बजावला मतदानाचा

 विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत

विधानसभेच्या 274 सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

            मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी आज सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी विधानसभेतील एकूण 274 सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही मतदान प्रक्रिया पार पडली.

            यावेळी विधानभवनाचे सचिव जितेंद्र भोळे तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

 परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी

५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

 

            मुंबईदि. १२ : परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिकउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीतअसे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            श्री. पाटील यांनी म्हटले आहे कीवाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन रुपये ५० आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विलंब शुल्क माफ करणे / विलंब शुल्काच्या आकारणीमधून सूट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन धारकांच्या संघटना यांच्याकडून शासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती. शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन विधानसभा सभागृहात निवेदनाव्दारे १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. त्यासअनुसरुन शासनाने दि.११ जुलै २०२४ रोजीच्या निर्देशाद्वारे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.  सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणासाठी प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सादर करावीतअसेही परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी म्हटले आहे.

००००

Jago बच्चो Jago


 

Featured post

Lakshvedhi