Thursday, 11 July 2024

हागाई भत्ता 50टक्के झाला हा

 


नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज

 नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज

 

            मुंबईदि. १० : राज्य शासनाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत.

            मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविकापर्यवेक्षिकासेतू सुविधा केंद्रग्रामसेवकसमूह संसाधन व्यक्तीआशा सेविकालाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने)महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेलतर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड१५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्रशाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे. परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेलतर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे.

            उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्रपिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी  रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अनिवार्य नाही. मात्रअसल्यास अपलोड करावी.

            अंगणवाडी सेविकापर्यवेक्षिकासेतू सुविधा केंद्रग्रामसेवकसमूह संसाधन व्यक्तीआशा सेविकांनी करावयाची कार्यवाही : अर्जदाराने सर्व माहिती अचूक भरल्याबाबतची खातरजमा करावीअर्जदार महिलेचा बँक तपशील व त्यासंबंधीची कागदपत्रे तपासून घ्यावीत. बँक खाते आधार संलग्न आहे किंवा कसे याची नोंद घ्यावी. नसल्यास आधार संलग्न करण्याबाबत संबंधित महिलेला माहिती द्यावी. अर्जदारास इतर आवश्यक ते सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अर्जदाराकडून त्रुटी पूर्तता करून घ्यावी. तालुकास्तरीय समितीने तयार केलेल्या तात्पुरत्या यादीबाबत आक्षेप आल्यास आक्षेप एकत्रित करून तालुका समितीकडे सुपूर्द करावेत. तालुका समितीच्या सूचनानुसा कार्यवाही करावी.

            तालुकास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : क्षेत्राची माहिती संकलित करणेक्षेत्रीय यंत्रणांना मार्गदर्शन करणेलाभार्थी महिलांची गावनिहाय तात्पुरती यादी तयार करून प्रसिद्ध करणेवेळोवेळी बैठका घेणेप्राप्त आक्षेपत्रुटींची पूर्ततेची यादी पडताळणी करून तात्पुरती सुधारित पात्रअपात्रतेची यादी जिल्हा समितीकडे सादर करणे.

            जिल्हास्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : प्राप्त झालेल्या यादीची तपासणी करून अंतिम यादी तयार करणेयोजना अंमलबजावणी आढावा घेणेप्रचार- प्रसिद्धी करणेयोजनेसाठी लागणाऱ्या निधीची मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे.

            राज्यस्तरीय समितीने करावयाची कार्यवाही : मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ कक्ष व कॉल सेंटर कार्यान्वित करणेयोजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेणेयोजनेसाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे आवश्यकतेनुसार मागणी व मार्गदर्शक सूचनेनुसार अन्य कार्यवाही करणे असे कामकाज आहे.

००००

Wednesday, 10 July 2024

अष्टविनायक’ देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

 अष्टविनायक’ देवस्थान येथे भाविकांना

सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

 

            मुंबई दि. १० : राज्यातील मोरेश्वर (मोरगाव)सिध्दीविनायक (सिद्धटेक)बल्लाळेश्वर (पाली)वरदविनायक (महाड)चिंतामणी (थेऊर)गिरीजात्मक (लेण्याद्री)विघ्नेश्वर (ओझर)महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या देवस्थानी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यातअशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात आज अष्टविनायक देवस्थानएकवीरा व पुणे येथील तारकेश्वर मंदिर देवस्थानातील सुरक्षितता या बाबतीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजविशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके,गृह विभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटेपुणे,रायगडअहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी तसेच अष्टविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या कीस्थानिक प्रशासनाने आणि देवस्थान ट्रस्टने समन्वयाने काम करून भाविकांना चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्यात. ज्यामुळे भाविकांना आंनदीदायी वातावरण तयार झाले पाहिजे. देवस्थानाच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घ्यावी. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना मंदिराच्या प्रथा- परंपरा जपाव्यात. प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था असावी. घनकचरा व्यवस्थापनासह पार्किंग व्यवस्थाशुध्द पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात.

            देवस्थान ट्रस्टच्या अतिरिक्त जमिनी चांगल्या सार्वजनिक उपक्रमांसाठी वापराव्यात.तेथील दळण- वळणाची व्यवस्थाअंतर्गत रस्त्यांची देखभाल करण्यात यावी.अष्टविनायक मंदिर व परिसर चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे. भाविकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात यावी. देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सूचना फलकसिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करावीअसेही त्यांनी सांगितले. देवस्थान विकास कामांसाठी आवश्यक ते प्रस्ताव सादर करावेत. म्हणजे संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची व्यवस्था करता येईल. एकविरा देवी व पुणे येथील तारकेश्वर मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने देवस्थानच्या दागिन्यांच्या व अन्य संपत्तीच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

            देवस्थानच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विशेष पुढाकार घेत असल्याबद्दल अष्टविनायक देवस्थानाच्या शिष्ट मंडळाच्या वतीने यावेळी डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.

पायाभूत प्रकल्पांची कामे करताना नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्यावी

 पायाभूत प्रकल्पांची कामे करताना

नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घ्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            मुंबई, दि. 10 : वांद्रे - वर्सोवा कोस्टल रोडच्या कामामध्ये एक कनेक्टर गजधर बांधसांताक्रूझ पश्चिम या ठिकाणी येणार आहे. हा कनेक्टर जेथे उतरणार आहे तेथील पुलाच्या खालील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना नागरिकांना समस्या जाणवणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            विधानभवन येथे वांद्रे क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमंत्री अतुल सावेआमदार ॲड. आशिष शेलारआमदार अमित साटमआमदार अतुल भातखळकरगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायरगृह विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागीम्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वालझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकरनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीवांद्रे पश्चिम परिसरातील विविध पायाभूत सुविधांचा विकास करत असतानाक्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच भूसंपादन करताना त्यांचे पुनर्वसन होईल याची दक्षता घ्यावी.  वांद्रे संक्रमण शिबिरातील गाळेधारकांना त्याच ठिकाणी पक्की घरे तसेच झोपडीधारकांचे परिशिष्ट-2 बनवून पुनर्विकासाची प्रक्रिया नियम व अटी तपासून सकारात्मकपणे राबवावी. तसेच म्हाडाच्या मैदान क्र. १ बांद्रा रेक्लमेशन या मैदानात देखभाल व दुरुस्तीतसेच खार आणि वांद्रे येथे ५०० चौ. फुटाचे समाजमंदिर बांधण्यासाठी म्हाडा कडून नाहरकत (NOC) प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नियम तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            ‘ओएनजीसी’च्या ‘सीएसआर’ निधीतून संपूर्ण प्रोमोनाडचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरणज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बनवण्याबाबत, वांद्रे रिक्लेमेशन येथे रँम्प रोड तयार करणेकोळीवाडे व गावठाणमधील घरांच्या पुनर्विकासकोळीवाड्यात घरांची दुरुस्तीसाठीकोळीवाडे व गावठाणमधील घरांसाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये स्वतंत्र तरतूद करणेफनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाबाबतवांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पआर.व्ही टेक्निकल हायस्कूल येथे स्कील डेव्हलपमेंट सेंटर सुरु करण्यासंदर्भातील कामांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला.

राघवेंद्र स्वामी यांच्या 'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी'च्या मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 राघवेंद्र स्वामी यांच्या 'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी'च्या

मराठी टीकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

            मुंबई, दि. १० : श्रीक्षेत्र मंत्रालयम्येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या 'श्रीकृष्णचारित्र्यमंजिरीया लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १० जुलै) राजभवन मुंबई येथे करण्यात आले.

            यावेळी श्री राघवेंद्र स्वामी मठमंत्रालयम् येथील विद्यमान पिठाधिपती स्वामी सुबुधेन्द्र तीर्थमुंबई येथील मठाचे विश्वस्त रामकृष्ण तेरकर व अनुवादकर्ते प्रा. गुरुराज कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.    

            मंत्रालयमआंध्र प्रदेश येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी वेदउपनिषदप्रभू राम चरित्र व श्री कृष्ण चरित्र यांसह विविध विषयांवर लिखाण करून वेदांचे सार सोप्या भाषेत सामान्य जनांना उपलब्ध करून दिले.

            'श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरीकेवळ २७ श्लोकांचे संकलन असले तरीही ते श्रीमद भगवद्गीते प्रमाणे सारगर्भित असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या ग्रंथावरील टीका प्रा. कुलकर्णी यांनी मराठी भाषेत आणल्यामुळे हा ग्रंथ मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. हा ग्रंथ हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये देखील अनुवादित केला जावा तसेच त्याचे ऑडिओ बुक देखील तयार केले जावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

            श्री राघवेंद्र स्वामी यांनी ३५० वर्षांपूर्वी मंत्रालयम येथे संजीवन समाधी घेतली. आपल्या जीवनकाळात त्यांनी ४८ ग्रंथांची निर्मिती केली. रामायण व महाभारताचे सार त्यांनी लिहिले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. द्रविड देशातील भक्ती - ज्ञानाची अभिवृद्धी महाराष्ट्रात झाली, असे सांगून श्रीकृष्ण चारित्र्य मंजिरी ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरित झाल्याबद्दल पिठाधिपती सुबुधेन्द्र तीर्थ यांनी आनंद व्यक्त केला.

0000

Maharashtra Governor releases Marathi version of

Raghavendra Swamy's ShriKrishna Charitrya Manjiri'

      Mumbai, 10th July : Maharashtra Governor Ramesh Bais released the Marathi commentary of the 'Shrikrishna Chatritrya Manjiri' originally written in the 17th Century by Shri Raghavendra Swamy of Mantralayam at Raj Bhavan Mumbai on Wed (10 July).

            Chief Pontiff of the 'Mantralayam' Shri Raghavendra Swamy Mutt Swami Subudhendra Teertha, trustee of the Mumbai Mutt Ramakrishna Terkar and translator Prof Gururaj Kulkarni were prominent among those present.

सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या वसतिगृहांचे संरचनात्मक परीक्षण सहा महिन्यांत करणार

 सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या वसतिगृहांचे

संरचनात्मक परीक्षण सहा महिन्यांत करणार


- मंत्री गुलाबराव पाटील


            मुबंई, दि. 10 : राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या सर्व वसतिगृहांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चर्ल ऑडिट) येत्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करुन त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या मराठवाड्यातील वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री श्री.पाटील बोलत होते.


            मराठवाडा विभागात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत ५१ वसतिगृह येतात.त्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मधील किलेअर्क येथील शासकीय वसतिगृह इमारतींची सार्वजनि्‌क बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनांनुसार या इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी २ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या सर्व वसतिगृहांचे परीक्षण येत्या सहा महिन्यांत करण्यात येईल. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या देखरेखीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागात स्वतंत्र कक्ष कार्यरत केल्यास तत्परतेने वसतिगृहांची दुरस्ती, देखरेख संदर्भातील कामे करता येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.


            या प्रश्नाच्या चर्चैत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य वजाहत मिर्जा, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.


००००

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत बायोमायनिंग प्रकल्पासाठीचे कार्यादेश महिन्याभरात

 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत

बायोमायनिंग प्रकल्पासाठीचे कार्यादेश महिन्याभरात

- मंत्री उदय सामंत

            मुबंई, दि. 10 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात  देण्यात येतीलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत बायोमायनिग प्रकल्पासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून यामध्ये तीन निविदा पात्र ठरल्या आहेत.  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रियेमध्ये अटींचा समावेश करण्यात आला आहे.  या पात्र ठरलेल्या निविदांचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतीलअसे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

            या प्रश्नावरील चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi